LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-data/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Working With Data
Author: Manali Ranade
Keywords: Calc
|
|
---|---|
|
लिबर ऑफिस कॅल्कच्या Working with Data वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
|
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
|
Fill Tools आणि Selection List चा उपयोग करून कामाची गती वाढविणे. |
|
एका शीटमधील डेटा दुस-या शीटमध्ये स्थलांतरीत करणे किवा वापरणे |
|
डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे |
|
इथे आपण उबंटु लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
|
स्प्रेडशीटमध्ये डेटा एंटर करणे हे थोडे कष्टाचे काम आहे. परंतु हे काम सोपे करण्यासाठी कॅल्कमध्ये विविध टूल्स देण्यात आलेली आहेत. |
|
एक प्राथमिक पध्दत म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका सेल मधील घटक दुस-या सेलमध्ये ड्रॉप करणे |
|
परंतु कॅल्कमधे अशाही अनेक सोयी आहेत ज्याद्वारे अनेकवार कराव्या लागणा-या क्रिया Automatic होऊ शकतात. |
|
त्यासाठी “Fill Tool” व “Selection Lists” या नावांची टूल्स आहेत. |
|
ही टूल्स एकाच डॉक्युमेंट मधील अनेक शीटस् मध्ये माहिती भरू शकतात. |
|
आपण ह्या प्रत्येकाबद्दल एकेक करून माहिती घेऊ. |
|
आपण आपली Personal Finance Tracker.ods ही फाईल उघडू या. |
|
Fill Tool चा वापर शीटमधील घटक डुप्लिकेट करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. |
|
समजा, आपल्या Personal Finance Tracker.ods मध्ये "Cost” या हेडिंगखाली असलेला डेटा आपल्याला त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी करायचा आहे |
|
प्रथम कॉपी करायचा सर्व Data Select करून घ्या. त्यासाठी "6000” अशी एंट्री असलेल्या सेलवर क्लिक करा. |
|
आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून "2000” अशी एंट्री असलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करा. |
|
शिवाय ज्या सेल्समध्ये तुम्हाला हा डेटा कॉपी करायचा आहे ते सिलेक्ट करून घ्या. |
|
आता माऊसचे डावे बटण सोडा. |
|
मेनूबारवरील Edit Optionवर क्लिक करून Fill Option वर क्लिक करा. |
|
पॉप अप मेनूमधील Write Option वर क्लिक करा. |
|
तुम्हाला "Cost” Heading खालील डेटा त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी झालेला दिसेल. |
|
केलेले सर्व बदल undo करा. |
|
Fill Tools चा जास्त गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे शीटमधे अंकांची Series, डेटा म्हणून एंटर करणे |
|
कॅल्कमधे आठवड्यातील वारांची तसेच वर्षातील महिन्यांची संक्षिप्त व पूर्ण नावांची यादी डेटा एंटर करण्यासाठी उपलब्ध आहे |
|
इथे userला स्वतःची यादी देखील तयार करता येऊ शकते. |
|
आता आपल्या शीटमध्ये आपण Days या नावाने नवीन हेडिंग इन्सर्ट करू या. |
|
या खाली आपण आठवड्यातले सातही दिवस Automatically लिहिणार आहोत. |
|
Days या हेडिंगखाली पहिले सात सेल्स सिलेक्ट करा. |
|
आता मेनूबार वरील Edit या ऑप्शनवर क्लिक करून Fill या ऑप्शनवर क्लिक करा. |
|
त्या मेनूमधील 'Series' या ऑप्शनवर क्लिक करा. |
|
“Fill Series Heading" असलेला डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. |
|
आता "Series Type” या हेडिंगखालील "Auto Fill” Optionवर क्लिक करा. |
|
यानंतरStart Value या फिल्डमध्ये आपण आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे Sunday टाईप करणार आहोत. |
|
Increment हे आधीपासूनच सेट केलेले आहे. आता "OK” बटणावर क्लिक करा. |
|
तुम्हाला सेल्समध्ये दिवस Automatically एंटर झालेले दिसतील. |
|
तुम्ही अशाच पध्दतीने केवळ आठवड्याचे दिवस, महिने किंवा वर्ष एंटर करू शकता. कारण ते कॅल्कमध्ये आधीपासून नमूद (म्हणजेचpre-defined) आहेत. |
|
अनुक्रमिक डेटा Auto Fill करण्याची दुसरी पध्दत पुढीलप्रमाणे |
|
सेल्समध्ये "Sunday” असे टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे कॉलममध्ये पुढच्या सेलवर फोकस येईल. |
|
आता पुन्हा Sunday असे टाईप केलेल्या सेलवर जा. त्या सेलच्या उजव्या बाजूला खाली कोप-यात एक छोटा काळा बॉक्स तुम्हाला दिसेल. |
|
त्या बॉक्सवर माऊसने क्लिक करा. |
|
तुम्हाला Display Box मध्ये Saturday असे दिसेपर्यंत खालच्या दिशेने ड्रॅग करा. |
|
आता माऊसचे बटण सोडा. |
|
Cells मध्ये आठवड्याचे दिवस Automaticallyभरले जातील. |
|
अनुक्रमित असलेल्या सर्व डेटासाठी ही पध्दत उपयोगी पडते. आपण केलेले बदल undo करू. |
|
आपण Start, End आणि Increment Value एंटर करून अंकांची one time series सुध्दा बनवू शकतो. |
|
हे कसे ते दाखविण्यासाठी प्रथम आपण सेल्स A 2 पासून A 7 पर्यंत आधी भरलेला डेटा delete करु या. |
|
आकडे डिलिट केल्यानंतर सेल्स A2 पासून A7 पर्यंत सिलेक्ट करा. |
|
आता मेनू बार मधील "Edit” वर क्लिक करा आणि मग "Fill” व “Series” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
|
आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल. आता डिफॉल्ट रूपात सिलेक्ट केलेले नसल्यास "Series Type” ह्या हेडिंग खालील "Linear” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
|
“Start Value” ह्या फिल्डमध्ये आपण पहिला सिरियल नंबर म्हणजेच "1” टाईप करू. |
|
“End Value” ह्या फिल्डमध्ये “6” ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू. |
|
आता आपण इनक्रिमेंट व्हॅल्यू "1” सेट करून शेवटी " “OK” ह्या बटणावर क्लिक करा. |
|
तुम्हाला सेल्समध्ये अनुक्रमित सिरियल नंबर्स आपोआप आलेले दिसतील. |
|
या सर्व क्रियांमधे Fill Tool संबंधित सेल्समधे तात्पुरता संबंध प्रस्थापित करते. Fill क्रिया संपल्यावर ह्या विविध सेल्समधे कुठलेही नाते रहात नाही. |
|
“Fill Tools” व्यतिरिक्त "Selection List” नामक अजून एक टूल आहे जे तुमच्या कामाची गती वाढविते. या टूलचा वापर केवळ टेक्स्टपुरताच मर्यादित आहे. |
|
आपण त्याबद्दल पुढील ट्युटोरियल्समध्ये चर्चा करू. |
|
आता एका शीटमधील Data दुस-या शीटमध्ये कसा वापरायचा किंवा स्थलांतरीत करायचा ते आपण पाहू. |
|
Calc मध्ये उपयोगकर्त्याला अनेक शीटवरील समान सेलमध्ये समान डेटा एंटर करता येतो. |
|
याचा अर्थ असा की प्रत्येक शीटमध्ये एकेक करून समान डेटा एंटर करण्यापेक्षा तुम्ही एकाचवेळी सर्व शीटस् मध्ये समान डेटा एंटर करू शकता. |
|
आपला संपूर्ण डेटा Personal Finance Tracker.ods या फाईल मधील "Sheet 1” वर आहे. |
|
आता आपल्याला "sheet 1” मधील डेटा जसाच्या तसा "Sheet 2” आणि "Sheet 3” मधे दाखवायचा आहे. |
|
त्यासाठी मेनूबारवरील "Edit” ऑप्शनवर क्लिक करून मग "Sheet” या ऑप्शनवर क्लिक करा. |
|
आता "Select” वर क्लिक करा. |
|
एक डायलॉग बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुम्ही Shift Key च्या सहाय्याने "Sheet 1”, “Sheet 2 आणि “Sheet 3” हे ऑप्शन सिलेक्ट करा. |
|
आणि मग "OK” बटणावर क्लिक करा. |
|
हे तुम्हाला "Sheet 1” वर घेऊन जाईल. |
|
आता "Sheet 1” वर काही डेटा एंटर करा. |
|
उदाहरणार्थ सेल रेफरन्स F12 मध्ये आपण "This will be displayed on multiple sheet” असे टाईप करा. |
|
आता "Sheet 2” व “Sheet 3” या टॅबवर एकेक करून क्लिक करा. |
|
तुम्हाला प्रत्येक शीटमधील सेल रेफरन्स F 12 मध्ये समान डेटा दिसेल. |
|
आपण केलेले बदल undo करा. |
|
पुढे आपण सेल्समधील डेटा डिलिट करण्याच्या आणि सेल्समधील डेटामध्ये बदल करण्याच्या विविध पध्दती शिकणार आहोत. |
|
सेलचे कुठलेही फॉरमॅटिंग काढून न टाकता त्यातील डेटा डिलिट करण्यासाठी तो सेल सिलेक्ट करा. |
|
तुम्हाला दिसेल की सेलमधील डेटा "Input Line” या फिल्डमध्ये दिसत आहे. |
|
आता कीबोर्डवरील "Backspace” बटण दाबा. |
|
तुम्हाला डेटा डिलिट झालेला दिसेल. |
|
केलेले बदल undo करा. |
|
सेलमधील डेटा बदलण्यासाठी केवळ तो सेल सिलेक्ट करून सेलमधील जुन्या डेटावर टाईप करा. |
|
नवीन डेटासाठी त्याचे मूळ फॉरमॅटींग तसेच राहिल. केलेले बदल undo करा. |
|
सेलमधील सर्व घटक (डेटा) काढून न टाकता त्यातील एखादा भाग बदलण्यासाठी त्या सेलवर डबल क्लिक करा. |
|
आता कर्सरच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे सेलमध्ये बदल करू शकता. |
|
केलेले बदल undo करून घ्या. |
|
आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
|
आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
|
Fill Tools आणि Selection List चा उपयोग करून कामाची गती वाढविणे. |
|
एका शीटमधील डेटा दुस-या शीटमध्ये स्थलांतरीत करणे किवा वापरणे |
|
डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे |
|
*सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
|
*ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
|
*जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
|
*स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
|
*Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
|
*जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
|
*अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
|
*"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
|
*यासाठी National Misssion on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
|
*यासंबंधी माहिती |
|
*spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
|
*ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज ............ नी दिलेला आहे. |
|
*ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |