Java/C2/Introduction-to-Array/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:36, 19 November 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Introduction-to-Array

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 Introduction to Arrays वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:07 ह्या पाठात शिकणार आहोत arrays तयार करणे आणि त्यातील घटक access करणे.
00:14 त्यासाठी,
  • Ubuntu 11.10
  • JDK 1.6 आणि
  • Eclipse 3.7.0 वापरणार आहोत.


00:25 आपल्याला Java तील data types आणि for loop ची माहिती असायला हवी.
00:32 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:38 Arrays म्हणजे माहितीचा संग्रह.
00:40 उदाहरणार्थ गुणांची यादी, नावांची यादी, तापमानाची यादी, पर्जन्यमानाची यादी,
00:47 यादीतील प्रत्येक घटकाला त्याच्या स्थानानुसार अनुक्रमांक असतो.
00:52 पहिल्या घटकाचा अनुक्रमांक 0 असेल.
00:55 दुस-या घटकाचा 1 आणि पुढे अशाप्रकारे वाढेल.
00:59 हा डेटा कसा संचित करायचा ते पाहू.
01:03 Eclipse वर जाऊ.
01:06 ArraysDemo नावाचा class आधीच तयार केलेला आहे.
01:11 main मेथडमधे पर्जन्यमानाचा डेटा लिहू.
01:16 त्यासाठी main function मधे टाईप करा,
01:18 int rainfall open आणि close square brackets equal to, महिरपी कंसात लिहा 25 coma, 31, 29, 13, 27, 35, 12 आणि शेवटी semicolon.
01:53 variable rainfall नंतरच्या square braces कडे लक्ष द्या.
01:58 ह्यामुळे rainfall नावाचा integers चा array तयार होतो.
02:03 array चे घटक लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरतात.
02:09 डेटा access कसा करायचा ते पाहू .
02:12 पुढच्या ओळीवर टाईप करा,
02:14 System dot out dot println कंसात rainfall चौकटी कंसात 2
02:28 आपण 2 अनुक्रमांकाचा घटक प्रिंट करत आहोत.
02:32 दुस-या शब्दात, array चा तिसरा घटक जो 29 आहे.
02:38 सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू.
02:43 29 हा तिसरा घटक आऊटपुट म्हणून दिसेल.
02:49 2 च्या जागी 0 टाईप करा.
02:56 सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू.
03:00 आपल्याला पहिली व्हॅल्यू म्हणजेच 25 हे आऊटपुट दिसेल.
03:07 आता पहिल्या घटकाची किंमत बदलू.
03:13 त्यासाठी टाईप करा rainfall चौकटी कंसात 0 equal to 11;semicolon
03:27 आता त्याची किंमत बघू. त्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू.
03:34 आपल्याला दिसेलच की किंमत बदलून 11 झाली आहे.
03:40 array चा आकार माहित असेल पण व्हॅल्यूज माहित नसतील तर काय?
03:45 हा array कसा बनवायचा ते पाहू.
03:49 main function मधील सर्व काढून टाकून type करा,
03:57 int squares open आणि close square brackets equal to new int चौकटी कंसात 10. टाइप करा.
04:19 हे स्टेटमेंट 10 घटकांचा array तयार करते. ह्या array चे नाव squares आहे.
04:30 यात काही किंमती भरू.
04:33 टाईप करा
04:35 Squares चौकटी कंसात 0 is equal to 1;semicolon
04:43 नंतरची ओळ squares चौकटी कंसात 1 equal to 4; semicolon
04:53 नंतरची ओळ squares चौकटी कंसात 2 equal to 9; semicolon
05:04 Squares चौकटी कंसात 3 equal to 16; semicolon
05:15 पहिल्या चार अंकांचे वर्ग आपण भरले आहेत.
05:20 Array इतर घटकांमध्ये काय आहे ते पाहू.
05:26 त्यासाठी array तील सहावा घटक प्रिंट करू.
05:30 टाईप करा System कॅपिटल मध्ये s.out.println(squares चौकटी कंसात [5]);
05:56 प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला शून्य हे उत्तर दिसेल.
06:05 कारण integers चा arrayघोषित केल्यावर सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0 झाली.
06:11 तसेच float च्या array मधील सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0.0 होते.
06:18 array तील प्रत्येक घटकात त्याची किंमत लिहिणे हे खूप वेळखाऊ ठरेल. त्याऐवजी आपण for loop वापरू.
06:28 त्यासाठी टाईप करा,

int n coma, x;semicolon एंटर

for कंसात x = is equal to 4;semicolon x less than< 10;semicolon x = x + 1 for लूप च्या आत टाईप करा, {

n = x + 1; semicolon

squares चौकटी कंसात x equal to n * n; semicolon

}

07:25 आपण4 ते 9 मधील प्रत्येक क्रमांकासाठी array च्या संबंधित घटकामधे त्याची किंमत सेट करत आहोत.
07:36 आता आऊटपुट पाहू.
07:38 आपल्याला दिसेल की आपण array च्या सहाव्या घटकाची व्हॅल्यू प्रिंट करत आहोत. त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा.
07:52 असे दिसेल की आता सहावा घटक सहाचा वर्ग म्हणजे 36 आहे.
07:57 आता for loop च्या आतमध्ये आपण सर्वच घटकांच्या व्हॅल्यूज सेट करूशकतो.
08:03 घटकांच्या व्हॅल्यू manually लिहिणा-या ओळी काढून टाकून 4 च्या जागी 0 लिहा.
08:14 अशाप्रकारे 0 ते 9 मधील सर्व अनुक्रमांकांच्या घटकांना त्यांच्या वर्गाप्रमाणे किंमती दिल्या.
08:21 आता आपण तिस-या घटकाची किंमत पाहू.
08:25 त्यासाठी 5 च्या जागी 2 लिहा.
08:30 सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:35 आपल्याला दिसेल की तिस-या घटकाची किंमत loop ने 9 सेट केली आहे.
08:42 अशाप्रकारे आपण arrays तयार करून वापरू शकतो.
08:50 हा पाठ येथे संपला.
08:53 ह्या पाठात आपण शिकलो,
08:55 array घोषित करणे आणि initializeकरणे,
08:58 array तील घटक access करणे.
09:01 ह्या पाठासाठी असाईनमेंट,
09:04 दिलेल्या integers च्या array तील घटकांची बेरीज करा.
09:10 प्रकल्पाची अधिक माहिती,
09:13 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:19 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:26 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:44 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते ; सहभागासाठी धन्यवाद .



Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana