C-and-C++/C3/Arrays/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:32, 20 March 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration
|
00.01 | C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.07 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00.09 | array म्हणजे काय? |
00.11 | array ची घोषणा. |
00.13 | array चे आरंभीकरण. |
00.16 | array वरील काही उदाहरणे. |
00.18 | आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु. |
00.22 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00.25 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 |
00.30 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
|
00.36 | Array च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00.39 | Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह. |
00.44 | Array इंडेक्स 0 पासून सुरू होतो. |
00.48 | पहिला घटक index 0मध्ये संग्रहीत आहे. |
00.52 | arraysचे तीन प्रकार आहेत: |
00.55 | Single dimensional array. |
00.57 | Two dimensional array आणि |
00.59 | Multi-dimensional array. |
01.01 | या ट्यूटोरियल मध्ये आपणsingle dimensional array ची चर्चा करूया. |
01.06 | single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु. |
01.09 | या साठी सिंटॅक्स आहे: |
01.11 | data-type, array चे नाव आणि आकार. |
01.16 | उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजरarray star घोषित केला आहे. |
01.24 | array इंडेक्स star 0 ते star 4 पासून सुरू होईल. |
01.29 | आपण एक array ची घोषणा पहिली आहे. |
01.32 | आता आपण एका array ची सुरवात पाहु. |
01.35 | या साठी सिंटॅक्स आहे: |
01.38 | data-type, array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार. |
01.44 | उदाहरणार्थ, येथे आपण इंटिजरarray star, 3आकारा सह घोषित केला आहे. 1,2 आणि 3 array चे घटक आहेत. |
01.54 | येथे इंडेक्स star 0 ते star 2 पासून सुरू होईल. |
01.59 | चला आता उदाहरणां कडे वळू. |
02.01 | मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. |
02.04 | मी तो उघडते. |
02.06 | कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या. |
02.10 | या प्रोग्राम मध्ये, आपण एक array मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत. |
02.16 | मी आता कोड समजावून सांगते. |
02.18 | ही हेडर फाइल आहे.
|
02.20 | हे आपले main फंक्शन आहे.
|
02.22 | येथे आपण एक array star, 3 आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे. |
02.28 | 4, 5आणि 6 array चे घटक आहेत, |
02.33 | नंतर आपण इंटिजर वेरिएबल sumघोषित केला आहे. |
02.36 | येथे आपण array चे घटक जोडू आणि परिणामsum मध्ये संग्रहित करू. |
02.41 | लक्ष द्या, 4 इंडेक्स 0मध्ये, 5 इंडेक्स 1 मध्ये, आणि 6 इंडेक्स 2मध्ये संग्रहीत होईल. |
02.50 | नंतर आपण बेरीज प्रिंट करू. |
02.52 | हे आपले return statement आहे. |
02.54 | आता Save वर क्लिक करा. |
02.57 | प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
02.59 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03.09 | संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि Enter दाबा. |
03.19 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array . Enter दाबा. |
03.24 | येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल, |
03.26 | The sum is 15. |
03.28 | आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.
|
03.32 | प्रोग्राम वर परत या. |
03.34 | समजा, ओळ क्रमांक 4 येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो, |
03.39 | Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु. |
03.42 | टर्मिनलवर परत या. |
03.44 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
03.47 | आपल्याला एक एरर दिसेल. |
03.49 | Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant. |
03.56 | याचे कारण, arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे. |
04.01 | प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू. |
04.04 | ओळ क्रमांक 4 येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा. |
04.09 | आता Save वर क्लिक करा. |
04.12 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
04.15 | अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
|
04.19 | होय, हे कार्य करत आहे. |
04.21 | आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू. |
04.25 | प्रोग्राम वर परत या. |
04.28 | मी येथे काही गोष्टी बदलते. |
04.30 | प्रथम, कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा. |
04.38 | आता dot cppएक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि Save वर क्लिक करा. |
04.44 | हेडर फाइलला iostream म्हणून बदलू. |
04.49 | आता using statement समाविष्ट करू. |
04.55 | C++ मध्ये एक array ची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे. |
05.01 | म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही. |
05.04 | printf statement च्या जागी cout statement लिहा. |
05.09 | format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. |
05.17 | येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n |
05.26 | आता Save वर क्लिक करा. |
05.29 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
05.32 | संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1. |
05.42 | येथे आपल्याकडे array1 आहे कारण, आपल्याला array dot cफाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही. |
05.51 | आता Enter दाबा. |
05.54 | कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter दाबा. |
05.59 | असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15 |
06.02 | आपण पाहु शकतो की हे आपल्या C codeप्रमाणे आहे. |
06.07 | आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू.
|
06.10 | प्रोग्राम वर परत या. |
06.12 | समजा येथे ओळ क्रमांक 7वर, |
06.14 | मी, star[1], star[2] आणि star[3]; टाइप करेल. |
06.23 | Save वर क्लिक करा. |
06.24 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
06.28 | मी prompt क्लियर करते. |
06.30 | अगोदर प्रमाणे संकलित करू. |
06.33 | अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू. |
06.36 | आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.
|
06.39 | याचे कारण array इंडेक्स 0 पासून सुरू होतो. |
06.43 | प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, array इंडेक्स एक पासून सुरू होतो. |
06.49 | महणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू. |
06.54 | येथे टाइप करा, 0 ... येथे, 1 आणि 2. Save वर क्लिक करा. |
07.02 | कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या. |
07.05 | अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू. |
07.09 | होय, हे कार्य करत आहे. |
07.12 | आता, आपण स्लाईडस् वर परत जाऊ. |
07.14 | संक्षिप्त रूपात, |
07.16 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो. |
07.19 | Arrays. |
07.20 | Single Dimensional Arraysm घोषित करणे, |
07.23 | Single Dimensional Arrays सुरू करणे,
|
07.26 | उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6} |
07.31 | array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, sum is equal to star 0 plus star 1 plus star 2 |
07.40 | असाइनमेंट. |
07.41 | array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
|
07.47 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
07.50 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07.53 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07.57 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08.00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08.03 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08.06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08.13 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08.17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
08.25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08.30 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
08.33 | सहभागासाठी धन्यवाद. |