Health-and-Nutrition/C2/Breast-crawl/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:07, 14 August 2020 by Debosmita (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Breast crawl वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:05 ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय?
00:10 ब्रेस्ट क्रॉलची प्रक्रिया आणि
00:13 ब्रेस्ट क्रॉलचे महत्व.
00:18 प्रथम आपण समजून घेऊ, ब्रेस्ट क्रॉल म्हणजे काय?
00:23 बाळ जन्मताच दूध पिण्याच्या स्वाभाविक सवयीने जन्म घेतो.
00:28 प्रसूतीनंतर लगेच, बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवल्यास बाळ आईचे स्तन शोधू शकते आणि स्तनपान करण्यास सुरवात करू शकते.
00:40 ह्या संपूर्ण प्रक्रियेला Breast Crawl म्हटले जाते.
00:46 हे लक्षात घ्या की पूर्ण-वेळेत जन्मलेले , स्थिर बाळ जे नैसर्गिक किंवा सिजेरियन प्रसुतीमुळे जन्माला आले आहे,
00:58 आणि जे जन्मानंतर लगेचच `रडतात, ब्रेस्ट कॅरोल त्यांच्या द्वारे केले जाऊ शकते.
01:03 कमी वजन असलेल्या बाळांसाठी ब्रेस्ट कॅरोल केले जात नाही, कारण ते श्वासनाच्या समस्यांमुळे त्रासलेले असतात जसे कि श्वास घेण्यात त्रास.
01:15 आता, आपण ब्रेस्ट कॅरोलची प्रक्रिया आणि नंतर त्याचे महत्व शिकूया.
01:22 सर्व प्रथम खात्री करून घ्या कि, डिलिव्हरी रूमचे तापमान 26 अंश सेल्सियसच्या जवळपास असावे.
01:29 आता बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून स्वच्छ करावयाचे आहे.
01:35 बाळाचे हाथ सोडून संपूर्ण शरीर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
01:42 लक्षात ठेवा - बाळाचे हात ओले ठेवावे.
01:46 पुसताना तिच्या त्वचेवरचा संरक्षणात्मक पांढरा थर काढू नका.
01:53 तापमान थंड असल्यास, ते बाळाचे रक्षण करेल.
01:56 बाळाला पुसल्यानंतर ओला कपडा काढून टाका.
02:01 बाळाला पुसुन घेतल्यानंतर, जन्म सेविकाने बाळाच्या नाळची नाडी जाणून घेतली पाहिजे.
02:08 एकदा का धड धड थांबली कि, तिने नाळ कापली पाहिजे.
02:13 नंतर, बाळाला तुम्ही आईच्या उघड्या पोटावर अश्या पद्धतीने ठेवा कि जेणेकरून बाळाचे पोट आईच्या पोटाला स्पर्श करेल.
02:22 बाळाचं डोकं आईच्या न धुतलेल्या स्तनांमध्ये ठेवले पाहिजे.
02:26 बाळाचं तोंड आईच्या स्तनाखाली असावे.
02:30 आता breast crawl करण्यासाठी बाळ अगदी योग्य ठिकाणी आहे.
02:37 नवजात बाळासाठी पुढे सरकणे फार नैसर्गिक आहे, त्यामुळे ती सहजपणे आईच्या स्तनाकडे सरकू शकते.
02:46 पुढे काय करायचे आहे कि - बाळ आणि आई दोघांना उबदार ठेवण्यासाठी स्वच्छ कोरडा कपडा पांघरावा.
02:54 बाळाच्या डोक्यावर टोपी घालावी.
02:57 कृपया लक्ष्यात घ्या - आम्ही नंतरच्या प्रतिमांमध्ये टोपी आणि कपडा दाखवलेला नाही.
03:04 हे आपल्याला breast crawl च्या दरम्यान बाळाला स्पष्टपणे पाहण्यास मदत करेल.
03:10 बाळाला कपड्यात गुंडल्यानंतर - आईला तिच्या हाताने बाळाच्या पाठीस आधार द्याचा आहे.
03:18 आता बाळाच्या क्षमतांबद्दल चर्चा करू जे ब्रेस्ट कॅरोल करण्यात मदत करतात.
03:24 प्रसूतीनंतर बाळ खूप सावध आणि स्वाभाविक असतात.
03:29 तिच्या अस्वच्छ हाथांचा वास तिला लाळ गाळण्यास उत्तेजित करतो.
03:35 तसेच बाळ तिची कमी दृष्टी वापरून, तिच्या आईचा चेहरा आणि एरीओला पाहू शकते.
03:43 एरीओला हा निप्पलभोवतीचा गडद भाग आहे.
03:47 अखेरीस, हात आणि पाय वापरुन बाळ सरकू लागते, हळूहळू तिच्या आईच्या स्तनाकडे रांगत जाते.
03:57 काही बाळ ताबडतोब रांगणे सुरू करतात आणि काही वेळ घेतात.
04:04 स्तनापर्यंत पोहोचल्यावर, सर्वात पहिले बाळ आपल्या हाताने स्तनाला पकडण्याचा प्रयत्न करतो.
04:12 जोपर्यंत बाळ तिचे पहिले स्तनपान घेत नाही तो पर्यंत आई आणि बाळात अडथळा आणू नका.
04:20 जन्म सेविका आणि आईने या प्रक्रियेदरम्यान संयम राखला पाहिजे.
04:27 बाळाला तिच्या पहिल्या स्तनपानासाठी आईच्या स्तनापर्यंत पोहोचण्यास 30 ते 60 मिनिटे लागू शकतात.
04:35 स्तनपानाच्या सुरुवातीस- बाळ तिचे तोंड रुंद उघडेल आणि आईच्या स्तनाशी योग्य पकड करेल.
04:45 स्तनपान पूर्ण केल्यानंतर, बाळाला एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ त्याच स्थितीत राहू द्या.
04:52 असे केल्याने, आई आणि बाळ यांच्यात संबंध वाढण्यास मदत होते.
04:58 आईने कोणतीही औषधे घेतली असल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
05:05 कधीकधी असे होऊ शकते की प्रसूतीनंतर आईला प्रसूती खोली मधून दुस-या खोलीत हलवावे लागेल.
05:13 अशा परिस्थितीत, आईला दुसर्या खोलीत हलविल्यानंतर- बाळाला आईच्या उघड्या पोटावर ठेवून लगेचच दोघांमध्ये त्वचेचा स्पर्श होऊ द्या .
05:29 आता सिजेरियनद्वारे जन्माला आलेल्या बाळांसाठी breast crawl बद्दल चर्चा करू या-
05:35 अश्या स्थितीत: बाळाला आईच्या पोटाऐवजी छातीवर अश्या पद्धतीतीने ठेवा, कि बाळाचे पाय आईच्या डोक्याकडे असले पाहिजे.
05:47 बाळाची छाती आणि पोट आईच्या खांद्यावर आणि तोंड आईच्या स्तनावर असावे.
05:54 ऑपरेशन रूममध्ये शक्य असेल तोपर्यंत बाळाला स्तनपान करू द्या.
05:59 लक्षात ठेवा - प्रसूतीनंतर लगेचच अन्य नवजात शिशु काळजी पेक्षा आईच्या त्वचेचा स्पर्श बाळाच्या त्वचेशी सर्वात महत्वाचा आहे.
06:09 लक्षात ठेवा - breast crawl पूर्ण झाल्यानंतरच, प्रसूती नंतर नवजात शिशु काळजी दिली पाहिजे.
06:17 आता, नवजात शिशुसाठी breast crawl च्या महत्त्वबद्दल चर्चा करूया.
06:23 ब्रेस्ट कॅरोल बाळाला आईचे पहिले दूध मिळण्यास मदत करते ज्याला colostrum म्हटले जाते.
06:29 हे रंगात पिवळसर आणि घट्ट असते.
06:33 लक्षात ठेवा की, प्रसूतीनंतर – प्रत्येक स्तनपानादरम्यान बाळ जेवढे कॉलेस्ट्रॅम घेईल त्याच्या पिण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होईल.
06:43 दर वेळी स्तनपानादरम्यान बाळ प्रत्येक स्तनांमधून पहिल्या दिवशी ५ मिलीलिटर,
06:47 दुसर्या दिवशी 10 मिलीलिटर,
06:50 तिसर्या दिवशी 25 मिलीलीटर,
06:53 चौथ्या दिवशी 40 मिलीलीटर आणि पाचव्या दिवशी 55 मिलीलीटर दूध पिईल.
07:05 हे नवजात बाळासाठी पुरेसे आहे.
07:09 म्हणूनच बाळाला कोलोस्ट्रम ऐवजी अन्य काहीही खायला देऊ नये.
07:15 कोलोस्ट्रम हे बाळासाठी पहिले लसीकरण मानले जाते, आणि ह्यात सौंसर्गाशी लढणारे प्रथिने समाविष्ट असतात ज्यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
07:27 आईच्या प्रसूतीनंतर बाळासाठी ऊर्जेचा हा पहिला स्त्रोत आहे.
07:33 तसेच Colostrum, glucose रक्ताची पातळी कमी होऊ देत नाही.
07:37 हे बाळाची अन्य शरीरक्रियांना व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
07:42 हे मेंदूचा आरोग्यदायी विकास करण्यात मदत करते.
07:46 हे बाळाचे प्रथम मल बाहेर येण्यात मदत करते.
07:50 Breast crawl मुळे आई आणि बाळ या दोघांमधील त्वचेचा स्पर्श बाळाला उबदार ठेवतो.
07:57 बाळ स्वतःच शिकतो की आपल्या आईच्या स्तनाशी योग्य पकड कशी करावी .
08:04 Breast crawl मुळे आईचे स्वस्थ जीवाणू बाळाच्या शरीरात जातात.
08:08 हे जीवाणू बाळाच्या आतड्यांमध्ये जातात आणि संसर्गांशी लढतात.
08:13 अखेरीस यामुळे बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
08:18 Breast crawl हे बाळाला प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देखील देते आणि आई व तिच्या बाळाच्या दरम्यान संबंध जोडते.
08:29 breast crawl आईसाठी देखील फायदेशीर आहे.
08:34 बाळाच्या पायाच्या हालचालीमुळे आईच्या गर्भावर दाब पडते, ह्या दाबामुळे गर्भाशयाच्या आकुंचनात आणि नाळ बाहेर पडण्यास मदत होते.
08:45 स्तनपान सुरू केल्याने आईच्या शरीरात oxytocin वाढते.
08:51 oxytocin च्या वाढल्यामुळे नाळ बाहेर पडण्यास देखील मदत होते.
08:56 म्हणून breast crawl मुळे रक्त कमी जाते आणि आईमध्ये anaemia होण्यापासून थांबवते.
09:03 Anaemia हि एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते.
09:08 यामुळे आईमध्ये थकवा आणि कमजोरी येऊ शकते.
09:13 म्हणूनच,breast crawl आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत फायदेशीर नैसर्गिक प्रक्रिया आहे.
09:21 आपण breast crawl ह्या स्पोकन ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:26 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Ranjana