Health-and-Nutrition/C2/Breast-conditions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:28, 14 August 2020 by Debosmita (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 स्तनदा मातेच्या ‘स्तनांची स्थिती’ यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 या ट्युटोरिअल मध्ये आपण 'कडक स्तन' आणि 'स्तनांचा दाह' याबद्दल शिकणार आहोत.
00:13 'कडक स्तन' ह्यासह सुरवात करू.
00:17 प्रसूतीनंतर 3 ते 5 दिवसांच्या दरम्यान सामान्यत कडक स्तन जाणवते.
00:23 हे एकाच वेळेला दोन्ही स्तनांमध्ये जाणवते.
00:28 आईने 'पूर्ण भरलेल्या स्तनासह', 'कडक स्तन' ह्यात गोंधळून जाऊ नये.
00:33 अशा प्रकारे, आता आपण 'कडक स्तन' आणि 'पूर्ण भरलेले स्तन' यांच्यातील फरकाची चर्चा करणार आहोत.
00:40 'कडक स्तन' ह्यात - स्तन फुलणे, सुज येणे आणि दुधाने भरलेले पण वेदनादायी होतात:
00:46 यामुळे स्तनांचा पृष्ठभाग तकतकीत व नसा विस्तारलेल्या दिसतात.
00:52 आईला २४ तासांपेक्षा जास्त काळापर्यंत ताप येऊ शकतो आणि बाळाला स्तनाची पकड घेण्यास कठीण जाते.
01:01 तर, पूर्ण भरलेले स्तन सामान्य असतात.
01:04 पूर्ण भरलेले स्तन मोठे दिसतात पण ते तकतकीत दिसत नाहीत,
01:10 दुधाने भरलेले स्तन वेदनादायक नसतात आणि ह्या दरम्यान ताप येत नाही.
01:17 आता आपण स्तनदा मातांमध्ये कडक स्तनचे कारणे ह्यावर चर्च करू.
01:23 कडक स्तनचे कारण पुढील स्थितींपैकी असू शकते-
01:27 प्रसुतिनंतर आईने बाळाला लगेच स्तनपान केले नसेल.
01:32 आई बाळाला वारंवार दूध पाजत नसेल.
01:36 स्तनपानादरम्यान आईच्या स्तनावर बाळाची व्यवस्थित पकड नसेल आणि
01:42 आईने अचानक स्तनपान करवणे थांबविले असेल.
01:47 चला तर आता आपण कडक स्तनांवर कसे उपचार करावे याविषयी चर्चा करू.
01:51 प्रथम - आईला स्वच्छ पाण्याने हात धुण्यास सांगा.
01:56 मग बाळाला आईच्या जवळ आणा जेणेकरून ती बाळाला पाहू शकते, वास घेऊ शकते आणि स्पर्श करू शकते.
02:03 बाळ फारच चिडचिड करत असेल अशावेळेला आई बाळाच्या दुपट्याचा वास घेऊ शकते.
02:08 त्यानंतर, आईने एक ग्लास पाणी प्यावे.
02:12 मग, 5 ते 10 मिनिटांपर्यंत स्तनावर ओलसर गरम कपडा ठेवा किंवा
02:18 आई कोमट पाण्याने अंघोळ करू शकते.
02:21 त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल.
02:24 त्यानंतर, आरोग्य कार्यकर्त्याने आईला आराम करण्यास सांगितले पाहिजे - अधिक तणावामूळे लेट-डाउन रिफ्लेक्स वर (दूध निघण्याच्या प्रतिक्रियेवर) परिणाम होईल आणि
02:33 दूध बाहेर येणार नाही.
02:36 आता, आरोग्य कार्यकर्त्याने किंवा कुटुंबियातील सदस्याने आईच्या मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागाला मालिश केली पाहिजे.
02:43 त्यामुळे स्तनातून दूध बाहेर येण्यास मदत होईल.
02:46 पाठीची वरची बाजू आणि स्तन यामधील नसा एकच असतात.
02:52 नंतर, आईने तिच्या स्तनावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश केली पाहिजे.
02:57 मालिश केल्याने तिला आराम मिळेल आणि लेट-डाउन रिफ्लेक्स (दूध निघण्याची प्रतिक्रिया) सुधारेल.
03:03 या सर्व गोष्टी ऑक्सिटोसिन तयार करण्यास मदत करतील.
03:07 ह्याला ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा लेट-डाउन रिफ्लेक्स म्हटले जाते.
03:12 ऑक्सीटोसिन एक हार्मोन आहे जो दुधाला बाहेर येण्यास मदत करतो.
03:17 त्यानंतर, आईने एरीओला मऊ करण्यास हाताने दूध काढावे.
03:23 यामुळे बाळाला स्तनावर योग्य पद्धतीने पकड करण्यास मदत होईल.
03:27 स्तनातून हाताने दूध काढतांना - आईने एरिओलाच्या भोवती दबाव दिला पाहिजे.
03:33 हाताने दूध काढल्यानंतर - बाळाला स्वतः पकड करणे अवघड जाईल म्हणून आईने बाळाच्या तोंडात एरिओला दिला पाहिजे.
03:43 दोन्ही बाजूने स्तनपान करण्याचा प्रयत्न करा.
03:46 आईने स्तनपान झाल्यानंतर मधल्या वेळात ५ ते १० मिनिटे स्तनांवर ओला थंड कपडा ठेवावा किंवा
03:54 आई स्तनांवर थंड कोबीची पाने ठेवू शकते.
03:58 ती या कोबीची पाने रेफ्रिजरेटर किंवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवू शकते.
04:04 यामुळे वेदनादायी नरम स्तन व पाणी असलेली स्तनांची सूज कमी होण्यास मदत होते.
04:09 मग आईने वारंवार स्तनपान करावे.
04:13 आता आपण शिकूया, कडक स्तन होणे कशाप्रकारे थांबवू शकतो.
04:17 प्रथम, बाळाच्या भुकेची लक्षणने समजून घेण्याचा प्रयत्न करा - जसे शरीर वळवळ करणे.
04:25 बोटांना चोखणे.
04:28 रुटिंग रीफ्लेक्स म्हणजे – ज्या वस्तू बाळाच्या तोंडाला व गालाला स्पर्श करतात , बाळ त्याचे डोके त्या दिशेने वळवते.
04:36 बोटांना चोखणे
04:39 उशिराच्या टप्प्यात, बाळ रडायला सुरवात करतो.
04:43 ज्यावेळी बाळामध्ये ही भुकेची लक्षणे दिसून येतील तेव्हा बाळास स्तनपान करावे, बाळ रडण्याची वाट पाहू नये,
04:50 बाळाची स्तनावरील पकड योग्य असून ते व्यवस्थित स्तनपान करत आहे याची खात्री करा.
04:55 लक्षात ठेवा, स्तनपान करून एक स्तन पूर्ण रिकामे झाल्यावरच दुसऱ्या बाजूला स्तनपान करा.
05:02 पुढे, आपण आणखी एक स्तनाची स्थिती शिकू जी आहे स्तनांचा दाह -
05:08 ही एक अशी स्थिती आहे जेथे स्तनाचा भाग लाल, सुजलेला आणि कडक होतो.
05:14 आईला ताप येतो, तीव्र वेदना होतात व आजारी वाटते.
05:18 बऱ्याच माता पहिल्या ६ आठवड्यात ‘स्तनांचा दाह’ या त्रासातून जातात.
05:22 पण हे स्तनपणादरम्यान कधीही होऊ शकते.
05:27 स्तनांचा दाह आणि कडक स्तन यामध्ये गोंधळ उडू शकतो.
05:31 तथापि कडक स्तनांचा परिणाम संपूर्ण स्तनावर आणि दोन्ही स्तनांवर होतो.
05:37 तर स्तनाचा दाह ह्याचा परिणाम स्तनाच्या भागावर आणि सहसा फक्त एका स्तनावर होतो.
05:44 कडक स्तनांमुळे किंवा नलिका बंद झाल्यामुळे स्तनाचा दाह होऊ शकतो.
05:51 जर स्तनाच्या दाह वर उपचार न केल्यास बंद नलिका कशा विकसित होतात यावर आपण चर्चा करूयात.
05:59 बंद नलिका ती स्थिती आहे जेथे स्तनामधून दूध येत नाही.
06:04 बऱ्याचदा हि नलिका स्तनाचा भाग असते जी घट्ट दुधाने बंद होते.
06:11 याचे गाठीत रुपांतर होते. ही गाठ नरम असते आणि बहुतेकदा गाठी वर त्वचेचा लालसरपणा असतो.
06:20 बंद नलिका व जड स्तनांमुळे दुध साठते .
06:24 दुध जेंव्हा बंदनलिका व जड स्तनांमध्ये राहते यालाच ‘दुध साठणे’ असे म्हणतात.
06:32 जर हे साठलेले दुध काढून टाकले नाही, तर स्तनांच्या पेशीला सूज येऊ शकते .याला संसर्ग नसलेला स्तनांचा दाह म्हणतात.
06:42 तर कधी कधी स्तनांना जीवाणूंचा संसर्ग होतो यालाच संसर्गजन्य ‘स्तनांचा दाह’ असे म्हणतात.
06:51 खालील स्थितींमध्ये, जिवाणू सहजपणे चीरांमध्ये प्रवेश करतील:
06:56 जर स्तनावर चिरा असतील, अनुपचारित स्तनाचा दाह आणि स्तनाच्या दाहच्या उपचारात उशीर होईल.
07:06 लक्षात घ्या: स्तनावर पु झालेला फोड म्हणजे अनुपचारित स्तनाच्या दाह मध्ये वाढ.
07:11 आता स्तनदाहचे कारणे ह्याबद्दल चर्चा करू-
07:15 ‘स्तनदाह’ चे पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वारंवार स्तनपान न करणे.
07:21 जर स्तनदा माता हि काम करणारी महिला असेल तर वारंवार स्तनपान करणे हे अवघड होते.
07:27 वारंवार स्तनपान न करण्याची इतर कारण म्हणजे बाळाला किंवा आईला आलेले आजारपण असू शकते.
07:33 दुसरे म्हणजे निप्पल मधून स्तनपान करणे, ह्यात बाळ स्तनातून पूर्णपणे दूध संपवत नाही.
07:40 तिसरे म्हणजे, दुधाचा पुरवठा जास्त आहे.
07:43 चौथे म्हणजे, आईपासून लवकर दुध तोडणे, जिथे बाळ स्तनपाना व्यतिरिक्त इतर अन्न घेत आहे.
07:50 पाचवा म्हणजे घट्ट (फिट) कपडे - जर आई घट्ट (फिट) कपडे वापरत असेल आणि विशेषत: रात्री जर आईने घट्ट (फिट) ब्रा घातली असेल तर यामुळे स्तनावर दबाव पडून दुग्ध नलिका बंद होऊ शकतात.
08:03 सहावा बाळंतपणाचा ताण – आईला कोणताही तणाव असल्यास त्याचा परिणाम लेट डाउन रेफ्लेक्स वर होईल.
08:12 सातवा निप्पलला ( स्तनाग्रे ) चिरा आहे - हे जीवाणूंना स्तनांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी एक मार्ग प्रदान करते आणि ह्यामुळे ‘स्तनांचा दाह’ होऊ शकते.
08:22 चला आता 'स्तनांचा दाह' साठी उपचार बघूया.
08:26 प्रथम कारण ओळखण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उपचार सुरू करा.
08:31 आईने स्तनपान करण्यापूर्वी स्तनावर कोमट कपड्याचा वापर करावा.
08:35 किंवा कोमट पाण्याने अंघोळ करावी.
08:37 प्रथम तिने बाधित स्तनातून स्तनपानास सुरुवात करावी.
08:42 जर यांमुळे वेदना जास्त वाढल्या किंवा लेट डाऊन रिफ्लेक्स’(दुध निघण्याची प्रतिक्रिया) वर परिणाम झाला तर अबाधित स्तनातून स्तनपान करावे .
08:50 लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करणे आवश्यक आहे.
08:55 जर निप्पल किंवा एरीओला वर खुली जखम नसेल तर आई बाधित स्तनाने स्तनपान करू शकते.
09:04 लक्षात ठेवा, जेव्हा ही आई 'स्तनांचा दाह' असलेल्या स्तनातून बाळाला स्तनपान करत असते तेव्हा-
09:09 आईने बाळाला संसर्ग होण्याच्या चिन्हांवर लक्ष ठेवावे कारण बाळाला संसर्ग होण्याचा धोका आहे.
09:17 बाधित बाजूच्या स्तनातील दुधात अनेक हानीकारक जिवाणू असतात.
09:24 स्तनावर मालिश केल्याने दुधाचा प्रवाह सुधारू शकतो,
09:28 बाधित भागापासून ते निप्पल कडे सौम्यपणे मालिश करावी.
09:34 आणि आईने पुरेशी विश्रांती घ्यावी.
09:37 लक्षणे गंभीर असतील तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
09:40 स्तनाच्या फोडाचा शस्त्रक्रियेतून निचरा आणि अँटिबायोटिक्स घेण्याची आवश्यकता आहे.
09:47 याव्यतिरिक्त आईने तिच्या शरीराला आराम मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि दीर्घ व सामान रीतीने श्वास घ्यावे.
09:55 सुखदायक संगीत ऐका आणि let-down reflex ला सुरुवात करण्यासाठी बाळाचा विचार करा.
10:04 लक्षात ठेवा, स्तनांचा दाह रोखण्यासाठी बाळाची स्तनावर योग्य पकड असणे आवश्यक आहे.
10:09 यामुळे नलिका बंद होणे टळेल आणि बाळाला पुरेसे दुध मिळेल.
10:14 या सर्व स्तनांची स्थिती टाळण्यासाठी मुख्य गोष्टी आहेत - बाळाची योग्यरीतीने पकड आणि स्थिती आणि वारंवार स्तनपान करणे.
10:25 आपण स्तनदा मातेच्या ‘स्तनांची स्थिती’ या वरील ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:30 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana