BASH/C2/Globbing-and-Export-statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Globbing and Export Statement

Author: FOSSEE and spoken-tutorial team

Keywords: Video tutorial, Globbing, Export statement


Time Narration
00:01 नमस्कार. Globbing and Export command वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 * Globbing
00:09 * export command
00:11 ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे.
00:18 नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:24 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:27 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:31 * GNU Bash वर्जन 4.1.10.
00:35 पाठाच्या सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:43 आता globbing विषयी जाणून घेऊ.
00:46 * फाईलनेम किंवा पाथनेमचा BASH ने केलेला विस्तार म्हणजे Globbing.
00:52 * Globbing मधे wildcards वापरतात व त्यांचा विस्तार केला जातो.
00:57 * यात नेहमीच्या wildcard चिन्हांचा अर्थ लावला जातो. जसे की,
01:02 *(अॅस्टेरिक) आणि
01:04 ? (प्रश्नचिन्ह)
01:05 हे उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ.
01:09 तुमच्या कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडू.
01:18 टर्मिनल वर टाईप करा,

ls space asterix dot sh एंटर दाबा.

01:27 हे चालू डिरेक्टरीमधे .sh एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्सशी जुळवून बघेल.
01:34 येथे sh एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्सची सूची बघू शकतो.
01:40 प्रॉम्प्ट क्लियर करू. आता टाईप करा,

ls space s asterix dot sh आणि एंटर दाबा.

01:51 s अक्षराने सुरू होणा-या आणि sh हे एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्स s asterix dot sh शी जुळलेल्या बघू शकतो.
02:02 पुढे पाहू.
02:04 आता टाईप करा,

ls space चौकटी कंस सुरू a hyphen c चौकटी कंस पू्र्ण asterix dot sh आणि एंटर दाबा.

02:19 हे जुळेल आणि a किंवा b किंवा c ह्या अक्षरापासून सुरू होणा-या फाईल्स दाखवल्या जातील.
02:26 आऊटपुट बघा.
02:28 a किंवा b किंवा c अक्षरापासून सुरू होणा-या सर्व फाईल्सची सूची आपण बघू शकतो.
02:35 आणि sh हे ह्या फाईल्सचे एक्सटेन्शन आहे.
02:39 आता पुढे टाईप करा

ls space चौकटी कंस सुरू caret sign a hyphen c चौकटी कंस पू्र्ण asterix dot sh आणि एंटर दाबा.

02:55 sh असे एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईलच्या नावांशी हे जुळेल.
03:00 परंतु 'a' किंवा 'b' किंवा 'c' ह्या अक्षरांनी सुरूवात होणा-या फाईल वगळल्या जातील.
03:07 आऊटपुट बघा. येथे फाईलच्या नावांची सुरूवात 'a', 'b' किंवा 'c' अक्षरांनी झालेली नसल्याचे लक्षात येईल.
03:16 प्रॉम्प्ट क्लियर करू.
03:19 आता टाईप करा,

ls space चौकटी कंस सुरू capital 'A' small 'a' चौकटी कंस पू्र्ण asterix sign dot sh आणि एंटर दाबा.

03:34 हे अप्पर आणि लोअर केस मधील 'A' अक्षराने सुरूवात होणा-या फाईल्सच्या नावांशी जुळवून बघेल.
03:40 आऊटपुट पहा.

अप्पर आणि लोअर केस मधील 'A ने सुरू होणा-या आणि sh एक्सटेन्शन असलेल्या सर्व फाईल्सच्या नावांची सूची दाखवली आहे.

03:49 आता BASH मधील Export command बद्दल जाणून घेऊ.
03:53 स्लाईडसवर जाऊ.
03:55 Bashमधे व्हेरिएबल्स त्यांच्या स्वतःच्या Shell मधे लोकल व्हेरिएबल असतात.
04:00 * लोकल व्हेरिएबल्स त्याच Shell द्वारे किंवा चालू Shell द्वारे वापरता येऊ शकतात.
04:06 Export command मुळे व्हेरिएबल किंवा फंक्शन सर्व child processesच्या environment मधे निर्यात होते.
04:15 * लोकल व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबलमधे देखील बदलता येतो.
04:20 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
04:24 टर्मिनल वर जाऊन टाईप करा,

myvar equal to sign lion आणि एंटर दाबा.

04:34 आता टाईप करा,

echo space dollar sign myvar आणि एंटर दाबा.

04:41 lion प्रिंट केले जाईल.
04:44 ही व्हॅल्यू myvar ह्या व्हेरिएबलला दिली होती.
04:48 आता नव्या Shell वर जाऊ.
04:51 नव्या Shellवर जाण्यासाठी तुम्ही नवे टर्मिनल उघडू शकता.

किंवा टाईप करा, slash bin slash bash आणि एंटर दाबा.

05:03 आता myvar ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तपासू.
05:07 टाईप करा,

echo space dollar sign myvar आणि एंटर दाबा.

05:15 रिकामी ओळ प्रिंट झालेली दिसेल.
05:17 ह्याचा अर्थ myvar व्हेरिएबलला दिलेली व्हॅल्यू ह्या Shell मधे ट्रान्सफर झाली नाही.
05:24 तसेच myvar हे केवळ मागील Shell साठी लोकल व्हेरिएबल आहे. चालू Shell साठी नाही.
05:32 मागील Shell वर परत जाण्यासाठी exitअसे टाईप करू.
05:36 व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित करण्यासाठी export command वापरू.
05:43 कसे ते पाहू.
05:46 टाईप करा,

export space myvar equal to sign lion आणि एंटर दाबा.

05:55 आता टाईप करा,

echo space dollar sign myvar आणि एंटर दाबा.

06:02 lion असे दाखवले जाईल.
06:05 आता दुस-या Shell वर जाऊ. टाईप करा, slash bin slash bash आणि एंटर दाबा.
06:13 प्रॉम्प्ट क्लियर करू.
06:15 आता टाईप करा,echo space dollar sign myvar.
06:22 lion असे दाखवले जाईल.
06:25 कारण export command द्वारे myvar हे व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित केले होते.
06:33 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:36 स्लाईडस वर परत जाऊ. थोडक्यात,
06:39 आपण शिकलो,
06:41 * Globbing
06:42 * Export command
06:44 असाईनमेंट म्हणून.
06:45 एकBash script लिहा जी globbing या पाठात जाणून घेतलेली सर्व ऑपरेशन्स करेल.
06:51 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
06:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:57 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:05 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:08 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:12 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
07:37 हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
07:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:47 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana