KiCad/C2/Designing-printed-circuit-board-in-KiCad/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:20, 19 December 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Designing-printed-circuit-board-in-KiCad

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00.01 प्रिय मित्रांनो,
00.02 KiCad मधील Designing printed circuit board या पाठात स्वागत.
00.07 आपण शिकणार आहोत,
00.09 KiCad मधे printed circuit boardचे डिझाईन बनवणे.
00.12 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
00.16 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00.25 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00.30 यूज़र ला circuit schematic design बनवणे, तसेच
00.35 electric rule check करणे,
00.37 netlist बनवणे,
00.39 footprints सहित components mapकरणे माहिती असावे.
00.43 संबंधित पाठा साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या.
00.50 KiCad सुरू करण्यासाठी,
00.52 ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
00.56 Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01.01 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01.09 हे KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल.
01.12 EEschemaउघडण्यासाठी वरील पॅनेलवर जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा.
01.19 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01.25 OK वर क्लिक करा.
01.28 आधी बनवलेल्या Astable multivibratorचे सर्किटschematic आपण वापरू.
01.35 असे करण्यास File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01.42 फाईल सेव्ह केलेला फोल्डर निवडा.
01.49 project1.sch निवडा. Openवर क्लिक करा.
01.56 मी विंडोचा आकार बदलेल.
02.00 आता मी Open वर क्लिक करेल .
02.06 हे सर्किट schematic उघडेल.
02.08 माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू.
02.13 ह्या सर्किटसाठी आधीच netlist बनवली आहे.
02.16 संबंधित componentsशी फूटप्रिंट मॅप केलेले आहेत.
02.20 आता पुढे printed circuit board layout बनवू.
02.26 हे सुरू करण्यासाठी EEschema विंडोच्या वरील पॅनेल मधील Run PCBnew बटण क्लिक करा.
02.36 PCBnew विंडो उघडेल.
02.39 it did not find project1.brd असा मेसेज असलेला info dialog box उघडेल.
02.44 dialog box बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा.
02.49 PCBnew विंडोच्या वरील पॅनेल मधील Read netlist बटण क्लिक करून फूटप्रिंटस import करू.
02.57 येथे netlist विंडो उघडली आहे.
03.01 सर्व default settings आहेत तशीच ठेवा.
03.03 Browse netlist Files बटण क्लिक करा.
03.07 हे Select netlist विंडो उघडेल.
03.13 नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू.
03.20 संबंधित डिरेक्टरीतून project1.net फाईल सिलेक्ट करा. Openवर क्लिक करा.
03.27 Read Current Netlist बटणावर क्लिक करा.
03.30 project1.cmp not found अशी वॉर्निंग देईल.
03.35 OK वर क्लिक करा.
03.37 netlist विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
03.42 सर्व इंपोर्ट झालेल्या फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या डाव्या कोप-यात वरती ठेवलेल्या दिसतील.
03.49 सर्व फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे.
03.56 त्यासाठी PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधे असलेल्या Manual and Automatic move and place of modules बटणावर क्लिक करा.
04.08 PCBnew विंडोच्या मध्यभागी एकदा राईट क्लिक करा.
04.14 Glob Move and Placeवर जाऊन Move All Modules वर क्लिक करा.
04.22 हे Confirmation विंडो उघडेल. Yes क्लिक करा.
04.28 स्पष्ट दिसण्यासाठी माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू.
04.35 footprintsच्या टर्मिनल्स जोडणा-या पांढ-या रंगाच्या वायर्स कदाचित तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील.
04.39 जर दिसत नसतील तर PCBnew विंडोच्या डाव्या पॅनेलमधे असलेल्या Show or Hide board ratsnest बटणावर क्लिक करा.
04.51 पांढ-या वायर्सला airwires म्हणतात.
04.55 अशा पध्दतीने modules मांडू की कमीत कमी airwires एकमेकांना ओलांडतील.
05.01 IC 555 footprintवर राईट क्लिक करा.
05.07 Footprint ऑप्शन्स वर जाऊन Moveवर क्लिक करा.
05.12 footprint कर्सरला जोडला गेला आहे.
05.16 तुम्ही पाहु शकता , पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या grid नुसार component हलतात.
05.25 एकदा क्लिक करून तुम्हाला हवा तिथे component ठेवा. मी तो येथे ठेवत आहे.
05.33 PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधील Grid options ह्या ड्रॉप डाऊन मेनूद्वारे ग्रीड स्पेसिंग बदलता येते.
05.44 आता Grid 1.270 ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूसहित पुढे जाऊ.
05.53 components हलवण्यासाठी M ही शॉर्टकट की देखील वापरू शकतो.
05.58 उदाहरणार्थ capacitor कसा हलवायचा ते पाहू.
06.02 कर्सरcapacitor वर ठेवा.
06.05 M दाबा. ते module कर्सरला जोडले जाईल. गरजेनुसार हे कुठेही हलवू शकता.
06.14 component ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा.
06.17 component फिरवण्यासाठी R दाबा.
06.22 उदाहरणार्थ resistor फिरवू. resistor वर कर्सर ठेवा R दाबा.
06.29 अशाप्रकारे सर्व componentsची मांडणी करू शकतो.
06.32 आपण फूटप्रिंट अशापध्दतीने मंडळी मांडली आहे की, कमीत कमी airwiresएकमेकांना ओलांडतील. हे येथे दाखवले आहे.
06.41 आता ह्या airwires चे actual tracks मधे रूपांतरित करणे गरजेचे आहे.
06.46 PCBnew विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Layer टॅब खालील Back layer सिलेक्ट करा. Back layer हिरव्या रंगाने दाखवली जाते.
07.01 निवडलेली Layer छोट्या निळ्या बाणाने दाखवली जाते.
07.06 tracksबनवण्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील पॅनेलमधे असलेले Add tracks and vias बटण निवडा.
07.17 R1च्या एका nodeवर क्लिक करा.
07.22 त्या नंतर R2 च्या node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे.
07.31 तसेच आणखी एक वायर Resistor R3 आणि capacitor C1 मधे जोडणार आहोत.
07.38 R3 च्या एका nodeवर क्लिक करा.
07.41 वायरची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा.
07.46 नंतर C1 च्या node वर जिथे वायर जोडणे गरजेचे आहे तिथे डबल क्लिक करा.
07.51 येथील बनलेला हिरवा ट्रॅक printed circuit boardवर बनणारा तांब्याचा मार्ग दाखवतो.
07.59 तसेच track ची रूंदीही बदलता येते.
08.02 PCBnew विंडोच्या मेनूबारमधील Design Rulesपर्यायावर क्लिक करून हे करता येते.
08.11 Design Rulesवर क्लिक करा.
08.14 Design Rules Editor उघडेल. जिथे trackची रूंदी बदलू शकतो.
08.19 आपणtrack ची रूंदी बदलून 1.5 करू. त्यासाठी Track Widthच्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा. 1.5 टाईप करून एंटर दाबा.
08.34 trackबनवण्यासाठी कीबोर्डवरील Xबटण वापरू शकतो.
08.39 मी हे तुम्हाला दाखविते, LED D1च्या एका nodeवर कर्सर ठेवा आणि X बटण दाबा.
08.48 नंतर R3 node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे.
08.54 track ची रूंदी वाढलेली दिसेल. अशाप्रकारे board वरील डिझाईन पूर्ण करू शकतो.
09.03 मी अगोदरच board साठी डिझाईन पूर्ण करून ठेवले आहे.
09.08 आपण पूर्ण केलेली डिझाईन board file उघडू.
09.19 हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी PCB edges काढणे गरजेचे आहे.
09.25 त्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील Layer tab मधील PCB Edges हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.
09.34 layout editor विंडोच्या उजव्या पॅनेलवर असलेल्या Add graphic line or polygon बटणावर क्लिक करा .
09.44 ह्या Printed circuit Boardच्या भोवती आयत काढू.
09.49 layoutच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करा.
09.52 कर्सर आडवा उजवीकडे हलवा.
09.56 रेषेची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा.
10.00 कर्सर उभा खालच्या दिशेने सरकवा.
10.04 अशा पध्दतीने आयत पूर्ण करू शकतो.
10.11 आपण आयत पूर्ण करू.
10.16 माऊसचे डावे बटण डबल क्लिक करून आयत पूर्ण करा.
10.24 File मेनूवर क्लिक करून Save वर क्लिक करा. ही फाईल extension .brd अशी सेव्ह होईल हे लक्षात घ्या.
10.38 अशाप्रकारे Astable multivibrator सर्किटचे board layout पूर्ण झाले आहे.
10.44 ह्या पाठात PCBnew द्वारे printed circuit board चे डिझाईन बनवायला शिकलो.
10.50 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11.03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.06 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.29 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
11.35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11.38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana