Java/C2/First-Java-Program/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:09, 23 October 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: First-Java-Program

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:02 First java program च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:09 ह्यात शिकणार आहोत,
00:11 सोपा java program लिहिणे.
00:14 तो compile करणे.
00:16 तो कार्यान्वित करणे आणि
00:19 java मध्ये वापरली जाणारी naming conventions.
00:24 येथे Ubuntu version 11.10 आणि Java Development Environment jdk 1.6 वापरणार आहोत.
00:32 ह्या पाठासाठी तुमच्या सिस्टीमवर JDK 1.6 install केलेले असणे आवश्यक आहे.
00:39 नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा.
00:46 आता पहिला java program लिहू.
00:51 त्यासाठी Terminal आणि Text Editor ची गरज आहे.
00:56 gedit हा Text Editor वापरू.
01:01 text editor वर प्रथम HelloWorld हा classबनवू.
01:06 टाईप करा class HelloWorld HelloWorld हे classचे नाव आहे.
01:17 Open curly bracket. एंटर दाबून close curly bracket काढा.
01:24 ह्या दोन curly brackets मधीलcode, class HelloWorld शी संबंधित असेल.
01:33 सेव्हवर क्लिक करा.
01:37 मधूनमधून फाईल सेव्ह करणे ही चांगली सवय आहे.
01:43 Save As चा Dialog box उघडेल.
01:46 फाईल सेव्ह करायचे location निवडा.
01:51 home directory मध्ये एक folder बनवू.
01:57 Demo नाव देऊन एंटर दाबा.
02:02 ह्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करू.
02:08 Name च्या text-boxमध्ये class name टाईप करा.
02:13 java मध्ये class name आणि file name सारखेच असले पाहिजे.
02:20 आपण HelloWorld हा class बनवला आहे.
02:25 फाईल HelloWorld dot java नावाने सेव्ह करा.
02:33 java ला Dot javaहे extensionदिले आहे.
02:39 सेव्ह करा. फाईल सेव्ह झाली आहे.
02:47 क्लासच्या आत main method लिहू.
02:53 टाईप करा,
02:54 public static void main parentheses inside parentheses String arg Square brackets
03:10 main function प्रोग्रॅमची सुरूवात असल्याचे दाखवते.
03:15 public, static, void आणि String arg बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ.
03:23 पुन्हा open curly bracket.
03:27 एंटर दाबून close curly bracket लिहा.
03:32 ह्या दोन curly brackets मधील code हा main methodशी संबंधित असेल.
03:41 आपणTerminal वर वाक्य दाखविण्यासाठी code लिहिणार आहोत.
03:46 त्यासाठी main method मध्ये टाईप करा System dot out dot println parentheses semi-colon
03:59 हे statement ओळ प्रिंट करण्यासाठी वापरतात. ओळ टर्मिनेट करण्यासाठी semi-colon वापरतात.
04:10 Java ला काय print करायचे ते सांगू.
04:13 parentheses मध्ये, double quotes मध्ये टाईप करा My first java program exclamation mark.
04:30 फाईल सेव्ह करा.
04:36 Terminal वर जाऊ.
04:38 HelloWorld.java फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली त्यातच आहात याची खात्री करा.
04:46 मी home directory मध्ये आहे.
04:50 टाईप करा cd Space Demo आणि Enter दाबा.
04:59 Demo folder फोल्डरमध्ये HelloWorld.java ही फाईल उपलब्ध आहे.
05:06 ही फाईलcompile करण्यासाठी टाईप करा javac Space HelloWorld dot java आणि एंटर दाबा.
05:21 ही कमांड फाईल compile करेल.
05:25 फाईल compile झाली आहे कारण error मिळाली नाही.
05:30 HelloWorld.class ही फाईल तयार झालेली दिसेल.
05:36 ही फाईल कोणत्याही
05:38 Operating System वर कार्यान्वित होईल .
05:41 त्यासाठी java compiler ची आवश्यकता नाही.
05:45 java या भाषेला "एकदा लिहा व कुठेही चालवा" असे म्हणतात.
05:51 compile केल्यानंतर, प्रोग्राम खालील कमांड वापरुन कार्यान्वित करू.
05:56 java (c नाही) space HelloWorld (dot java extension नाही) टाईप करून एंटर दाबा.
06:07 My first java program! हे आऊटपुट मिळेल.
06:13 java चा पहिला प्रोग्रॅम लिहिला आहे. editor वर जा.
06:22 statement च्या शेवटचे semi-colon काढू.
06:27 सेव्ह करा.
06:29 टर्मिनलवर जा.
06:33 javac HelloWorld dot java ही कमांड कार्यान्वित करा.
06:41 compiler, error देईल.
06:44 ती म्हणजे semi colon is expected on the fifth line.
06:52 up arrow, error statement दाखवते.
06:57 एडिटरवर जा.
07:01 Java मध्ये सर्व statements semicolons ने टर्मिनेट केली जातात.
07:06 पाचव्या ओळीवर जाऊनsemicolon टाईप करा.
07:13 सेव्ह करा. compile करण्यापूर्वी फाईल सेव्ह करणे आवश्यक आहे.
07:22 टर्मिनलवर जा.
07:25 javac Space HelloWorld dot java टाईप करून फाईल Compile करा.
07:32 हे कार्यान्वित झाले आहे. errors मिळाल्या नाहीत.
07:36 java HelloWorld ह्या कमांडच्या सहाय्याने प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
07:45 My first java program! हे आऊटपुट मिळेल.
07:49 अशाप्रकारे तुम्ही javaतील errors हाताळू शकता.
07:54 पुढेही अशाच errors बघणार आहोत.
08:02 java मधील naming conventions पाहू.
08:06 * class name हे CamelCase मध्ये असले पाहिजे.
08:10 * ह्याचा अर्थ प्रत्येक नव्या शब्दाची सुरूवात upper case ने होईल.
08:14 * उदाहरणार्थ class HelloWorld, class ChessGame.
08:19 म्हणजे helloचा H आणि World चा W uppercase मध्ये आहे.
08:25 Chess आणि Game मधील C आणि G uppercase मध्ये आहेत.
08:31 method name हे mixed caseमध्ये असले पाहिजे.
08:35 म्हणजे पहिल्या शब्दाची सुरूवात lower case ने झाली पाहिजे.
08:39 पुढे येणारे सर्व नवे शब्द upper case ने सुरू झाले पाहिजेत.
08:44 method name हे verb असले पाहिजे.
08:48 उदाहरणार्थ showString(), main(), goToHelp(). येथे show मधील s lowercase मध्ये stringमधील S uppercase मध्ये आहे .व्हेरिएबलच्या नावाची सुरूवात digits ने केलेली नसावी.
09:06 class method किंवा variable name साठी keywords वापरू शकत नाही.
09:13 उदाहरणार्थpublic, private, void, static इत्यादी.
09:22 ह्या पाठात साधा java program लिहून तो compile आणि कार्यान्वित करायला शिकलो.
09:30 java मधील naming conventions पाहिले.
09:35 Self assessment म्हणून Java file name and class name should be same हे वाक्य प्रिंट करणारा साधा java programलिहा.
09:47 प्रकल्पाची अधिक माहिती
09:50 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:58 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:02 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
10:10 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:13 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:17 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:49 आपण ह्या पाठाच्या शेवटास पोहोचलो आहोत.
10:51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:53 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana