LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Viewing-a-presentation-in-Impress/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing a Presentation वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत: |
00:10 | View options आणि त्यांचा वापर |
00:14 | Master slide |
00:16 | slide साठी Layouts . |
00:19 | या पाठासाठी मी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:33 | आपण आधी सेव्ह केलेले presentation Sample-Impress.odp उघडू. |
00:41 | ही फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे. |
00:48 | ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
00:52 | या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा. |
00:57 | LibreOffice Impress मधील अनेक View options चांगली presentation तयार करण्यास मदत करतात. |
01:04 | हा Normal view आहे. |
01:07 | presentation इतर व्ह्यूमधे असल्यास Normal tab वर क्लिक करून Normal view मधे परत या. |
01:15 | slides चे डिझाइन कसे बदलायचे ते पाहू. |
01:20 | Slides Pane मधे Overview टायटलच्या slide वर क्लिक करा. |
01:25 | उजव्या बाजूस असलेल्या Sidebar वर जा. |
01:29 | Master Slides नाव असलेल्या विभागावर क्लिक करा. |
01:34 | Master Slides खाली 3 विभाग आहेत. |
01:38 | Used in This presentation.
Recently Used आणि Available for Use. |
01:46 | या प्रेझेंटेशनमधे वापरलेले slide डिझाईन Used in This presentation मधे दिसत आहे.
आता हे बदलू. |
01:57 | Available for Use विभागातून तुमच्या आवडीचे कोणतेही slide डिझाईन निवडा.
Classy Red slide डिझाईन निवडू. |
02:08 | Workspace मधील slide च्या डिझाईनमधे झालेला बदल लक्षात घ्या.
पहा, slide डिझाईन बदलणे किती सोपे आहे. |
02:18 | उजव्या कोपर्यात वरती ‘X’ आयकॉनवर क्लिक करून Master Slides विभाग बंद करा. |
02:25 | आता Outline view पाहू. |
02:29 | Workspace मधे Outline tab वर क्लिक करा. |
02:33 | दुसऱ्या पध्दतीने, menu bar मधील View menu वर क्लिक करून Outline view पाहू शकतो. |
02:41 | नंतर Outline पर्यायावर क्लिक करा. |
02:45 | Table of Contents प्रमाणे Outline view मधे सर्व slides एकाखाली एक व्यवस्थित मांडल्या जातात. |
02:53 | Workspace मधील प्रत्येक slide, डावीकडे slide number सह, thumbnail म्हणून दाखवली जाते.
आणि slide Heading हे thumbnail च्या शेजारी दिसते. |
03:06 | Overview slide heading हायलाईट झाले असल्याचे लक्षात घ्या. |
03:12 | याद्वारे Outline tab निवडताना आपण Overview slide वर होतो हे सूचित होते. |
03:18 | प्रत्येक वाक्याच्या सुरूवातीस असलेले काळे ठिपके bullet points रूपात दिसतील. |
03:25 | या bullet points वर माऊस फिरवल्यास कर्सरचे रूपांतर हातात होईल. |
03:32 | slide मधे फेरमांडणी करण्यासाठी लाईन आयटम वर किंवा खाली कसे हलवायचे ते शिकू. |
03:40 | Overview slide मधे “Explain the long term course to follow” हा लाईन आयटम निवडा. |
03:47 | Formatting bar वर डावीकडे वरती जा. |
03:51 | “Move Up” नावाच्या Up arrow icon वर क्लिक करा. |
03:56 | निवडलेला लाईन आयटम एक लेव्हल वर गेल्याचे दिसेल. |
04:02 | पुन्हा वरती डावीकडील Formatting bar वर जा. |
04:07 | “Move Down” नावाच्या Down arrow icon वर क्लिक करा. |
04:12 | निवडलेला लाईन आयटम एक लेव्हल खाली आल्याचे दिसेल. |
04:18 | निवडलेले लाईन आयटम्स दुसऱ्या slides मधे देखील हलवू शकतो. |
04:23 | Formatting bar, मधे पुन्हा Down arrow icon वर क्लिक करा. |
04:29 | निवडलेला लाईन आयटम आता “Short Term Strategy” नावाच्या slide वर गेल्याचे लक्षात घ्या. |
04:37 | केलेले हे बदल undo करण्यासाठी CTRL + Z कीज दाबा. |
04:44 | आपले presentation त्याच्या मूळ रूपात पुन्हा दिसून लागेल. |
04:49 | slides ची फेरमांडणी करण्यासाठी आता Slide Sorter view वापरू. |
04:56 | Workspace मधे Slide Sorter tab वर क्लिक करा. |
05:01 | दुसऱ्या पध्दतीने menu bar मधे View menu वर क्लिक करून Slide Sorter view बघू शकतो.
नंतर Slide Sorter पर्यायावर क्लिक करा. |
05:13 | आपल्याला हव्या त्या क्रमाने slides लावण्यासाठी हा व्ह्यू उपयोगी आहे. |
05:19 | slide number 3 वर क्लिक करून slide number 2 च्या आधी slide ड्रॅग करा. |
05:26 | Slide Sorter view मधे कुठेही क्लिक करा. |
05:30 | दोन्ही slides ची फेरमांडणी झाल्याचे दिसेल. |
05:35 | हे बदल undo करू. |
05:39 | आता Notes view पाहू. |
05:43 | Workspace मधे Notes tab वर क्लिक करा. |
05:47 | दुसऱ्या पध्दतीने, menu bar मधील View menu वर क्लिक करून Notes view पाहता येतो.
नंतर Notes पर्यायावर क्लिक करा. |
05:58 | Notes view मध्ये आपण नोट्स लिहू शकतो. याचा उपयोग presentation देताना होऊ शकतो. |
06:05 | Workspace मधे slide खालील “Click to add Notes” लिहिलेल्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. |
06:12 | माझ्यामाणे यात काही टेक्स्ट टाईप करा. |
06:17 | टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
06:22 | जेव्हा slides प्रोजेक्टरवर दिसतात तेव्हा आपण आपल्या नोट्स मॉनिटरवर पाहू शकू, |
06:30 | परंतु प्रेक्षकांना त्या प्रोजेक्टर स्क्रीनवर दिसणार नाहीत. |
06:36 | आता Normal tab वर पुन्हा क्लिक करू. |
06:40 | Impress विंडोच्या उजव्या बाजूचा Sidebar आपण दाखवू किंवा लपवू शकतो. |
06:47 | असे करण्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करा. |
06:52 | नंतर Sidebar पर्याय चेक किंवा अनचेक करा. |
06:57 | ह्यानुसार sidebar उजव्या बाजूला दाखवला किंवा लपवला जाईल. |
07:04 | आता slide चा layout कसा बदलायचा ते शिकू. |
07:09 | Sidebar मधील Properties विभागावर क्लिक करून नंतर Layouts प्रॉपर्टीवर जा. |
07:17 | नंतर Title, Content over Content layout वर जा आणि क्लिक करा. |
07:25 | ह्यामुळे slide चा layout बदलेल. |
07:29 | दुसऱ्या पध्दतीने Standard Toolbar च्या ड्रॉप डाऊनमधील Slide Layout आयकॉनवर क्लिक करा. |
07:36 | layouts पैकी कुठल्याही एकावर क्लिक करून आपण slide चा layout बदलू शकतो. |
07:43 | Save आयकॉन वर क्लिक करून आपल्या presentation मध्ये केलेले सर्व बदल सेव्ह करा.
नंतर फाईल बंद करा. |
07:53 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
08:01 | या पाठात आपण शिकलोः
View options आणि त्यांचा वापर |
08:09 | Master slides आणि
slide साठी Layouts |
08:14 | असाईनमेंट म्हणून:
“Practice-Impress.odp” फाईल उघडा. |
08:21 | Master Slides वापरून slide 3 चे slide डिझाईन बदला. |
08:27 | slide क्रमांक 2 आणि 3 यांची अदलाबदल करा. |
08:31 | slide 4 चा layout बदलून तो ‘Title and 2 Content’ असा करा. |
08:37 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
08:45 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
08:55 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
08:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:06 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |