Scilab/C2/Plotting-2D-graphs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:22, 4 April 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.00 सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत .
00.04 संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू.
00.10 अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते.
00.15 सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots, contour plots, 3D plots, histograms, bar charts, इत्यादी.
00.24 सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
00.28 कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू.
00.34 आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ.
00.39 हे linspace कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो.
00.45 उदाहरणार्थ,
00.48 x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
00.57 तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
01.08 आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो.
01.14 आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत.
01.19 हे मॅटलॅबप्रमाणेच आहे.
01.23 प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल.
01.31 ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे.
01.36 आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू.
01.41 हे बंद करू.
01.43 सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा.
01.50 येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल.
01.54 ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत.
02.03 पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू.
02.06 सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात .
02.14 plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो.
02.26 येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल.
02.31 स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते.
02.36 स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल.
02.44 स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते.
02.46 ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या.
02.51 तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो.
02.57 त्याला rect म्हणतात.
03.07 आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे.
03.14 rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो.
03.24 आता Title, Axis आणि Legends बद्दल जाणून घेऊ.
03.28 अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title ह्या कमांडस वापरतात.
03.38 ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा.
03.45 x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे.
03.58 3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल.
04.04 त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू.
04.11 सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04.18 x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे.
04.26 आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ.
04.36 एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे .
04.41 ही विंडो बंद करू.
04.44 कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते.
04.51 आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू.
04.56 रो वेक्टर x मधे linspace कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू.
05.03 फंक्शन घोषित करू.
05.05 y1 = x square
05.07 plot x verses y1
05.10 दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square
05.15 plot x verses y2
05.17 तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ.
05.22 येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत.
05.33 ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत.
05.37 ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात.
05.41 ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत.
05.49 तुम्ही ग्राफ बघू शकता.
05.51 कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल.
05.56 हे legend कमांड द्वारे मिळवता येऊ शकते.
06.08 "o-" हा कर्व्ह y1=x square हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते.
06.19 ही ग्राफिक विंडो बंद करू.
06.22 आता plot2d फंक्शन आणि subplot फंक्शन बद्दल जाणून घेऊ.
06.28 सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते.
06.31 demonstration टॅबद्वारे plot2dचे डेमोज बघता येतात .
06.39 Graphicsवर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा.
06.51 plot2d वर क्लिक करा.
06.54 येथे डेमो ग्राफ बघू शकता.
06.55 ग्राफचा कोडदेखील येथे view code बटणावर क्लिक करून बघता येतो.
07.02 ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते.
07.07 Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो.
07.12 टर्मिनलवर जाऊ.
07.15 आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत.
07.21 ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे.
07.27 येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता.
07.36 नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा.
07.46 sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा.
07.55 आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू.
08.00 त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा.
08.11 येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो.
08.18 टर्मिनल बंद करा.
08.21 तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा.
08.26 तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या.
08.29 आता Subplot फंक्शन जाणून घेऊ.
08.33 subplot() फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते.
08.37 सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ.
08.43 उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot बघा.
08.58 ही विंडो बंद करू.
09.00 subplot() कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा 2 by 2 matrix तयार करते.
09.10 तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे.
09.15 सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू.
09.24 एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो .
09.28 तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो.
09.32 graphic विंडोवर क्लिक करा. File मेनूतील export toसिलेक्ट करा .
09.39 प्लॉटला योग्य नाव द्या.
09.50 जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा.
09.54 आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा.
09.59 JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा.
10.05 इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा.
10.11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10.15 सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
10.20 सायलॅब लिंक्स पाहात रहा.
10.22 स्पोकन ट्युटोरियल्स हा Talk to a Teacher project चा भाग असून National Mission on Education through ICT द्वारे त्यास अर्थसहाय्य मिळाले आहे.
10.29 अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
10.32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी----- आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana