Java/C2/Array-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:48, 13 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Array-Operations
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Java तील Array Operationsवरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:07 | येथे शिकणार आहोत, |
00:09 | Arrays class import करणे आणि, |
00:12 | arrays वरील प्राथमिक operations. |
00:15 | त्यासाठी
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7.0 वापरणार आहोत. |
00:25 | आपल्याला Java तील arrays बद्दल माहिती असायला हवी. |
00:30 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:35 | Arrays वर कार्य करणा-या मेथडस Arrays नावाच्या class मधे उपलब्ध आहेत. |
00:40 | त्या वापरण्यासाठी class आयात करावा लागेल. |
00:43 | त्यासाठी स्टेटमेंट लिहू import java.util.Arrays semicolon |
00:50 | आता class मधील मेथड वापरू शकतो. |
00:52 | त्यासाठी मेथड नेमच्या आधी dot देतात. |
00:56 | म्हणून Arrays dot toString म्हणजे Arrays class मधीलtoString मेथड. |
01:05 | आता eclipse वर जाऊ. |
01:08 | आपण ArraysDemo नावाचा class आधीच तयार केला आहे. |
01:13 | आता class Arrays आयात करू. |
01:16 | import स्टेटमेंट class घोषित करण्यापूर्वी लिहावे लागते. |
01:22 | म्हणून public class आधी टाईप करा. |
01:26 | import java.util.Arrays semicolon |
01:46 | ह्या स्टेटमेंटचा अर्थ java मधे util नावाचे package असून त्यातील Arrays class आयात करा असा आहे. |
01:59 | आता array समाविष्ट करू. |
02:01 | main function मधे टाईप करा, |
02:03 | int marks open and close square brackets equal to महिरपी कंसात 2 comma, 7, 5, 4, 8 |
02:20 | आता Arrays class मधील मेथड वापरून प्रिंट करण्यासाठी array चे रूपांतर string मधे करू. |
02:28 | त्यासाठी टाईप करा String mStr equal to Arrays dot toString आणि कंसात array चे नाव म्हणजेच marks लिहू . |
02:50 | ह्यातील toString मेथड arrayचे रूपांतर string मधे करेल. |
02:56 | आपण marks प्रिंट करू. |
02:58 | त्यासाठी टाईप करा System dot out dot println कंसात mStr |
03:12 | आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:18 | आऊटपुटमधे दिसेल की toString मेथडमुळे array चे रूपांतर string मधे झाले आहे. |
03:26 | आता array तील घटक sortकरून बघू. |
03:31 | त्यासाठी 'Arrays dot toString ओळीच्या आधी टाईप करा Arrays dot sort कंसात Array चे नाव म्हणजेच marks. |
03:46 | Arrays class मधील sort मेथडने त्याकडे दिलेल्या arrayचे घटक सॉर्ट केले आहेत. |
03:53 | आपण marks ह्या array चे घटक sort करत आहोत आणि string मधे रूपांतर करून प्रिंट करत आहोत. |
04:04 | आऊटपुट पाहण्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:11 | आपल्याला आऊटपुटमधे दिसेल sort मेथडने array चढत्या क्रमाने sort केला आहे. |
04:19 | sort मेथडमुळे array मधेच बदल झाला आहे. |
04:22 | ह्या प्रकारच्या sorting ला inplace sorting म्हणतात. |
04:26 | म्हणजे ज्या array तील घटक आपण sort करत असतो तोच sorting मुळे बदलतो. |
04:33 | आपण fill ही पुढची मेथड बघणार आहोत. |
04:38 | या fill मेथडला दोन arguments आहेत. |
04:43 | प्रोग्रॅममधील sorting line काढून टाका. |
04:50 | टाईप करा Arrays dot fill कंसात array चे नाव म्हणजेच marks |
05:05 | हे आपले पहिले argument आहे आणि दुसरे argument, array कुठल्या व्हॅल्यूने भरायचा ती किंमत. आपण ती 6 घेऊ. शेवटी semicolon देऊ. सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:24 | दिसेल की fill मेथड तिच्या नावानुसार array मधील सर्व घटक 6 या दिलेल्या किमतीने भरते. |
05:32 | copyOf ही पुढील मेथड पाहणार आहोत. |
05:37 | array marks मधील सर्व घटक आपण array marksCopy मधे कॉपी करू. |
05:44 | arrays dot fill ही ओळ काढून टाका. |
05:48 | आणि टाईप करा int marksCopy []; open and close square brackets semicolon |
05:59 | पुढील ओळीवर टाईप करा marksCopy = arrays. CopyOf कंस semicolon |
06:25 | ह्या मेथडला दोन arguments आहेत. |
06:29 | पहिले argument हे arrayचे नाव असते ज्यातून आपल्याला घटक कॉपी करायचे आहेत. म्हणजेच marks, |
06:39 | दुसरे argument किती घटक कॉपी करायचे ती संख्या. आपण 5 घटक कॉपी करू. |
06:47 | arrays dot toStrings मधे marks च्या जागी marksCopy लिहा. |
06:55 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:01 | आपल्याला दिसेल की marks ह्या array मधील घटक marksCopy ह्या array त कॉपी झाले आहेत. |
07:10 | कॉपी करण्याच्या घटकांची संख्या बदलून पाहू. |
07:15 | 5 च्या जागी 3 लिहा. |
07:19 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:24 | आपल्याला दिसेल की फक्त पहिले तीन घटक कॉपी झाले आहेत. |
07:31 | array मधील एकूण घटकांच्या संख्येपेक्षा जास्त घटक कॉपी करण्यास सांगितल्यास काय होते ते पाहू. |
07:39 | 3 च्या जागी 8 लिहा. |
07:44 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:48 | आपल्याला दिसेल की जास्तीचे घटक 0 ह्या default किंमतीने भरले गेले आहेत. |
07:54 | व्हॅल्यूजची range कॉपी कशी करतात ते पाहू. |
07:58 | copyOf च्या जागी copyOfRange लिहा आणि 8 च्या जागी 1 comma, 4 लिहा. |
08:15 | ही मेथड 1 ने सुरू करून 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी करेल. |
08:27 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:31 | आपल्याला दिसेल की घटक क्रमांक 1 ते 3 कॉपी झाले आहेत. |
08:39 | लक्षात घ्या की आपण 1, 4 ही arguments दिली होती. |
08:47 | तरी 4 क्रमांकाचा घटक कॉपी झाला नाही. |
08:50 | फक्त 3 क्रमांकापर्यंतचे घटक कॉपी झाले आहेत. range समाप्त करणा-या पॅरामीटरपेक्षा एक ने कमी अंकावर कॉपी होणे थांबते. |
09:01 | ही पध्दत वापरल्याने range ची सलगता अबाधित राहते. |
09:07 | (0, 4) मुळे 0 ते 3 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील. |
09:12 | (4, 6) मुळे 4 ते 5 अनुक्रमांकाचे घटक लिहिले जातील. |
09:17 | त्यामुळे (0, 4) + (4, 6) = (0, 5) अशी range ची बेरीज नीट जुळते. |
09:26 | हा पाठ येथे संपतो. |
09:31 | आपण शिकलो, |
09:33 | Arrays class import करणे आणि, |
09:36 | arrays वरील प्राथमिक operations जसे की to string , sort, copy, fill. |
09:44 | असाईनमेंट. |
09:46 | Arrays.equals मेथड बद्दल वाचा आणि ती काय करते ते शोधा. |
09:53 | प्रकल्पाची अधिक माहिती |
09:55 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:05 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
10:10 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:16 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:22 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:31 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:39 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:43 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |