BASH/C2/Nested-and-multilevel-if-elsif-statements/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of स्क्रिप्ट:' Nested-and-multilevel-if-elsif-statements
Author: Manali Ranade
Keywords: video tutorial, Bash shell, if, else, fi
|
|
00:00 | नमस्कार. Nested and multilevel if statement in BASH वरील पाठात आपले स्वागत.
|
00:09 | या पाठात शिकणार आहोत, |
00:12 | Nested if-else आणि
|
00:14 | Multilevel if-else statement
|
00:17 | उदाहरणांच्या सहाय्याने जाणून घेऊ.
|
00:22 | ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
|
00:28 | नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
|
00:35 | ह्या पाठासाठी आपण वापरू,
|
00:38 | उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
|
00:42 | GNU Bash वर्जन 4.1.10
|
00:46 | पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
|
00:52 | Nested if-else statement कसे कार्य करते ते समजून घेऊ.
|
00:57 | जर कंडिशन 1 true असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
|
01:04 | जर कंडिशन 2 true असेल तर स्टेटमेंट1 कार्यान्वित होईल.
|
01:10 | म्हणजेच जेव्हा 1 आणि 2 कंडिशन्स true असतील तेव्हा स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
|
01:19 | जर कंडिशन 1 false असेल तर स्टेटमेंट 3 कार्यान्वित होईल.
|
01:25 | आणि जर कंडिशन 2 false असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल. |
01:31 | ह्याचे उदाहरण पाहू.
|
01:33 | मी nestedifelse.sh ह्या फाईलमधे कोड लिहून ठेवला आहे.
|
01:38 | तो उघडू.
|
01:40 | आता कोड समजून घेऊ.
|
01:43 | ही shebang line आहे.
|
01:45 | NAME ह्या व्हेरिएबलला anusha ही व्हॅल्यू दिली आहे.
|
01:50 | PASSWORD ह्या व्हेरिएबलला abc123 ही व्हॅल्यू दिली आहे.
|
01:56 | read कमांड स्टँडर्ड इनपुट कडून आलेला एका ओळीचा डेटा वाचेल.
|
02:02 | - (हायफन) p फ्लॅग प्रॉम्प्ट दाखवेल.
|
02:05 | - (हायफन) p नंतर “Enter name: ” ही स्ट्रिंग टर्मिनलवर दाखवली जाईल.
|
02:11 | myname ह्या व्हेरिएबलमधे युजरने दिलेले टेक्स्ट म्हणजेच युजर इनपुट संचित केले जाईल.
|
02:18 | पहिले if स्टेटमेंट myname आणि NAME ह्या व्हेरिएबल्सची तुलना करेल. |
02:24 | युजरने दिलेले इनपुट आणि NAME ह्या व्हेरिएबलमधील संचित व्हॅल्यू म्हणजेच anusha यांची तुलना केली जाईल.
|
02:31 | जर दोन्ही व्हॅल्यूज जुळल्या तर if स्टेटमेंट मधील उर्वरित कोडचे मूल्यमापन केले जाईल.
|
02:38 | read कमांड टाईप केलेला पासवर्ड वाचून तो mypassword व्हेरिएबलमधे संचित करेल.
|
02:46 | येथे - (हायफन) s फ्लॅग सायलेंट मोडसाठी आहे.
|
02:49 | याचा अर्थ युजरने टाईप केलेले टेक्स्ट टर्मिनलवर दाखवले जाणार नाही. |
02:56 | येथे if-else statements चा आणखी एक संच आहे.
|
02:59 | ही if-else statements पहिल्या if स्टेटमेंटमधे गुंफली आहेत.
|
03:05 | दुसरे if स्टेटमेंट mypassword आणि PASSWORD व्हेरिएबल्सची तुलना करेल.
|
03:12 | जर if कंडिशन true असेल म्हणजेच जर पासवर्ड जुळले तर टर्मिनलवर,
|
03:18 | echo कमांड “Welcome” मेसेज दाखवेल.
|
03:21 | -e मुळे backslash escapes चा अर्थ लावला जातो.
|
03:27 | \n नव्या ओळीसाठी आहे म्हणजेच “Welcome” ही स्ट्रिंग नव्या ओळीवर प्रिंट होईल.
|
03:35 | जेव्हा if कंडिशन true नसेल तेव्हा else कंडिशन कार्यान्वित होईल.
|
03:42 | म्हणजे जेव्हा पासवर्ड जुळणार नाहीत तेव्हा else कंडिशन कार्यान्वित होईल.
|
03:48 | येथे echo कमांड “Wrong password” असे दाखवेल.
|
03:53 | आतील if-else स्टेटमेंट fi ने संपेल.
|
03:57 | आता पहिल्या if-else स्टेटमेंटवर जाऊ.
|
04:01 | जर myname आणि NAME ह्यांच्या व्हॅल्यूज जुळल्या नाही तर else स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
|
04:09 | हे टर्मिनलवर “Wrong Name” असा मेसेज echo करेल. |
04:14 | बाहेरील if-else स्टेटमेंट fi ने पूर्ण केले आहे.
|
04:18 | ctrl+alt आणि t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा.
|
04:27 | फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू.
|
04:29 | टाईप करा:
chmod space plus x space nestedifelse.sh |
04:38 | आता टाईप करा,
dot slash nestedifelse.sh |
04:43 | हा प्रोग्रॅम टर्मिनलवर कार्यान्वित केल्यास
|
04:46 | Name आणि Password
|
04:48 | या दोन कंडिशन्स तपासेल.
|
04:52 | येथे प्राॅम्प्ट “Enter Name:” असे दाखवत आहे.
|
04:55 | anusha टाईप करा.
|
04:57 | ही कंडिशन true असल्यामुळे पुढच्या if कंडिशनचे मूल्यमापन होईल.
|
05:02 | आता प्रॉम्प्ट “Password:” असे दाखवत आहे.
|
05:05 | abc123 असा पासवर्ड टाईप करू. |
05:10 | पासवर्ड PASSWORD ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूशी जुळत आहे. |
05:15 | त्यामुळे प्रॉम्प्ट “Welcome” असे दाखवत आहे.
|
05:19 | आता स्क्रिप्ट पुन्हा कार्यान्वित करू.
|
05:21 | अप ऍरोचे बटण दाबा.
|
05:24 | dot slash nestedifelse.sh कमांडवर जा.
|
05:29 | एंटर दाबा.
|
05:31 | परंतु ह्यावेळी आपण तेच नाव वेगळ्या पासवर्डसोबत देणार आहोत.
|
05:37 | त्यामुळे anusha हे नाव आणि 123 हा पासवर्ड टाईप करा.
|
05:44 | NAME ची व्हॅल्यू जुळेल पण password ची व्हॅल्यू जुळणार नाही.
|
05:49 | त्यामुळे “Wrong password” असा मेसेज दाखवला जाईल.
|
05:53 | पहिल्या if स्टेटमेंट मधील गुंफलेले nested else स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे सिध्द झाले आहे.
|
06:01 | ही स्क्रिप्ट पुन्हा कार्यान्वित करू.
|
06:04 | ह्यावेळी आपण swati हे नाव देणार आहोत.
|
06:08 | “Wrong name” हा मेसेज दाखवला जाईल.
|
06:12 | कारण swati हे नाव व्हेरिएबलला दिलेल्या anusha ह्या व्हॅल्यूशी जुळत नाही. |
06:19 | त्यामुळे कंट्रोल पहिल्या if स्टेटमेंटमधून बाहेर पडेल आणि else स्टेटमेंट कार्यान्वित होईल.
|
06:25 | हे “Wrong name” हा मेसेज प्रिंट करेल.
|
06:29 | आता multilevel if-else स्टेटमेंट पाहू.
|
06:34 | जर कंडिशन 1 true असेल तर स्टेटमेंट 1 कार्यान्वित होईल.
|
06:40 | जर कंडिशन 1 false असेल तर कंडिशन 2 चे मूल्यमापन होईल.
|
06:46 | जर कंडिशन 2 true असेल तर स्टेटमेंट 2 कार्यान्वित होईल. |
06:52 | आणि जर कंडिशन 2 false असेल तर कंडिशन N चे मूल्यमापन होईल.
|
06:58 | जर कंडिशन N true असेल तर स्टेटमेंट N कार्यान्वित होईल.
|
07:03 | आणि जर कंडिशन N false असेल तर स्टेटमेंट X कार्यान्वित होईल.
|
07:10 | त्याचे उदाहरण पाहू.
|
07:12 | माझ्याजवळ उदाहरण आहे.
|
07:14 | ते उघडू. multilevel-ifelse dot sh हे फाईलचे नाव आहे.
|
07:23 | आता कोड समजून घेऊ.
|
07:25 | ही shebang line आहे.
|
07:27 | कार्यान्वित करताना mystring ह्या व्हेरिएबल मधे युजरने इनपुट केलेला शब्द संचित होईल.
|
07:34 | if कंडिशन इनपुट केलेली स्ट्रिंग null आहे का तपासेल.
|
07:39 | - (हायफन) z स्ट्रिंगची लांबी शून्य आहे का तपासेल.
|
07:44 | टर्मिलवर man test असे टाईप करा.
विविध स्ट्रिंग कंपॅरिझनबद्दल जाणून घेऊ. |
07:51 | आपण काहीच टाईप केले नाही तर हे echo स्टेटमेंट प्रिंट केले जाईल. |
07:56 | पहिली elif कंडिशन इनपुट स्ट्रिंग मधे raj ही स्ट्रिंग आहे का तपासेल.
|
08:03 | असल्यास हे echo स्टेटमेंट प्रिंट होईल.
|
08:08 | यातील wildcard character मुळे raj ही स्ट्रिंग असलेले सर्व शब्द ओळखले जातील.
|
08:15 | पुढील elif कंडिशन इनपुट स्ट्रिंग मधे jit हा शब्द आहे का तपासेल.
|
08:22 | असल्यास हे echo स्टेटमेंट प्रिंट होईल. |
08:27 | वरील सर्व कंडिशन्स अयशस्वी झाल्यास else कंडिशन कार्यान्वित होईल.
|
08:33 | आणि “Sorry! Input does not contain either 'raj' or 'jit'” हा मेसेज दाखवेल.
|
08:41 | fi हे multilevel if-else स्टेटमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते.
|
08:46 | आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
|
08:48 | टर्मिनलवर जा.
|
08:51 | टाईप करा:
chmod space plus x space multilevel-ifelse.sh |
09:00 | टाईप करा,
dot slash multilevel-ifelse.sh |
09:06 | इनपुट देण्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट केले जाईल.
|
09:09 | वेगवेगळी इनपुट देऊन काय होते ते पाहू.
|
09:14 | प्रथम काहीही टाईप न करता एंटर दाबा.
|
09:19 | "Nothing was Entered " मेसेज दाखवला जाईल.
|
09:22 | आणि कंट्रोल multilevel if-else. स्टेटमेंटमधून बाहेर पडेल.
|
09:28 | प्रॉम्प्ट क्लियर करा.
|
09:30 | वेगळे इनपुट देऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
|
09:34 | अप ऍरो दाबा.
|
09:36 | dot slash multilevel hyphen ifelse dot sh वर जा.
|
09:41 | एंटर दाबा.
|
09:43 | प्रॉम्प्ट "Enter a Word" असे दाखवेल.
|
09:45 | टाईप करा abhijit.
|
09:48 | “abhijit contains word jit” असे आऊटपुट दिसेल.
|
09:53 | हे आपल्या कोडमधे प्रोग्रॅमचा कंट्रोल तिस-या कंडिशनवर गेल्याचे दाखवते.
|
09:59 | पहिल्या दोन कंडिशन्स जुळलेल्या नाहीत. |
10:03 | हेच लॉजिक सर्व कंडिशन्सना लागू होईल.
|
10:07 | वेगवेगळी इनपुट देऊन प्रोग्रॅम कार्यान्वित करा आणि रिझल्ट तपासा.
|
10:13 | थोडक्यात,
|
10:15 | आपण प्रोग्रॅमच्या सहाय्याने शिकलो,
|
10:18 | Nested If-else: Name आणि Password verification ,
|
10:23 | तसेच Multilevel if-else: स्ट्रिंग कंपॅरिझन |
10:28 | असाईनमेंट म्हणून, वेगवेगळे आऊटपुट मेसेजेस दाखवणारा प्रोग्रॅम लिहा.
|
10:34 | जेव्हा संख्या 3 पेक्षा मोठी,
|
10:35 | 3 पेक्षा लहान,
|
10:37 | किंवा 3 असेल,
|
10:39 | किंवा युजर इनपुट काहीच दिलेले नसेल.
|
10:42 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10:45 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:48 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:53 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10:55 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:58 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:02 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:09 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:13 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:20 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:26 | हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे. |
11:31 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|