C-and-C++/C2/Functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:25, 3 March 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

C-and-C++/C2/Functions/Marathi

Title of script: Functions

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.01 C and C++ मधील Functionsवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.06 आपण शिकणार आहोत,
00.09 function म्हणजे काय?
00.11 function चा Syntax
00.13 return statement चे महत्त्व.
00.16 हे उदाहरनाद्वारे करू.
00.18 आपण सामान्य errors आणि त्याचे उपाय ही पाहु.
00.22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00.25 Ubuntu Operating system version 11.10
00.29 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00.35 चला, function च्या परिचयाने सुरवात करू.
00.39 function हा एक स्वयंपूर्ण प्रोग्राम आहे, जो एखादे विशिष्ट कार्य करतो.
00.45 प्रत्येक प्रोग्रॅम एक किंवा अधिक functions ने बनलेला असतो.
00.49 कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे controlपरत जातो.
00.55 function चा syntax पाहू.
00.59 ret-type functionने return केलेल्या डेटाचा टाईप सांगते.
01.05 fun_name म्हणजे function चे नाव.
01.09 parameters म्हणजे variable ची नावे आणि त्यांच्या प्रकरांची यादी.
01.14 आपण रिक्त पॅरमीटर सूची निर्दिष्ट करू शकतो.
01.18 ह्याला arguments नसलेले function म्हणतात.
01.21 आणि ह्याला arguments सहित function म्हणतात.
01.26 voidवापरुन प्रोग्रॅमवर पाहु.
01.29 मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहिला आहे.
01.32 आपण तो उघडू.
01.35 लक्ष द्या function हे फाईलचे नाव आहे.
01.38 आणि मी extentsion .c ने फाइल सेव केली आहे.
01.43 हा code समजून घेऊ.
01.45 ही header file आहे.
01.47 कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे.
01.51 येथे add नामक function घोषित केले आहे.
01.54 पहा, add function कुठल्याही arguments शिवाय आहे.
01.58 void हा return type आहे.
02.01 फंक्शनचे दोन प्रकार आहेत.
02.03 User-defined function म्हणजे add function आणि,
02.06 Pr-defined function म्हणजेच printf आणि main function .
02.12 आपण a आणि b ला अनुक्रमे दोन आणि तीन ह्या व्हॅल्यूज देऊन सुरू केले आहे.
02.19 येथे आपण variable c घोषित केला आहे,.
02.21 नंतर a आणि b च्या वॅल्यूज जोडू.
02.24 c मध्ये result संचित होतो.
02.27 नंतरresult प्रिंट करू.
02.29 हे main function आहे.
02.32 येथे आपण add function कॉल करू.
02.34 येथे बेरीज होऊन result प्रिंट होईल.
02.39 Save वर क्लिक करा.
02.42 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02.45 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02.53 संकलित करण्यासाठी, टाईप करा ' gcc function.c -o fun.
03.00 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./fun
03.05 Sum of a and b is 5 असे आऊटपुट दिसेल.
03.10 प्रोग्रॅमवर जाऊ.
03.13 Functions मध्ये special identifiers असतात त्यांना parameters किंवा arguments म्हणतात.
03.20 arguments असलेले समान उदाहरण पाहू.
03.23 ह्यात थोडे बदल करू.
03.27 टाईप करा int add (int a,comma int b)
03.32 येथे आपण एक add functionघोषित केला आहे.
03.36 येथे int a आणि int b ही add functionची arguments आहेत.
03.41 हे डिलिट करा.
03.42 a आणि b येथे सुरू करण्याची गरज नाही.
03.46 printf स्टेट्मेंट डिलिट करा.
03.49 टाईप करा int main()



03.52 sum हे व्हेरिएबल घोषित करू.
03.54 टाईप करा int sum;
03.57 नंतर टाइप करा sum = add(5,4);
04.03 येथे add function कॉल करत आहोत.
04.05 नंतर5 आणि 4 parametersपास करू.
04.10 a मध्ये 5, b मध्ये 4 असे संचित केले जाईल.
04.14 त्यांची बेरीज केली जाईल.
04.18 रिज़ल्ट प्रिंट करू.
04.20 येथे टाइप करा,
04.21 printf(“Sum is %d\n”,sum);
04.27 हे डिलिट करू. कारण वर function आधीचcallकेले आहे.
04.32 टाइप करा, return 0;
04.36 non-void functionने return statement वापरावे जे वॅल्यू परत करते.
04.41 Save वर क्लिक करा.
04.43 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04.45 टर्मिनलवर जाऊ.
04.48 अगोदर प्रमाणे प्रोग्रॅम संकलित करा.
04.50 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04.52 आपल्याला आऊटपुट मिळेल. Sum is 9 .
04.57 आता हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
05.02 प्रोग्रॅम वर जाऊ.
05.04 येथे काही गोष्टी बदलू.
05.07 प्रथम Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
05.12 .cpp extension ने फाइल सेव करा.
05.18 Save वर क्लिक करा.
05.19 header file बदलूनiostream करा.
05.24 येथे using स्टेट्मेंट समाविष्ट करू.
05.28 C++ मध्ये फंक्शनdeclaration समान आहे.
05.32 त्यामुळे येथे कोणताही बदल करण्याची गरज नाही.
05.37 printf statement च्या जागी cout statement लिहा. C++ मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी cout<< function वापरतात.
05.48 येथे format specifier आणि \n गरज नाही..
05.52 commaडिलीट करा.
05.54 दोन opening angle brackets टाईप करा.
05.58 sum नंतर पुन्हा दोन opening angle brackets टाईप करा.
06.03 डबल कोट्स मध्ये backslash n. टाइप करा.
06.07 closing bracket डिलिट करा.
06.09 Save वर क्लिक करा.
06.11 प्रोग्रॅम संकलित करू.कार्यान्वित करण्यासाठी,
06.14 टर्मिनलवर जाऊ.
06.16 टाईप करा g++ function dot cpp hyphen o fun1
06.23 येथे fun1 लिहू. कारण आपल्याला fun आऊटपुट फाइल overwrite करायची नाही.
06.31 एंटर दाबा.
06.34 टाईप करा ./fun1
06.38 Sum is 9 असे आउटपुट दिसेल.
06.42 काही common errors पाहू, ज्या आपल्यास मिळू शकतात.
06.47 समजा येथे चारच्या जागी xटाईप केले.
06.51 मी बाकीचा कोड तसाच ठेवेल.
06.55 Save वर क्लिक करा.
06.58 प्रोग्रॅम संकलित करू.
07.02 आपल्याला दहाव्या ओळीवर,
07.06 x was not declared in this scope. ही error मिळेल.
07.09 कारणx हे character variable आहे.
07.13 हे कुठेही घोषित केले नव्हते.
07.15 add function चे argument हे integer variable आहे.
07.21 अशाप्रकारे return type आणि return value जुळत नाहीत.
07.25 प्रोग्रॅम वर परत जाऊ.
07.27 error दुरूस्त करू.
07.30 दहाव्या ओळीवर चार टाइप करा.
07.32 Save वर क्लिक करा.
07.35 पुन्हा हे कार्यान्वित करू.
07.37 prompt clear करू.
07.40 अगोदरप्रमाणे प्रोग्राम संकलित करू.
07.42 हे कार्य करत आहे.
07.45 आणखी common error पाहू, जी आपल्यास मिळू शकते.
07.50 समजा येथे आपण केवळ एक parameter पास केला,
07.55 चार डिलीट करा.
07.56 Save वर क्लिक करा.
07.58 टर्मिनल वर जाऊ.
08.00 संकलित करू.
08.01 दहाव्या ओळीवर आपल्याला,
08.06 too few arguments to function 'int add (int, int)' ही एरर दिसेल.
08.11 प्रोग्रॅमवर जाऊ.
08.14 तुम्ही पाहु शकता आपल्याकडे दोन parametersआहेत.
08.19 int a आणि int b .
08.22 आणि येथे आपण केवळ एक parameterपास करत आहोत.
08.25 म्हणून error मिळाली.
08.27 error दुरूस्त करू.
08.29 चार टाईप करा.
08.31 Save वर क्लिक करा.
08.34 टर्मिनल वर जाऊ.
08.36 पुन्हा कार्यान्वित करू.
08.39 हे कार्य करत आहे.
08.42 स्लाईडस वर जाऊ.
08.44 शिकलो ते थोडक्यात,
08.49 Functions,
08.50 function चा Syntax
08.51 arguments शिवाय Function .
08.53 Eg- void add()
08.55 Arguments सहित Function
08.57 Eg- int add(int a and int b)
09.02 Assignment
09.03 "फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्रॅम लिहा.
09.07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09.11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
09.21 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.24 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.28 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09.35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09.40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09.47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09.52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09.55 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana