PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-1/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: User-Registration-Part-1
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवणे, mysqlडेटाबेसमधे युजर रजिस्टर करणे ह्यावरील पाठात आपले स्वागत. |
0:09 | हा पाठ सुरू करण्यापूर्वी "User login" वरील पाठ जरूर पाहा. ती लिंक तुम्हाला दिलेली आहे. |
0:19 | "User registration" पूर्वी "User login" बनवण्याचे कारण "User login" ची प्रक्रिया "Registration" च्या प्रक्रियेपक्षा सोपी आहे. |
0:34 | योग्य पध्दतीने "login" ची प्रक्रिया झाली आणि डेटाबेसमधील fields मिळाली की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू शकतो. |
0:43 | डेटाबेसमधे काय रजिस्टर करत आहोत हे कळण्याच्या दृष्टीने हे सोपे आहे. |
0:49 | या भागाच्या सुरूवातीला आपण फॉर्म बनवू आणि login च्या माहितीची उपलब्धता तपासू. |
0:56 | आपल्या आधीच्या पाठांतील "login session" फोल्डर वापरू. |
1:03 | येथे login सेशन आणि fields आहेत पण आपण नवी फाईल बनवणार आहोत. |
1:12 | प्रथम काही टॅग्ज समाविष्ट करू. |
1:15 | ही फाईलlogin सेशन फोल्डर मधे बनवू. ज्याचे "index dot php" हे मुख्य पेज दिसत आहे. |
1:22 | Log in, log out आणि युजर्स logged in असल्यास member पेजही दिसत आहेत. ही फाईल "register dot php" नावाने सेव्ह करू. |
1:32 | युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवत असल्यामुळे युजर login करण्यापूर्वी स्वतःला रजिस्टर करू शकतो. |
1:40 | "register dot php" बनवली आहे. तसेच index file मधे खाली लिंक बनवून ती उघडणार आहोत. |
1:48 | ही रजिस्टर पेजला लिंक करेल म्हणून येथे "Register" टाईप करा. |
2:02 | आपल्याला "Register" अशी लिंक मिळेल. आत्ता ह्या पेजवर काहीही नाही. |
2:09 | हे login करण्याच्या पाठातून घेतले आहे. येथे लिंक समाविष्ट केल्याने loginकरण्यापूर्वी आपण रजिस्टर करू शकतो. |
2:20 | डेटाबेसमधे डेटा टाईप करण्यासाठी नवी विंडो उघडून "php my admin" वर जाऊ. |
2:29 | हा "php login" डेटाबेस आहे आणि हे "users" टेबल आहे. |
2:38 | मी येथे "name" हे नवे फिल्ड समाविष्ट करून आता "date" हे फिल्ड समाविष्ट करणार आहे. |
2:47 | At the end of the table हा पर्याय निवडून खाली फिल्डमधे "date" टाईप करा. date फॉरमॅट निवडा. |
3:04 | ही कोणती तारीख याबद्दल विचार करत असाल तर युजर रजिस्टर होत असतानाची ही date असेल. आता हे सेव्ह करू. |
3:15 | "User login" या पाठातील id, username आणि password ही फिल्डस घेत आहोत. याशिवाय युजरचे नाव आणि रजिस्टर केल्याची तारीख ने ही फिल्डस वाढवत आहोत. |
3:29 | ब्राऊज करू. येथे आधीपासूनच असलेल्या काही व्हॅल्यूज दिसत आहेत. |
3:35 | त्या डिलिट करून रिकाम्या डेटाबेसने सुरूवात करू. आपण युजर्स रजिस्टर करत आहोत. |
3:40 | आता एकही युजर नाही आणि रजिस्टर पेजवर जाण्यासाठी लिंक मिळाली असे समजू. हे आपले रजिस्टर पेज आहे. |
3:49 | ह्यात पेज कसे बनवायचे हे सांगणारा html कोड थोडक्यात बघू. आपल्याकडे एक फॉर्म असेल. |
3:59 | हा स्वतः सबमिट होणारा फॉर्म असेल. हा "register dot php" वर पुन्हा सबमिट होईल. |
4:07 | आपण एक टेबल बनवणार आहोत. त्यामधे येथे row असणार आहे. |
4:13 | आपल्याकडे दोन कॉलम्स आहेत म्हणून दोन td blocks आहेत. पहिला म्हणजे fullname. |
4:23 | हे तुमच्यावर सोडतो. वेळ वाचवण्याकरता मी असे करत आहे. |
4:30 | दुस-या कॉलममधे टाईप करा, input type equal to "text" आणि name equals "fullname". |
4:38 | मूळ पेजवर जाऊन register वर क्लिक करा. |
4:47 | येथे बघू शकतो, हा पहिला कॉलम आहे आणि हा दुसरा input box असलेला कॉलम आहे. |
4:55 | आपण येथे वर जाऊ. php codeमधे header एको करू. याबद्दल मी नंतर सांगेन. |
5:07 | आपल्याला हे मिळाले आहे. वेळ वाचविण्यासाठी हे खाली कॉपी पेस्ट करू. |
5:15 | तुम्ही "t r" पासून "end t r" पर्यंत निवडल्याची खात्री करा. |
5:22 | हे खाली पेस्ट करू. नंतर "Choose a username" टाईप करा आणि हे बदलून येथे "username" टाईप करा. |
5:32 | हे पुन्हा पेस्ट करू. येथे "Choose a password" टाईप करा. तुमचा संगणक हॅक करण्यासाठी कोणी screen capture softwareवापरून किंवा तुमच्या स्क्रीनकडे लक्ष ठेवून पासवर्ड चोरू नये म्हणून ही खबरदारी आहे. |
5:47 | आणि पुढे येथे खाली पेस्ट करा त्याला "Repeat your password" नाव द्या. |
05:58 | येथे "password" टाईप करा. |
6:07 | ह्याला पुन्हा "password" नाव देऊ शकत नाही म्हणून "repeat password". |
6:10 | सुरक्षिततेसाठी युजरने सबमिट केल्यावर दोन्ही पासवर्ड एकमेकांबरोबर तपासून बघणार आहोत. |
6:20 | इतर कुठल्याही फिल्डची गरज नाही. हे शेवटचे आहे. |
6:24 | आपल्याला "date" ची गरज आहे. फॉर्म सबमिट करताना ते करू. |
6.31 | अशाप्रकारे फॉर्म बनवला आहे. मागे जाऊन रिफ्रेश करू. |
6:37 | टेबल वापरल्यामुळे ह्याची समान पध्दतीने मांडणी झालेली दिसेल. |
6:42 | आपल्याला सबमिट बटण हवे आहे. |
6:45 | टेबलच्या खाली paragraph break द्या. |
6:48 | टाईप करा input type equal to "submit" आणि name equal to "submit". |
6:54 | उपलब्धता तपासायची आहे. ज्याची व्हॅल्यू "register" असेल. |
6:57 | रिफ्रेश करा. पासवर्ड फिल्डसमधे आपल्याला अक्षरे दिसत नाहीत. |
7:05 | युजर्सना त्यांच्या व्हॅल्यूज टाईप करण्यासाठी fullname आणि username आहे. |
7:12 | आपण येथे पाठ संपवत आहोत. |
7:16 | हे तुम्ही क्रमाक्रमाने करून बघत असाल तर तुम्ही तुमच्या पध्दतीने हा फॉर्म बनवू शकता. |
7:25 | थोडा वेळ घेऊन हवा तसा फॉर्म तुम्ही बनवा. |
7:30 | त्यात हवे ते बदल जसे की labels बदलू शकता. |
7:33 | boxes आणि register बटण मिळाल्याची खात्री करा. |
7:35 | पुढील भागात युजरने प्रत्येक फिल्ड टाईप केले का ते तपासू. |
7:44 | पासवर्ड समान आहेत का हे तपासण्यासाठी तुलना करू. दोन पासवर्ड आहेत पण character lengthवेगळी असल्याने ते समान नाहीत. युजरकडून काही चूक झाल्यामुळे तो रजिस्टर करू शकणार नाही. |
7:59 | खात्री आहे तुम्ही आत्तापर्यंत कुठे ना कुठे रजिस्टर केले असेल आणि पासवर्ड पुन्हा टाईप केलेला असेल. |
8:07 | तसेच पासवर्ड encrypt करून हानीकारक html tags फॉर्ममधून काढून टाकणार आहोत. रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी अशी सुरक्षितता घेणार आहोत. |
8:17 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |