LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Basic-Data-manipulation-in-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:12, 3 September 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
TIME NARRATION
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Calc मधील Basic Data Manipulation वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः
00:11 Calc मधे काही मूलभूत फॉर्म्युलांचा वापर करणे.
00:15 columns सॉर्ट करणे आणि data फिल्टर करणे.
00:20 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:34 formula म्हणजे काय?
00:36 formula म्हणजे उत्तर मिळवण्यासाठी numbers आणि variables वापरून लिहिलेले समीकरण.
00:43 variables ही cell locations आहेत ज्यामधे equation साठीचा आवश्यक डेटा असतो.
00:50 मूलभूत गणिती क्रिया-

प्रथम Calc मधे काही मूलभूत arithmetic गणन क्रिया कशा करायच्या हे जाणून घेऊ.

01:00 म्हणजेच Addition, subtraction, multiplication आणि division.
01:07 Personal-Finance-Tracker.ods ही फाईल उघडा.
01:12 Cost हेडिंग खाली नमूद केलेल्या सर्व खर्चांच्या रकमेची बेरीज करू.
01:19 Miscellaneous च्या लगेच खालच्या cell वर Sum Total असे टाईप करा.
01:25 नंतर cell A8 वर क्लिक करा आणि 7 हा अनुक्रमांक टाईप करा.
01:33 आता cell C8 वर क्लिक करा जिथे costs ची बेरीज दाखवायची आहे.
01:42 is equal to SUM आणि पुढे ज्या columns ची बेरीज करायची आहे त्यांची रेंज braces मधे टाईप करा.

म्हणजेच C3 colon C7.

01:55 आता Enter दाबा.
01:58 Cost खालील सर्व रकमेची बेरीज होऊन ती बेरीज cell C8 मधे दर्शवली गेली असल्याचे दिसेल.
02:07 आता Calc मधील subtraction बद्दल जाणून घेऊ.
02:12 समजा House Rent मधून Electricity Bill वजा करायचे आहे.
02:19 आपण ती cell C10 मधे दाखवणार आहोत.
02:23 cell C10 वर क्लिक करून,

“is equal to C3 minus C4” असे टाईप करा.

02:33 Enter दाबा.

cell C10 मधील व्हॅल्यूचे निरीक्षण करा.

02:39 ही C3 आणि C4 च्या व्हॅल्यूजची वजाबाकी दाखवेल.
02:45 अशाचप्रकारे वेगवेगळ्या cells मधील data आपण
divide आणि multiply  करू शकतो.
02:52 cell C11 वर क्लिक करा आणि “is equal to C5 asterix C6” असे टाईप करून Enter दाबा.
03:04 cell C11 मधे multiplication चे उत्तर दाखवले जाईल.
03:10 cell C12 वर क्लिक करा आणि “is equal to C3 forward slash C6 असे टाईप करून Enter दाबा.
03:22 cell C12 मधे भागाकाराचे उत्तर दाखवले जाईल.
03:27 division, multiplication आणि subtraction करून केलेले बदल आपण undo करू.
03:35 त्यासाठी Ctrl+Z ही बटणे एकत्रितपणे तीनवेळा दाबा.
03:41 spreadsheet मधील आणखी एक मूलभूत क्रिया म्हणजे संख्यांची सरासरी काढणे.

हे कसे करायचे ते बघू.

03:50 cell B9 मधे Average हे heading टाईप करा.
03:56 येथे एकूण cost ची सरासरी काढायची आहे.
04:01 आता cell C9 वर क्लिक करा.
04:05 टाईप करा is equal to Average आणि कंसात C3 colon C7.

Enter दाबा.

04:16 Cost column ची सरासरी cell मधे दाखवली जाईल.
04:23 हे बदल undo करण्यासाठी Ctrl+Z कीज दाबा.
04:29 याचप्रकारे आडव्या row मधील घटकांचा average सुध्दा आपण काढू शकतो.
04:36 या पाठांच्या मालिकेत इतर formulae आणि operators बद्दल नंतर जाणून घेणार आहोत.
04:43 आता Calc spreadsheet मधील data कसा sort करायचा ते जाणून घेऊ.
04:48 सॉर्टिंग द्वारे spreadsheet मधील rows आणि columns अर्थपूर्ण क्रमाने आयोजित केले जातात.
04:55 सॉर्टिंगमुळे data चे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येते आणि तो समजून घेता येतो.
05:02 संपूर्ण sheet मधून एखादा घटक शोधणे किंवा मिळवणे सोपे होते.
05:09 आपण एका पाठोपाठ एक लागू करून तीन निकषांपर्यंत data चे सॉर्टिंग करू शकतो.
05:17 संपूर्ण sheet वर किंवा cells च्या रेंजवर सॉर्टिंगचे फीचर लागू करता येते.
05:23 सामान्यतः Data वास्तविक व्हॅल्यूजवर सॉर्ट केला जातो. उदाहरणार्थ: चढता किंवा उतरता क्रम, वर्णमालेनुसार, डावीकडून उजवीकडे, कालक्रमानुसार जुने ते नवीन, इत्यादी.
05:39 Costs या heading खालील data आपण चढत्या क्रमाने सॉर्ट करणार आहोत.
05:45 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून C1 ते C7 पर्यंतच्या cells सिलेक्ट करा.
05:52 हे cells ची रेंज सिलेक्ट करेल जी आपल्याला सॉर्ट करायची आहे.
05:57 Standard toolbar वर जा.

येथे sorting चे तीन वेगळे आयकॉन्स दिसतील.

06:04 Sort Ascending आयकॉनवर क्लिक करा.
06:07 Sort range चा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:11 Current selection बटणावर क्लिक करा.
06:14 निवडलेल्या cells मधील संख्या आता चढत्या क्रमानुसार लावल्या गेल्या आहेत हे पहा.
06:21 Sort Descending आयकॉनवर क्लिक करा.
06:24 Sort range च्या डायलॉग बॉक्समधे Current selection बटण क्लिक करा.
06:30 आता निवडलेल्या cells मधील संख्या उतरत्या क्रमाने लावलेल्या दिसतील.
06:37 हे बदल Undo करण्यासाठी Ctrl+Z कीज दोन वेळा दाबा.
06:43 सर्व संख्या त्यांच्या मूळ cells मधे परत आल्या आहेत.
06:48 data सॉर्टिंग क्रियेवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी Sort आयकॉनवर क्लिक करा.
06:54 किंवा menu bar वर जाऊन Data वर क्लिक करा.

नंतर Sort या सब मेनूवर क्लिक करा.

07:05 Sort Range डायलॉग बॉक्समधे पुन्हा एकदा Current selection बटण क्लिक करा.
07:11 यावेळी Sort चा दुसरा डायलॉग बॉक्स उघडेल. यात Sort criteria आणि Options असे दोन टॅब्ज आहेत.
07:19 डिफॉल्ट रूपात Sort criteria हा टॅब निवडलेला आहे.

त्याखाली तीन Sort keys दिसतील.

07:27 Sort key 1 ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Cost पर्याय निवडा.
07:32 नंतर त्याच्या शेजारील Ascending पर्यायावर क्लिक करा.
07:37 उतरता क्रम लावण्यासाठी Descending पर्यायावर क्लिक करा.

आपण Ascending पर्याय निवडणार आहोत.

07:46 आता उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा.
07:51 Cost हा column चढत्या क्रमाने सॉर्ट झाला आहे.
07:57 हे बदल undo करण्यासाठी Ctrl+Z कीज दाबा.
08:02 एकावेळी अनेक columns देखील सॉर्ट करता येऊ शकतात.
08:07 त्यासाठी प्रथम अनेक columns सिलेक्ट करा. नंतर sort पर्याय लागू करा.

आपण त्याचे प्रात्यक्षिक पाहू.

08:16 समजा आपल्याला Serial numbers, Items तसेच Cost हे अनुक्रमे लावायचे आहे.
08:23 त्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे प्रथम SN, Items आणि Cost हे तीनही columns सिलेक्ट करा.
08:31 आता menu bar वर जाऊन Data वर क्लिक करा.

सेबमेनूमधे Sort वर क्लिक करा.

08:40 Sort चा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:43 Sort criteria टॅबखाली Sort key 1 च्या ड्रॉपडाऊनमधे Cost पर्याय निवडा.
08:50 Sort key 2 च्या ड्रॉपडाऊन मधून SN पर्याय निवडा.
08:55 Sort key 3 च्या ड्रॉपडाऊन मधून Items पर्याय निवडा.
09:00 पहिल्या दोन sort च्या पर्यायांमधे Descending वर क्लिक करा.
09:05 sort च्या तिसऱ्या पर्यायासाठी Ascending वर क्लिक करा.
09:09 नंतर OK वर क्लिक करा.
09:13 बदलांकडे लक्ष द्या.

आपण निवडलेल्या क्रमानुसार सर्व columns सॉर्ट झालेले दिसतील.

09:22 हे बदल undo करू.
09:26 Calc मधे data filter कसा करायचा हे जाणून घेऊ.
09:31 प्रत्येक एंट्री स्क्रीनवर दाखवली जाण्यासाठी ती ज्या अटी पूर्ण करते त्यांची सूची म्हणजे filter.
09:39 या फीचरचे प्रात्यक्षिक बघूया.
09:43 filter लागू करण्यासाठी कुठल्याही cell वर क्लिक करा. उदाहरणार्थ Items नावाच्या cell वर क्लिक करा.
09:52 Standard toolbar मधील Auto Filter आयकॉनवर क्लिक करा.
09:57 किंवा menu bar वर जाऊन Data वर क्लिक करा.

नंतर सेबमेनूमधून Auto Filter वर क्लिक करा.

10:08 आपल्याला Items हेडिंगवर ड्रॉपडाऊन ऍरो आलेला दिसेल.
10:15 या ड्रॉपडाऊन ऍरोवर क्लिक करा.
10:18 Filter चा पॉपअप बॉक्स उघडेल.
10:21 समजा आपल्याला फक्त Electricity Bill data बघायचा आहे.
10:27 प्रथम All हा पर्याय अनचेक करा.
10:32 नंतर Electricity Bill हा पर्याय चेक करा आणि Ok बटण क्लिक करा.
10:39 sheet मधील फक्त Electricity Bill शी संबंधित data दिसेल.

उर्वरित घटक काढून टाकले जातील.

10:49 सर्व डेटा पुन्हा बघण्यासाठी Items या cell वरील ड्रॉपडाऊन ऍरोवर क्लिक करा.
10:57 All पर्यायावर क्लिक करा.
11:00 सर्व हेडिंग्ज चेक केल्याची खात्री करा आणि Ok क्लिक करा.
11:05 sheet मधे असलेला सर्व data आता आपण बघू शकतो.
11:12 Calc मधील इतर filters बद्दल या मालिकेतील पुढील पाठात जाणून घेणार आहोत.
11:19 आता फाईल सेव्ह करून बंद करा.
11:22 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

11:27 या पाठात आपण शिकलोः

Calc मधे काही मूलभूत Formula वापर, columns सॉर्ट करणे आणि data फिल्टर करणे.

11:38 असाईनमेंट म्हणून:
11:40 spreadsheet-practice.ods” फाईल उघडा.
11:45 Salary column हा Ascending ऑर्डरमधे सॉर्ट करा.
11:49 Name column फिल्टर करून Rahul चा डेटा दाखवा.
11:54 केलेले बदल Undo करा.


11:57 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

12:05 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

12:15 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
12:19 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:25 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali