Netbeans/C2/Handling-Images-in-a-Java-GUI-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 21:26, 23 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration


00.01 नमस्कार.
00.02 Handling Images in a Java GUI Application using Netbeans IDE वरील पाठात स्वागत.
00.10 आपल्याला नेटबीन्स ची प्राथमिक ओळख तसेच,
00.15 JFrame फॉर्मवरील टेक्स्ट फिल्डस, बटण्स, मेनू समाविष्ट करण्याचे ज्ञान आहे असे समजू.
00.22 नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.29 ह्या पाठात जाणून घेऊ: इमेजेस हाताळण्या संदर्भात सविस्तर माहिती,
00.34 आणि त्यांच्यावर GUI ऍप्लिकेशनमधे एखादी कृती करणे.
00.39 ह्या पाठासाठी Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.52 जावा ऍप्लिकेशन मधे इमेजेस ऍक्सेस करणे आणि हाताळण्याची सर्वमान्य पध्दत म्हणजे getResource() मेथड.
00.59 IDE मधील GUI Builder वापरून ऍप्लिकेशनमधे इमेज समाविष्ट करणारा कोड बनवायला शिकू.
01.07 आणि साधी Jframe बनवू ज्यामधे इमेज दाखवणारे एक Jlabel असेल.
01.13 ह्या पाठात पाहू -
01.15 ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे.
01.18 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट करणे.
01.20 लेबलवर इमेज दाखवणे.
01.22 माऊस इव्हेंटस आणि पॉप-अप्स बनवणे.
01.25 ऍप्लिकेशन बिल्ड करून कार्यान्वित करणे.
01.28 आपले सँपल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी IDE वर जाऊ.
01.33 फाईल मेनूतून New Project निवडा.
01.37 Categories मधील Java, Projects खालील Java Application निवडून Next क्लिक करा.
01.46 Project Name फिल्डमधे ImageDisplayApp टाईप करा.
01.54 Create Main Class चेकबॉक्स क्लियर करा.
01.58 तसेच Set as Main Project चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा.
02.03 Finishक्लिक करा. IDEमधे प्रोजेक्ट तयार झालेले असेल.
02.08 ह्या भागात Jframe form बनवून त्यात Jlabel समाविष्ट करणार आहोत.
02.14 प्रथम Jframe form बनवू.
02.17 Projects विंडोत ImageDisplayApp नोड एक्सपांड करा.
02.23 Source Packages नोडवर राईट क्लिक करून NewमधीलJframe form पर्याय निवडा.
02.30 Class Name फिल्डमधे ImageDisplay टाईप करा.
02.37 Package फिल्डमधे org.me.myimageapp टाईप करा.
02.45 Finishक्लिक करा.
02.48 आता Jlabel समाविष्ट करू.
02.52 IDEच्या उजव्या बाजूच्या पॅलेट मधील Label कॉम्पोनंट निवडून Jframeवर ड्रॅग करा.
03.01 आता तुमचा फॉर्म अशाप्रकारे दिसला पाहिजे.
03.06 ऍप्लिकेशनमधे इमेजेस किंवा इतर रिसोर्सेस वापरता तेव्हा सामान्यतः रिसोर्सेससाठी वेगळे Java पॅकेज बनवतात.
03.15 लोकल फाईल सिस्टीममधे, पॅकेज हे फोल्डर सदृश्य असते.
03.19 प्रोजेक्टस विंडोमधे org.me.myimageapp च्या नोडवर राईट क्लिक करून New मधील Java Package निवडा.
03.30 New Package विझार्डमधे org.me.myimageapp पुढे .resources टाईप करा.
03.40 त्यामुळे नव्या पॅकेजचे नाव आता org.me.myimageapp.resources हे असेल.
03.47 Finish क्लिक करा.
03.49 इमेज समाविष्ट करू तेव्हा प्रोजेक्टस विंडोतील org.me.myimageapp.resources ह्या पॅकेजमधे इमेज आलेली दिसली पाहिजे.
03.59 ऍप्लिकेशनमधे इमेज Jlabel कॉम्पोनंटमधे बसवली जाणार आहे.
04.04 आता लेबलवर इमेज समाविष्ट करू.
04.08 GUI designerमधे फॉर्ममधे समाविष्ट केलेले लेबल सिलेक्ट करा.
04.14 विंडोच्या उजवीकडे असलेल्या पॅलेट खालील प्रॉपर्टी विंडोमधे स्क्रॉल करून Icon प्रॉपर्टीवर जा.
04.23 ellipsis म्हणजेच उजवीकडील तीन टिंबांवर क्लिक करा.
04.30 Icon प्रॉपर्टी डायलॉग बॉक्समधे Import to Projectवर क्लिक करा.
04.34 फाईल निवडण्यासाठी तुम्हाला हवी असलेली इमेज ज्या फोल्डरमधे आहे त्या फोल्डरवर जा.
04.42 Next क्लिक करा.
04.45 विझार्डच्या Select Target Folder पेजमधे Resources फोल्डर निवडा.
04.49 Finish क्लिक करा.
04.52 नंतर IDE आपल्या प्रोजेक्टमधे इमेज कॉपी करेल.
04.57 ऍप्लिकेशनbuild करून कार्यान्वित करतो तेव्हा ही इमेज वितरणासाठीच्या JAR फाईलमधे समाविष्ट होते.
05.07 OK क्लिक करा.
05.11 तुमच्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Clean and Build पर्याय निवडा.
05.18 आता फाईल विंडोवर जाऊन build फोल्डर खालील,
05.29 dist फोल्डर मधे jar फाईल बघू शकता.
05.33 imagedisplay क्लासमधे इमेज ऍक्सेस करण्यासाठी येथे कोड बनतो.
05.38 तसेच फॉर्मच्या डिझाईन व्ह्यूमधे लेबलवर तुमची इमेज दाखवते.
05.43 आता फॉर्म चांगला दिसण्यासाठी काही सोप्या गोष्टी करू.
05.48 Properties विंडोमधे Text प्रॉपर्टी सिलेक्ट करा.
05.56 आणि jLabel1 डिलिट करा.
06.04 लेबलवर दाखवले जाणारे टेक्स्ट ही GUI Builder ने तयार केलेली व्हॅल्यू आहे.
06.10 परंतु आपण टेक्स्ट ऐवजी इमेज दाखवण्यासाठी लेबल वापरत आहोत.
06.15 त्यामुळे टेक्स्टची गरज नाही.
06.18 आता लेबल ड्रॅग करून ते फॉर्मच्या मध्यात ठेवा.
06.26 GUI Designerमधे Source टॅब क्लिक करा.
06.30 Generated Code असे लिहिलेल्या ओळीपर्यंत स्क्रॉल करा.
06.33 GUI Designer द्वारे बनलेला कोड बघण्यासाठी Generated Codeच्या डावीकडे असलेले अधिकचे चिन्ह क्लिक करा.
06.42 येथे ही कीलाईन आहे.
06.49 jLabel1आयकॉन प्रॉपर्टीसाठी Property editor वापरलेला असल्याने IDEने setIconमेथड बनवली आहे.
06.57 त्या मेथडच्या पॅरामीटरमधे getResource() मेथडला ImageIconच्या निनावी इनर क्लास कडून कॉल येतो.
07.10 एकदा तुमची इमेज समाविष्ट झाली की Design व्ह्यूमधे इमेजवर राईट क्लिक करा.
07.19 Events खालील Mouse मधील mouseClickedक्लिक करा.
07.24 व्ह्यू बदलून Source मोडवर जाईल.
07.28 येथे माऊस क्लिक झाल्यावर कार्य करणारा तुमचा कोड येथे लिहू शकता.
07.33 GUI मधे इमेज क्लिक केल्यावर पॉप अप उघडण्यासाठी कोडच्या काही ओळी समाविष्ट करू.
08.00 आपण आवश्यक असलेल्या कोडच्या काही ओळी टाईप केलेल्या आहेत.
08.05 प्रथम पॉप अप साठी नवी Jframe बनवली आहे.
08.12 आणि डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन सेट केले आहे.
08.15 आणि शेवटी पॉप अप वर दिसणारे टेक्स्ट येथे दिलेले आहे.
08.24 ह्या कोडच्या ओळी समाविष्ट केल्यावर फाईलच्या सुरूवातीला दोन ओळी टाईप करून आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट करू.
08.36 import javax.swing.*
08.45 आणि import java.awt.* हे समाविष्ट करा.
08.53 ह्यामुळे प्रोग्रॅमसाठी आवश्यक असलेली पॅकेजेस इंपोर्ट होतील.
08.59 ऍप्लिकेशन build करून कार्यान्वित करू.
09.02 इमेज ऍक्सेस करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी कोड बनवला आहे.
09.07 इमेज ऍक्सेस होते का ही खात्री करण्यास ऍप्लिकेशनbuild करून कार्यान्वित करा.
09.12 प्रथम प्रोजेक्टचा Main class सेट करू.
09.16 प्रोजेक्ट सुरू केल्यावर कुठला क्लास कार्यान्वित करायचा हे मेन क्लासमुळे IDEला समजते .
09.21 याशिवाय ऍप्लिकेशन बिल्ड होताना JARफाईलमधे Main class हा घटक तयार झाल्याची खात्री होते.
09.33 प्रोजेक्ट विंडोतील ImageDisplayApp प्रोजेक्ट नोड वर राईट क्लिक करून Properties निवडा.
09.41 Project Properties च्या डायलॉग बॉक्समधे डावीकडील Run कॅटॅगरी सिलेक्ट करा.
09.47 Main Class फिल्ड समोर असलेले Browseबटण क्लिक करा.
09.51 org.me.myimageapp.ImageDisplay सिलेक्ट करून Select Main Class क्लिक करा.
10.01 OK क्लिक करा.
10.05 आता Project नोड वर राईट क्लिक करून Clean & Build सिलेक्ट करा.
10.11 Files विंडोमधे ऍप्लिकेशनच्या Build प्रॉपर्टीज बघू शकतो.
10.20 Build फोल्डरमधे कंपाईल केलेला क्लास असतो.
10.23 dist फोल्डरमधे एक्झीक्युटेबल JAR फाईल असते ज्यात कंपाईल केलेला क्लास आणि इमेजचा समावेश असतो.
10.32 आता टूलबारवरील Run निवडा.
10.34 इमेज असलेली आऊटपुट विंडो उघडेल.
10.39 ह्या इमेजवर क्लिक करा.
10.42 वरच्या बाजूला इमेजचे वर्णन दाखवणारा pop-up दिसेल.
10.50 आता असाईनमेंट करू.
10.54 ह्या पाठात दाखवल्याप्रमाणे चार इमेजेस असलेले आणखी एक GUI बनवा.
11.01 प्रत्येक इमेजसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस जसे की, कीबोर्ड, माऊस-मोशन, माऊस-क्लिक, माऊस-व्हील इव्हेंट लिहा.
11.12 आपण असाईनमेंट आधीच तयार केली आहे.
11.17 ही कार्यान्वित करू.
11.20 असाईनमेंट अशी दिसली पाहिजे.
11.26 आपण कीबोर्ड आणि माऊस इव्हेंटस बनवले आहेत.
11.34 शिकलो ते थोडक्यात,
11.36 Jframe फॉर्म बनवला.
11.39 इमेजसाठी पॅकेज समाविष्ट केले.
11.41 लेबलवर इमेज दाखवली.
11.44 तसेच माऊस इन्हेंटस, pop-ups बनवले.
11.49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11.53 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12.02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12.07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12.11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
12.46 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana