QGIS/C4/DEM-Analysis/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | QGIS मधील DEM Analysis वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू, |
00:11 | SRTM डेटा वेबसाइटवरून DEM डेटा डाउनलोड करणे. |
00:16 | DEM ची Hillshade दाखवणे. |
00:19 | येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux ओएस आवृत्ती 16.04 |
00:25 | QGIS आवृत्ती 2.18 आणि कार्यरत इंटरनेट कनेक्शन. |
00:33 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी तुम्ही QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:39 | या मालिकेतील पूर्व-आवश्यक शिकवण्या पाहण्यासाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
00:45 | Digital Elevation Model किंवा DEM ही रास्टर फाइल आहे. |
00:50 | हे प्रत्येक रास्टर सेलसाठी एलिव्हेशन डेटा दाखवते. |
00:55 | DEMs मोकळ्या पृथ्वीच्या भूभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जातात. |
01:00 | भूप्रदेश सहसा वनस्पती आणि मानवनिर्मित फीचरसपासून रहित असतो. |
01:06 | DEM चा उपयोग उंचीवर आधारित क्षेत्राची गणना आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो. |
01:14 | चला DEM डेटा डाउनलोड करूया. |
01:17 | दिलेली लिंक कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये उघडा. |
01:21 | Shuttle radar topography mission (SRTM) data वेबसाइट उघडते. |
01:27 | या वेबसाइटवरून SRTM डेटा विनामूल्य डाउनलोड केला जाऊ शकतो. |
01:32 | Download Manager पेजवर, एलवेशन मॉडल्स टाइल्स मध्ये व्यवस्थित केले जातात. |
01:39 | Tile Size आणि Format साठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. |
01:44 | रेडिओ बटणावर क्लिक करून आपण टाइलचा आकार आणि स्वरूप निवडू शकतो. |
01:50 | जगाच्या नकाशावर पृष्ठ खाली स्क्रोल करा. |
01:54 | जगाच्या नकाशात झूम करण्यासाठी नकाशाच्या डाव्या कोपर्यात + चिन्ह वापरा. |
02:00 | Maharashtra टाइलवर क्लिक करा. |
02:03 | जगाच्या नकाशाच्या वरच्या-डाव्या कोपर्यात असलेल्या Search बटणावर क्लिक करा. |
02:09 | Download विंडो उघडते. |
02:12 | Description हैडिंग पर्यंत खाली स्क्रोल करा.तळाशी असलेल्या Download SRTM लिंक वर क्लिक करा. |
02:20 | एक डायलॉग बॉक्स उघडेल, Save File करा पर्याय निवडा. OK बटणावर क्लिक करा. |
02:29 | माझ्या सिस्टमवर, Downloads फोल्डरवर zip file डाउनलोड होते. |
02:34 | zip file मधील कंटेंट एक्सट्रॅक्ट करा. |
02:38 | राइट -क्लिक करा आणि येथे Extract Here पर्याय निवडा. |
02:43 | एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरवर डबल-क्लिक करा.हा DEM dataset आहे. |
02:50 | येथे आपल्याला वेगवेगळ्या फाईल एक्स्टेंशन असलेल्या अनेक फाईल्स दिसतात. |
02:55 | फोल्डर बंद करा. |
02:57 | QGIS इंटरफेस उघडा. |
03:00 | menu bar वरील Layer menu वर क्लिक करा. |
03:04 | सब-मेनूमधून, Add layer निवडा,Add Raster Layer पर्यायावर क्लिक करा. |
03:11 | Data source डायलॉग बॉक्स उघडते. |
03:14 | SRTM वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या SRTM फोल्डरवर नेव्हिगेट करा. |
03:21 | फोल्डरच्या कंटेंट मधून, .tif एक्सटेंशन असलेली फाइल निवडा.Open बटणावर क्लिक करा. |
03:31 | कॅनव्हासवर तुम्हाला भूप्रदेशाचा DEM दिसेल. |
03:36 | DEM मध्ये भूप्रदेशाविषयी सर्व 3D information असते. |
03:41 | रास्टर इमेज वरील प्रत्येक पिक्सेल त्या स्थानावरील सरासरी उंची दर्शवतो.ही उंची मीटरमध्ये दिली आहे. |
03:52 | डार्क पिक्सेल कमी उंची असलेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. |
03:57 | लाइटर पिक्सेल उच्च उंची असलेल्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. |
04:02 | चला या नकाशाचे DEM विश्लेषण सुरू करूया. |
04:07 | मेनू बारवरील Raster मेनूवर क्लिक करा. |
04:11 | ड्रॉप डाउनमधून Analysis वर क्लिक करा.सब-मेनूमधून DEM (Terrain models) वर क्लिक करा. |
04:19 | DEM डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:22 | इनपुट फाइल फील्डमध्ये डीफॉल्ट निवड म्हणून DEM layer आहे. |
04:28 | Output file च्या पुढील Select बटणावर क्लिक करा. |
04:33 | Save the results to.. डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:37 | डायलॉग बॉक्समध्ये, फाइलला Hillshade.tif असे नाव द्या. |
04:44 | मी ते Desktop वर सेव्ह करेन. |
04:47 | Save बटणावर क्लिक करा. |
04:50 | Mode पर्याय म्हणून Hillshade निवडा. |
04:54 | येथे डीफॉल्टनुसार Hillshade आधीपासूनच निवडलेले आहे. |
04:59 | Load into canvas when finished चेक-बॉक्स चेक करा. |
05:05 | येथे डीफॉल्टनुसार ते आधीच निवडलेले आहे. |
05:09 | डीफॉल्ट सेटिंग्ज तशीच राहू द्या. |
05:12 | Ok बटणावर क्लिक करा. |
05:15 | Processing Completed मेसेज घेऊन एक पॉप-अप बॉक्स उघडतो.OK बटणावर क्लिक करा. |
05:22 | Qgis.bin डायलॉग बॉक्समधील OK बटणावर क्लिक करा. |
05:27 | DEM डायलॉग बॉक्सवरील Close बटणावर क्लिक करा. |
05:32 | Layers panel मध्ये आता नवीन लेयर, Hillshade जोडला आहे. |
05:37 | कॅनव्हासवर तुम्हाला Hillshade मोडमध्ये रास्टर नकाशा दिसेल. |
05:42 | हा नकाशा 3D प्रतिमा तयार करण्यासाठी लाइट आणि शेडो वापरून तयार केला जातो. |
05:48 | मॉडेल अधिक स्पष्ट करण्यासाठी, आपण आच्छादन म्हणून Hillshade वापरू. |
05:54 | आता आपण मूळ DEM लेयरचे symbology बदलू. |
05:59 | Layers पॅनेलमधील srtm लेयरवर राइट -क्लिक करा. |
06:04 | कॉन्टैक्स्ट मेनूमधून properties पर्याय निवडा. |
06:09 | Layer Properties डायलॉग बॉक्स उघडतो. |
06:13 | डाव्या पॅनलमधून Style निवडा. |
06:17 | Band Rendering विभागाअंतर्गत, Render type बदलून Singleband pseudocolor करा . |
06:24 | Load minimum/maximum values करा अंतर्गत, minimum/maximum रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:33 | Interpolation ड्रॉप-डाउनमधून Linear निवडा. |
06:37 | ही येथे डीफॉल्ट निवड आहे.Color ड्रॉप-डाउन मधून Spectral निवडा. |
06:44 | खाली स्क्रोल कर.ड्रॉप डाउनमधून Continuous म्हणून Mode निवडा. |
06:50 | Classify बटणावर क्लिक करा. |
06:53 | 5 नवीन रंग वैल्यूज तयार केली आहेत. |
06:57 | रंग सर्वात कमी ते सर्वोच्च पर्यंत रास्टरच्या उंचीची वैल्यूज दर्शवतात. |
07:04 | तळाशी उजव्या कोपर्यात Apply बटण आणि OK बटणावर क्लिक करा. |
07:10 | लेयर्स पॅनेलमध्ये, Hillshade लेयर डिसेबल करा. |
07:14 | Hillshade लेयर च्या समोरील चेक-बॉक्स अनचेक करा. |
07:18 | आता कॅनव्हासवर तुम्हाला स्पेक्ट्रल कलर नकाशा दिसेल. |
07:24 | लाल छायांकित भूभाग कमीत कमी उंच आहे आणि निळा सर्वात उंच आहे. |
07:30 | Hillshade layer एनेबल करा. |
07:33 | Layers Properties डायलॉग बॉक्स उघडा. |
07:37 | डाव्या पॅनलमधून Transparency निवडा. |
07:41 | स्लायडर ड्रॅग करून Global transparency ५०% वर सेट करा. |
07:47 | Apply बटण आणि OK बटणावर क्लिक करा. |
07:51 | नकाशा झूम करा. |
07:53 | कॅनव्हासवर आता आपल्याला लँडस्केपची वर्धित स्थलाकृति दिसते. |
08:00 | चला थोडक्यात बघू. |
08:03 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो.SRTM डेटा वेबसाइटवरून DEM डेटा डाउनलोड करणे |
08:11 | DEM ची Hillshade दाखवणे |
08:15 | येथे असाइनमेंट आहे. |
08:17 | रास्टर नकाशासाठी Slope मोड वापरून भूप्रदेशाची कल्पना करा. Slope लेयरसाठी symbology बदला |
08:27 | इशारा: Slope म्हणून Mode निवडा आणि आच्छादन म्हणून वापरा. |
08:33 | तुमची पूर्ण केलेली असाइनमेंट येथे दाखवल्याप्रमाणे दिसली पाहिजे. |
08:38 | हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा. |
08:45 | आपण स्पोकन ट्युटोरियल वापरून कार्यशाळा घेतो आणि प्रमाणपत्रे देतो.कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
08:54 | कृपया या फोरमवर तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा |
08:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकारने निधी दिला आहे. |
09:06 | या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. |