Health-and-Nutrition/C2/Breast-conditions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | स्तनदा मातेच्या ‘स्तनांची स्थिती’ यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | या ट्युटोरिअल मध्ये आपण 'कडक स्तन' आणि 'स्तनांचा दाह' याबद्दल शिकणार आहोत. |
00:13 | 'कडक स्तन' ह्यासह सुरवात करू. |
00:17 | प्रसूतीनंतर 3 ते 5 दिवसांच्या दरम्यान सामान्यत कडक स्तन जाणवते. |
00:23 | हे एकाच वेळेला दोन्ही स्तनांमध्ये जाणवते. |
00:28 | आईने 'पूर्ण भरलेल्या स्तनासह', 'कडक स्तन' ह्यात गोंधळून जाऊ नये. |
00:33 | अशा प्रकारे, आता आपण 'कडक स्तन' आणि 'पूर्ण भरलेले स्तन' यांच्यातील फरकाची चर्चा करणार आहोत. |
00:40 | 'कडक स्तन' ह्यात - स्तन फुलणे, सुज येणे आणि दुधाने भरलेले पण वेदनादायी होतात: |
00:46 | यामुळे स्तनांचा पृष्ठभाग तकतकीत व नसा विस्तारलेल्या दिसतात. |
00:52 | आईला २४ तासांपेक्षा जास्त काळापर्यंत ताप येऊ शकतो आणि बाळाला स्तनाची पकड घेण्यास कठीण जाते. |
01:01 | तर, पूर्ण भरलेले स्तन सामान्य असतात. |
01:04 | पूर्ण भरलेले स्तन मोठे दिसतात पण ते तकतकीत दिसत नाहीत, |
01:10 | दुधाने भरलेले स्तन वेदनादायक नसतात आणि ह्या दरम्यान ताप येत नाही. |
01:17 | आता आपण स्तनदा मातांमध्ये कडक स्तनचे कारणे ह्यावर चर्च करू. |
01:23 | कडक स्तनचे कारण पुढील स्थितींपैकी असू शकते- |
01:27 | प्रसुतिनंतर आईने बाळाला लगेच स्तनपान केले नसेल. |
01:32 | आई बाळाला वारंवार दूध पाजत नसेल. |
01:36 | स्तनपानादरम्यान आईच्या स्तनावर बाळाची व्यवस्थित पकड नसेल आणि |
01:42 | आईने अचानक स्तनपान करवणे थांबविले असेल. |
01:47 | चला तर आता आपण कडक स्तनांवर कसे उपचार करावे याविषयी चर्चा करू. |
01:51 | प्रथम - आईला स्वच्छ पाण्याने हात धुण्यास सांगा. |
01:56 | मग बाळाला आईच्या जवळ आणा जेणेकरून ती बाळाला पाहू शकते, वास घेऊ शकते आणि स्पर्श करू शकते. |
02:03 | बाळ फारच चिडचिड करत असेल अशावेळेला आई बाळाच्या दुपट्याचा वास घेऊ शकते. |
02:08 | त्यानंतर, आईने एक ग्लास पाणी प्यावे. |
02:12 | मग, 5 ते 10 मिनिटांपर्यंत स्तनावर ओलसर गरम कपडा ठेवा किंवा |
02:18 | आई कोमट पाण्याने अंघोळ करू शकते. |
02:21 | त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल. |
02:24 | त्यानंतर, आरोग्य कार्यकर्त्याने आईला आराम करण्यास सांगितले पाहिजे - अधिक तणावामूळे लेट-डाउन रिफ्लेक्स वर (दूध निघण्याच्या प्रतिक्रियेवर) परिणाम होईल आणि |
02:33 | दूध बाहेर येणार नाही. |
02:36 | आता, आरोग्य कार्यकर्त्याने किंवा कुटुंबियातील सदस्याने आईच्या मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागाला मालिश केली पाहिजे. |
02:43 | त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल. |
02:46 | पाठीची वरची बाजू आणि स्तन यामधील नसा एकच असतात. |
02:52 | नंतर, आईने तिच्या स्तनावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश केली पाहिजे. |
02:57 | मालिश केल्याने तिला आराम मिळेल आणि लेट-डाउन रिफ्लेक्स (दूध निघण्याची प्रतिक्रिया) सुधारेल. |
03:03 | या सर्व गोष्टी ऑक्सिटोसिन तयार करण्यास मदत करतील. |
03:07 | ह्याला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा लेट-डाउन रिफ्लेक्स म्हटले जाते. |
03:12 | ऑक्सीटोसिन एक हार्मोन आहे जो दुधाला बाहेर येण्यास मदत करतो. |
03:17 | त्यानंतर, आईने एरीओला मऊ करण्यास हाताने दूध काढावे. |
03:23 | यामुळे बाळाला स्तनावर योग्य पद्धतीने पकड करण्यास मदत होईल. |
03:27 | स्तनातून हाताने दूध काढतांना - आईने एरिओलाच्या भोवती दबाव दिला पाहिजे. |
03:33 | हाताने दूध काढल्यानंतर - बाळाला स्वतः पकड करणे अवघड जाईल म्हणून आईने बाळाच्या तोंडात एरिओला दिला पाहिजे. |
03:43 | दोन्ही बाजूने स्तनपान करण्याचा प्रयत्न करा. |
03:46 | आईने स्तनपान झाल्यानंतर मधल्या वेळात ५ ते १० मिनिटे स्तनांवर ओला थंड कपडा ठेवावा किंवा |
03:54 | आई स्तनांवर थंड कोबीची पाने ठेवू शकते. |
03:58 | ती या कोबीची पाने रेफ्रिजरेटर किंवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवू शकते. |
04:04 | यामुळे वेदनादायी नरम स्तन व पाणी असलेली स्तनांची सूज कमी होण्यास मदत होते. |
04:09 | मग आईने वारंवार स्तनपान करावे. |
04:13 | आता आपण शिकूया, कडक स्तन होणे कशाप्रकारे थांबवू शकतो. |
04:17 | प्रथम, बाळाच्या भुकेची लक्षणने समजून घेण्याचा प्रयत्न करा - जसे शरीर वळवळ करणे. |
04:25 | बोटांना चोखणे. |
04:28 | रुटिंग रीफ्लेक्स म्हणजे – ज्या वस्तू बाळाच्या तोंडाला व गालाला स्पर्श करतात , बाळ त्याचे डोके त्या दिशेने वळवते. |
04:36 | बोटांना चोखणे |
04:39 | उशिराच्या टप्प्यात, बाळ रडायला सुरवात करतो. |
04:43 | ज्यावेळी बाळामध्ये ही भुकेची लक्षणे दिसून येतील तेव्हा बाळास स्तनपान करावे, बाळ रडण्याची वाट पाहू नये, |
04:50 | बाळाची स्तनावरील पकड योग्य असून ते व्यवस्थित स्तनपान करत आहे याची खात्री करा. |
04:55 | लक्षात ठेवा, स्तनपान करून एक स्तन पूर्ण रिकामे झाल्यावरच दुसऱ्या बाजूला स्तनपान करा. |
05:02 | पुढे, आपण आणखी एक स्तनाची स्थिती शिकू जी आहे स्तनांचा दाह - |
05:08 | ही एक अशी स्थिती आहे जेथे स्तनाचा भाग लाल, सुजलेला आणि कडक होतो. |
05:14 | आईला ताप येतो, तीव्र वेदना होतात व आजारी वाटते. |
05:18 | बऱ्याच माता पहिल्या ६ आठवड्यात ‘स्तनांचा दाह’ या त्रासातून जातात. |
05:22 | पण हे स्तनपणादरम्यान कधीही होऊ शकते. |
05:27 | स्तनांचा दाह आणि कडक स्तन यामध्ये गोंधळ उडू शकतो. |
05:31 | तथापि कडक स्तनांचा परिणाम संपूर्ण स्तनावर आणि दोन्ही स्तनांवर होतो. |
05:37 | तर स्तनाचा दाह ह्याचा परिणाम स्तनाच्या भागावर आणि सहसा फक्त एका स्तनावर होतो. |
05:44 | कडक स्तनांमुळे किंवा नलिका बंद झाल्यामुळे स्तनाचा दाह होऊ शकतो. |
05:51 | जर स्तनाच्या दाह वर उपचार न केल्यास बंद नलिका कशा विकसित होतात यावर आपण चर्चा करूयात. |
05:59 | बंद नलिका ती स्थिती आहे जेथे स्तनामधून दूध येत नाही. |
06:04 | बऱ्याचदा हि नलिका स्तनाचा भाग असते जी घट्ट दुधाने बंद होते. |
06:11 | याचे गाठीत रुपांतर होते. ही गाठ नरम असते आणि बहुतेकदा गाठी वर त्वचेचा लालसरपणा असतो. |
06:20 | बंद नलिका व जड स्तनांमुळे दुध साठते . |
06:24 | दुध जेंव्हा बंदनलिका व जड स्तनांमध्ये राहते यालाच ‘दुध साठणे’ असे म्हणतात. |
06:32 | जर हे साठलेले दुध काढून टाकले नाही, तर स्तनांच्या पेशीला सूज येऊ शकते .याला संसर्ग नसलेला स्तनांचा दाह म्हणतात. |
06:42 | तर कधी कधी स्तनांना जीवाणूंचा संसर्ग होतो यालाच संसर्गजन्य ‘स्तनांचा दाह’ असे म्हणतात. |
06:51 | खालील स्थितींमध्ये, जिवाणू सहजपणे चीरांमध्ये प्रवेश करतील: |
06:56 | जर स्तनावर चिरा असतील, अनुपचारित स्तनाचा दाह आणि स्तनाच्या दाहच्या उपचारात उशीर होईल. |
07:06 | लक्षात घ्या: स्तनावर पु झालेला फोड म्हणजे अनुपचारित स्तनाच्या दाह मध्ये वाढ. |
07:11 | आता स्तनदाहचे कारणे ह्याबद्दल चर्चा करू- |
07:15 | ‘स्तनदाह’ चे पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वारंवार स्तनपान न करणे. |
07:21 | जर स्तनदा माता हि काम करणारी महिला असेल तर वारंवार स्तनपान करणे हे अवघड होते. |
07:27 | वारंवार स्तनपान न करण्याची इतर कारण म्हणजे बाळाला किंवा आईला आलेले आजारपण असू शकते. |
07:33 | दुसरे म्हणजे निप्पल मधून स्तनपान करणे, ह्यात बाळ स्तनातून पूर्णपणे दूध संपवत नाही. |
07:40 | तिसरे म्हणजे, दुधाचा पुरवठा जास्त आहे. |
07:43 | चौथे म्हणजे, आईपासून लवकर दुध तोडणे, जिथे बाळ स्तनपाना व्यतिरिक्त इतर अन्न घेत आहे. |
07:50 | पाचवा म्हणजे घट्ट (फिट) कपडे - जर आई घट्ट (फिट) कपडे वापरत असेल आणि विशेषत: रात्री जर आईने घट्ट (फिट) ब्रा घातली असेल तर यामुळे स्तनावर दबाव पडून दुग्ध नलिका बंद होऊ शकतात. |
08:03 | सहावा बाळंतपणाचा ताण – आईला कोणताही तणाव असल्यास त्याचा परिणाम लेट डाउन रेफ्लेक्स वर होईल. |
08:12 | सातवा निप्पलला ( स्तनाग्रे ) चिरा आहे - हे जीवाणूंना स्तनांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मार्ग प्रदान करते आणि ह्यामुळे ‘स्तनांचा दाह’ होऊ शकते. |
08:22 | चला आता 'स्तनांचा दाह' साठी उपचार बघूया. |
08:26 | प्रथम कारण ओळखण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उपचार सुरू करा. |
08:31 | आईने स्तनपान करण्यापूर्वी स्तनावर कोमट कपड्याचा वापर करावा. |
08:35 | किंवा कोमट पाण्याने अंघोळ करावी. |
08:37 | प्रथम तिने बाधित स्तनातून स्तनपानास सुरुवात करावी. |
08:42 | जर यांमुळे वेदना जास्त वाढल्या किंवा लेट डाऊन रिफ्लेक्स’(दुध निघण्याची प्रतिक्रिया) वर परिणाम झाला तर अबाधित स्तनातून स्तनपान करावे . |
08:50 | लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करणे आवश्यक आहे. |
08:55 | जर निप्पल किंवा एरीओला वर खुली जखम नसेल तर आई बाधित स्तनाने स्तनपान करू शकते. |
09:04 | लक्षात ठेवा, जेव्हा ही आई 'स्तनांचा दाह' असलेल्या स्तनातून बाळाला स्तनपान करत असते तेव्हा- |
09:09 | आईने बाळाला संसर्ग होण्याच्या चिन्हांवर लक्ष ठेवावे कारण बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे. |
09:17 | बाधित बाजूच्या स्तनातील दुधात अनेक हानीकारक जिवाणू असतात. |
09:24 | स्तनावर मालिश केल्याने दुधाचा प्रवाह सुधारू शकतो, |
09:28 | बाधित भागापासून ते निप्पल कडे सौम्यपणे मालिश करावी. |
09:34 | आणि आईने पुरेशी विश्रांती घ्यावी. |
09:37 | लक्षणे गंभीर असतील तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. |
09:40 | स्तनाच्या फोडाचा शस्त्रक्रियेतून निचरा आणि अँटिबायोटिक्स घेण्याची आवश्यकता आहे. |
09:47 | याव्यतिरिक्त आईने तिच्या शरीराला आराम मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि दीर्घ व सामान रीतीने श्वास घ्यावे. |
09:55 | सुखदायक संगीत ऐका आणि let-down reflex ला सुरुवात करण्यासाठी बाळाचा विचार करा. |
10:04 | लक्षात ठेवा, स्तनांचा दाह रोखण्यासाठी बाळाची स्तनावर योग्य पकड असणे आवश्यक आहे. |
10:09 | यामुळे नलिका बंद होणे टळेल आणि बाळाला पुरेसे दुध मिळेल. |
10:14 | या सर्व स्तनांची स्थिती टाळण्यासाठी मुख्य गोष्टी आहेत - बाळाची योग्यरीतीने पकड आणि स्थिती आणि वारंवार स्तनपान करणे. |
10:25 | आपण स्तनदा मातेच्या ‘स्तनांची स्थिती’ या वरील ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:30 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |