QGIS/C3/Table-Joins-and-Spatial-Joins/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:26, 11 February 2022 by Radhika (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 QGIS मधील Table Joins आणि Spatial Joins वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 या ट्युटोरियलमध्ये, आपण कॉमन फील्ड आणि समान spatial data असलेल्या दोन data-sets ना attribute tables मध्ये जॉईन करायला शिकू ,
00:19 येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux OS आवृत्ती. १६.०४
00:26 QGIS आवृत्ती 2.18
00:30 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी शिकणाऱ्याला QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे.
00:36 पूर्वआवश्यक QGIS ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या.
00:42 प्लेअरच्या खाली असलेल्या Code files लिंकमध्ये दिलेले फोल्डर डाउनलोड करा.
00:48 डाउनलोड केलेल्या झिप फाईलमधील कंटेंट एक्सट्रॅक्ट आणि फोल्डरमध्ये जतन करा.
00:54 मी आधीच Code files डाउनलोड , एक्सट्रॅक्ट आणि डेस्कटॉपवरील फोल्डरमध्ये सेव्ह केल्या आहेत.
01:01 फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा.
01:04 एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमध्ये Stations.shp फाइल शोधा.
01:09 Stations.shp फाइल भारतातील हवामान केंद्रे किंवा एअर स्टेशनची ठिकाणे दाखवते.
01:17 या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर फाईल्स देखील येथे आहेत.
01:23 attribute tables जॉईन करणे म्हणजे ,दोन data-sets मधील  attribute data  एकत्र करणे.
01:30 टेबल जॉईन करण्याचे दोन मार्ग आहेत,टेबल जॉईन म्हणजे, एक किंवा अधिक कॉमन कॉलम डेटा असलेले टेबल्स जॉईन करणे.
01:40 Spatial Join म्हणजे समान spatial data असलेल्या tables जॉईन करणे.
01:46 या ट्युटोरियलमध्ये आपण दोन्ही पद्धती दाखवणार आहोत.
01:50 अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या.
01:54 QGIS इंटरफेस उघडा.
01:57 प्रथम, आपण कॉमन फील्ड असलेल्या attribute tables जॉईन करू.
02:02 डावीकडील टूलबारमधून  Add Vector Layer टूलवर क्लिक करा.
02:07 Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो.
02:10 डेटासेट फील्डच्या पुढील ब्राउझ बटणावर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडतो.
02:17 डेस्कटॉपवरील Code files  फोल्डरमधून Stations.shp फाइलवर नेव्हिगेट करा.
02:22 Open  बटणावर क्लिक करा.
02:25  Add vector layer डायलॉग बॉक्समध्ये, Open बटणावर क्लिक करा.
02:30 Stations.shp लेयर्स पॅनेलमध्ये जोडला जाईल.
02:35 कॅनव्हासवर संबंधित नकाशा दिसतो.
02:39 हा नकाशा भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या हवामान केंद्रांशी संबंधित पॉइंट फीचरस दर्शवितो.
02:47 या लेयरसाठी attribute table उघडू या.
02:51 Layers Panel मध्ये, Stations.shp वर राइट -क्लिक करा.
02:56 कॉन्टैक्स्ट मेनूमधून Open Attribute Table पर्याय निवडा.
03:01 attribute table उघडतो.
03:03 लक्षात घ्या की फक्त एका attribute District चा data उपलब्ध आहे.
03:10 attribute table मिनिमाइज करा.
03:13 आता आपण Layers Panel मध्ये स्प्रेडशीट असलेला दुसरा data-set जोडू. हा डेटा सेट  CSV format मध्ये आहे.
03:23 मेन्यू बारवरील Layer मेनूवर क्लिक करा. Add layer वर क्लिक करा.
03:30 सब-मेनूमधून Add Delimited Text Layer पर्यायावर क्लिक करा.
03:35 एक डायलॉग बॉक्स उघडतो.
03:38 File Name फील्डच्या शेजारी असलेल्या Browse बटणावर क्लिक करा.
03:43 एक डायलॉग बॉक्स उघडतो.
03:46 डेस्कटॉपवरील Code files फोल्डरमधून Rainfall.csv फाइलवर नेव्हिगेट करा. Open बटणावर क्लिक करा.
03:54  Delimited Text File डायलॉग बॉक्समध्ये, File Format म्हणून CSV निवडा.
04:01 No geometry म्हणून Geometry definition निवडा. इतर सर्व फील्ड असेच सोडा.
04:09 OK बटणावर क्लिक करा.
04:12 QGIS कॅनव्हासवर,  Layers Panel मध्ये  Rainfall layer  जोडला जाईल.
04:18 Rainfall layer वर राइट -क्लिक करा.
04:21 कॉन्टैक्स्ट मेनूमधून Open Attribute Table वर क्लिक करा.
04:26 attribute table उघडतो. attribute table  मध्ये विविध जिल्ह्यांसाठी January ते December या कालावधीतील पावसाचा डेटा आहे.
04:37 Stations attribute table मैक्सिमाइज करा आणि दोन्ही tables ची तुलना करा.
04:43 कृपया लक्षात ठेवा, District फील्ड  Rainfall आणि Stations layers दोन्ही मध्ये कॉमन आहे.
04:50 आता आपण Rainfall layer पासून Stations layer मध्ये  attribute data  जोडू.
04:56 Stations attribute table मध्ये District नावाचा एकच कॉलम आहे.
05:02 आपण Stations attribute table मध्ये  Rainfall data जोडू.
05:07 attribute tables बंद करा.
05:10  Layers Panel मध्ये Stations layer  निवडा.
05:14 या layer ला  Rainfall layer मधून नवीन data प्राप्त होईल.
05:19 Stations layer वर राइट -क्लिक करा.
05:22 कॉन्टैक्स्ट मेनूमधील Properties पर्यायावर क्लिक करा.
05:26 Layer Properties डायलॉग बॉक्स उघडतो. डाव्या पॅनलमधून Joins वर क्लिक करा.
05:33 नवीन विंडोमध्ये, खाली-डाव्या कोपर्‍यात असलेल्या  plus चिन्हावर क्लिक करा.
05:39 Add vector join डायलॉग बॉक्स उघडेल.
05:43 येथे आपल्याकडे Join layer, Join field  आणि Target field निवडण्यासाठी पर्याय आहेत.
05:51 Join layer  हा Rainfall layer असेल, ज्यामधून Stations attribute table मध्ये  data जोडला जाईल.
05:59 येथे Rainfall layer आधीच निवडलेला आहे.
06:03 Join field हे Rainfall table  मध्ये जोडणारे फील्ड किंवा  attribute आहे.
06:10 Join field मध्ये, ड्रॉप-डाउनमधून District  निवडा.
06:15 Target field  हे Stations table मध्ये जोडले जाणारे फील्ड आहे.
06:20 Target field  मध्ये, District  आधीच निवडलेला आहे.
06:25 हे फील्ड दोन्ही  tables साठी कॉमन आहे.
06:29 Choose which fields are joined यासाठी चेक-बॉक्स चेक करा.
06:34 खालील टेक्स्ट-बॉक्स आता सर्व कॉलम आणि चेक-बॉक्सने भरलेला आहे.
06:41 टेक्स्ट बॉक्स मध्ये January ते  Annual Average या कॉलम्ससाठी बॉक्स चेक करा.
06:48 Add vector join डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा.
06:53 Layer Properties डायलॉग बॉक्समध्ये, लेयर आणि जोडलेल्या कॉलम्सची माहिती शीर्षस्थानी दर्शविली आहे.
07:02 "

Apply बटणावर क्लिक करा, नंतर OK बटणावर क्लिक करा."

07:06 QGIS इंटरफेसवर,आधी दर्शविल्याप्रमाणे Stations layer साठी attribute table उघडा .
07:14 हे table सर्व स्थानकांसाठी Rainfall data  दाखवते हे पहा.
07:20 attribute table बंद करा.
07:23 पुढे आपण, स्थानानुसार दोन data-sets चे attribute table join कसे करायचे ते शिकू.
07:30  Layers Panel मध्ये दुसरा layer जोडूया.
07:34 यासाठी Add Vector Layer टूलवर क्लिक करा.
07:38 Add Vector Layer डायलॉग बॉक्समध्ये, ब्राउझ बटणावर क्लिक करा.
07:43 डेस्कटॉपवरील  Code files फोल्डरमधून Admin.shp वर नेव्हिगेट करा.
07:49 Open बटणावर क्लिक करा.
07:51 Add Vector Layer डायलॉग बॉक्समधील Open बटणावर पुन्हा क्लिक करा.
07:56 Admin layer आता Layers Panel मध्ये जोडला आहे.
08:00 Admin layer नकाशा उघडतो जो भारताच्या प्रशासकीय राज्याच्या सीमा दर्शवतो.
08:07  Layers panel मधील  Admin layer वर क्लिक करा.
08:11 ड्रॅग करा आणि Stations layer च्या खाली आणा.
08:15 आता आपण वेगवेगळ्या राज्यांमधील पॉइंट फीचरस पाहू शकतो.
08:20  Admin layer साठी attribute table उघडा.
08:24 attribute table राज्यांशी संबंधित माहिती दाखवते.
08:29 Admin attribute table मिनिमाइज करा. पुन्हा  Stations attribute table उघडा.
08:36 आता आपण Stations layer आणि Admin layer साठी स्थानानुसार attributes मध्ये जॉईन करू.
08:43 दोन्ही attribute tables बंद करा.
08:47 Vector मेनूवर क्लिक करा.
08:48 मेनू खाली स्क्रोल करा आणि Data Management Tools वर क्लिक करा.
08:53 सब-मेनूमधून  Join attributes by location निवडा.
08:58 Join attributes by location डायलॉग बॉक्स उघडतो.
09:02 Target vector layer साठी ड्रॉप-डाउन वर क्लिक करा.
09:05 येथे आपल्याला attribute table मध्ये जॉईन होण्यासाठी Target vector layer निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.
09:12 आपल्या बाबतीत, आपल्याला  Stations layer वर नवीन  data जोडण्याची आवश्यकता आहे.
09:17 म्हणून Stations layer हा Target Layer आहे.
09:21 त्यामुळे आपण target layer म्हणून ड्रॉप-डाउनमधून Stations [EPSG: 4326]  निवडू.
09:29 Join vector layer ड्रॉप-डाउनवर क्लिक करा.
09:33 येथे आपल्याला तो layer निवडावा लागेल जो आपल्याला  target layer मध्ये जॉईन व्हायचा आहे.
09:40 ड्रॉप-डाउनमधून Admin [EPSG: 4326] निवडा.
09:45 येथे आपल्याकडे attributes मध्ये  joining होण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
09:50 आपल्याला विविध राज्यांमध्ये असलेली हवामान केंद्रे शोधण्यात रस आहे.
09:56 त्यामुळे Geometric predicate अंतर्गत, आपण within चेक-बॉक्स निवडू. खाली स्क्रोल कर.
10:04 Open output file after running algorithm चेक-बॉक्स तपासा.
10:10 उर्वरित सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा. Run बटणावर क्लिक करा.
10:17 तळाशी स्टेटस बार प्रोसेसिंग अल्गोरिदमची प्रगती दर्शवते. प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
10:25 कॅनव्हासवर, Layers Panel मध्ये एक नवीन layer, Joined layer जोडला जातो.
10:32 Joined layer वर राइट -क्लिक करा आणि attribute table उघडा.
10:37 या table मध्ये Stations layer वरील प्रत्येक पॉइंटसाठी Admin layer वरील सर्व attributes समाविष्ट आहेत.
10:45 प्रत्येक पॉइंट फीचरमध्ये राज्याची माहिती असते.
10:49 attribute table बंद करा.
10:52 प्रोजेक्ट सेव्ह करण्यासाठी, मेन्यू बारमधून  Project  मेनूवर क्लिक करा.  Save As पर्याय निवडा.
11:01 योग्य नाव द्या आणि सोयीचे ठिकाण निवडा.
11:06  Save बटणावर क्लिक करा.
11:10 चला थोडक्यात बघू.
11:12 या ट्युटोरियलमध्ये, आपण कॉमन फील्ड आणि समान spatial data असलेल्या दोन data-sets ना attribute tables मध्ये जॉईन करायला शिकलो,
11:22 असाइनमेंट म्हणून, stations data जून ते डिसेंबरपर्यंतच्या rainfall data  शी जॉईन करा.
11:30  Code files फोल्डरमध्ये दिलेल्या Rainfall.csv आणि Stations.shp फाइल वापरा.
11:37 पूर्ण केलेले असाइनमेंट असे दिसले पाहिजे.
11:41 हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा.
11:48 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:58 कृपया या फोरमवर तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा.
12:02 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकार ऑफ इंडिया द्वारे निधी दिला जातो.
12:10 या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.


Contributors and Content Editors

Radhika