LibreOffice-Suite-Calc/C2/Working-with-Sheets/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:26, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: LibreOffice Suite/Calc/Basic Level/Working with Sheets

Author: Manali Ranade

Keywords: Calc, Basic Level, Working with Sheets

Visual Clue
Narration
00:00 लिबर ऑफिस कॅल्कच्या 'Working with Cells and Sheets' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:09 Rows आणि कॉलम्स Insert आणि Delete करणे.
00:13 शीटस् Insert आणि Delete करणे. शीटला नवीन नाव देणे.
00:17 इथे आपण उबंटु लिनक्स व्हर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00:29 स्प्रडेशीटमध्ये Rows आणि कॉलम्स कसे Insert करावे ह्यानी ट्युटोरियलची सुरूवात करू.
00:35 आपण आपली 'Personal Finance Tracker.ods' ही फाईल उघडू या.
00:42 कॉलम्स आणि Rows वेगवेगळे किंवा एकत्रितरित्या (म्हणजेच ग्रुपमध्ये) Insert करता येतात.
00:47 स्प्रेडशीटमध्ये जर एक रो किंवा एक कॉलम वाढवायचा असेल तर प्रथम जिथे तुम्हाला नवीन रो किंवा कॉलम Insert  करायचा आहे तो सेल, कॉलम अथवा रो सिलेक्ट करा.
01:00 उदाहरणार्थ आपल्या 'Personal Finance Tracker.ods' ह्या फाईलमधल्या पहिल्या रो मध्ये कुठेही क्लिक करा.
01:09 आपण जिथे "Cost" लिहिलेले आहे तिथे क्लिक करू या.
01:13 आता मेनूबारमधील "Insert" ऑप्शनवर क्लिक करा. आणि मग "Rows" वर क्लिक करा.
01:19 आपण सिलेक्ट केलेल्या रो च्या वरती नवीन रो Insert झालेली दिसेल.
01:25 त्याचप्रमाणे नवीन कॉलम Insert करण्यासाठी मेनूबारमधील "Insert" या बटणावर क्लिक करा आणि नंतर "Column" वर क्लिक करा.
01:34 सिलेक्ट केलेल्या कॉलमच्या आधी नवीन कॉलम Insert झालेला दिसेल.
01:40 केलेले बदल undo करू.
01:44 जर तुम्ही अक्षराने ओळखला जाणारा कॉलम किंवा अंकाने ओळखली जाणारी रो सिलेक्ट केलेली असेल तर नवीन कॉलम किंवा रो Insert करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून "Insert Column" किंवा "Insert Rows" हे ऑप्शन ड्रॉप डाऊन मेनूतून निवडा.
02:04 किंवा सेलवर कर्सरने क्लिक करून तो सिलेक्ट करा. मग माऊसचे उजवे बटण क्लिक करून "Insert" ऑप्शन निवडा. तुम्हाला अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स दिसेल.
02:18 एक रो किंवा एक कॉलम Insert करण्यासाठी Entire Row किंवा Entire Column हा ऑप्शन निवडा.
02:25 एकावेळी अनेक कॉलम्स किंवा Rows Insert करण्यासाठी सेलवर माऊसचे डावे बटण क्लिक करा आणि तुम्हाला जितके कॉलम्स किंवा Rows हायलाईट करायचे आहेत तिथपर्यंत माऊसने ड्रॅग करा.
02:43 इथे आपण चार सेल्स हायलाईट केले आहेत.
02:47 वर सांगितलेल्या रो किंवा कॉलम Insert करण्याच्या पध्दतींपैकी कोणतीही एक पध्दत वापरा. मला नवीन रो Insert करायची आहे म्हणून मी सिलेक्ट केलेल्या सेलवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून Insert ऑप्शन निवडत आहे. 
03:00 मी त्यानंतरEntire Row ऑप्शन निवडत आहे. आता "OK" बटणावर क्लिक करा. निवडलेल्या Rows च्या वर चार नवीन Rows इन्सर्ट झालेल्या तुम्हाला दिसतील.
03:14 आता पुढे आपण एक कॉलम किंवा कॉलम्सचा ग्रुप कसा डिलिट करायचा ते शिकणार आहोत. 
03:20 एक कॉलम किंवा रो डिलिट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हवा असलेला कॉलम किंवा रो सिलेक्ट करा.
03:28 उदाहरणार्थ जर आपल्याला "Laundry" असे लिहिलेला कॉलम डिलिट करायचा असेल तर प्रथम त्या कॉलम मधील सेलवर क्लिक करून तो सिलेक्ट करा.
03:37 आता सेलवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून "Delete" ऑप्शनवर क्लिक करा.
03:43 "Delete Cell" असलेला डायलॉग बॉक्स दिसेल.
03:47 आता "Shift Cells Up" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "OK" बटणावर क्लिक करा.
03:53 आपल्याला दिसेल की सेल डिलिट होऊन त्याच्या खालील सेल्स वर शिफ्ट झाले आहेत. हे बदल undo करू.
04:01 आता आपण एकाच वेळी अनेक कॉलम किंवा रो कसे डिलिट करायचे ते शिकणार आहोत.
04:08 उदाहरणार्थ जर आपल्याला "Laundry" असे लिहिलेला रो डिलिट करायचा असेल तर प्रथम सिरियल नंबर 6 असलेला सेल सिलेक्ट करा.
04:18 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून संपूर्ण रो वर ड्रॅग करा. किंवा जी रो डिलिट करायची आहे, त्या डावीकडील Row Reference अंकावर क्लिक करा. संपूर्ण रो हायलाईट होईल.
04:33 सेलवरती माऊसचे उजवे बटण दाबून "Delete" ऑप्शनवर क्लिक करा.
04:38 "Delete Cells" असे हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
04:43 आता "Shift Cells Up" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "OK" बटणावर क्लिक करा.
04:48 तुम्हाला दिसेल की संपूर्ण Row डिलिट झाली असून त्याच्या खालील रो वरती शिफ्ट झालेली आहे.
04:55 अशाच प्रकारे आपण Rows च्या ऐवजी कॉलम्स सिलेक्ट करून ते डिलिट करू शकतो. आपण केलेले बदल undo करू.
05:04 शीटमध्ये एकावेळी अनेक Rows किंवा कॉलम डिलिट कसे करायचे हे पाहिल्यानंतर आता आपण कॅल्कमध्ये शीटस् इन्सर्ट आणि डिलिट कशा करायच्या ते शिकणार आहोत.
05:14 कॅल्कमध्ये विविध पध्दतींनी नवीन शीट इन्सर्ट करता येतात. आपण एकेक करून त्या पध्दती बघणार आहोत.
05:23 सर्व पध्दतींतील पहिली पायरी म्हणजे तुम्हाला ज्या शीटच्या पुढे नवीन शीट इन्सर्ट करायची आहे ती सिलेक्ट करा.
05:30 आता मेनूबारवरील "Insert" ऑप्शनवर क्लिक करून "Sheet" वर क्लिक करा.
05:36 "Insert Sheet" असे हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
05:41 चालू असलेल्या शीट पुढे नवीन शीट इन्सर्ट करण्यासाठी "After Current Sheet" हे रेडिओ बटण सिलेक्ट करा.
05:49 "Name" या फिल्डमध्ये आपल्या नवीन शीटचे "Sheet 4" असे नाव दिसत आहे. हे सिस्टीम जनरेटेड नाव आहे. तुम्ही हे नाव बदलू शकता.
06:01 आता "OK" बटणावर क्लिक करा. चालू शीटपुढे नवीन शीट इन्सर्ट झालेली तुम्हाला दिसेल.
06:09 नवीन शीट इन्सर्ट करण्याची आणखी एक पध्दत म्हणजे कॅल्क विंडोच्या डाव्या बाजूच्या खालील कोप-यात चालू शीटच्या टॅबवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून "Insert" ऑप्शनवर क्लिक करा.
06:19 इथे आपण नवीन शीट इन्सर्ट करायची जागा, शीटची संख्या आणि नाव निवडू शकतो. आणि मग "OK" बटणावर क्लिक करा. अशा पध्दतीने नवीन शीट इन्सर्ट होतील.
06:31 चालू शीटच्या पुढे नवीन शीट इन्सर्ट करण्याची दुसरी सोपी पध्दत म्हणजे "Add Sheet" या बटणवर क्लिक करणे. हे बटण शीट टॅबच्या पुढे असून ते + या चिन्हाने दर्शविण्यात आले आहे.
06:43 क्लिक केल्यानंतर नवीन शीट आपोआप शेवटच्या शीटपुढे इन्सर्ट होईल.
06:51 नवीन शीट इन्सर्ट करण्याची शेवटची पध्दत आता पाहू. “Insert Sheet” dialog box उघडण्यासाठी + खूण असलेल्या "Add Sheet" टॅबच्या उजवीकडील रिकाम्या जागेवर क्लिक करा.
07:06 रिकाम्या जागेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट शीट हा डायलॉग बॉक्स दिसेल.
07:13 या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही शीट संबंधीची सर्व तपशीलवार माहिती एंटर करून "OK" बटणावर क्लिक करा.
07:20 शीटस् कशा Insert करायाच्या ते पाहिल्यानंतर आता कॅल्कमध्ये "Sheet Delete" कशा करायच्या ते पाहू.
07:27 शीटस् एकेक किंवा ग्रुपमध्ये डिलिट करता येतात.
07:31 एक शीट डिलिट करण्यासाठी, तुम्हाला जी शीट डिलिट करायची आहे त्या शीटवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून आलेल्या पॉपअप मेनूमधील "Delete Sheet" या ऑप्शनवर क्लिक करा. आणि मग "Yes" या ऑप्शनवर क्लिक करा.
07:45 तुम्हाला शीट डिलिट झालेली दिसेल.
07:48 एखादी विशिष्ट शीट डिलिट करण्याची अजून एक पध्दत म्हणजे मेनूबारमधील "Edit" या ऑप्शनचा उपयोग करणे.
07:55 उदाहरणार्थ जर आपल्याला "Sheet 3" डिलिट करायची असेल तर मेनूबार मधील "Edit" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Sheet" या ऑप्शनवर क्लिक करा.
08:05 आता पॉपअप मेनूमधील "Delete" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Yes" या ऑप्शनवर क्लिक करा.
08:12 तुम्हाला शीट डिलिट झालेली दिसेल. आपण आता डॉक्युमेंट केलेले बदल undo करू.
08:19 एकावेळी अनेक शीट डिलिट करायच्या असतील, उदाहरणार्थ "Sheet 2" व "Sheet 3" तर तुम्ही प्रथम "Sheet 2" या टॅबवर क्लिक करा. कीबोर्डवरील शिफ्टचे बटण दाबून धरून "Sheet 3" या टॅबवर क्लिक करा.
08:36 आता यापैकी कुठल्याही एका टॅबवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून आलेल्या पॉपअप मेनूमधील "Delete Sheet" या ऑप्शनवर क्लिक करा. आणि मग "Yes" या ऑप्शनवर क्लिक करा.
08:47 तुम्हाला दोन्ही शीट डिलिट झालेल्या दिसतील. पुढील भाग समजून घेण्यासाठी केलेले बदल undo करू या.
08:56 दुस-या पध्दतीत मेनूबारमधील "Edit" ऑप्शनचा उपयोग करून विशिष्ट शीट डिलिट करता येते.
09:03 उदाहरणार्थ जर आपल्याला "Sheet 6" आणि "Sheet 7" डिलिट करायच्या असतील तर मेनूबार मधील "Edit" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Sheet" या ऑप्शनवर क्लिक करा.
09:14 आता पॉपअप मेनूमधील "Select" या ऑप्शनवर क्लिक करा.
09:19 उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये "Sheet 6" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवून "Sheet 7" या ऑप्शनवर क्लिक करा
09:30 आता "OK" बटणावर क्लिक करा. अशा पध्दतीने डिलिट करण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या शीट सिलेक्ट झालेल्या आहेत.
09:37 आता पुन्हा मेनूबारमधील "Edit" या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर "Sheet" या ऑप्शनवर क्लिक करा.
09:45 आता पॉपअप मेनूमधील "Delete" या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Yes" या ऑप्शनवर क्लिक करा.
09:51 आपल्याला सिलेक्ट केलेल्या शीट डिलिट झालेल्या दिसतील.
09:56 कॅल्कमध्ये शीट कशा डिलिट करायच्या हे पाहिल्यांनतर आता स्प्रेडशीटमधील शीटला "Rename" कसे करायचे ते पाहू.
10:03 जर तुम्ही स्प्रेडशीटमध्ये पाहिलेत तर विविध शीटसना "Sheet1", "Sheet 2", "Sheet 3" अशा पध्दतीने डिफॉल्ट रूपात नावे दिलेली असतात.
10:13 ज्या फाईलमध्ये कमी शीटस् असतात त्यांना ही पध्दत चालू शकते परंतु ज्यात मोठ्या संख्येने शीटस् असतात तिथे ही त्रासदायक ठरते.
10:21 कॅल्कमध्ये शीटस् ला आपल्याला आवडीप्रमाणे नावे देता येतात.
10:27 उदाहरणार्थ जर आपल्याला "Sheet 4" ला "Dump" या नावाने Rename करायचे असेल तर ते तुम्ही "Sheet 4" च्या टॅबवर डबल क्लिक करून करू शकता.
10:37 तुम्हाला "Rename Sheet" असे हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स तिथे आलेला दिसेल. डिफॉल्ट रूपात टेक्स्ट बॉक्समध्ये "Sheet 4" असे लिहिलेले असेल.
10:47 तेथील डिफॉल्ट नेम डिलिट करा आणि "Dump" असे शीटचे नवीन नाव लिहा.
10:52 आता "OK" बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला "Sheet 4" हा टॅब "Dump" या नावाने रीनेम झालेला दिसेल. आता "Sheet 5" आणि "Dump" डिलिट करूया.
11:02 अशा प्रकारे आपण लिबर ऑफिस कॅल्कवरील ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:08 आपण जे शिकलो ते थोडक्यात: Rows आणि कॉलम्स Insert आणि Delete करणे.
11:14 शीटस् Insert आणि Delete  करणे. शीटला नवीन नाव देणे.
11:19 COMPREHENSIVE ASSIGNMENT: "Spread sheet practice.ods" ही फाईल उघडा
11:25 "Serial Number" असे हेडिंग असलेली रो सिलेक्ट करून ती डिलिट करा. त्या शीटला "Department Sheet" या नावाने रिनेम करा.
11:32 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
11:36 *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:44 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
11:47 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:50 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.

11:59 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.

यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.

12:12 *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.
12:22 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज ............ नी दिलेला आहे.

ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha