Java/C2/while-loop/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:44, 8 November 2013 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: while-loop
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | java मधील While Loop वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या पाठात while loop आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:12 | यासाठी
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7 वापरणार आहोत. |
00:21 | या पाठासाठी relational operators ची माहिती असायला हवी. |
00:26 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:36 | ही while loop ची रचना आहे. |
00:39 | ह्याचे दोन भाग आहेत. |
00:41 | loop running condition हा पहिला आणि loop variable हा दुसरा. |
00:48 | उदाहरण पाहण्यासाठी Eclipse वर जाऊ. |
00:55 | हा eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:00 | येथे WhileDemo class बनवून त्यामध्ये main method लिहिलेली आहे. |
01:05 | आपण while loop वापरून 1 ते 10 आकडे print करणार आहोत. टाईप करा int n = 1 |
01:15 | n हे loop variable आहे. |
01:21 | टाईप करा, while कंसात n less than or equal to 10 open and close braces |
01:33 | हिला looping running condition म्हणतात. |
01:37 | जोपर्यंत condition true असेल तोपर्यंत loop कार्यान्वित होईल. |
01:42 | n ची व्हॅल्यू 10 किंवा कमी असेपर्यंत हे loop कार्यान्वित राहील. |
01:47 | हे तेव्हाच थांबेल जेव्हा n ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त होईल. |
01:53 | loop च्या आत n ची व्हॅल्यू print करणार आहोत. |
01:58 | System.out.println(n); आणि नंतर increment n = n + 1; |
02:12 | अशाप्रकारे प्रथम 1 print होईल नंतर n ची व्हॅल्यू 2 होईल. |
02:18 | नंतर loop condition तपासली जाईल. |
02:21 | ती true असल्यामुळे 2 print होऊन n ची व्हॅल्यू 3 होईल. |
02:25 | अशाप्रकारे 10 print होईपर्यंत loop चालू राहिल. n जेव्हा11 होईल तेव्हा condition true नसल्यामुळे loop थांबेल. |
02:37 | हे कसे कार्य करते ते पाहू. |
02:39 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:47 | आपल्याला 1 ते 10 आकडे print झालेले दिसतील. |
02:52 | आता 50 ते 40 असे अंक print करू. |
02:58 | 50 ने सुरूवात करू. n = 1 च्या जागी n = 50 करा. |
03:03 | आपण 40 पर्यंत जाणार आहोत. |
03:05 | n ची व्हॅल्यू 40 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी. condition बदलून n greater than or equal to 40 करा. |
03:16 | मोठ्यापासून लहान संख्येपर्यंतlooping असल्याने loop variable कमी करू. |
03:22 | त्यासाठी n=n + 1 च्या जागी n=n - 1 करा. |
03:27 | सेव्ह करून कार्यान्वित करा. 50 पासून 40 पर्यंत आकडे print झालेले दिसतील. |
03:42 | आता 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे print करू. |
03:48 | 7 ने सुरूवात करू. |
03:50 | n = 50 च्या जागी n = 7 करा आणि 70 ने संपवू. |
03:57 | condition बदलून n less than equal to 70 करा. |
04:03 | अशाप्रकारे loop 70 वर थांबेल. |
04:07 | loop variable 7 ने वाढवल्यास 7 चा पाढा मिळेल. |
04:12 | n=n - 1 च्या जागी n=n + 7 करा. |
04:18 | प्रथम 7 print होईल आणि नंतर n ची व्हॅल्यू 14 होऊन print होईल. अशाप्रकारे 70 पर्यंत संख्या print होतील. सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:33 | 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे print झालेले दिसतील. |
04:43 | while loop वापरून एखाद्या संख्येतील अंकांची बेरीजही करता येते. |
04:47 | कसे ते पाहू. |
04:49 | main method मधील हा भाग डिलिट करू. |
04:54 | int n equal to 13876. ही संख्या घेऊ. |
05:02 | नंतर int dSum equal to 0. व्हेरिएबल dSum मध्ये आकड्यांची बेरीज संचित होईल. |
05:18 | टाईप करा while, कंसात n greater than 0 |
05:27 | ही condition का वापरली हे तुम्हाला लवकरच कळेल. |
05:32 | अंकांच्या बेरजेसाठी प्रथम अंक मिळवणे गरजेचे आहे. |
05:36 | त्यासाठी modulo operator वापरू. |
05:40 | एकक स्थानावरील अंक घेऊन dSum मध्ये मिळवण्यासाठी टाईप करा, dSum = dSum + (n modulo % 10) |
05:52 | नंतर 10 ने भागून एकक स्थानचा अंक काढून टाकणार आहोत. n = n / 10 |
06:08 | loop च्या पहिल्या फेरीत dSum ची व्हॅल्यू 6 आणि n ची व्हॅल्यू 1387 असेल. |
06:15 | दुस-या फेरीत dSum ची व्हॅल्यू 7 आणि 6 ह्यांची बेरीज 13, आणि n ची व्हॅल्यू 138 होईल. |
06:22 | अशाप्रकारे loop चालू राहिल. n मधील अंक कमी होत शेवटी |
06:28 | n ची व्हॅल्यू शून्य होईल. n greater than 0 ही condition false होईल आणि loop थांबेल. |
06:36 | आता print statement समाविष्ट करू. |
06:42 | System.out.println(dSum) |
06:51 | हे कसे होते ते पाहू. सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:59 | 25 ही बेरीज print झालेली दिसेल. |
07:06 | while loop ही programming मध्ये वापरल्या जाणा-या मूलभूत रचनांपैकी एक आहे. |
07:16 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:20 | या पाठात while loop आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेतले. |
07:26 | पुढील assignment सोडवा. |
07:29 | दिलेली संख्या while loop वापरून उलट क्रमाने मांडा. उदाहरणार्थ 19435 => 53491 |
07:37 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:50 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:57 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:03 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:07 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:12 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:17 | सहभागासाठी धन्यवाद. |