BASH/C3/Arrays-and-functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Arrays-and-functions
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, functions, array function, return function
Time | Narration |
00:01 | नमस्कार.
Arrays & functions वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत. |
00:11 | फंक्शनमधे array पास करणे |
00:14 | फंक्शनमधे exit स्टेटमेंट वापरणे |
00:17 | फंक्शनमधे return स्टेटमेंट वापरणे |
00:20 | हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ. |
00:24 | ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे. |
00:29 | तुम्हाला BASH मधील arrays आणि if स्टेटमेंटचेही ज्ञान असावे. |
00:36 | नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:43 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00:46 | उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:50 | GNU BASH वर्जन 4.2 |
00:54 | पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
01:02 | प्रथम फंक्शनमधे array पास करणे आणि त्याचा वापर ह्याबद्दल जाणून घेऊ. |
01:09 | मी function_(underscore)array dot sh फाईल उघडत आहे. |
01:15 | ही shebang line आहे. |
01:18 | array_(underscore) display हे फंक्शनचे नाव आहे. |
01:22 | ओपन कर्ली ब्रॅकेटने function definition ची सुरूवात होते. |
01:27 | Dollar @(at-sign) चा उपयोग आपण मागील पाठात जाणून घेतला होता. |
01:34 | मुळात हे फंक्शनमधे पास केलेली सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट करण्यासाठी वापरतात. |
01:40 | Dollar @ (at sign) गोल कंसात लिहिल्याने array व्हेरिएबलमधे 'array' एलिमेंटस संचित होतील. |
01:47 | Dollar महिरपी कंस सुरू array चौकटी कंसात @(At-sign) महिरपी कंस पूर्ण |
01:55 | कोडची ही ओळ ऍरेचे सर्व एलिमेंटस दाखवेल. |
02:00 | Dollar महिरपी कंस सुरू array चौकटी कंसात one महिरपी कंस पूर्ण |
02:08 | कोडमधील ही ओळ ऍरेचे दुसरे एलिमेंट दाखवेल. |
02:14 | Operating_systems हा ऍरे Ubuntu, Fedora, Redhat आणि Suse ह्या एलिमेंटसच्या द्वारे घोषित केला आहे. |
02:22 | येथे operating_systems हा ऍरे 'array_display' फंक्शनमधे पास केला आहे. |
02:29 | फंक्शनमधे ऍरे पास करण्याचा सिंटॅक्स असा आहे function_name space dollar महिरपी कंस सुरू array_name चौकटी कंसात @(At sign) महिरपी कंस पूर्ण. |
02:45 | प्रोग्रॅमवर जा. |
02:48 | तसेच colors हा ऍरे White, green, red आणि blue ह्या एलिमेंटसद्वारे घोषित केला आहे. |
02:57 | येथे colors हा ऍरे array_display ह्या फंक्शनमधे पास केला आहे. |
03:02 | आता फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा. |
03:07 | टाईप करा:
chmod space plus x space function underscore array dot sh |
03:18 | एंटर दाबा. |
03:19 | टाईप करा:
dot slash function underscore array dot sh |
03:25 | एंटर दाबा. |
03:27 | 'operating_systems' आणि 'colors' ऍरेजचे एलिमेंटस येथे दिसत आहेत. |
03:33 | आणि 'operating_systems' आणि 'colors' ह्या ऍरेजची दुसरी एलिमेंटस देखील दाखवली आहेत. |
03:41 | Bash मधे 'exit' आणि 'return' स्टेटमेंटस आपल्याला प्रोग्रॅम किंवा फंक्शनचा स्टेटस कोड देतात. |
03:49 | return स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या स्क्रिप्टकडे आपण परत जातो. |
03:54 | exit स्टेटमेंटमुळे जिथून फंक्शन कॉल केले होते त्या पूर्ण स्क्रिप्टमधून आपण बाहेर पडतो. |
04:01 | फंक्शनमधून परतण्याच्या ह्या दोन्ही पध्दती आपण बघू. |
04:06 | मी 'return_exit.sh' फाईल उघडत आहे. |
04:12 | ही shebang line आहे. |
04:14 | return_(अंडस्कोर)function हे फंक्शनचे नाव आहे. |
04:18 | ओपन कर्ली ब्रॅकेटने फंक्शनची व्याख्या सुरू होते. |
04:22 | हे if स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल. |
04:27 | दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास "if" मधील कमांडस कार्यान्वित होतील. |
04:33 | हे echo स्टेटमेंट हा मेसेज दाखवेल. |
04:36 | This is return function. |
04:39 | return 0 मुळे कंट्रोल फंक्शनकडून मुख्य प्रोग्रॅमकडे स्टेटस कोड 0(zero) सहित पाठवला जातो. |
04:47 | लक्षात घ्या फंक्शनमधील return नंतरची स्टेटमेंटस कार्यान्वित होत नाहीत. |
04:54 | fi हे if स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते. |
04:58 | येथे exit_(अंडकस्कोर)function हे फंक्शनचे नाव आहे. |
05:02 | येथे if स्टेटमेंट दोन व्हेरिएबल्सची तुलना करेल. |
05:06 | दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यास 'if' कमांडस कार्यान्वित होतील. |
05:14 | echo स्टेटमेंट "This is exit function" हा मेसेज दाखवेल. |
05:19 | exit 0 प्रोग्रॅम टर्मिनेट करेल. |
05:23 | fi हे if स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवेल. |
05:27 | येथे 3 आणि 3 ह्या अर्ग्युमेंटस सहित फंक्शन कॉल केले जाईल. |
05:33 | हे "We are in main program " हा मेसेज दाखवेल. |
05:38 | येथे "3" आणि "3" ह्या अर्ग्युमेंटस सहित दुसरे फंक्शन कॉल केले जाईल. |
05:44 | echo स्टेटमेंट "This line is not displayed" असा मेसेज दाखवेल. |
05:49 | लक्षात घ्या exit प्रोग्रॅम टर्मिनेट करेल. |
05:53 | exit नंतरचे काहीही कार्यान्वित होणार नाही. |
05:58 | फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा. |
06:00 | टाईप करा:
chmod space plus x space return underscore exit dot sh |
06:09 | एंटर दाबा. |
06:12 | टाईप करा:
dot slash return underscore exit dot sh |
06:18 | एंटर दाबा. |
06:20 | येथे दाखवल्याप्रमाणे आऊटपुट मिळेल. |
06:24 | प्रोग्रॅम कसे कार्य करतो ते जाणून घेऊ. |
06:27 | कंट्रोल मुख्य प्रोग्रॅममधे म्हणजेच स्क्रिप्ट मधे असेल. |
06:33 | फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल return_function वर जाईल. |
06:39 | दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे '"This is return function असा मेसेज दाखवेल. |
06:47 | नंतर त्याला return 0 स्टेटमेंट मिळेल. आणि कंट्रोल फंक्शनकडून मेन प्रोग्रॅममधील कॉल देणा-या ओळीच्या खालील स्टेटमेंटवर जाईल. |
06:59 | We are in main program हा मेसेज दाखवेल. |
07:03 | त्यानंतर फंक्शन कॉल केल्यामुळे कंट्रोल exit_function वर जाईल. |
07:11 | दोन्ही व्हेरिएबल्स समान असल्यामुळे "This is exit function" असा मेसेज दाखवेल. |
07:19 | नंतर exit 0 हे स्टेटमेंट मिळेल. त्याने प्रोग्रॅम संपवला जाईल. |
07:25 | exit नंतरचे कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही. |
07:30 | तसेच This line is not displayed हे एको स्टेटमेंट कार्यान्वित होणार नाही. |
07:36 | तुम्हाला फरक कळला असेल अशी अपेक्षा आहे. |
07:39 | थोडक्यात, |
07:41 | पाठात शिकलो, |
07:44 | फंक्शनमधे array पास करणे |
07:47 | फंक्शनमधे exit स्टेटमेंट वापरणे |
07:50 | फंक्शनमधे return स्टेटमेंट वापरणे |
07:53 | हे उदाहरणांद्वारे समजून घेतले. |
07:56 | असाईनमेंट म्हणून, |
07:57 | एक प्रोग्रॅम लिहा. |
07:58 | ज्यातील फंक्शन ऍरेमधील सर्व एलिमेंटसची बेरीज करेल. हे फंक्शन एलिमेंटसची बेरीज दाखवेल. |
08:07 | या फंक्शनला (1, 2, 3) आणि (4, 5, 6) हे दोन ऍरे एलिमेंटस देऊन कॉल करा. |
08:15 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:19 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:23 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
08:30 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
08:45 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:49 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
09:04 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
09:10 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |