LibreOffice-Suite-Base/C2/Create-a-simple-form/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Create a simple forms
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:03 | या ट्युटोरियलमध्ये आपण Simple Forms बद्दल जाणून घेणार आहोत. |
00:09 | येथे आपण शिकणार आहोत, |
00:12 | form म्हणजे काय? |
00:14 | Wizard च्या सहाय्याने form कसा तयार करायचा? |
00:17 | आत्तापर्यंत आपण शिकलो की LibreOffice Base च्या सहाय्याने database बनवणे आणि आपण ज्यात data संचित करतो ते टेबल बनवणे. |
00:27 | परंतु databaseच्या टेबलमध्ये data कसा भरायचा? |
00:33 | एक पध्दत म्हणजे टेबल्सच्या सेल्समध्ये data टाईप करणे जे आपण मागील ट्युटोरियलमध्ये केले. |
00:42 | data भरण्याची अजून एक जलद आणि कमीतकमी चुका होणारी अशी पध्दत आहे. |
00:49 | आणि ती म्हणजे Forms चा वापर. Form हा data भरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी असलेला front end किंवा user interface आहे. |
01:00 | उदाहरणार्थ simple form हा टेबलमधील fields पासून बनलेला असू शकतो. |
01:06 | आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या Library databaseचा उदाहणादाखल वापर करणार आहोत. |
01:15 | simple form मध्ये Books table मधील fields चा समावेश असू शकतो. |
01:21 | ह्या form चा वापर Books table मध्ये data भरण्यासाठी करता येतो. |
01:27 | आता आपण form कसा बनवायचा ते शिकू या. |
01:33 | प्रथम आपण LibreOffice Base हा प्रोग्रॅम सुरू करू या. |
01:38 | बेस प्रोग्रॅम चालू नसेल तर स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या Start button वर क्लिक करा आणि नंतर All programs वर क्लिक करा. नंतर LibreOffice Suite मधील LibreOffice Base वर क्लिक करा. |
01:57 | आता open an existing database file या पर्यायावर क्लिक करा. |
02:04 | Recently Used या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला Library database दिसेल. |
02:11 | तो सिलेक्ट करून Finish या बटणावर क्लिक करा. |
02:17 | LibreOffice Base आधीपासूनच सुरू असल्यास, |
02:21 | Library databaseची Library.odb ही फाईल उघडण्यासाठी File menu वर क्लिक करा आणि मग Openवर क्लिक करा. |
02:36 | किंवा फाईल मेनूमधील Recent Documents वर क्लिक करा आणि Library.odb निवडा. |
02:48 | आता आपण Library databaseमध्ये आहोत. |
02:52 | डावीकडील Database ह्या सूचीच्या पॅनेलमधील Forms या आयकॉनवर क्लिक करा. |
03:01 | लक्षात घ्या, नवीन Form बनवण्याच्या दोन पध्दती आहेत. Create Form in Design View and Use Wizard to create form. |
03:12 | Use Wizard to create form या दुस-या पर्यायावर क्लिक करा. |
03:19 | आता आपल्याला LibreOffice Writer window सारखी एक नवी विंडो दिसेल. |
03:26 | आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला Form Wizard नामक एक popup window दिसेल. |
03:33 | Books table वर आधारित असलेला आपला पहिला Form बनवण्यासाठी Wizard वर जाऊ या. |
03:40 | आपण डावीकडे दिसत असलेल्या आठ steps मधून जाणार आहोत. |
03:46 | सध्या आपण Field Selection या पहिल्या stepवर आहोत. |
03:53 | आणि उजव्या बाजूला असलेल्या Tables or Queries नामक drop down मधील Books हे टेबल निवडू या. |
04:03 | त्याच्या खाली डावीकडे आपण उपलब्ध fields ची सूची बघू शकतो. |
04:09 | उजव्या बाजूला आपल्याला fields on the form दिसेल. |
04:14 | केवळ form मध्ये आवश्यक असलेली fields आपण स्थलांतरित करू. |
04:21 | यासाठी double arrow चे चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करू या. |
04:27 | लक्षात घ्या की आपण डावीकडे असलेली सर्व fields उजवीकडे स्थलांतरित केली आहेत. |
04:35 | BookId field मधील numbers हे autogenerate होणार असल्यामुळे, आपल्याला ते form वर नको आहे. |
04:46 | मग आपण हे फिल्ड परत डाव्या बाजूला स्थलांतरित करू या. |
04:51 | उजव्या बाजूला असलेल्या BookId वर क्लिक करा आणि Less than चे एक चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करा. |
05:02 | आता आपण पुढील step वर जाण्यासाठी खालील Next या बटणावर क्लिक करू. |
05:10 | Step 2. आपण simple form बनवत असल्यामुळे ही Step आपण सध्या सोडून देऊ. त्यासाठी Next या बटणावर क्लिक करू. |
05:21 | आता आपण Step 5 म्हणजेचArrange controlsवर आहोत . |
05:26 | background window कडे लक्ष द्या. आपले Books table, Orange background मध्ये दिसेल. |
05:35 | Arrangement of the Main form ह्या लेबल खालील 4 आयकॉन्सवर एकेक करून क्लिक करा. |
05:44 | क्लिक केल्यावर असे दिसेल की background window तसेच title, author इत्यादी लेबल्स आणि त्यांच्या टेक्स्ट बॉक्सच्या रचनेत बदल होत आहे. |
05:57 | पहिल्या Columnar - Labels left या रचनेचा वापर करू या. |
06:08 | येथे लेबल्स डाव्या बाजूला आणि टेक्स्ट बॉक्स उजव्या बाजूला आहेत, जसे सर्वसाधारण फॉर्ममध्ये असते. |
06:17 | आता आपण पुढे जाण्यासाठी Next बटणावर क्लिक करू. |
06:22 | आपण Set Data Entry नावाच्या 6 व्या Stepवर आहोत. |
06:28 | आत्ता आपण ही Step सोडून देणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. |
06:33 | 7 वी Step आहे Apply Styles . |
06:36 | लक्ष द्या की आपण लिस्ट बॉक्समधील प्रत्येक रंगावर क्लिक केल्यावर विंडोचा background colour बदलत आहोत. |
06:45 | Ice Blue हा रंग निवडण्यासाठी त्यावर क्लिक करू. |
06:50 | आता आपण अंतिम Step वर जाऊ. |
06:53 | आठव्या Stepवर आपल्या form ला नाव देऊ या. |
06:59 | आपण आपल्या मनाप्रमाणे नाव देऊ शकतो. |
07:03 | Name of the form खालील text box मध्ये Books Data Entry Form असे नाव टाईप करू या. |
07:16 | आता how do we want to proceed after creating the form? वर जाऊ. |
07:20 | प्रथम Work with the form निवडू या. |
07:23 | याचा अर्थ आपण data भरण्यासाठी form वापरायला सुरूवात करणार आहोत. |
07:29 | form चे डिझाईन बदलण्यासाठी आपण Modify the form निवडू शकतो. ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत. |
07:37 | आता खालील finish या बटणावर क्लिक करू. |
07:44 | अशा प्रकारे आपण विंडोवर Books Data Entry Form असे शीर्षक असलेला simple form बनवला आहे. |
07:54 | लक्ष द्या की टेक्स्ट बॉक्समध्ये काही values दिसत आहेत. जसे की An autobiography', 'Jawaharlal Nehru' इत्यादी. |
08:05 | या values कुठून आल्या? |
08:08 | Base ट्युटोरियलच्या मागील भागात आपण Books table मध्ये ह्या values टाईप केल्या होत्या. |
08:17 | आता हा form वापरण्यासाठी तयार आहे. |
08:22 | प्रत्येक value वर जाण्यासाठी आपण टॅब हे बटण दाबू या. |
08:27 | form मध्ये आपल्याला Conquest of self हे शीर्षक असलेल्या दुस-या पुस्तकाची माहिती दिसेल. |
08:37 | खालील Forms Navigation toolbar मधे उजवीकडे टोक असलेल्या काळ्या त्रिकोणी आयकॉन वर क्लिक करून, आपण प्रत्येक पुस्तकाची माहिती बघू शकतो. ज्यास record असेही म्हणतात. |
08:54 | लक्षात घ्या की 5 पैकी तिसरे record येथे दर्शवले जात आहे. |
09:01 | जेव्हा आपण कर्सर ह्या black arrowच्या आयकॉनजवळ नेऊ तेव्हा Base आपल्याला tool tips दर्शवेल. |
09:09 | First Record, Previous Record, Next Record, आणि Last Record. |
09:16 | आपण याचा उपयोग करून recordsमध्ये पुढे मागे जाऊ शकतो. |
09:22 | अशा प्रकारे आपण LibreOffice Base च्या Simple Forms वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:27 | थोडक्यात आपण Form म्हणजे काय आणि Wizard च्या सहाय्याने Form कसा बनवायचा ते शिकलो. |
09:35 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:47 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
09:52 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
09:56 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |