KiCad/C2/Designing-printed-circuit-board-in-KiCad/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Designing-printed-circuit-board-in-KiCad
Author: Manali Ranade
Keywords: KiCAD
|
|
---|---|
00.01 | प्रिय मित्रांनो, |
00.02 | KiCad मधील Designing printed circuit board या पाठात स्वागत. |
00.07 | आपण शिकणार आहोत, |
00.09 | KiCad मधे printed circuit boardचे डिझाईन बनवणे. |
00.12 | आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम, |
00.16 | आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत. |
00.25 | तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. |
00.30 | यूज़र ला circuit schematic design बनवणे, तसेच |
00.35 | electric rule check करणे, |
00.37 | netlist बनवणे, |
00.39 | footprints सहित components mapकरणे माहिती असावे. |
00.43 | संबंधित पाठा साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या. |
00.50 | KiCad सुरू करण्यासाठी, |
00.52 | ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा. |
00.56 | Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. |
01.01 | सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा. |
01.09 | हे KiCad ची मेन विंडो स्क्रीनवर उघडेल. |
01.12 | EEschemaउघडण्यासाठी वरील पॅनेलवर जाऊन EEschema टॅबवर क्लिक करा. |
01.19 | it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल. |
01.25 | OK वर क्लिक करा. |
01.28 | आधी बनवलेल्या Astable multivibratorचे सर्किटschematic आपण वापरू. |
01.35 | असे करण्यास File मेनूवरील Open वर क्लिक करा. |
01.42 | फाईल सेव्ह केलेला फोल्डर निवडा. |
01.49 | project1.sch निवडा. Openवर क्लिक करा. |
01.56 | मी विंडोचा आकार बदलेल. |
02.00 | आता मी Open वर क्लिक करेल . |
02.06 | हे सर्किट schematic उघडेल. |
02.08 | माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू. |
02.13 | ह्या सर्किटसाठी आधीच netlist बनवली आहे. |
02.16 | संबंधित componentsशी फूटप्रिंट मॅप केलेले आहेत. |
02.20 | आता पुढे printed circuit board layout बनवू. |
02.26 | हे सुरू करण्यासाठी EEschema विंडोच्या वरील पॅनेल मधील Run PCBnew बटण क्लिक करा. |
02.36 | PCBnew विंडो उघडेल. |
02.39 | it did not find project1.brd असा मेसेज असलेला info dialog box उघडेल. |
02.44 | dialog box बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा. |
02.49 | PCBnew विंडोच्या वरील पॅनेल मधील Read netlist बटण क्लिक करून फूटप्रिंटस import करू. |
02.57 | येथे netlist विंडो उघडली आहे. |
03.01 | सर्व default settings आहेत तशीच ठेवा. |
03.03 | Browse netlist Files बटण क्लिक करा. |
03.07 | हे Select netlist विंडो उघडेल. |
03.13 | नीट दिसण्यासाठी विंडोचा आकार बदलू. |
03.20 | संबंधित डिरेक्टरीतून project1.net फाईल सिलेक्ट करा. Openवर क्लिक करा. |
03.27 | Read Current Netlist बटणावर क्लिक करा. |
03.30 | project1.cmp not found अशी वॉर्निंग देईल. |
03.35 | OK वर क्लिक करा. |
03.37 | netlist विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
03.42 | सर्व इंपोर्ट झालेल्या फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या डाव्या कोप-यात वरती ठेवलेल्या दिसतील. |
03.49 | सर्व फूटप्रिंटस PCBnew विंडोच्या मध्यभागी ठेवणे गरजेचे आहे. |
03.56 | त्यासाठी PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधे असलेल्या Manual and Automatic move and place of modules बटणावर क्लिक करा. |
04.08 | PCBnew विंडोच्या मध्यभागी एकदा राईट क्लिक करा. |
04.14 | Glob Move and Placeवर जाऊन Move All Modules वर क्लिक करा. |
04.22 | हे Confirmation विंडो उघडेल. Yes क्लिक करा. |
04.28 | स्पष्ट दिसण्यासाठी माऊसच्या scroll बटणाद्वारे zoom in करू. |
04.35 | footprintsच्या टर्मिनल्स जोडणा-या पांढ-या रंगाच्या वायर्स कदाचित तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील. |
04.39 | जर दिसत नसतील तर PCBnew विंडोच्या डाव्या पॅनेलमधे असलेल्या Show or Hide board ratsnest बटणावर क्लिक करा. |
04.51 | पांढ-या वायर्सला airwires म्हणतात. |
04.55 | अशा पध्दतीने modules मांडू की कमीत कमी airwires एकमेकांना ओलांडतील. |
05.01 | IC 555 footprintवर राईट क्लिक करा. |
05.07 | Footprint ऑप्शन्स वर जाऊन Moveवर क्लिक करा. |
05.12 | footprint कर्सरला जोडला गेला आहे. |
05.16 | तुम्ही पाहु शकता , पार्श्वभूमीवर दिसत असलेल्या grid नुसार component हलतात. |
05.25 | एकदा क्लिक करून तुम्हाला हवा तिथे component ठेवा. मी तो येथे ठेवत आहे. |
05.33 | PCBnew विंडोच्या वरील पॅनेलमधील Grid options ह्या ड्रॉप डाऊन मेनूद्वारे ग्रीड स्पेसिंग बदलता येते. |
05.44 | आता Grid 1.270 ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूसहित पुढे जाऊ. |
05.53 | components हलवण्यासाठी M ही शॉर्टकट की देखील वापरू शकतो. |
05.58 | उदाहरणार्थ capacitor कसा हलवायचा ते पाहू. |
06.02 | कर्सरcapacitor वर ठेवा. |
06.05 | M दाबा. ते module कर्सरला जोडले जाईल. गरजेनुसार हे कुठेही हलवू शकता. |
06.14 | component ठेवण्यासाठी एकदा क्लिक करा. |
06.17 | component फिरवण्यासाठी R दाबा. |
06.22 | उदाहरणार्थ resistor फिरवू. resistor वर कर्सर ठेवा R दाबा. |
06.29 | अशाप्रकारे सर्व componentsची मांडणी करू शकतो. |
06.32 | आपण फूटप्रिंट अशापध्दतीने मंडळी मांडली आहे की, कमीत कमी airwiresएकमेकांना ओलांडतील. हे येथे दाखवले आहे. |
06.41 | आता ह्या airwires चे actual tracks मधे रूपांतरित करणे गरजेचे आहे. |
06.46 | PCBnew विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या Layer टॅब खालील Back layer सिलेक्ट करा. Back layer हिरव्या रंगाने दाखवली जाते. |
07.01 | निवडलेली Layer छोट्या निळ्या बाणाने दाखवली जाते. |
07.06 | tracksबनवण्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील पॅनेलमधे असलेले Add tracks and vias बटण निवडा. |
07.17 | R1च्या एका nodeवर क्लिक करा. |
07.22 | त्या नंतर R2 च्या node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे. |
07.31 | तसेच आणखी एक वायर Resistor R3 आणि capacitor C1 मधे जोडणार आहोत. |
07.38 | R3 च्या एका nodeवर क्लिक करा. |
07.41 | वायरची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा. |
07.46 | नंतर C1 च्या node वर जिथे वायर जोडणे गरजेचे आहे तिथे डबल क्लिक करा. |
07.51 | येथील बनलेला हिरवा ट्रॅक printed circuit boardवर बनणारा तांब्याचा मार्ग दाखवतो. |
07.59 | तसेच track ची रूंदीही बदलता येते. |
08.02 | PCBnew विंडोच्या मेनूबारमधील Design Rulesपर्यायावर क्लिक करून हे करता येते. |
08.11 | Design Rulesवर क्लिक करा. |
08.14 | Design Rules Editor उघडेल. जिथे trackची रूंदी बदलू शकतो. |
08.19 | आपणtrack ची रूंदी बदलून 1.5 करू. त्यासाठी Track Widthच्या व्हॅल्यूवर डबल क्लिक करा. 1.5 टाईप करून एंटर दाबा. |
08.34 | trackबनवण्यासाठी कीबोर्डवरील Xबटण वापरू शकतो. |
08.39 | मी हे तुम्हाला दाखविते, LED D1च्या एका nodeवर कर्सर ठेवा आणि X बटण दाबा. |
08.48 | नंतर R3 node वर डबल क्लिक करा जिथे वायर जोडणे गरजेचे आहे. |
08.54 | track ची रूंदी वाढलेली दिसेल. अशाप्रकारे board वरील डिझाईन पूर्ण करू शकतो. |
09.03 | मी अगोदरच board साठी डिझाईन पूर्ण करून ठेवले आहे. |
09.08 | आपण पूर्ण केलेली डिझाईन board file उघडू. |
09.19 | हे डिझाईन पूर्ण करण्यासाठी PCB edges काढणे गरजेचे आहे. |
09.25 | त्यासाठी PCBnew विंडोच्या उजवीकडील Layer tab मधील PCB Edges हा पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
09.34 | layout editor विंडोच्या उजव्या पॅनेलवर असलेल्या Add graphic line or polygon बटणावर क्लिक करा . |
09.44 | ह्या Printed circuit Boardच्या भोवती आयत काढू. |
09.49 | layoutच्या डाव्या बाजूला वरती क्लिक करा. |
09.52 | कर्सर आडवा उजवीकडे हलवा. |
09.56 | रेषेची दिशा बदलण्यासाठी एकदा क्लिक करा. |
10.00 | कर्सर उभा खालच्या दिशेने सरकवा. |
10.04 | अशा पध्दतीने आयत पूर्ण करू शकतो. |
10.11 | आपण आयत पूर्ण करू. |
10.16 | माऊसचे डावे बटण डबल क्लिक करून आयत पूर्ण करा. |
10.24 | File मेनूवर क्लिक करून Save वर क्लिक करा. ही फाईल extension .brd अशी सेव्ह होईल हे लक्षात घ्या. |
10.38 | अशाप्रकारे Astable multivibrator सर्किटचे board layout पूर्ण झाले आहे. |
10.44 | ह्या पाठात PCBnew द्वारे printed circuit board चे डिझाईन बनवायला शिकलो. |
10.50 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10.54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11.03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.06 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.15 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.19 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.29 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
11.35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
11.38 | सहभागासाठी धन्यवाद. |