Java/C2/Using-this-keyword/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:37, 13 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Using this keyword

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 Java तील Using this keyword वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत,
00:09 this keywordचा वापर
00:11 fields सोबत त्याचा वापर
00:14 constructorsच्या साखळीसाठी त्याचा वापर.
00:17 येथे वापरत आहोत,
  • Ubuntu version 11.10
  • jdk 1.6
  • Eclipse IDE 3.7.0


00:28 या पाठासाठी माहित असायला हवे,
00:30 java मधे eclipse द्वारे constructorबनवणे.
00:34 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 आता this कीवर्डचा उपयोग पाहू.
00:44 constructor मधे this म्हणजे करंट object चा संदर्भ असतो.
00:48 this द्वारे constructor मधील करंट object च्या कुठल्याही मेंबरचा संदर्भ देऊ शकतो .
00:55 fields सोबत this कसे वापरायचे ते पाहू.
01:00 this कीवर्ड नावांतील गोंधळ टाळण्यास मदत करते.
01:07 येथे उदाहरण बघू.
01:10 त्यासाठी Eclipse उघडा.
01:17 आपण मागील पाठात बनवलेला Student हा class उघडा.
01:23 default constructor आणि एक parameter असलेल्या constructor ला कमेंट करा.
01:40 तसेच पहिली दोन objects बनवणा-या कोडला देखीलcomment करा.
02:03 आता parameterized constructor कडे लक्ष द्या.
02:11 the_roll_number आणि the_name ही अर्ग्युमेंटस constructor कडे passकेली आहेत.
02:20 roll_number आणि name ही instance व्हेरिएबल्स आहेत.
02:26 आता अर्ग्युमेंटस बदलून ती roll_number आणि name करू.
02:39 त्यासाठी constructor मधे,
02:42 roll_number equal to roll_number आणि name equal to name करा.
02:55 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
03:04 हे आऊटपुट मिळेल.
03:07 I am a Parameterized Constructor

0

null
03:12 कोडवर परत जाऊ.
03:17 आपल्याला 2 warnings दिसतील.
03:20 warning चिन्हावर माऊसचा कर्सर न्या.
03:23 असे दिसेल, The assignment to the variable roll_number has no effect.
03:29 आणि The assignment to the variable name has no effect.
03:33 कारणconstructor मधे roll_number आणि name ही लोकल व्हेरिएबल्स आहेत.
03:40 मेथड किंवा block मधेच access करता येणारी व्हेरिएबल्स लोकल व्हेरिएबल्स असतात.
03:47 येथे roll_number आणि name हे 11 आणि Raju ने initializeहोतील.
03:54 कारण 11 आणि Raju ह्या व्हॅल्यूज constructor कडे pass केल्या आहेत.
04:01 पण constructor च्या बाहेर येताना त्या accessible नसतील.
04:06 आपल्याला माहित असलेली roll_number आणि name ही instance व्हेरिएबल्स आहेत.
04:13 object तयार झाल्यावर ती 0 आणि null ने initialize झाली आहेत.
04:18 त्यामुळे 0 आणि null हे आऊटपुट मिळाले.
04:21 constructorच्या आत छोटा बदल करू.
04:29 त्यासाठी टाईप करा this dot roll_number equal to roll_number.
04:37 आणि this dot name equal to name.
04:44 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
04:51 हे आऊटपुट मिळेल.
04:53 I am a Parameterized Constructor
11 and Raju
04:58 कारण this dot roll_number आणि this dot name ही instance व्हेरिएबल्स roll_number आणि name ह्यांचा संदर्भ घेतात.
05:12 आणि येथे roll_number आणि name ही मेथड मधे pass केलेली arguments आहेत.
05:20 local आणि instance व्हेरिएबल मधील गोंधळ टाळण्यासाठी this हा कीवर्ड वापरला.
05:29 आता this कीवर्ड वापरूनconstructorची साखळी तयार करू.
05:34 this कीवर्ड द्वारे constructor मधे दुसरा constructor कॉल करू शकतो.
05:39 हे constructors एकाच class मधे असले पाहिजेत.
05:43 ह्याला explicit constructor invocation म्हणतात.
05:46 आपण बनवलेल्या Student class वर जाऊ.
05:54 comments काढून टाका.
06:28 पहिल्या दोन constructors मधील instance व्हेरिएबलला त्यांच्या व्हॅल्यूज प्रदान करणारा भाग commentकरा.
06:52 दुसरे व तिसरे object बनवणारा भाग देखील Commentकरा.
07:08 आता parameters नसलेल्या constructor वर जाऊ.
07:16 curly brackets नंतर टाईप करा this कंसात 11 आणि semicolon.
07:28 दुस-या constructor मधे टाईप करा this कंसात 11 comma double quotes मधे Raju semicolon.
07:42 फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा.
07:49 हे आऊटपुट मिळेल.
07:51 I am a Parameterized Constructor
07:54 I am a constructor with a single parameter
07:57 I am a Default Constructor

11 आणि Raju

08:02 आता आऊटपुट समजून घेऊ.
08:08 जेव्हा object बनेल तेव्हा संबंधितconstructor कॉल केला जाईल.
08:13 येथे हा no argument constructor आहे.
08:20 constructor मधे controlपहिल्या ओळीवर आहे.
08:24 हे this कंसात 11 हे स्टेटमेंट कार्यान्वित करेल.
08:26 त्यामुळे अशा constructor ला call जाईल जो single integer argument घेतो.
08:36 नंतरcontrol this कंसात11 comma Rajuवर येईल.
08:44 त्यामुळे अशा constructor ला call जाईल जो 1 integer आणि 1 String argument घेतो.
08:53 अशाप्रकारे constructor कार्यान्वित होऊन I am a Parameterized Constructor हे आऊटपुट मिळाले आहे.
09:02 आता instance व्हेरिएबल्स आपण passकेलेल्या 11 आणि Rajuह्या व्हॅल्यूजने initialize होतील.
09:11 आता कंट्रोल calling constructor कडे परत जाईल.
09:16 त्यामुळे दुसरा constructor कार्यान्वित होईल.
09:19 आपल्याला I am a constructor with a single parameter हे आऊटपुट दिसेल.
09:25 नंतर control पहिल्या constructor वर जाऊन तो कार्यान्वित होईल.
09:30 आपल्याला I am a default constructor हे आऊटपुट दिसेल.
09:37 नंतर studentDetail method कार्यान्वित होईल.
09:42 आपल्याला 11 आणि Raju मिळेल.
09:45 आता छोटे बदल करू.
09:47 constructor मधे thisस्टेटमेंट शेवटी टाका.
10:01 आपल्याला compiler error मिळेल.
10:03 error चिन्हावर माऊस न्या.
10:06 आपल्याला ही एरर दिसेल.
10:07 Constructor call must be the first statement in the constructor.
10:12 त्यामुळे ही constructorची पहिलीच ओळ असावी लागेल.
10:16 म्हणून ही constructor ची पहिली ओळ बनवू.
10:27 आता एरर गेलेली दिसेल.
10:31 या पाठात आपण शिकलो,
10:35 fields सोबत this चा वापर,
10:38 constructors साखळीसाठी this चा वापर,
10:41 constructor मधे thisचा वापर कसा करायचा .
10:45 असाईनमेंट म्हणून आपण बनवलेल्या Employee class मधे,
10:49 दोन parameters असलेला constructor बनवा.
10:52 instance व्हेरिएबल्स initializeकरण्यासाठी thisवापरा .
10:57 तसेच 1 आणि no parameters चे constructor बनवा.
11:01 पाठात सांगितल्याप्रमाणे this द्वारे constructors ची साखळी बनवा.
11:07 प्रकल्पाची अधिक माहिती,
11:09 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
11:12 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:16 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:19 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:23 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:26 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:46 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:55 हा पाठ येथे संपत आहे.
11:58 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana