Java/C2/Hello-World-Program-in-Eclipse/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:39, 23 October 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Hello-World-Program-in-Eclipse

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:01 HelloWorld in Java on Eclipse वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 Eclipse द्वारे Java मध्ये Hello Worldचा प्रोग्रॅम कसा लिहायचा ते पाहू.
00:13 ह्यासाठी Eclipse 3.7.0 आणि Ubuntu 11.10 वापरणार आहोत.
00:20 system वर Eclipse install असणे आवश्यक आहे.
00:25 Eclipse मध्ये फाईल बनवणे, सेव्ह करून कार्यान्वित करणे माहित असायला हवे.
00:30 नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा.
00:36 java code मधील ही ओळHello World हा मेसेज प्रिंट करेल.
00:44 हे Eclipse वर करू.
00:46 Alt आणि F2 दाबा. dialog box मध्ये eclipse टाईप करून एंटर दाबा.
00:56 workspace मध्ये Okक्लिक करा. हे Eclipse IDE आहे.
01:09 new project समाविष्ट करू.
01:12 File मधील New वर क्लिक करून Project सिलेक्ट करा.
01:19 project च्या सूचीतून Java Project सिलेक्ट करा. Next क्लिक करा.
01:26 project name मध्ये टाईप करा DemoProject (लक्षात ठेवा Demo आणि Project मध्ये space नको D आणि P capital lettersमध्ये असले पाहिजे.)
01:40 wizards च्या उजव्या कोप-यात खाली Finish वर क्लिक करा.
01:46 DemoProject बनले आहे.
01:49 project मध्ये new class समाविष्ट करू .
01:52 DemoProject वर Right click करा. New मधील Class select करा. New Java Class Portlet उघडेल.
01:59 class name मध्ये टाईप करा DemoProgram आणि method stubs मधील Public Static Void main निवडा.
02:13 wizardच्या खालील उजव्या कोप-यात Finishवर क्लिक करा.
02:20 DemoProject मध्ये source directory आहे आणि Demo program.Javaही फाईल आहे.
02:27 Javaतील प्रत्येक घोषितclass त्याच नावाच्या स्वतंत्र फाईलमध्ये लिहिला जातो. class Demo Program हा Demo program. Java या फाईलमधेच असेल.
02:40 एडिटरसाठी जागा खूपच कमी असल्याने ते नीट दिसत नाही. Portlet minimise करून घेऊ. आता एडिटर नीट दिसत आहे.
02:55 लक्ष द्या, या ओळीची सुरवात दोन slashes ने होते म्हणजे ही comment लाईन असून त्याचा codeशी संबंध नाही.
03:05 ही ओळ काढून टाकू.त्याचप्रमाणे slash, Asterisk आणि Asterisk slash या मधील सर्व काही देखील commentआहे.
03:17 ही देखील comment काढून टाकु.
03:22 आपल्याकडे code चा मुख्य साचा आहे.
03:27 येथे print statement लिहू. System.
03:35 eclipse येथे सर्व पर्यायांची सूची देत आहे.
03:38 येथे आपणcommand manuallyटाईप करू.
03:43 Out.printlnकंसात quotes मध्ये HelloWorld टाईप करा.
03:56 Java मध्ये प्रत्येक statement चा शेवट semicolon ने होतो.
03:59 येथे semicolon देऊ.
04:03 आपला HelloWorld प्रोग्रॅम पूर्ण झाला आहे .
04:06 Ctrl + S दाबून सेव्ह करा.
04:11 Right click करून Run as मधील java application सिलेक्ट करा. code कार्यान्वित होईल.
04:19 output consoleवर HelloWorld मेसेज असे दिसेल.
04:24 World च्या जागी Java लिहा.
04:30 Ctrl + S करून सेव करा आणि त्यास कार्यान्वित करा.
04:41 Hello Java हा message दिसेल.
04:45 code च्या प्रत्येक भागाचे कार्य पाहू.
04:48 पहिल्या ओळीत DemoProgram हे class name असून हा Public class आहे.
04:55 दुसरी ओळ main method असल्याचे दाखवते. म्हणजे या method पासून java कार्यान्वित होण्यास सुरूवात होते.
05:04 हे print statement आहे.
05:07 अशाप्रकारे आपण Java मध्ये HelloWorld program लिहिला आहे.
05:14 आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:17 आपण Java मध्ये HelloWorld program लिहिला, Java codeच्या प्रत्येक भागाचे कार्य समजून घेतले.
05:27 assignment
05:29 Greet नावाचा java class बनवून यशस्वीरित्या कार्यान्वित होणारा प्रोग्रॅम लिहा.
05:37 प्रकल्पाची अधिक माहिती
05:39 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
05:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
05:53 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:55 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:59 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
06:05 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:14 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:19 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana