C-and-C++/C2/If-And-Else-If-statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:10, 11 December 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: If-And-Else-If-statement

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.02 Conditional statements in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.09 ह्यात शिकणार आहोत,
00.12 एकstatement कार्यान्वित करणे.
00.14 अनेक statements कार्यान्वित करणे.
00.17 हे उदाहरणांद्वारे पाहू.
00.20 आपण common errors आणि solutions ही बघू .
00.25 ह्यासाठी आपणUbuntu Operating system version 11.10;
00.32 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.39 प्रथमconditional statements शिकू.
00.43 हे statement, कार्यान्वित होताना प्रोग्रॅमचा flow नियंत्रित करते.
00.50 कोणता code कार्यान्वित होणार ह्याचा निर्णय घेण्यास मदत करते.
00.56 आपणconditions, true किंवा false आहेत हे बघतो.
01.01 त्यानुसार एक किंवा अनेक statements कार्यान्वित करू शकतो.
01.08 if statementचा flow समजून घेऊ.
01.13 condition जर true असेल तर statement1 कार्यान्वित होईल.
01.21 condition जर false असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
01.29 आता else if statement चा flow पाहू.
01.33 condition1 जर true असेल statement1 कार्यान्वित होईल.
01.41 condition1 जर false असेल तर condition2 तपासली जाईल.
01.50 condition2 जर trueअसेल तर statement3 कार्यान्वित होईल.
01.55 condition2 जर false, असेल तर statement2 कार्यान्वित होईल.
02.03 प्रोग्रॅमकडे वळू.
02.06 मी एडिटरवरcode आधीच लिहिला आहे.
02.09 आपण तो उघडू.
02.13 ifstmt.c हे आपल्या फाईलचे नाव आहे.
02.19 ह्यामध्ये दोन संख्यांची बेरीज करून काही conditions तपासणार आहोत.
02.27 हा code समजून घेऊ.
02.31 ही header file आहे.
02.34 हे main function आहे.
02.38 येथे a, b आणि sum ही तीनinteger variables घोषित केली आहेत.
02.47 येथे userला input देण्यास सांगू.
02.49 a आणि bच्या व्हॅल्यूज user एंटर करेल.
02.53 त्या व्हॅल्यूजvariable a आणि b मध्ये संचित होतील.
02.58 scanf() हे console वरील डेटा वाचेल.
03.02 मिळालेला result दिलेल्या व्हेरिएबलमध्ये संचित करते.
03.06 scanf() मधील format specifier डेटाचा टाईप सांगते.
03.11 येथे %d आहे ज्याचा अर्थ डेटाचा टाईप integer आहे.
03.19 a आणि bच्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत .
03.22 मिळणारे उत्तर sum मध्ये संचित करू.
03.26 ते प्रिंट करू.
03.29 हे if statement आहे.
03.31 sum वीसपेक्षा जास्त आहे का हे तपासू.
03.36 condition true असेल तरSum is greater than 20 असे प्रिंट करू.
03.43 ह्या ओळींना comment करू.
03.48 हे return statement आहे.
03.51 सेव्ह करा.
03.53 if statement कार्यान्वित कसे होते ते पाहू.
03.58 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
04.09 compile करण्यासाठी टाईप करा gcc ifstmt.c -o if आणि एंटर दाबा.
04.20 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if आणि एंटर दाबा.
04.26 आपल्याला असे दिसेल,
04.28 Enter the value of a and b.
04.32 आपण10 आणि 12 ह्या व्हॅल्यूज देऊ.
04.38 Sum of a and b is 22. Sum is greater than 20.
04.46 प्रोग्रॅमवर जाऊ.
04.49 आपण दुसरी condition तपासू.
04.53 ही comment काढू.
04.57 येथे comment करू.
05.00 सेव्ह करा.
05.03 हे else-if statement आहे.
05.05 Sum ही दहा पेक्षा जास्त आहे का हे तपासू.
05.11 condition true असेल तर प्रिंट करू Sum is greater than 10 and less than 20 .
05.18 टर्मिनलवर जाऊ.
05.20 compile करून कार्यान्वित करू.
05.27 आपल्याला असे दिसेल,
05.28 Enter the value of a and b.
05.30 10 आणि 2 ह्या व्हॅल्यूज देऊ.
05.35 आपल्याला असे दिसेलSum of a and b is 12.
05.39 Sum is greater than 10 and less than 20.
05.43 prompt clear करा. प्रोग्रॅमवर परत जाऊ.
05.48 ही आणि ही comment काढा आणि सेव्ह करा.
05.56 conditions falseअसतील तर प्रिंट करू Sum is less than 10.
06.04 हे else statement आहे.
06.08 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06.12 compile करून नंतर कार्यान्वित करा.
06.18 आपल्याला दिसेल,
06.20 Enter the value of a and b.
06.22 3 आणि 5 अशा व्हॅल्यूज देऊ.
06.27 हे आऊटपुट दिसेल, sum of a and b is 8.
06.31 Sum is less than 10.
06.34 काही common errors पाहू.
06.39 प्रोग्रॅमवर परत जाऊ.
06.41 समजा if statement च्या शेवटी semicolon टाईप केले.
06.47 ते सेव्ह करा.
06.50 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
06.53 compile करू.
06.56 else without a previous if अशी error दिसेल.
07.02 प्रोग्रॅमवर जाऊ. ही syntax error आहे.
07.07 If statement हे कधीही semicolon ने संपवले जात नाही.
07.10 else if statement चे कार्य आधीच्या if शिवाय होऊ शकत नाही.
07.16 ही error दुरूस्त करण्यासाठी semicolonडिलिट करा.
07.22 सेव्ह करा.
07.25 कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
07.29 compile करून कार्यान्वित करा.
07.35 Enter the value of a and b
07.37 3 आणि 6 या व्हॅल्यू देऊ.
07.44 हे आऊटपुट दिसेल.
07.46 Sum of a and b is 9. Sum is less than 10.
07.52 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
07.57 प्रोग्रॅमवर जाऊ.
08.00 त्यात काही बदल करू.
08.03 Shift, Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
08.11 फाईलला .cpp extensionदेऊन सेव्ह करा.
08.20 header file बदलून iostream करा.
08.26 using statement समाविष्ट करा.
08.30 search for आणि replace text option निवडा.
08.36 printf statement च्या जागी cout statement लिहू.
08.40 Replace all आणि नंतर Close वर क्लिक करा.
08.46 closing brackets डिलिट करा.
08.50 scanf statement च्या जागी cin statement लिहू.
08.55 टाईप करा cin आणि दोन closing angle brackets.
09.00 C++मध्ये ओळ वाचण्यासाठी cin >> function चा वापर होतो.
09.06 format specifiers डिलिट करू.
09.09 comma आणि & डिलिट करू.
09.12 comma डिलिट करून टाईप करा two closing angle brackets.
09.17 & आणि closing brackets डिलिट करून सेव्ह करा.
09.25 closing bracket आणि comma डिलिट करू.
09.32 \n आणि format specifier डिलिट करू.
09.37 टाईप करा two opening brackets
09.42 पुन्हा टाईप करा two opening angle brackets “\n”.
09.49 closing bracket डिलिट करा.
09.54 आता पुन्हा डिलिट करा ही आणि ही closing bracket.
09.59 सेव्ह करा.
10.03 कार्यान्वित करा.
10.04 टर्मिनलवर जाऊन prompt clear करू.
10.10 compile करण्यासाठी टाईप करा g++ ifstmt.cpp -o if1
10.21 येथे if1 आहे कारण ifstmt.c च्या output parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही.
10.31 एंटर दाबा.
10.33 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./if1 आणि एंटर दाबा.
10.39 Enter the value of a and b. 20 आणि 10 या व्हॅल्यूज देऊ.
10.48 Sum of a and b is 30. हे आऊटपुट दिसेल.
10.53 Sum is greater than 20.
10.57 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10.59 स्लाईडस वर जाऊ.
11.03 थोडक्यात,
11.04 if statement उदाहरणार्थ if(condition)

{…........

}

11.12 else if statement उदाहरणार्थ else if(condition)

{….........

}

11.18 assignment,
11.19 a हा b पेक्षा मोठा की लहान हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11.24 Hint: if statement वापरा.
11.28 a, b किंवा c पैकी कोणती व्हॅल्यू मोठी आहे हे तपासणारा प्रोग्रॅम लिहा.
11.34 Hint: else-if statement वापरा.
11.39 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11.41 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11.44 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.49 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11.51 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.54 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.58 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
12.05 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12.09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12.16 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12.21 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana