LibreOffice-Suite-Base/C2/Introduction/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Introduction
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत LibreOffice Base म्हणजे काय. |
00:09 | बेस वापरण्याची पूर्वतयारी. |
00:12 | LibreOffice Base मध्ये आपण काय करू शकतो? |
00:14 | Relational Database चे basics. नवा database आणि table तयार करणे. |
00:20 | LibreOffice Base हा LibreOffice suiteचा database घटक आहे. |
00:26 | Microsoft Access चे बेसशी साम्य आहे. |
00:30 | बेस हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्याचे वितरण, आदानप्रदान व वापर आपण कुठल्याही निर्बंधाशिवाय करू शकतो. |
00:37 | बेसच्या वापरासाठी लागणा-या पूर्वतयारीकडे एक नजर टाकू. |
00:41 | मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठीची System requirement पुढीलप्रमाणे |
00:45 | Microsoft Windows 2000 (Service Pack 4 or higher), XP, Vista, or Windows 7; Pentium-compatible PC. हार्ड डिस्कवर 1.5 Gb किंवा जास्त उपलब्ध जागा; |
01:02 | Ubuntu Linux साठीची System requirement अशा प्रकारे |
01:06 | Linux kernel चे version 2.6.18 or higher; Pentium-compatible PC |
01:13 | विंडोज किंवा लिनक्स ह्या दोन्ही installation साठी आपल्याकडे किमान 256 Mb RAM असावी. (512 Mb किंवा जास्त असल्यास चांगले) |
01:24 | System requirementच्या संपूर्ण माहितीसाठी लिबर ऑफिसची बेवसाईट पहा. |
01:30 | तसेच आपल्याला Java Runtime Environment इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. जी तुम्ही या लिंकवरून डाऊनलोड करू शकता. |
01:38 | Free Java Download ह्या मध्यभागी असलेल्या लाल बटणावर क्लिक करा. |
01:44 | एकदा फाईल डाऊनलोड झाली की त्यावर डबल क्लिक करा. आणि इन्स्टॉल करण्याच्या सर्व सूचनांचे पालन करा. |
01:52 | आता आपण LibreOffice Base चे installation बघू या. |
01:56 | तुम्ही complete installation चा पर्याय निवडून जर LibreOffice Suite इन्स्टॉल केले असेल |
02:03 | तर तुमच्या स्क्रीनच्या डावीकडे खाली असलेल्या Start menu वर क्लिक करूनLibreOffice Base उघडू शकता. |
02:12 | All Programs वर क्लिक करून नंतर LibreOffice Suite वर क्लिक करा. |
02:21 | जर तुम्ही LibreOffice Suite इन्स्टॉल केले नसेल |
02:24 | तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवरील डाऊनलोडवर LibreOffice वर क्लिक करून Base इन्स्टॉल करू शकता. |
02:37 | LibreOffice Suiteच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे. |
02:43 | Base इन्स्टॉल करताना complete हा पर्याय निवडायचा आहे हे लक्षात ठेवा. |
02:50 | आता आपण पुढील विषयाकडे वळू या. |
02:54 | LibreOffice Base मध्ये आपण काय करू शकतो? |
02:57 | Base मध्ये आपल्याला data योग्य पध्दतीने संचित करता येतो. |
03:02 | forms च्या सहाय्याने data entry करता येते व data बघता येतो. |
03:08 | queries च्या सहाय्याने माहिती मिळवता येते. |
03:12 | सुबक व छापण्यायोग्य चांगले रिपोर्टस् तयार करता येतात. |
03:17 | data चे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला baseची मदत होते. |
03:21 | तुम्हाला कदाचित माहिती असेल की database हा data, forms, queries and reports यांचा समूह असतो. |
03:29 | उदाहरणार्थ बेसचा उपयोग Customer Information databases हाताळण्यासाठी, |
03:36 | sales orders आणि invoices वर नियंत्रण ठेवण्यासाठी, student gradeच्या databaseची व्यवस्था राखण्यासाठी किंवा libraryसंबंधित database बनवण्यासाठी होतो. |
