LibreOffice-Suite-Impress/C2/Printing-a-Presentation-Document/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:35, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Printing a Presentation

Author: Manali Ranade

Keywords: Impress


Visual Clue
Narration
00.00 लिबर ऑफिस इम्प्रेसच्या 'Printing a Presentation' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्युटोरियलमध्ये आपण कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे विविध पर्याय जाणून घेणार आहोत.
00.11 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'.
00.16 इथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00.25 अनेक वेळा आपल्याला प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर प्रिंट करावी लागते.
00.29 उदाहरणार्थ तुम्हाला प्रेझेंटेशनची कॉपी तुमच्या श्रोत्यांना पुढील संदर्भासाठी द्यायची आहे.
00.35 प्रथम आपण 'Sample Impress' प्रेझेंटेशन फाईल वर डबल क्लिक करून उघडू या.
00.41 आपल्या स्लाईडची प्रिंट घेण्यासाठी 'File' वर जाऊन मग 'Print' वर क्लिक करा. किंवा Ctrl आणि P ही कीबोर्डवरील बटणे एकत्रितपणे दाबा.
00.50 'General' आणि 'Options' या टॅबखालील सेटींग्जबद्दल जाणून घेण्यासाठी,
00.55 लिबर ऑफिस रायटरमधील 'Viewing and printing documents' या ट्युटोरियची मदत घ्या.
01:02 'General' टॅब मधल्या 'Print' खालील 'Document' या फिल्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ठ पर्याय उपलब्ध असतात.
01:09 या पर्यायांमुळे आपण हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये आपल्या स्लाईडची प्रिंट घेऊ शकतो.
01:15 'Slides', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' यापैकी आपण 'Slides' हा पर्याय निवडू.
01:22 'लिबर ऑफिस इम्प्रेस' या टॅबवर क्लिक करा.
01:26 येथे आपल्याला स्लाईडचा रंग आणि आकार व स्लाईडचा जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो.
01.34 कंटेट्स खाली 'Slide Name', 'Date and Time' आणि 'Hidden Pages' हे सिलेक्ट करू या.
01:41 पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव, तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकता.
01:49 नंतर कलर खालील 'Greyscale' हा पर्याय निवडा.
01:53 पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपल्याला स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते.
02:00 आणि Size खाली 'Fit to printable page' हा पर्याय निवडा. लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील इतर पर्याय कशाप्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता.
02:10 तुम्हाला कोणत्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार 'pane layout' या टॅबमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
02:18 समजा आपल्याला एकाच पानावर अनेक स्लाईडस् ची प्रिंट घ्यायची आहे.
02:23 त्यासाठी 'pages per sheet' हा पर्याय निवडा. Default रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते.
02:29 येथे पानाचा छोटा preview दिसत आहे.
02:33 ड्रॉप आऊन ऍरोवर क्लिक करा आणि प्रत्येक पानावर किती स्लाईडस् प्रिंट करायच्या आहेत ती संख्या निवडा.
02:39 जर आपण 2 ही संख्या निवडली तर preview मध्ये आपल्याला 2 स्लाईडस् दिसतील. जर 6 निवडल्या तर preview मध्ये 6 स्लाईडस् दिसतील.
02:48 'Draw a border around each page' हा पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल.
02:56 त्यामुळे तुमचे पान जास्त आकर्षक दिसेल.
02:59 'Brochure' या पर्यायामुळे आपल्याला स्लाईड, पुस्तक रूपात प्रिंट करता येतात. त्यामुळे बाईंडिंग करणे सोपे जाते.
03:06 सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही. हा पर्याय कसे काम करतो ते तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या.
03:14 'Option' या टॅबमधील कुठलाही चेक बॉक्स निवडलेला नाही याची खात्री करा.
03:19 हे चेक बॉक्स काही विशिष्ट करणांसाठी दिले आहेत. या ट्युटोरियलमध्ये आपण याविषयी चर्चा करणार नाही.
03:25 आता 'Print' या बटणावर क्लिक करा.
03:28 जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने configure केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
03:36 पुढे आपण 'Handouts' या पर्यायाबद्दल जाणून घेऊ या. 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा.
03:41 आणि 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट या फिल्डमधून 'Handouts' हा पर्याय निवडा.
03:47 'Default' रूपात एका पानावर चार स्लाईड असतात व त्यांचा 'Default' क्रम डावीकडून उजवीकडे आणि नंतर खाली असा असतो. या प्रेझेंटेशनसाठी यात कुठलाही बदल करू नये.
03:58 लिबर ऑफिस इम्प्रेस या टॅबमधील 'Size' हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रीय आहे.
04:05 ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा तुमच्या स्लाईडस् ची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो.
04:12 आता 'Print' या बटणावर क्लिक करा.
04:15 जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
04:20 आता पहिल्या स्लाईडवर जाऊन 'Note' या टॅबवर क्लिक करा.
04:25 येथे आपण 'This is a sample note' अशी तळटीप टाईप करू या.
04:30 तुमच्या स्लाईडस् साठी टाईप केलेल्या तळटीपा प्रिंट करण्यासाठी फाईलवर जाऊन 'Print' वर क्लिक करा.
04:35 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट या फिल्डवर जाऊन 'Notes' हा पर्याय निवडा.
04:42 डावीकडील 'preview' पेजमध्ये पहा. स्लाईडच्या खालील भागात तुम्ही टाईप केलेली तळटीप दिसत आहे.
04:48 'Libre Office Impress' या टॅबवर आता क्लिक करा.
04:52 लक्षात घ्या 'Notes' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो.
04:57 आता 'Print' या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
05:05 शेवटी, प्रेझेंटेशन करताना जलद संदर्भ म्हणून स्लाईड्सची रूपरेखा छापण्यासाठी, प्रथम File वर क्लिक करून नंतर Print वर क्लिक करा.
05:13 'General' टॅबमधील 'Print' खालील 'Document' या फिल्डवर जाऊन 'Outline हा पर्याय निवडा.
05:19 डावीकडील 'Preview' पेजमध्ये पहा. तेथे तुमच्या स्लाईड्सची रूपरेखा म्हणजेच स्लाईड्सचा क्रम, त्यांची Headings व त्यातील मुद्दे तुम्हाला दिसतील.
05:28 'Libre Office Impress' या टॅबवर आता क्लिक करा.
05:32 लक्षात घ्या 'Outline ' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो.
05:38 आता 'Print' या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही प्रिंटर योग्य पध्दतीने 'configure' केलेला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
05:47 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो असून त्यात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले.
05:52 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'
05:57 COMPREHENSION TEST ASSIGNMENT. नवीन प्रेझेंटेशन तयार करा.
06:02 फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा. 'Handout' रूपात पहिल्या चार स्लाईडस् प्रिंट करा.
06:10 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:16 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
06:21 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:27 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:31 *अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken hyphen tutorial dot org वर संपर्क साधावा.
06:38 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
06:42 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
06:50 *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.
07:01 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे.
07:06 *ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha