Java/C2/Getting-started-java-Installation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:52, 8 April 2014 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration


00.01 Getting started with Java: Installation वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.


00.07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00.09 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे,
00.13 Java कशासाठी?
00.14 Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
00.17 येथे आपण वापरत आहोत,
00.19 उबुंटु वर्जन 11.10 आणि
00.21 Java डेवलपमेंट एन्वाइरन्मेंट JDK 1.6
00.26 या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे.
00.31 तुमच्या सिस्टम वर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर इनस्टॉल असायला हवा.
00.35 तुम्हाला लिनक्स मधील टर्मिनल, टेक्स्ट एडिटर आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00.43 जर नसेल तर कृपया spoken-tutorial.org वर उपलब्ध असलेले लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा.
00.51 java प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी JDK म्हणजेच Java डेवलपमेंट किट इनस्टॉल करण्याची गरज आहे.
00.57 JDK बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या.
01.02 JDK आता सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करू.
01.07 यासाठी रूट परमिशन्स आवश्यक आहे.
01.10 तुम्हाला रिपॉज़िटरी निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे.


01.14 अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे.
01.19 डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल.
01.25 सर्वात वर डॅशहोम दिसेल.
01.28 डॅशहोम वर क्लिक करा.
01.31 सर्चबार मध्ये Synaptic (सिनॅप्टिक) टाइप करा. .


01.35 तुम्हाला येथे Synaptic Package Manager( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) दिसेल.
01.38 Synaptic Package Manager ( सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर ) वर क्लिक करा.
01.42 तुम्हाला ऑथेनटिकेशन साठी पासवर्ड विचारला जाईल.
01.47 पासवर्ड टाइप करून Authenticate (ऑथेनटिकेट) वर क्लिक करा..


01.56 हे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडेल.
02.03 आता Quick Filter (क्विक फिल्टर) बॉक्स मध्ये jdk टाइप करा.


02.08 आपण openjdk-6-jdk नामक पॅकेज पाहत आहोत.


02.13 त्यावर राइट-क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा.


02.17 नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा.
02.20 तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल.
02.24 To be Installed (टू बी इनस्टॉल्ड )वर क्लिक करा आणि नंतर Apply (अप्लाइ)वर क्लिक करा.
02.30 इन्स्टलेशन काही सेकंद घेईल.
02.38 आता आपण पाहतो की, openjdk-6-jdk पर्याय हिरव्या रंगात आहे.
02.48 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
02.52 चला आता इन्स्टलेशन पडताळू, यासाठी Ctrl , Alt आणि T किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
03.03 मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे.
03.06 कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा java space hyphen version आणि एंटर दाबा.


03.15 आपण पाहतो की jdk चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे .


03.20 तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो.
03.26 तर आपण यशस्वीरित्या jdk इनस्टॉल केले आहे.
03.30 आता एक साधा Java प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु.
03.35 मी खालील कोड अगोदरच TestProgram dot java नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता.
03.42 हा कोड संकलित करून कार्यान्वित करू.
03.45 हा कोड टर्मिनल वर We have successfully run a Java Program असे प्रदर्शित करेल.
03.53 पुन्हा टर्मिनल वर जाऊ.
03.57 लक्ष द्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये TestProgram dot java ही फाइल सेव केली होती.
04.03 आणि सध्या मी Home Directory (होम डाइरेक्टरी ) मध्ये आहे.
04.07 कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा, javac space TestProgram dot java.
04.19 हे कोड संकलित करण्यासाठी आहे.
04.21 एंटर दाबा.
04.25 आता मी कोड कार्यान्वित करते.
04.27 टाइप करा, java space TestProgram आणि एंटर दाबा.
04.35 आपल्याला We have successfully run a java program असे आउटपुट मिळेल.
04.44 अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे.
04.48 आता स्लाइड्स वर परत जाऊ.
04.51 आता मी Java का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल.
04.55 Java हे सोपे आहे.
04.57 हे "ऑब्जेक्ट ओरियेनटेड" आहे.
04.59 हे एक स्वतंत्र मंच आहे.
05.01 हे सुरक्षित आहे.
05.02 Java कडे उच्च कार्य आहे.
05.04 Java हे मल्टी – थ्रेडड आहे.
05.07 आता आपण Java चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु.
05.11 -JSP, किंवा Java सर्वर पेजस: हे सामान्य HTML टॅग्स सहित कोड वर आधारित आहे.
05.18 JSP हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते.
05.22 -Java Applets: हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते.
05.28 -J2EE किंवा Java एंटरप्राइज़ एडिशन: J2EE कंपनीज़ वापरते.
05.33 हे XML संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे .
05.38 -JavaBeans: JavaBeans हे पुन्हा वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर घटक आहे .
05.43 हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते.
05.47 -Mobile Java: हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते, जसे की, मोबाइल फोन.
05.53 तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
05.56 सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन JDK इनस्टॉल करणे,
05.59 java प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे,
06.02 Java वापरण्याचे फायदे,
06.04 Java चे प्रकार आणि एप्लिकेशन्स.
06.08 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.17 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
06.22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
06.24 स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


06.27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06.30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.


06.36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06.41 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि ,

गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.

06.47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06.52 http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro
06.58 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07.01 मी कविता साळवे आपला निरोप घेते.
07.04 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble