Synfig/C3/Underwater-animation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:30, 6 November 2020 by Arthi (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Synfig वापरून “Underwater- animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरियलमध्ये आपण 'Synfig' मध्ये इमेजेस एनिमेट करून स्वतःला परिचित करू.
00:12 आपण png आणि svg आयात(इम्पोर्ट) करण्यास शिकू.
00:16 distortion वापरून इमेजेसना एनिमेट करणे

Noise Gradient जोडणे शिकू.

00:22 आणि random animation साठी Random पर्याय वापरणे.
00:26 उपरोक्त वापर करून आपण अंडरवॉटर एनिमेशन तयार करण्यास शिकू.
00:32 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS,

आणि Synfig studio व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.

00:43 आपण Synfig interface मध्ये आहोत.
00:46 मी माझी Synfig फाईल Underwater-animation म्हणून सेव्ह केली आहे.

कृपया तसेच करा.

00:54 आता आपण आपल्या अंडरवॉटर एनिमेशन तयार करण्यास सुरवात करूया.
00:59 अंडरवॉटर एनिमेशनसाठी आपल्याला पार्श्वभूमी, काही बूडबुडे आणि काही पाण्याचे झाडं आवश्यक आहेत.
01:06 आपल्याला मासे, बेडूक, खेकडा, इत्यादिसारख्या काही प्राण्यांची देखील आवश्यकता असेल.
01:13 हे एनीमेशन तयार करण्यासाठी मी पूर्वी तयार केलेल्या इमेजेस(प्रतिमा) वापरणार आहे.
01:19 सराव करण्यासाठी, विद्यार्थी या ट्युटोरियलच्या Code Files लिंकमध्ये दिलेले इमेजेस वापरू शकतात.
01:26 png इमेजेस म्हणून बॅकग्राऊंड, ऑक्टोपस, वॉटर प्लांट, बबल, फिश.
01:32 svg इमेजेस म्हणून फ्रॉग आणि क्रॅब.
01:36 आपण आपल्या अंडरवॉटर एनिमेशनसाठी एक एक करून png इमेजेसना आयात करण्यास सुरू करू.
01:43 त्यासाठी, File वर जा आणि Import वर क्लिक करा.
01:47 Desktop वर क्लिक करा आणि Underwater animation वर डबल क्लिक करा.

आणि background.png निवडा.

01:54 नंतर Import वर क्लिक करा. आपल्याला कॅनव्हसवर इमेज मिळेल.
02:00 तसेच, दर्शविल्याप्रमाणे वॉटर प्लांट, फिश -1, फिश-2, ऑक्टोपस, फ्रॉग, क्रॅब, बबल म्हणून आयात करा.
02:10 तुम्हाला Layers panel मध्ये यासारखी एक सूची दिसली पाहिजेत.
02:14 प्रत्येक ग्राफिकसारखे प्लांट, फिश-1 इत्यादीचे वेगळे ग्रुप तयार करण्यासाठी अनुक्रमे आयात केलेल्या लेअर्सना निवडा.
02:24 नंतर Layer वर राईट क्लिक करा. Group layer निवडा.
02:30 आता दर्शविल्याप्रमाणे या group layers चे नाव बदलूया.
02:37 Canvas वर परत या.

सर्व इमेजेसना स्केल करा आणि येथे दर्शविल्याप्रमाणे अंडरवॉटर दृश्यची व्यवस्था करा.

02:46 कधीकधी svg फाईल आयात करतांना ते synfig मध्ये एरर्स दर्शवू शकतात.

जसे तुम्ही इथे पाहू शकता कि बेडूकचे डोळे इथे दिसत नाहीत म्हणून मी ते पुन्हा काढीन.

03:01 आता आपण Time track panel वर जाऊ. Time cursor आता सुरवातीच्या फ्रेमवर ठेवा.
03:07 Turn on animate editing mode icon वर क्लिक करा.
03:10 Layers panel वर जा. Fish-1 group layer विस्तारीत करण्यास त्रिकोणावर क्लिक करा.
03:16 Fish-1 layer. png वर राईट क्लिक करा.

New layer वर जा नंतर Distortion निवडा आणि Twirl वर क्लिक करा.

03:26 आता आपण माशाच्या शेपटीला एनिमेट करू.

canvas वर परत जा. दर्शविल्याप्रमाणे Twirl इफेक्ट ठेवा.

03:34 Twirl समायोजित करा.
03:36 आता कर्सर 10th फ्रेमवर हलवा.

canvas वर परत जाऊ.

03:44 दर्शविल्याप्रमाणे Twirl हॅन्डल्स जे निळ्या बिंदूमध्ये आहेत ते हलवून Twirl इफेक्ट केले जाऊ शकते.
03:52 आपल्याला Rotation व्हॅल्यू -50.60 अंश दिसेल.
03:56 कर्सर 18th आणि 24th फ्रेम्सवर एक एक करून हलवा आणि त्याच स्टेप्स पुन्हा करा.
04:03 रोटेशनचे क्रम अनुक्रमे 32 अंश आणि -5 अंश म्हणून बदला.
04:10 त्याचप्रमाणे, मी माशाच्या वरच्या आणि खालच्या पंखांना एनिमेट करण्यासाठी twirl इफेक्ट्स दोनदा देईन.
04:24 शेवटपर्यंत पुनरावृत्ती एनिमेशनसाठी, आपल्याला Time Loop देणे गरजेचे आहे.
04:29 त्यासाठी, Fish group लेअरच्या सर्वात वर राईट क्लिक करा.

आता New layer वर जा, नंतर Other आणि Time Loop वर क्लिक करा.

04:40 आता Layers panel वर जा आणि Fish layer निवडा.
04:44 Time track panel वर जा आणि कर्सर जिरोथ फ्रेमवर ठेवा.

दर्शविल्याप्रमाणे मासा हलवा.

04:53 Time track panel वर जा आणि कर्सर 100th फ्रेमवर ठेवा.

दर्शविल्याप्रमाणे मासा हलवा.

05:03 त्याचप्रमाणे, आपण Fish-2 एनिमेट करूया.
05:11 पुढे जाण्यापूर्वी आपली फाईल सेव करू.
05:15 आता क्रॅबच्या नखांना एनिमेट करूया. Layers panel वर जा.
05:20 Crab group लेअर विस्तारीत करण्यास त्रिकोणावर क्लिक करा.
05:24 येथे, मला क्रॅबच्या वेगवेगळ्या भागासाठी वेगळ्या ग्रुपची आवश्यकता आहे.
05:35 नंतर Claw-1 चे प्रथम भाग निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा.
05:40 New layer वर जा आणि नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा.
05:47 दर्शविल्याप्रमाणे रोटेट हॅन्डल समायोजित करा.
05:50 Time track panel वर जा आणि कर्सर 10th फ्रेमवर ठेवा.
05:55 आता Parameters panel वर जा आणि Rotate amount 18 अंशमध्ये बदला.
06:02 पुन्हा Layers panel वर जा.

Claw-1 चा दुसरा भाग निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा.

06:09 New layer वर जा नंतर Transform आणि Rotate वर क्लिक करा.

दर्शविल्याप्रमाणे rotate handle समायोजित करा.

06:17 Time track panel वर जा आणि कर्सर 10th फ्रेमवर ठेवा.
06:22 Parameters panel वर जा आणि rotate Amount -7 अंशमध्ये बदला.
06:28 त्याचप्रमाणे, Claw-2 एनिमेट करू.
06:35 पुढे आपण खेकड्याच्या डोळ्यांना एनिमेट करूया. Layers panel वर जा आणि Eye group layer उघडा.

Ctrl key वापरुन दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना निवडा.

06:51 Time track panel वर जा आणि कर्सर 9th फ्रेमवर ठेवा.

आता Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना हलवा.

07:07 पुन्हा Time track panel वर जा आणि कर्सर 18th फ्रेमवर ठेवा.
07:12 आता Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे दोन्ही डोळ्याच्या काळ्या भागांना हलवा.

शेवटपर्यंत पुनरावृत्ती एनिमेशनसाठी Time Loop लागू करा.

07:26 पुन्हा एकदा पुढे जाण्यापूर्वी आपली फाईल सेव करूया.
07:32 पुढे आपण बेडूकचे तोंड आणि जीभ एनिमेट करूया.

ते करण्यासाठी, प्रथम Layers panel वर जा आणि Frog group layer उघडा.

07:44 तोंड आणि जीभीचे लेअर्स निवडा आणि त्यांना एकत्र ग्रुप करा.
07:50 या ग्रुपला Mouth and tongue असे नाव देऊ.
07:55 Layers panel वर जा आणि बेडूकचे तोंड निवडा.
08:00 नंतर Time track panel वर जा . कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा.

दर्शविल्याप्रमाणे लेअरचे नोडस् हलवा.

08:11 Layers panel वर जा आणि यावेळी, बेडूकची जीभ निवडा.
08:18 आता Time track panel वर जा आणि कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा.
08:25 Parameters panel वर जा आणि व्हर्टाइसेस ग्रुपच्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करून व्हर्टाइसेस ग्रुप उघडा.
08:32 vertex 1 ची संख्या निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा.
08:37 Mark active point as off पर्याय वर क्लिक करा. त्याच keyframe वर Vertex संख्या 2 ते 12 साठी देखील असेच करा.
08:52 Layers panel वर जा आणि Water plant png लेअरवर राईट क्लिक करा.
08:58 New layer वर जा नंतर Distortion आणि Twirl वर क्लिक करा.
09:04 Time track panel वर जा आणि कर्सर 13th फ्रेमवर ठेवा.
09:09 Parameters panel वर जा. Twirl ची Rotation व्हॅल्यू 23 अंशमध्ये बदला.
09:15 आता 25th फ्रेमवर जा. इथे Twirl ची Rotation व्हॅल्यू -9 अंशमध्ये बदला.
09:23 पुन्हा एकदा फाईल सेव्ह करा.
09:27 पुढे आपण ऑक्टोपस एनिमेट करू. Octopus group layer निवडा.
09:32 Canvas वर जा आणि दर्शविल्याप्रमाणे ऑक्टोपसला 0 , 75, 135 आणि 185 किफ्रेम्सवर हलवा.
09:46 Layers panel वर जा आणि Octopus png layer निवडा. त्या लेअरवर राईट क्लिक करा.
09:53 आता New Layer वर जा नंतर Distortion आणि Stretch वर क्लिक करा.
09:59 Time track panel वर जा आणि कर्सर 138 फ्रेमवर ठेवा.

canvas वर परत या.

10:06 येथे दर्शविल्याप्रमाणे ऑक्टोपस इमेजवर stretch इफेक्ट मिळविण्यासाठी नारंगी बिंदू हलवा.
10:12 त्याचप्रमाणे कर्सर 145, 150, 160, 168, 172 वर ठेवा आणि दर्शविल्याप्रमाणे stretch चा नारंगी बिंदू हलवा.
10:30 पुढे, Bubble layer निवडा. त्यावर राईट क्लिक करा आणि New Layer वर जा आणि नंतर Transform वर जा. Translate वर क्लिक करा.
10:41 Parameters panel वर जा आणि Origin वर राईट क्लिक करा.

नंतर Convert वर जा आणि Random वर क्लिक करा.

10:49 लेअर्स पॅनलवर जा . Bubble layer निवडा आणि Duplicate layer आयकॉनवर क्लिक करा.
10:55 येथे दर्शविल्याप्रमाणे 3 वेळा पुन्हा करा आणि बुडबुडे(बबल) व्यवस्थित करा.
11:05 लेअर्स पॅनलवर जा. सर्वात वरची लेअर निवडा.

त्यावर राईट क्लिक करा आणि New layer वर जा नंतर Gradient वर जा. Noise Gradient वर क्लिक करा.

11:19 Parameters panel वर जा. Amount 0.5 मध्ये बदला.
11:23 Blend method ला Multiply मध्ये बदला.

आणि दाखवल्याप्रमाणे Size 60 ते 300 पिक्सेल वर बदला.

11:34 Time track panel वर जा आणि कर्सर 200th फ्रेमवर ठेवा.
11:39 Parameters panel वर जा. Random Noise Seeds चे व्हॅल्यू वाढवा.
11:46 शेवटी फाईल सेव्ह करा.
11:49 File वर जा आणि Render वर क्लिक करा. Render setting window वर जा.

Choose वर क्लिक करा.

11:56 एक्सटेंशन avi मध्ये बदला. Target ड्रॉप-डाउन मेनू वर जा आणि ffmpeg निवडा.
12:05 End time वर क्लिक करा आणि ते 200 मध्ये बदला.

आणि Render वर क्लिक करा.

12:16 एनिमेशन पाहण्यासाठी, Desktop वर जा. Underwater-animation. avi निवडा.

त्यावर डबल क्लिक करा.

12:26 यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:30 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Underwater एनिमेशन बद्दल शिकलो.
12:38 आपण png आणि svg आयात करण्यास देखील शिकलो.
12:42 Distortions पर्यायासह एनिमेट करा जसे कि twirl, stretch.

Noise Gradient जोडा.

12:49 random animation साठी Random पर्याय वापरा.
12:53 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. Code files लिंकमध्ये दिलेले साधे डिझाइन आकार शोधा

ही फाईल आयात करा.

Twirl इफेक्ट वापरून एनिमेट करा.

13:05 तुमची पूर्ण झालेली असाइन्मेंट अशी दिसली पाहिजे.
13:09 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते पहा.
13:14 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

13:21 कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
13:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:30 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Arthi, Ranjana