LibreOffice-Suite-Base/C2/Create-queries-using-Query-Wizard/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:44, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Create Queries using Query Wizard

Author: Manali Ranade

Keywords: Base


Visual Clue
Narration
00:02 बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. Query wizard च्या सहाय्याने simple query बनवणे, फिल्डस सिलेक्ट करणे, फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि query द्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे.
00:24 प्रथम query म्हणजे काय हे जाणून घेऊ.
00:29 database मधून विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी queryचा वापर करता येतो.
00:36 दुस-या शब्दात सांगायचे तर आपणdatabase ला प्रश्न विचारून आपल्या निकषांशी जुळणारी माहिती काढून घेता येते.
00:48 आपण आपल्या लायब्ररी databaseच्या उदाहरणाचा विचार करू.
00:56 आपल्या लायब्ररी databaseमध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे.
01:04 आता आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांच्या सूचीसाठी लायब्ररी databaseला query करू शकतो.
01:12 किंवा आपण लायब्ररीमध्ये सध्या नसलेल्या, म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांच्या सूचीसाठी databaseला query करू शकतो.
01:21 बेसच्या सहाय्याने simple query कशी बनवायची ते पाहू.
01:30 आपल्या उदाहरणात सर्व सभासदांच्या नावांची सूची, त्यांच्या फोन नंबरसहित दाखवणार आहोत.
01:44 आपण Library database मध्ये आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला तो कसा उघडायचा हे माहित झाले असेलच.
01:51 डाव्या पॅनेलवरील Queries च्या आयकॉनवर क्लिक करा.
01:57 उजव्या पॅनेलमध्ये आपल्याला तीन पर्याय दिसतील.
02:03 आपण प्रथम simple query बनवत असल्यामुळे आपण सोप्या आणि जलद पध्दतीची निवड करू या.
02:11 आणि ती म्हणजे Query Wizardचा वापर.
02:17 complex queries बनवण्यासाठी बेसने काही सोपे पर्याय प्रदान केले आहेत. जसे की Create Query in Design View
02:28 आणि Create Query in SQL view. याबद्दल आपण नंतर शिकणार आहोत.
02:36 आता Use Wizard to Create Query वर क्लिक करा.
02:43 आता वरती Query Wizard असे लिहिलेली popup विंडो उघडेल.
02:50 डावीकडे आपल्याला 8 steps दिसतील ज्यातून आपण जाणार आहोत.
02:57 आपण Step 1. Field Selectionवर आहोत.
03:03 उजवीकडे आपल्याला टेबल्स या लेबलखाली drop down दिसेल.
03:11 query द्वारे मिळणा-या माहितीचा source आपण येथे निवडणार आहोत.
03:21 आपल्या queryच्या उदाहरणात लायब्ररीमधील सर्व सभासदांची माहिती मिळवायची असल्यामुळे आपण drop down मधीलTables: Members वर क्लिक करू या.
03:35 आता डावीकडील Available fields च्या यादीतील नेम फिल्डवर क्लिक करून ते उजवीकडील सूचीत स्थलांतरित करा.
03:50 पुढे डावीकडील फोन हे फिल्ड उजवीकडे स्थलांतरित करा.
04:00 लक्षात ठेवा की सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी, उजवीकडे दाखवल्या जाणा-या double arrow बटणाचा वापर करू शकतो.
04:09 आता खाली Next बटणावर क्लिक करा.
04:15 आता आपण Step 2 . Sorting Order वर आहोत.
04:20 आपल्याquery च्या रिझल्टमध्ये सभासदांची यादी आणि फोन नंबर असल्यामुळे आपण ते तसेच ठेवू शकतो.
04:30 किंवा आपण सभासदांच्या नावांच्या यादीप्रमाणे सॉर्ट करू शकतो.
04:36 Base Wizard आपल्याला एकावेळी रिझल्टची सूची चार फिल्डस पर्यंत सॉर्ट करण्याची परवानगी देते.
04:45 आता सगळ्यात वरच्या drop down वर क्लिक करा.
04:51 आणि Members.Name वर क्लिक करा.
04:55 आपल्याला हवे असल्यास नावे सॉर्ट करण्यासाठी आपण चढता किंवा उतरता क्रम निवडू शकतो.
05:03 Ascending या पर्यायावर क्लिक करा.
05:07 आणि पुढील Stepवर जा.
05:11 Step 3. Search Conditions.
05:16 काही निकषांवर आपला रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी ह्या step ची मदत होईल.
05:22 उदाहरणार्थ आपण आपल्या रिझल्टमध्ये केवळ R या अक्षराने सुरूवात होणा-या मेंबर्सची नावे दाखवू शकतो.
05:34 त्यासाठी Fields drop down बॉक्सवर क्लिक करा. नंतर Members.Name वर क्लिक करा.
05:45 आता Condition drop down वर क्लिक करा.
05:51 येथे विविध conditions दिसतील.
05:58 Like वर क्लिक करा.
06:02 Valueच्या text box मध्ये capital Rआणि percentage चे चिन्ह टाईप करा.
06:13 अशा प्रकारे query मध्ये simple आणि complex conditions समाविष्ट करू शकतो.
06:22 सर्व सभासदांची यादी मिळवण्यासाठी Valueच्या text boxमधून R% डिलिट करा आणि Next वर क्लिक करा.
06:37 आपण मधल्या Steps सोडून Step 7 वर आलो आहोत.
06:43 कारण आपण एका टेबलपासून simple query बनवत आहोत.
06:51 आणि आपली query तपशीलवार माहिती देणारी आहे. सारांश देणारी नाही.
06:57 सारांशाने माहिती देणा-या query मध्ये aggregate functionsवापरून आणि गट बनवून माहिती दिली जाते.
07:05 उदाहरणार्थ सर्व सभासदांची संख्या किंवा सर्व पुस्तकांच्या किंमतींची बेरीज.
07:13 या पर्यायाबद्दल आपण नंतर जाणून घेऊ.
07:17 आता येथे आपण aliases बनवू या.
07:23 म्हणजेच रिझल्टच्या सूचीत ओळखीची आणि अर्थपूर्ण labels किंवा headers बनवू या.
07:32 आपण Name फिल्डला Member Name आणि Phone fieldला Phone Number असे alias देऊ शकतो.
07:46 या टेक्स्ट बॉक्समध्ये हे दोन नवे aliases टाईप करा. आणि Next चे बटण दाबा.
07:57 आता आपण शेवटच्या म्हणजे Step 8 वर आहोत.
08:03 येथे आपण आपल्या simple query ला अर्थपूर्ण नाव देऊ.
08:09 Name of the Query या लेबलसमोर List of all members and their phone numbers असे टाईप करा.
08:20 wizard मध्ये आपण निवडलेले घटक overview मध्ये आपल्याला दिसतील.
08:27 आणि आता येथून पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो?
08:31 वरती उजवीकडे असलेल्या Display Query वर क्लिक करा आणि Finish बटणावर क्लिक करा.
08:41 wizard window बंद होऊन ती List of all members and their phone numbers नामक नवी विंडो उघडेल.
08:52 आपण सुरूवातीला Members table मध्ये एंटर केलेल्या चारही मेंबर्सची नावे त्यांच्या फोन नंबर सहित आपल्याला दिसतील.
09:04 तसेच ही सूचीची मांडणी अक्षरांनुसार चढत्या क्रमाने केलेली दिसेल.
09:13 अशा प्रकारे ही आपली simple query आहे.
09:18 आता assignment करू.
09:21 सर्व पुस्तकांची सूची चढत्या क्रमाने दर्शविणारी query बनवा.
09:28 सर्व fields चा समावेश करा.
09:31 query ला List of all books in the Library असे नाव द्या.
09:38 अशा प्रकारे आपण Creating Queries using Wizard वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:45 आपण जे शिकलो ते थोडक्यात. Query wizard च्या सहाय्याने simple query बनवणे, फिल्डस सिलेक्ट करणे, फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि query साठी निकष प्रदान करणे.
10:00 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
10:12 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे.
10:17 यासंबंधी अधिक माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
10:22 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pravin1389, Sneha