03:47 | आता आपण database ची प्राथमिक ओळख करून घेऊ. |
03:51 | database मध्ये टेबल म्हणजेच तक्त्याच्या रूपात मजकूर मांडला आणि संचित केला जातो. |
03:56 | टेबल्समधील प्रत्येक data घटक rows आणि columns मध्ये संचित केला जातो. |
04:03 | अशा database ला relational database असे म्हणतात. जेथे कॉलम्सच्या सहाय्याने टेबल्सचा एकमेकांशी संबंध जोडलेला असतो. |
04:15 | आपण लायब्ररीसाठी एका simple database चा विचार करू. |
04:20 | लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकांचा संग्रह असतो. |
04:23 | आणि पुस्तके लायब्ररीच्या सभासदांना दिलेली असू शकतात. |
04:28 | पुस्तकाला नाव, लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष आणि किंमत असते. |
04:37 | याला attributes किंवा गुणधर्म असे म्हणतात. |
04:42 | त्याचप्रमाणे लायब्ररीच्या सभासदाला नाव, दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता असतो. |
04:48 | आणि लायब्ररीच्या सभासदांनाच केवळ पुस्तके दिली जातात. |
04:54 | आता हा मजकूर rows आणि columns असलेल्या टेबल्सच्या रूपात कसा संचित करायचा ते बघू या. |
05:02 | Books table मध्ये प्रत्येक पुस्तकाबद्दलची माहिती संचित करू शकतो. |
05:08 | याचे attributes जसे की book title, author, publisher, year of publication and price हे कॉलम रूपात असतील. |
05:19 | प्रत्येक पुस्तक वेगळे ओळखण्यासाठी BookId नामक unique identifier हा column देखील समाविष्ट करा. |
05:27 | अशा प्रकारे आपल्याकडे एकाच नावाची दोन वेगळी पुस्तके असू शकतील. |
05:33 | तसेच Members table च्या कॉलम्समध्ये Name आणि Phone, |
05:40 | तसेच प्रत्येक सभासद वेगळा ओळखण्यासाठी Member Id चा समावेश असू शकतो. |
05:47 | आणि BooksIssued या तिस-या टेबलद्वारे आपल्याला सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवता येते. |
05:56 | या टेबलमध्ये book issued, the member, date of issue, date of return, actual date of return, whether checked in or not अशा प्रकारची माहिती असेल. |
06:09 | या टेबल्समधील data एकमेकांशी जोडून आपण त्यांच्या मध्ये संबंध प्रस्थापित करू शकतो. |
06:16 | यामुळे आपल्याला relational database हाताळणे सोपे होते. |
06:22 | relational database वरील advanced topics साठी Spoken tutorialच्या वेबसाईटवरील इतर ट्युटोरियल बघा. |
06:35 | आता आपण पहिल्या Base databaseला Library नावाच्या databaseने सुरूवात करू या. |
06:43 | नवा database बनवण्यासाठी प्रथम आपल्याला Base program उघडावा लागेल. |
06:50 | त्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली Start menu वर क्लिक करून All Programsवर जा. नंतर LibreOffice Suiteमध्ये LibreOffice Base वर क्लिक करा |
07:08 | Database Wizard नामक एक पॉप अप विंडो उघडेल. |
07:13 | नवीन Database बनवण्यासाठी Next बटणावर क्लिक करा. |
07:19 | पुढील विंडोमधील Finish बटणावर क्लिक करा. |
07:23 | Save As ही विंडो उघडेल. |
07:27 | आपण लायब्ररीचा Database तयार करत असल्यामुळे File Name च्या text box मध्ये Library असे टाईप करा. |
07:35 | आणि नंतर सेव्ह या बटणावर क्लिक करा. |
07:39 | आता आपण database मध्ये आहोत. |
07:42 | data संचित करण्यासाठी आपण टेबल्स बनवू या. |
07:46 | नवे टेबल बनवण्यासाठी डावीकडील database च्या सूचीतील Tables या आयकॉनवर क्लिक करा. |
07:54 | उजवीकडील Tasks च्या सूचीतून Create Table in Design View वर क्लिक करा. येथे दुसरी विंडो उघडेल. |
08:05 | येथे पहिल्या कॉलममध्ये Field Name खाली BookId टाईप करा. |
08:13 | Field Type या पुढील कॉलमवर जाण्यासाठी टॅब ही की वापरा. |
08:18 | प्रत्येक पुस्तकाचा BookId वेगवेगळा नंबर असल्यामुळे फिल्ड टाईपमधल्या ड्रॉप डाऊन मधून Integer ही पर्याय निवडा. |
08:32 | खालील भागातील Field Properties बदलू या. |
08:36 | AutoValue, No बदलून Yes करा. |
08:41 | या फिल्डमध्ये प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा वेगळा क्रमांक असेल. ज्यामुळे ते पुस्तक वेगळे ओळखता येईल. |
08:46 | दुस-या शब्दात या फिल्डला Primary Key असेही म्हणतात. |
08:52 | BookId फिल्डच्या डावीकडे पिवळ्या किल्लीचे चिन्ह दिसेल. |
08:58 | field names साठी Field Type कसे निवडायचे ते आपण पाहू. |
09:05 | Field typeहे text, integer, numeric, decimal किंवा date यापैकी असू शकते. |
09:13 | मजकूर रूपात असलेल्या फिल्डसाठी उदा नाव, शीर्षक, पत्ता यासाठी text हा टाईप वापरा. |
09:22 | केवळ संख्या असलेल्या फिल्डसाठी integer, numeric किंवाdecimalचा वापर करा. |
09:30 | उदाहरणार्थ किंमत असलेल्या फिल्डसाठी numeric आणि वर्ष असलेल्या फिल्डसाठी integerचा वापर करा. |
09:39 | आता आपण उरलेली फिल्डस बनवू या. |
09:43 | Title, Field type Text, |
09:52 | Author, त्याचे Field type Text, |
09:59 | Published Year, त्याचे Field type Integer |
10:05 | Publisher |
10:09 | त्याचे Field type Text |
10:11 | Price |
10:14 | त्याचे Field type Numeric |
10:18 | Length आणि Decimal places बदलून ते अनुक्रमे 5 आणि 2 करा. |
10:25 | Format example या बटणावर क्लिक करा. |
10:29 | येथे Field Format window उघडेल. |
10:33 | Category List मधून Currency आणि Format List मधून INR निवडा. |
10:42 | दोन decimal places असलेले Rs. 1234.00 निवडा. |
10:54 | लक्षात घ्या की दोन Decimal places सहित संपूर्ण लेंथ 5 आहे. |
11:02 | OK बटणावर क्लिक करा. आता आपण Books table साठी सर्व columns बनवले आहेत. |
11:11 | आता आपण टेबल सेव्ह करू. |
11:14 | फाईल मेनूखालील सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. |
11:20 | टेबल नेमच्या टेक्स्टमध्ये Books टाईप करा. |
11:25 | टेबल्स हे databaseचा एक भाग असल्यामुळे Library हा database ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टेबल्सही सेव्ह होतील हे लक्षात ठेवा. |
11:36 | आणि OK बटणावर क्लिक करा. |
11:39 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण Books या टेबलमध्ये data भरू या. तसेच Members आणि BooksIssued tables बनवू या. |
11:50 | अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:54 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
11:58 | LibreOffice Base म्हणजे काय? |
12:01 | Base वापरण्यासाठी पूर्वतयारी. |
12:03 | Base मध्ये आपण काय करू शकतो, Relational Database चे basics. |
12:08 | नवा database आणि टेबल बनवणे. |
12:13 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण tables and relationships यासंबंधी जाणून घेणार आहोत. |
12:18 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
12:24 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
12:32 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
12:38 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
12:44 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |