Spoken-Tutorial-Technology/C2/Editing-using-Audacity/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:13, 25 October 2013 by Madhurig (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार मित्रांनो , या एडिटिंग युसिंग ऑड्यासिटी ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे
00:08 हे ट्यूटोरियल ऑडिओ फाईल कशी संपादित करावी समजावेल. आपण शिकूया,
00:14 ऑड्यासिटीमध्ये फाईल कशी ओपन करावी. 
00:16 स्टीरिओ फाईलचे मोनोमध्ये रुपांतरीत करणे. लेबल जोडणे. ऑडिओ कट, डिलीट, मूव आणि एम्पलीफाय करणे. पार्श्वध्वनी गाळणे. ऑडिओ फाईल सेव आणि एक्स्पोर्ट करणे.      
00:27 या ट्यूटोरियलसाठी, मी उबन्तु लिनक्स वर्जन 10.04 ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑड्यासिटी वर्जन 1.3 वापरत आहे.  
00:36 ऑड्यासिटी खूप ऑडिओ प्रकारांना आधार देते. यासहीत:
00:39 WAV (Windows Wave format)
00:41 AIFF (Audio Interchange File Format)
00:43 Sun Au / NeXT
00:46 RCAM (Institut de Recherce et Coordination Acoustique / Musique)
00:49 MP3 (MPEG I, layer 3) (export requires separate encoder. see Lame Installation) Ogg Vorbis
00:53 आता मुख्य मेनू मधून ऑड्यासिटीत प्रवेश करू. Applications >> Sound and Video >> Audacity.
01:04 ऑड्यासिटी हेल्प बॉक्स उघडेल. आता OK वर क्लिक करा.
01:09 ऑडिओ फाईल संपादित करण्यासाठी, आपण प्रथम ती ऑड्यासिटीमध्ये इम्पोर्ट करू. यासाठी, File >> Import >> Audio वर जा.
01:21 जेव्हा ब्राऊजर विंडो ओपन होईल, ऑडिओ फाईल एडीट करण्यासाठी ब्राउज करा आणि Open वर क्लिक करा. 
01:31 फाईल Audacity विंडो मध्ये ओपन होईल.   
01:36 हि फाईल a u p फाईल म्हणून सेव करा. (ऑड्यासिटी प्रोजेक्ट फाईल)  File >> Save Project As.वर क्लिक करून >>
01:47 ओपन झालेल्या बॉक्स मध्ये OK वर क्लिक करा.
01:51 फाईलला नाव द्या. येथे आपण टाईप करू  'Editing in Audacity' 
01:55 फोल्डर तपासा, आणि Save वर क्लिक करा. 
02:00 'Copy All Audio into Project (safer)'  हा ऑपशन निवडा. 
02:05 हा फोल्डर बनवतो जो सर्व ऑड्यासिटी प्रोजेक्ट डेटा फाईल्स समाविष्ट करेल.  
02:11 ट्रयाक्सकडे पहा. जर तेथे फक्त एक ट्रॅक असेल तर ऑडिओ MONO. मध्ये आहे. 
02:16 ह्याचा डावीकडील पेनलवर सुद्धा उल्लेख केला जाईल. 
02:21 आता, एक दुसरी ऑडिओ फाईल उघडुया.
02:35 जर तेथे दोन ट्रॅक्स आहेत, तर ऑडिओ STEREO मध्ये आहे. पुन्हा, ह्याचा डावीकडील पॅनल वर सुद्धा उल्लेख केला जाईल.  
02:45 संपूर्णपणे ट्रॅक काढण्यासाठी, ट्रॅक निवडा, Tracks टॅब वर क्लिक करा आणि Remove Tracks निवडा.   
02:59 आळीपाळीने, ट्रयाक्स डाव्या टोकाकडील X वर क्लिक करून डिलीट करा.    
03:04 जर ऑडिओ फाईल स्टीरिओ मोड मध्ये आहे आणि स्टीरिओ परिणाम आवश्यक नसेल, तर तो मोड मोनो मध्ये बदलू शकता.   
03:12 हे करण्यासाठी, Tracks टॅब वर जा आणि Mix एंड Render निवडा.  
03:20 आता ऑडीओ फाईलच्या डावीकडील प्यानेलवरील ड्रोप-डाऊन बाणावर क्लिक करा आणि स्प्लिट स्टीरिओ टु मोनो निवडा.   
03:30 एक ट्रॅक डिलीट करा.  
03:35 झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी कर्सरवर क्लिक करा जेथे तुम्हाला फाईल झूम करणे आवश्यक वाटते आणि एडीट प्यानेलवरील झूम इन किंवा झूम आउट बटणावर क्लिक करा.  
03:52 आळीपाळीने, कर्सर फाईलच्या झूम इन किंवा झूम आउट ज्या भागावर करायचा आहे तेथे ठेवा. 
04:03 आता कंट्रोल बटन दाबा आणि माऊसवरील स्क्रोल व्हील झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी वापरा.     
04:19 ऑडीओ फाईलला अनावश्यक भाग काढण्यासाठी कट, कॉपी, पेस्ट, डिलीट आणि काही खास इफेक्ट्स देता येतात.    
04:29 फाईलचा आवाज सुद्धा वाढवता किंवा कमी करता येतो.  
04:35 संपादित करण्यापूर्वी, नेहमी ऑडीओ फाईल संपूर्ण एका. तुम्ही ऐकल्याप्रमाणे सहज संदर्भासाठी तुम्हाला लेबल भागांची गरज लागू शकते.   
04:44 असे करण्यासाठी, ट्रॅक वर क्लिक करून लेबल ट्रॅक जोडा >> add New आणि Label Track.     
04:56 पॉईन्टकडे लेबल जोडण्यासाठी, कर्सरने पॉईन्ट निवडा आणि ट्रॅक्स टॅब वर जा.    
05:05 आणि सिलेक्शन जवळ Add लेबल निवडा.    
05:08 तुम्ही लेबल मध्ये टाईप करू शकता.  
05:16 आळीपाळीने, पॉइन्ट वर क्लिक करा.  
05:24 Ctrl +B. दाबा.  
05:28 हे पहिल्या वेळी नविन लेबल ट्रॅक ओपन करते. 
05:32 अनुक्रमे Ctrl +B त्याच ट्रयाकवर नविन लेबल ओपन करेल.    
05:47 जेथे कर्सर ठेवला आहे तेथे लेबल, कर्सर सहित टाइम लाईन वरील पॉइन्टकडे ओपन होईल.       
05:53 जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा प्रत्येक नविन लेबलसाठी कर्सर ठेवा आणि Ctrl +B दाबा. 
06:07 लेबल सुद्धा हलवता येऊ शकतात.  
06:15 हे लेबल डिलीट करण्यासाठी, टेक्स्ट बॉक्सच्या आत क्लिक करा आणि लेबल डीलीट होईपर्यंत backspace बटन दाबा.  
06:27 अन्य पद्धत अशी आहे कि Tracks >> Edit Labels वर जा.
06:34 सर्व लेबल्सची यादी असलेली विंडो दिसेल आणि जे लेबल्स डिलीट करायचे आहेत ते निवडा आणि Remove बटनावर क्लिक करून डीलीट करा. 
06:46 Ok वर क्लिक करा.
06:55 संपूर्ण ऑडीओ फाईल एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा ऐकल्या नंतर, संपादनाची रचना ठरवता येईल; आवश्यकतेनुसार फाईलचे भाग डिलीट करता किंवा बदलता येतील. 
07:07 संपादनाची रचना हि प्रस्तावना, मथळा आणि निष्कर्षासाठी काय योग्य आहे यावर अवलंबून आहे.  
07:15 पुनः पुन्हा आणि वाईट आलेले आवाज काढा. संदेशाचा परिणाम वाढवण्यासाठी Effects वापरू शकता.  
07:21 अनावश्यक आलेले आवाज, जसे तोतरेपणा आणि खोकला जे बोलणे अतिव्याप्त करणारे, पुनरावृत्ती करणारे आहे तसेच मोठा रिक्तपणा काढता येऊ शकतो. 
07:32 डिलीट करण्यासाठी, Selection टूल निवडा आणि ऑडीओ फाईलचा भाग निवडा जो लेफ्ट क्लिकने डिलीट करायचा आहे तो ड्रॅग करा आणि रिलीस करा, तो भाग डिलीट करण्यासाठी delete बटन दाबा. 
07:50 फाईलच्या एका भागाचे दुसऱ्या भागात स्थलांतर करण्यासाठी, ऑडीओ फाईलचा भाग निवडा जो लेफ्ट क्लिकने स्थलांतरीत करायचा आहे. तो ड्रयाग करा आणि रिलीस करा, मग तो भाग किबोर्ड शॉर्टकट Ctrl+X वापरून कट करा. 
08:07 आपण एडीट टूल प्यानेल मधील Cut बटनवर सुद्धा क्लिक करू शकतो किंवा Edit >> Cut ऑप्शनवर क्‍लिक करा.
08:22 ऑडीओ खंड (part) जेथे हवा आहे तेथे कर्सर सरकवणे आवश्यक आहे.    
08:31 तेथे क्लिक करा आणि ऑडीओ खंड पेस्ट करा.
08:33 हे शॉर्टकट Ctrl+V किंवा Paste बटन वापरून होऊ शकते.   
08:40 एडीट टूल प्यानेल किंवा एडीट मध्ये >>        
08:47 पेस्ट ऑप्शन   
08:52 मोठे श्वास कमी करण्यासाठी, ऑडीओ धारेतील श्वासाचा भाग निवडा. यासाठी, 
09:14 लेफ्ट क्लिक करा, ड्रयाग करा आणि रिलीस करा.   
09:17 Effect >> Amplify वर जा .  minus-5 किंवा -7 दाखल करा.   
09:26 किंवा Amplification बॉक्स मध्ये त्याहून जास्त, तुम्हाला किती आवाज कमी करायचा आहे त्यावर अवलंबून आहे आणि ok वर क्लिक करा.  
09:43 जो आवाज लहान प्रमाणत ध्वनिमुद्रित झाला आहे तो वाढवण्यासाठी, ऑडीओ निवडा, Effect >> Amplify वर जा >>
09:56 तेथे तुम्हाला किंमत आधीच असलेली दिसेल. हि किंमत या फाईलसाठी उत्तम एम्प्लीफिकेशन आहे. तुम्ही तुम्हाला हवी असलेली किंमत सुद्धा दाखल करू शकता.   
10:12 ok वर क्लिक करा. 
10:15 जर Ok बटन क्रियाशील नसेल, तर Allow Clipping ऑप्शन तपासा.  
10:34 अडथळे आणणारे पार्श्वध्वनी काढण्यासाठी, नमुना आवाजासहीत ट्रयाकवरील भाग निवडा.   
10:47 आवाजाशिवाय भाग निवडण्याकडे लक्ष द्या. आता Effect वर क्लिक.
10:55 Noise Removal (नॉईज रिमूवल) 
10:59 Get Noise Profile (गेट नॉईज प्रोफाईल) वर क्लिक करा. 
11:02 हे ओळखेल कि आवाजाचा नमुना गाळला गेला आहे. 
11:06 आता संपूर्ण ऑंडिओ ट्रयाक वर कोठेही क्लिक करून तो निवडा.  
11:11 पुन्हा, Effect >> वर क्लिक करा. 
11:16 Noise Removal (नॉईज रिमूवल). त्यात Noise Reduction Level (नॉईज रिडक्शन लेवल) निवडा.    
11:26 कमीतकमी वॅल्यू वापरा जी आवाज स्वीकारण्या योग्य पातळीपर्यंत कमी करेल.  
11:31 जास्त वॅल्यू आवाज पूर्णपणे बंद करतात पण परिणाम असा होतो कि ऑंडिओची मोडतोड शिल्लक रहाते.   
11:37 आता OK वर क्लिक करा.  
11:44 येथे सल्ला असा आहे कि ऑडीओ बॉक्समध्ये सुचवलेल्या value पेक्षा जास्त एम्प्लीफाय करू नये कारण एम्प्लीफिकेशन सुद्धा पार्श्वध्वनी वाढवते. 
11:54 त्याचबरोबर सुस्कारे आणि गुंजन आवाज जास्त ठळक करते.   
11:57 प्रोजेक्ट फाईल नियमित सेव करा.  
12:00: शेवटी, अंतिम प्रोजेक्ट आवश्यक ऑडीओ फॉरमॅट  जे आहेत wav, mp3 आणि इतर या मध्ये एक्सपोर्ट करा.
12:09 आपण आधीच हा भाग पूर्वीच्या ट्युटोरिअलमध्ये घेतला आहे. कृपया विस्तृत माहितीसाठी तो पडताळा.   
12:17 या बरोबर हि ट्युटोरिअल समाप्त होत आहे. चला सारांश पाहू. यात आपण शिकलो, ऑड्यासिटी वापरून मुलभूत संपादन,    
12;26 ऑडीओ फाईल कशी ओपन करावी, स्टिरीओ चे मोनो रुपांतर करणे, झूम इन आणि आउट, लेबल जोडणे.   
12:35 रचना आणि संपादन करणे. ऑडीओ कट, डिलीट, स्थलांतरित करणे. पार्श्वध्वनी गाळणे.   
12:50 वर दिलेल्या माहिती आधारे पहिल्या ट्युटोरिअल मध्ये ध्वनिमुद्रित केलेला ऑडीओ संपादित करा.   
12:55 आवश्यक तेथे फेड आउट आणि फेड इन वापरा.    
13:01 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.linkhttp://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
13:06 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
13:10 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
13:15 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम

स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

13:20 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13:25 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:30 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
13:35 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांचा कडून मिळाले आहे.
13:42 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro.
13:55 या बरोबर हि टुटोरिअल समाप्त होत आहे. 
13:58 या टुटोरिअलचे भाषांतर सचिन राणे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
14:01 सहभागासाठी धन्यवाद 

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, Pratik kamble