LibreOffice-Suite-Impress/C2/Creating-a-presentation-document/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:35, 17 December 2013 by Nancyvarkey (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Creating a presentation

Author: Manali Ranade

Keywords: Impress


Visual Clue
Narration
00:00 इम्प्रेसच्या 'Creating a presentation document' आणि बेसिक फॉरमॅटिंग वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:08 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग.
00:21 इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:29 आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेले 'Sample Impress' हे प्रेझेंटेशन उघडू या.
00:35 स्क्रीनवरील गोष्टींवर प्रथम नजर टाकू.
00:39 मध्यभागातल्या 'Work Space' मध्ये आपण काम करणार आहोत.
00:44 यात दिसणा-या पाच Tabs ना 'View Buttons' म्हणतात.
00:49 सध्या 'Normal' Tab निवडलेला आहे.
00:52 स्लाईड बनवण्यासाठी वापरला जाणारा हा मुख्य व्ह्यू आहे.
00:55 'Outline' व्ह्यूमधे स्लाईडचे शीर्षक, बुलेटस् आणि अनुक्रमांक ह्या स्वरूपात स्लाईड्सची यादी दिसते.
01:03 'notes' व्ह्यूमध्ये स्लाईडसाठी तळटीपा लिहिता येतात ज्या प्रेझेंटशनच्या वेळी दिसत नाहीत.
01:10 'Handout' व्ह्यू हँडआऊट प्रिंटींगसाठी वापरतात.
01:14 येथे आपल्याला एका पानावर किती स्लाईडस् प्रिंट करायच्या ते ठरवता येते.
01:19 स्लाईड्स थंबनेल्स बघण्यासाठी सॉर्टर व्ह्यू वापरतात.
01:23 'Normal' व्ह्यू बटणावर पुन्हा क्लिक करा.
01:26 स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला 'Slides' Pane दिसेल. प्रेझेंटेशन मधील स्लाईडसच्या थंबनेल्स येथे उपलब्ध असतात.
01:34 उजव्या बाजूला तुम्हाला 'Task' Pane दिसेल ज्याच्यात ५ विभाग आहेत.
01:40 'Layout Section' मध्ये स्लाईडचे आराखडे असतात.
01:43 हे जसेच्या तसे किंवा त्यात बदल करून वापरता येतात.
01:48 प्रत्येक विभागांबद्दल अधिक माहिती पुढे करून घेणार आहोत.
01:53 आता आपण स्लाईड कशी समाविष्ट करावी ते शिकू या. 'Slide Pane' वरील दुस-या स्लाईडवर क्लिक करून ती सिलेक्ट करा.
02:02 आपण 'Insert' आणि मग 'Slide' वर क्लिक करा.
02:05 आपल्याला दुस-या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल.
02:10 स्लाईडला शीर्षक देण्यासाठी 'Click to add Title' असे लिहिलेल्या टेक्स्टबार वर क्लिक करा.
02:17 आता 'Short term strategy' असे टाईप करून टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर क्लिक करा.
02:23 अशा प्रकारे आपल्याला शीर्षक समाविष्ट करता येते.
02:26 आपण दोन पध्दतींनी स्लाईडची कॉपी बनवू शकतो.
02:30 पहिली पध्दत बघू या; 'Insert' आणि मग 'Duplicate' स्लाईडवर क्लिक करा.
02:35 आपण प्रथम बनवलेल्या स्लाईड नंतर नवीन 'Duplicate Slide' समाविष्ट झालेली दिसेल.
02:42 या व्यतिरिक्त 'Work Space Pane' मधील 'Slide Sorter' वर क्लिक करून स्लाईड सॉर्टर व्ह्यू वर जा.
02:50 आता सातवी स्लाईड कॉपी करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून 'Context' मेनूमधील 'Copy' हा पर्याय सिलेक्ट करा.
02:58 शेवटच्या स्लाईडवर राईट क्लिक करून 'Paste' निवडा.
03:01 'After' हा पर्याय सिलेक्ट करून 'OK' वर क्लिक करा.
03:04 तुमच्या प्रेझेंटेशनच्या शेवटी ह्या स्लाईडची कॉपी तयार केली गेली आहे.
03:10 आता फाँट आणि फाँटला फॉरमॅटींग बद्दल जाणून घेऊ.
03:15 'Long Term Goal' असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर डबल क्लिक करून ती सिलेक्ट करा.
03:20 Body च्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि सर्व मजकूर सिलेक्ट करून तो डिलिट करा.
03:26 आता हे टाईप करा. 'Reduce cost', 'Reduce dependence on few vendors', 'Develop customized application'.
03:37 लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणे Font Type आणि Font Size मध्ये बदल करू या.
03:43 टेक्स्टची एक ओळ निवडा. Text Format या टूलबारमध्ये 'Albany' हा फाँट टाईप बदलून तो 'Arial Black' करा.
03:52 आणि '32' हा फाँट साईज बदलून तो '40' करा.
03:56 टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
03:59 लक्षात घ्या की फाँट बदललेला आहे.
04:02 'Format' मेनूमधील 'Character' या पर्यायावर क्लिक करून देखील फाँट बदलता येतो.
04:09 एक डायलॉग बॉक्स उघडेल, जिथे आपण आवश्यकतेनुसार फाँट, स्टाईल आणि साईज निवडू शकतो.
04:16 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
04:19 फाँटचा रंग बदलण्यासाठी आपण 'Development up to present' असे शीर्षक असलेली स्लाईड घेऊ.
'04:25 बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून सर्व मजकूर सिलेक्ट करा.
04:30 फाँट कलरच्या आयकॉन शेजारील डाऊन ऍरोवर क्लिक करून तुम्हाला योग्य वाटेल असा रंग निवडा.
04:37 टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
04:40 रंगामध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
04:43 लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणेच येथे 'Bold', 'Italic', 'Underline' ही फॉरमॅटिंग वापरता येतात.
04:50 'Recommendation' असे शीर्षक असलेली स्लाईड निवडा.
04:53 बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून टेक्स्टची एक ओळ निवडा.
04:58 आता 'Bold', 'Italic', 'Underline' या आयकॉनवर क्लिक करा.
05:03 टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
05:06 टेक्स्ट मध्ये झालेला बदल लक्षात घ्या.
05:08 आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:11 आपण शिकलो ते थोडक्यातः इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग.
05:24 COMPREHENSION TEST ASSIGNMENT
05:28 नवीन प्रेझेंटेशन तयार करा.
05:30 तिस-या आणि चौथ्या स्लाईडस् मध्ये एक नवीन स्लाईड समाविष्ट करा.
05:35 प्रेझेंटेशनच्या शेवटी चौथ्या स्लाईडची कॉपी बनवा.
05:40 दुस-या स्लाईडमध्ये टेक्स्टबॉक्स बनवा. त्यामध्ये काही टेक्स्ट टाईप करा.
05:45 टेक्स्टचा फाँट साईज बदलून तो 32 करा.
05:49 टेक्स्टला Bold, Italic आणि Underline करून त्याचा रंग निळा करा.
05:56 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:59 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:02 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:12 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:16 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
06:27 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
06:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:46 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha