QGIS/C2/Installation-of-QGIS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | QGIS च्या इंस्टॉलेशनवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण क्यूजीआयएस हे उबंटू लिनक्स , |
00:15 | विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टम वरती इन्स्टॉल करायला शिकू, |
00:20 | इंस्टॉलेशनसाठी, मी वापरत आहे, उबंटू लिनक्स व्हर्जन 16.04 |
00:28 | विंडोज १० |
00:30 | Mac OS X 10.10 आणि |
00:33 | कार्यरत इंटरनेट कनेक्शन. |
00:36 | Ctrl, Alt आणि T की एकाच वेळी दाबून टर्मिनल उघडा. |
00:43 | प्रॉम्प्टवर, sudo space su टाइप करा आणि एंटर दाबा. |
00:52 | एक संदेश दिसेल जो तुम्हाला तुमचा सिस्टम पासवर्ड एंटर करण्यास सूचित करतो. |
00:58 | पासवर्ड टाइप करा आणि एंटर दाबा. |
01:02 | आता आपल्याला इंस्टॉलेशनसाठी काही कमांडस कार्यान्वित करायच्या आहेत. |
01:08 | येथे माझ्याकडे आवश्यक कमांडसची सूची असलेली फाइल आहे. |
01:13 | ही फाइल कोड फाइलस लिंकमध्ये QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज नावाने प्रदान केली आहे. |
01:21 | आता sources.list फाइलमध्ये QGIS रेपॉजिटरीज जोडू. |
01:28 | खालील कमांड कॉपी करा. कॉपी करण्यासाठी Ctrl C वापरा. |
01:34 | टर्मिनल प्रॉम्प्टवर, राइट -क्लिक करा आणि पेस्ट निवडा.
आणि एंटर दाबा. |
01:43 | Gedit editor sources.list फाइलसह उघडेल. |
01:48 | QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज फाइलवर परत जा. |
01:53 | आता Sources.list फाइलच्या शेवटी येथे हायलाइट केलेल्या दोन ओळी add करा . |
02:00 | येथे दर्शविलेल्या दोन ओळी कॉपी करा. |
02:04 | Sources.list फाइलच्या शेवटी पेस्ट करा. |
02:09 | फाइल सेव्ह करण्यासाठी Ctrl S दाबा. |
02:13 | आता तुमच्या विंडोच्या वरच्या डाव्या कोपर्यात क्रॉसवर क्लिक करून ही फाईल बंद करा. |
02:20 | टर्मिनल प्रॉम्प्टवर, sudo space apt-get space update टाइप करा आणि एंटर दाबा. |
02:32 | या प्रक्रियेला काही वेळ लागू शकतो. अपडेट आता पूर्ण झाले आहे. |
02:39 | या टप्प्यावर आपल्याला आणखी काही कमांडस कार्यान्वित करायच्या आहेत. |
02:44 | चला QGIS इंस्टॉलेशन रेपॉजिटरीज फाइलवर परत जाऊ या. |
02:49 | खालील तीन कमांडस येथे दाखवल्या आहेत. |
02:53 | आपण त्यांना एकामागून एक कार्यान्वित करणे आवश्यक आहे. |
02:57 | एका वेळी एक कमांड कॉपी करा आणि टर्मिनलमध्ये पेस्ट करा. |
03:03 | प्रॉम्प्टवर प्रत्येक कमांड पेस्ट केल्यानंतर एंटर दाबा. |
03:27 | तिसर्या कमांडची अंमलबजावणी केल्यानंतर, तुम्हाला ओके मेसेज दिसेल. |
03:32 | आता क्यूजीआयएस इन्स्टॉलेशन रेपॉजिटरीज फाइलमधून शेवटची कमांड कार्यान्वित करा.
खालील कमांड कॉपी करा. |
03:41 | ते टर्मिनल प्रॉम्प्टवर पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
03:47 | सुरू ठेवण्यासाठी Y दाबा आणि एंटर दाबा. |
03:53 | या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. |
03:57 | इंस्टॉलेशन आता पूर्ण झाली आहे. |
04:01 | तुमच्या कीबोर्डवरील विंडोज की दाबा आणि सर्च बारमध्ये QGIS टाइप करा. |
04:09 | तुम्ही QGIS डेस्कटॉप अॅप्लिकेशन पाहू शकाल.
QGIS उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
04:18 | हा QGIS इंटरफेस आहे. |
04:22 | आता विंडोजवरील QGIS इंस्टॉलेशनकडे वळू. |
04:27 | QGIS इंस्टॉलेशन रिपॉझिटरीज फाइलवर परत जा. खालील लिंक कॉपी करा. |
04:35 | तुमच्या सिस्टममध्ये कोणताही वेब ब्राउझर उघडा. मी Chrome उघडत आहे. |
04:42 | कॉपी केलेली लिंक वेब ब्राउझरमध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
04:49 | या त्रुटी संदेशाकडे दुर्लक्ष करा आणि ओके वर क्लिक करा. |
04:55 | Long term release repository most stable विभागापर्यंत खाली स्क्रोल करा. |
05:01 | तुमच्या सिस्टमनुसार 64 बिट किंवा 32 बिट यांच्यातील योग्य सेटअप निवडा. |
05:09 | संबंधित सेटअप फाइलच्या डाव्या बाजूला दिलेल्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा. |
05:16 | तुमच्या इंटरनेट गतीनुसार , इंस्टॉलर फाइल डाउनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल. |
05:23 | मी ही सेटअप फाइल आधीच डाउनलोड केली आहे आणि ती डाउनलोडस फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे. |
05:30 | आता डाउनलोडस फोल्डरवर नेव्हिगेट करू. |
05:34 | टास्क बारवर उपलब्ध असलेल्या सर्च बॉक्समध्ये, डाउनलोडस टाइप करा. |
05:40 | डाउनलोडस पर्यायावर क्लिक करा. |
05:43 | डाउनलोडस फोल्डर उघडेल. |
05:46 | QGIS इंस्टॉलर फाइल शोधा. |
05:50 | इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. |
05:55 | तुमच्या सिस्टमवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.
पुढे जाण्यासाठी येस वर क्लिक करा. |
06:02 | इंस्टॉलेशन विझार्ड उघडतो. |
06:05 | सूचना वाचा आणि Next बटणावर क्लिक करा. |
06:10 | सॉफ्टवेअर लायसन्स अग्ग्रेमेन्ट पेज मध्ये, आय अग्री बटणावर क्लिक करा. |
06:16 | सॉफ्टवेअर कुठे इंस्टॉल करायचे ते निवडा, खात्री नसल्यास डीफॉल्ट स्थान तसेच ठेवा. |
06:24 | तुम्हाला इंस्टॉलेशनसाठी कोणतेही अतिरिक्त घटक निवडण्याची गरज नाही, फक्त QGIS सह पुढे जा. |
06:32 | इंस्टॉल बटणावर क्लिक करा. |
06:35 | इंस्टॉलेशनला थोडा वेळ लागेल. |
06:40 | एकदा पूर्ण झाल्यावर, इंस्टॉलेशन पूर्ण करण्यासाठी फिनिश बटणावर क्लिक करा.
QGIS आता तुमच्या सिस्टमवर इंस्टॉल केले जाईल. |
06:51 | टास्कबारवर उपलब्ध असलेल्या सर्च बॉक्समध्ये, QGIS टाइप करा. |
06:57 | सूचीमध्ये, तुम्ही QGIS डेस्कटॉप अॅप्लिकेशन पाहू शकाल. |
07:04 | QGIS उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
07:09 | हा QGIS इंटरफेस आहे. |
07:13 | आता Mac OS वरील QGIS इंस्टॉलेशनकडे वळू. |
07:19 | आपण आधी उघडलेल्या QGIS डाउनलोड वेब पेजवर परत जा. |
07:25 | Mac OS X टॅबसाठी डाउनलोड उघडा. |
07:29 | Long term release most stable विभागापर्यंत खाली स्क्रोल करा. |
07:34 | संबंधित सेटअप फाइलच्या डाव्या बाजूला दिलेल्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा. |
07:40 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
07:43 | डीफॉल्ट फाइलचे नाव बदलू नये. |
07:47 | ही फाइल सेव्ह करण्यासाठी एक स्थान म्हणून डाउनलोडस फोल्डर निवडा. |
07:52 | सेव्ह बटणावर क्लिक करा. |
07:55 | तुमच्या इंटरनेट गतीनुसार, इंस्टॉलर फाइल डाउनलोड होण्यास थोडा वेळ लागेल. |
08:02 | मी ही सेटअप फाइल आधीच डाउनलोडस केली आहे आणि ती डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह केली आहे. |
08:08 | आता डाउनलोडस फोल्डरवर नेव्हिगेट करू. |
08:12 | स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या search चिन्हावर क्लिक करा. |
08:18 | डाउनलोडस टाइप करा, डाउनलोडस फोल्डर पर्यायावर डबल-क्लिक करा. |
08:25 | QGIS इंस्टॉलर फाइल शोधा, इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
08:33 | अनेक फाइल्ससह सेटअप फोल्डर उघडते. |
08:37 | चार पॅकेजेस आहेत, प्रत्येक क्रमांकाने सुरू होतो. |
08:42 | हे तुम्हाला पॅकेजेस इंस्टॉल करण्याचा क्रम सांगते. |
08:46 | नॉन-ऍपल डेव्हलपर मान्यताप्राप्त सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन करण्याची परवानगी देण्यासाठी,प्रथम Mac Security Preferences बदलून allow apps downloaded from: Anywhere करा. |
08:58 | स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या search icon वर क्लिक करा. System Preferences टाइप करा आणि एंटर दाबा. |
09:09 | system Preferenceसह विंडो उघडेल. |
09:13 | Security & Privacy वर क्लिक करा. |
09:17 | Security & Privacy विंडोमधून, General टॅबमध्ये. बदलांना अनुमती देण्यासाठी तळाशी-डाव्या कोपर्यातील लॉक चिन्हावर क्लिक करा. |
09:28 | डायलॉग बॉक्समध्ये तुमचा सिस्टम पासवर्ड एंटर करा. |
09:32 | त्यानंतर अनलॉक बटणावर क्लिक करा. |
09:35 | Allow apps downloaded from विभागामध्ये, Anywhere रेडिओ बटणावर क्लिक करा. |
09:42 | डायलॉग बॉक्स उघडेल, Allow from anywhere बटणावर क्लिक करा. |
09:49 | सेटिंग्ज लॉक करण्यासाठी तळाशी-डाव्या कोपर्यात उघडलेल्या लॉक चिन्हावर क्लिक करा. |
09:55 | विंडो बंद करा. |
09:57 | आता सेटअप फोल्डरवर जा आणि पॅकेज क्रमांक 1 वर डबल क्लिक करा. |
10:03 | या इंस्टॉलेशन विझार्डमधील सूचना फॉलो करा आणि पॅकेज इंस्टॉल करा. |
10:09 | Continue वर क्लिक करा. |
10:12 | दिलेल्या महत्त्वाच्या सूचना वाचा आणि Continue वर क्लिक करा. |
10:17 | license agreement वाचा आणि Continue वर क्लिक करा. |
10:22 | उघडलेल्या डायलॉग बॉक्समधील Agree बटणावर क्लिक करून software license agreement मान्य करा. |
10:30 | इंस्टॉल वर क्लिक करा. |
10:33 | उघडलेल्या डायलॉग बॉक्समध्ये सिस्टम पासवर्ड टाइप करा. |
10:38 | आणि इंस्टॉल सॉफ्टवेअर बटणावर क्लिक करा. |
10:45 | इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर,Close बटणावर क्लिक करा. |
10:50 | पॅकेज क्रमांक 2,3 आणि 4 साठी ही प्रक्रिया पुन्हा करा. |
11:19 | एकदा सर्व चार पॅकेजेसचे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तुमच्या सिस्टमवर QGIS इंस्टॉल केले जाईल. |
11:27 | search चिन्हावर क्लिक करा. QGIS टाइप करा. |
11:33 | QGIS लाँच करण्यासाठी QGIS ऍप्लिकेशनवर डबल-क्लिक करा. |
11:39 | येथे QGIS इंटरफेस आहे. |
11:43 | इंटरफेस आणि वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती आगामी ट्यूटोरियलमध्ये समाविष्ट केली जाईल. |
11:51 | चला थोडक्यात बघू . या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो: |
11:57 | QGIS व्हर्जन 2.18 चे इंस्टॉलेशन Ubuntu Linux व्हर्जन 16.04, Windows 10 आणि Mac OS X 10.10 वरती |
12:11 | असाइनमेंट म्हणून,
तुमच्या मशीनवर QGIS इंस्टॉल करा. |
12:17 | QGIS इंटरफेस उघडा आणि एक्सप्लोर करा. |
12:21 | मेनू आणि टूलबारमधून जा. |
12:25 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो.
कृपया डाउनलोड करून पहा. |
12:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, कार्यशाळा आयोजित करते आणि आमच्या ऑनलाइन चाचण्या उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देते.
तपशीलांसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
12:48 | या स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
12:55 | तुम्हाला जिथे प्रश्न असेल तो मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीम मधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. |
13:07 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या ट्युटोरियलमधील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
13:13 | कृपया त्यावर असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.
हे गोंधळ कमी करण्यास मदत करेल. |
13:21 | कमी गोंधळासह, आम्ही या चर्चांचा उपदेशात्मक साहित्य म्हणून वापर करू शकतो. |
13:27 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट NMEICT, MHRD, भारत सरकार द्वारे निधी दिला जातो.
या मिशनच्या तपशीलांसाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या. |
13:40 | आयआयटी बॉम्बे मधून मी राधिका आहे. धन्यवाद. |