LibreOffice-Suite-Writer/C4/Creating-newsletter/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:33, 7 February 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Creating Newsletter

Author: Manali Ranade

Keywords: Writer


Visual Clue
Narration
00:00 लिबर ऑफिस रायटरच्या Creating Newsletters with Multiple Columns वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमध्ये Newsletters बनवणे आणि त्यासोबत करता येणा-या काही क्रियांबद्दल जाणून घेणार आहोत.
00:17 येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही operating system आणि LibreOffice Suiteचे version 3.3.4 वापरणार आहोत.
00:27 Newsletter म्हणजे प्रकाशित नियतकालिके, परिपत्रके इत्यादी. जी सभासदांना नियमितपणे पाठवली जातात.
00:39 याचे कॉलम्सच्या रूपात अनेक भाग केल्यामुळे वाचकांना या भागांतील विविध लेख वाचणे सोपे होते.
00:47 लेखांचे वाचन सहज आणि जलद करता येईल असे newsletter आपण रायटरच्या सहाय्याने बनवू शकतो.
00:55 नवे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडण्यास, Fileवर क्लिक करून नंतर New आणि Text Document वर क्लिक करा.
01:03 हे डॉक्युमेंट Newsletter नावाने सेव्ह करा.
01:13 आपल्याकडे Newsletter नामक नवे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे.
01:17 आता डॉक्युमेंटमध्ये कॉलम्स समाविष्ट करू.
01:20 त्यासाठी प्रथम मेनूबारवरील Format वर क्लिक करा आणि नंतर Columns वर क्लिक करा.
01:27 अनेक पर्यायांसहित एक डायलॉग बॉक्स उघडेल.
01:31 येथे आपण कॉलम्सची संख्या निवडू शकतो.
01:34 कॉलम्सची width आणि spacing ठरवता येते.
01:37 तसेच separator lines साठी विविध properties निश्चित करता येतात.
01:42 कॉलम्स फिल्डसची व्हॅल्यू दोन ने वाढवून newsletter डॉक्युमेंटसाठी आपण दोन कॉलम्स निवडू.
01:49 कॉलम्स फिल्डसच्या शेजारी पाच आयकॉन्स आपल्याला विविध उपलब्ध फॉरमॅटचे प्रिव्ह्यू दाखवतात.
01:56 दुस-या फॉरमॅटवर क्लिक करा.
01:59 कॉलम्सच्या प्रॉपर्टीज दाखविणा-या डिफॉल्ट रूपातील सर्व व्हॅल्यूज तशाच ठेवू.
02:05 OK वर क्लिक करा.
02:08 आपणास टेक्स्ट एरियामध्ये दोन कॉलम्स दिसतील.
02:12 पहिल्या कॉलममध्ये लेख लिहू.
02:15 याला Nature असे शीर्षक देऊन ते टेक्स्ट बोल्ड करून त्याचा फाँट साईज 15 करा.
02:21 आणि त्याच्याखाली लेख लिहायला सुरूवात करा.
02:25 पहिल्या कॉलमच्या शेवटी पोचल्यावर कर्सर आपोआप पुढच्या कॉलमवर गेलेला आपल्याला दिसेल.
02:33 आपण कॉलममध्ये picture देखील समाविष्ट करू शकतो. आणि कॉलममध्ये नीट बसवण्यासाठी त्याचा आकारही बदलू शकतो.
02:39 आता थोडी जागा सोडून आपण कॉलममध्ये दुसरा लेख लिहू या.
02:46 प्रथम त्या लेखाला बोल्ड टेक्स्टमध्ये आणि फाँटचा आकार 15 करून Sports असे शीर्षक देऊ आणि खाली त्यावरील लेख लिहू.
02:56 आपल्याला दिसेल की कॉलम्समुळे वाचकांना लेख वाचणे सोपे होते.
03:02 आपला लेख पहिल्या कॉलममध्ये बसवण्यास त्यातील काही वाक्ये डिलिट करू.
03:08 आता पुढील कॉलमवर जाण्यासाठी Insert बटणावर क्लिक करून मग Manual Break वर क्लिक करा.
03:16 उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये Column break बटणावर क्लिक करून मग OK वर क्लिक करा.
03:23 कर्सर आपोआप पुढील कॉलमवर गेलेला दिसेल.
03:27 या कॉलममध्ये तुम्ही दुसरा लेख लिहिणे सुरू करू शकता.
03:31 फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय जसे की,
03:33 Align left, Align right
03:36 टेक्स्टला Background Colorदेणे,
03:38 टेक्स्टला Highlighting करणे आणि इतर अनेक वैशिष्ट्ये,
03:41 समाविष्ट करून टेक्स्ट आकर्षक बनवता येऊ शकते.
03:45 उदाहरणार्थ background color देण्यासाठी टेक्स्टचा काही भाग सिलेक्ट करा.
03:51 टूलबारवरील background color च्या आयकॉनवर क्लिक करून मग Green 4 वर क्लिक करा.
03:59 निवडलेल्या टेक्स्टचा background color बदलून तो फिकट हिरवा झालेला दिसेल.
04:05 या प्रमाणे टेक्स्टच्या विविध भागांना विविध background color देऊ शकता.
04:10 ड्रॉईंग टूलबारवरील Text पर्यायावर क्लिक करून आपण newsletter मध्ये banners समाविष्ट करू शकतो.
04:18 डॉक्युमेंटमधील कुठल्याही टेक्स्ट नसलेल्या भागात हा टेक्स्ट बॉक्स नेऊन ठेवा.
04:24 टेक्स्ट बॉक्सच्या आतील भागात लिहिलेले टेक्स्ट हे बॅनर किंवा जाहिरातीसारखे काम करेल.
04:30 आता This is a newsletter हे टेक्स्ट टाईप करा.
04:35 आपण या टेक्स्टला काही effects ही देऊ शकतो.
04:37 उदाहरणार्थ प्रथम टेक्स्टवर राईट क्लिक करून मग मेनूमधील Text पर्यायावर क्लिक करा.
04:45 Text आणि Text Animation नामक टॅब असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
04:50 Text Animation टॅबवर क्लिक करा.
04:53 या टॅब खालील Effects फिल्डमध्ये अनेक पर्याय आहेत.
04:58 newsletter मध्ये टेक्स्ट Blink होण्यासाठी Blink या पर्यायावर क्लिक करू या.
05:04 शेवटी OK वर क्लिक करा.
05:07 आपल्याला डॉक्युमेंटमध्ये This is a newsletter हे टेक्स्ट सतत blink होताना दिसेल.
05:13 अशा प्रकारचे अनेक effects आणि graphics आपण टेक्स्टला देऊ शकतो.
05:18 पुढील पानावर नवा लेख लिहिण्यासाठी प्रथम Insert बटणावर क्लिक करू या.
05:25 नंतर Manual Break पर्यायावर क्लिक करू.
05:29 उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Page break बटणावर क्लिक करू.
05:34 शेवटी OK वर क्लिक करू.
05:37 आपल्याला कर्सर पुढील पानावर आलेला दिसेल.
05:40 या पानावर, मागील पानाप्रमाणेच कॉलमचा फॉरमॅट असेल.
05:46 लेखातील शब्दसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रथम टेक्स्टचा काही भाग किंवा संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा.
05:53 आता मेनूबारवरील Tools पर्यायावर क्लिक करा.
05:57 आता ड्रॉप डाऊनमधील Word Count पर्यायावर क्लिक करा.
06:02 आपल्याला निवडलेल्या भागातील तसेच संपूर्ण डॉक्युमेंटमधील शब्द संख्या दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल.
06:10 तसेच तो संपूर्ण डॉक्युमेंट तसेच निवडलेल्या भागातील अक्षरांची संख्या दाखवेल.
06:18 डॉक्युमेंट लिहिताना स्पेल चेकचे कार्य आपोआप होऊ शकते.
06:23 त्यासाठी टूलबारवरील AutoSpellcheck ह्या आयकॉनवर क्लिक करा.
06:27 लेख लिहिताना जर स्पेलिंगची काही चूक आढळल्यास रायटर ती चूक दाखवण्यासाठी त्या शब्दाला लाल रेघेने अंडरलाईन करेल.
06:37 उदाहरणार्थ Catया शब्दाते स्पेलिंग C -A- A -T असे लिहून स्पेस बार दाबा. आपल्याला या शब्दाखाली लाल रेघ दिसेल.
06:48 जेव्हा आपण ते दुरूस्त करू तेव्हा लाल रेघ निघून जाईल.
06:52 अशा प्रकारे आपण मागील ट्युटोरियलमध्ये बघितलेले फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय newsletters साठी देखील वापरू शकतो.
07:01 लिबर ऑफिस रायटर चे,
07:04 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:06 थोडक्यात आपण लिबर ऑफिस रायटरमध्ये Newsletters बनविणे आणि त्यासोबत करता येणा-या काही क्रियांबद्दल शिकलो.
07:17 सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे
07:21 ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:24 तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
07:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:31 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:34 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:38 अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.
07:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:48 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:56 यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
08:00 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
08:07 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana