FrontAccounting-2.4.7/C2/Installation-of-FrontAccounting-on-Windows-OS/Marathi
Time | Narration |
00:01 | FrontAccounting installation on Windows OS वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत XAMPP इन्स्टॉल करणे |
00:12 | FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे |
00:15 | Windows OS मधे डेटाबेस सेटअप करणे आणि
FrontAccounting इन्स्टॉल करणे. |
00:21 | या पाठासाठी मी वापरणार आहे-
Windows OS वर्जन 10 |
00:26 | XAMPP 5.5.19 द्वारे मिळवलेले Apache, MySQL आणि PHP |
00:32 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:36 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर आणि चालू इंटरनेट कनेक्शन. |
00:41 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजरही वापरू शकता. |
00:44 | FrontAccounting ही server वर आधारित Accounting System असल्याने,
आपण web server चा सेटअप करण्यासाठी XAMPP वापरणार आहोत. |
00:52 | वेब ब्राऊजर उघडा.
ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करून Enter दाबा. |
00:59 | हे आपल्याला XAMPP च्या डाऊनलोड पेजवर नेईल. |
01:03 | येथे सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी XAMPP डाऊनलोड उपलब्ध आहेत. |
01:08 | हिरवे बटण क्लिक करून XAMPP चे नवीनतम वर्जन डाऊनलोड करता येते. |
01:13 | परंतु सॉफ्टवेअरच्या आवश्यकतेनुसार XAMPP ची वेगवेगळी वर्जन लागू शकतात. |
01:19 | येथे मला XAMPP वर्जन 5.5.19 हवे आहे. |
01:24 | XAMPP Windows या लिंकवर क्लिक करा. |
01:28 | हे आजपर्यंतच्या XAMPP च्या सर्व वर्जन्सची सूची असलेल्या पेजवर नेईल. |
01:32 | येथे इन्स्टॉल करण्यासाठी मी XAMPP वर्जन 5.5.19 निवडत आहे. |
01:39 | डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. |
01:43 | आता Save file वर क्लिक करा.
आपल्या मशीनवर exe फाईल डाऊनलोड होईल. |
01:51 | ही फाईल ज्या फोल्डरमधे डाऊनलोड झाली आहे तो उघडा. |
01:55 | इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी फाईलवर डबल क्लिक करा. |
01:59 | User Account Control हा डायलॉग बॉक्स उघडेल.
Yes बटणावर क्लिक करा. |
02:06 | तुमच्या मशीनवर antivirus सॉफ्टवेअर असल्यास कदाचित एक पॉप अप विंडो उघडेल.
Yes बटणावर क्लिक करा. |
02:15 | पुढील विंडोमधील वॉर्निंग मेसेज बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा. |
02:21 | आता Setup wizard चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:25 | विचारणा झाल्यावर Next वर क्लिक करा. येथे दाखवल्याप्रमाणे इन्स्टॉलेशनच्या सर्व स्टेप्सचे पालन करा. |
02:31 | Learn more about Bitnami for XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करून पुढे जाण्यासाठी
Next बटणावर क्लिक करा. |
02:40 | इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर Do you want to start the Control Panel now? हा चेकबॉक्स अनचेक करा. |
02:47 | शेवटी Finish बटणावर क्लिक करा. |
02:51 | आता मशीनवर XAMPP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे का ते तपासू. |
02:56 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली Windows search bar वर क्लिक करून त्यात xampp टाईप करा. |
03:02 | सूचीमधे आपल्याला XAMPP Control Panel दिसेल. |
03:06 | XAMPP Control Panel वर राईट क्लिक करून Run as administrator पर्याय निवडा. |
03:12 | XAMPP Control Panel मधे Apache आणि MySQL सर्व्हिसेस कार्यान्वित असल्याची खात्री करा. |
03:18 | नसल्यास संबंधित सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी START बटणावर क्लिक करून services सुरू करा. |
03:24 | तुम्हाला कदाचित यापैकी काही एरर मेसेजेस मिळू शकतात:
“Apache shutdown unexpectedly” |
03:30 | “Port 80 in use for Apache Server'” |
03:34 | “Unable to connect to any of the specified MySQL hosts for MySQL database.” |
03:41 | याचे कारण Apache आणि MySQL साठी देण्यात आलेले डिफॉल्ट पोर्ट दुसऱ्या सॉफ्टवेअरने वापरलेले आहे. |
03:47 | Apache चा डिफॉल्ट पोर्ट नंबर 80 आणि MySQL चा 3306 आहे. |
03:55 | ही पोर्टस बदलण्यासाठी या पाठातील Additional Reading Material चा संदर्भ घ्या. |
04:00 | आणि पुढे जाण्यापूर्वी योग्य पोर्ट नंबर द्या.
उदाहरणार्थ: 8080 |
04:07 | आता फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा. |
04:11 | ऍड्रेसबारमधे localhost टाईप करून एंटर दाबा.
आपल्याला XAMPP चा स्क्रीन दिसला पाहिजे. |
04:19 | भाषा निवडण्यासाठी पर्याय दाखवले तर English पर्याय निवडा.
आपण XAMPP homepage वर आहोत. |
04:27 | आता FrontAccounting डाऊनलोड करू. |
04:30 | वेब ब्राऊजरमधे आणखी एक टॅब उघडा आणि या URL वर जा. |
04:37 | frontaccounting-2.4.7.zip वर क्लिक करा. |
04:42 | लगेच डाऊनलोड होणे सुरू होईल.
Save File वर क्लिक करून OK वर क्लिक करा. |
04:49 | डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, फाईल डाऊनलोड झालेला फोल्डर उघडा. |
04:54 | ही फाईल मी डाऊनलोड केली आहे. |
04:57 | फाईलवर राईट क्लिक करून Extract Here पर्याय निवडा. |
05:01 | एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यावर मी FrontAccounting फोल्डरचे नाव बदलून account असे करत आहे. |
05:07 | फोल्डरचे नाव बदलणे ऐच्छिक आहे.
परंतु हे एकाच मशीनवर असलेल्या FrontAccounting च्या अनेक फोल्डर्सपैकी आपला फोल्डर निवडण्यास मदत करते. |
05:17 | आता आपण account फोल्डर वेब सर्व्हरच्या root directory मधे हलवू. |
05:22 | “c:\xampp\htdocs” हा root directory चा पाथ आहे. |
05:29 | account फोल्डरवर राईट क्लिक करून Copy पर्यायावर क्लिक करा. |
05:33 | डावीकडील भागात “This PC” वर क्लिक करा ज्याला “My Computer” असेही म्हणतात. |
05:39 | नंतर “Local Disk (C:)” म्हणजेच C drive वर डबल क्लिक करा.
xampp फोल्डरमधील htdocs फोल्डरमधे जा. |
05:47 | htdocs मधे रिकाम्या जागेत राईट क्लिक करून Paste पर्याय निवडा. |
05:53 | XAMPP server यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे. |
05:57 | FrontAccounting installer वेब सर्व्हरच्या root डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा. |
06:02 | पुढे जाण्यापूर्वीFrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे. |
06:07 | हे phpmyadmin मधे करू जो MySQL साठीचा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे.
हे XAMPP इन्स्टॉल करताना त्याबरोबरच आले आहे. |
06:17 | वेब ब्राऊजरमधील XAMPP पेजवर परत जाऊ. |
06:21 | XAMPP पेजवर डावीकडील मेनूमधे phpMyadmin वर क्लिक करा. |
06:27 | वरील भागात असलेल्या मेनूमधील Users वर क्लिक करून मग Add User क्लिक करा. |
06:33 | उघडलेल्या नव्या विंडोमधे तुमच्या पसंतीचे User name टाका.
मी माझे User name म्हणून frontacc टाईप करत आहे. |
06:42 | Host च्या ड्रॉपडाऊन सूचीतून Local हा पर्याय निवडा. |
06:46 | password च्या टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. |
06:50 | मी पासवर्ड म्हणून admin123 टाईप करणार आहे. |
06:54 | Re-type च्या टेक्स्ट बॉक्समधे तोच पासवर्ड टाईप करा. |
06:58 | सध्या Generate Password prompt वर क्लिक करू नका. |
07:02 | Database for user account खाली -
Create database with the same name and grant all privileges हा पर्याय दिसेल. |
07:10 | तो पर्याय निवडून खाली स्क्रॉल करा. |
07:14आहे | पेजच्या खालील भागात उजवीकडील Go बटणावर क्लिक करा. |
07:18 | “You have added a new user” हा मेसेज दिसेल. |
07:22 | म्हणजेच frontacc नावाचा नवा डेटाबेस frontacc या युजरसहित तयार झाला आहे. |
07:29 | हे युजरनेम आणि पासवर्ड केवळ डेटाबेसमधे लॉगिन करण्यासाठी आहे. |
07:34 | युजरनेम, पासवर्ड आणि डेटाबेस यांच्या नावांची नोंद ठेवा. |
07:38 | नंतर FrontAccounting चे इन्स्टॉलेशन करताना त्यांची गरज लागेल. |
07:43 | Database चे नाव आणि username सारखे नसले तरी चालेल.
वेगळी नावे हवी असल्यास प्रथम डेटाबेस तयार करा. नंतर त्यासाठी युजर तयार करा. |
07:53 | नावांच्या प्रथेप्रमाणे username मधे स्पेस असता कामा नये. |
07:59 | XAMPP कार्यान्वित झाले असून डेटाबेस तयार आहे. |
08:02 | आपण Front Accounting इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहे. |
08:07 | वेबब्राऊजरमधे नवीन टॅब उघडा.
ऍड्रेसबारमधे localhost/account टाईप करून Enter दाबा. |
08:17 | आपल्याला FrontAccounting च्या वेबपेजवर
Step 1: System Diagnostics असे दिसत आहे. |
08:22 | Select install wizard language साठी English हा पर्याय निवडल्याची खात्री करा. |
08:26 | पेजवर खाली स्क्रॉल करा. तेथील Continue बटणावर क्लिक करा. |
08:31 | Step 2: Database Server Settings हे पुढील वेबपेजचे शीर्षक आहे. |
08:37 | येथे मी Server Host म्हणून localhost ठेवत आहे.
Server Port चा बॉक्स रिकामा ठेवत आहे. |
08:44 | तुम्ही MySQL चा 3306 हा डिफॉल्ट port number बदलला असल्यास तो येथे टाईप करा. |
08:52 | आपण आधी तयार केलेला पुढील तपशील भरू-
database Name मधे frontacc |
09:00 | database user मधे frontacc |
09:03 | आणि database password मधे admin123 |
09:07 | उर्वरित पर्याय भरू नका. खालील Continue बटणावर क्लिक करा. |
09:12 | पुढे तुम्ही तुमच्या company चा तपशील भरणार आहात.
कसे ते मी दाखवणार आहे. |
09:19 | Company Name मधे ST Company Pvt Ltd टाईप करा. |
09:24 | मी Admin Login म्हणून admin आणि
Admin Password म्हणून spoken टाईप करत आहे. |
09:31 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही पासवर्ड द्या. |
09:34 | तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करा.
हा login password लक्षात ठेवा. |
09:40 | पुढे Charts of Accounts साठी दोन पर्याय दिसतील. |
09:44 | Standard new company American COA हा पर्याय निवडू. |
09:49 | Default Language साठी English हा पर्याय निवडा. |
09:52 | Install बटणावर क्लिक करा. |
09:55 | स्क्रीनवर शेवटी, FrontAccounting ERP has been installed successfully हा मेसेज दिसेल जो आपले इन्स्टॉलेशन यशस्वी झाल्याचे सांगतो.
|
10:06 | FrontAccounting च्या इंटरफेसवर लॉगिन करण्यासाठी Click here to start ही लिंक क्लिक करा. |
10:12 | लॉग-इन स्क्रीनमधे पुढील तपशील भरा:
User name म्हणून admin Password म्हणून spoken |
10:22 | Company साठी ST Company Pvt. Ltd हा पर्याय निवडून
Login वर क्लिक करा. |
10:28 | हे आपल्याला Front Accounting Administration पेजवर नेईल. |
10:32 | या पेजवर आपल्याला विविध टॅब्ज दिसतील.
ते कसे वापरायचे हे आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत. |
10:39 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
10:44 | या पाठात आपण शिकलो,
XAMPP डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे |
10:50 | FrontAccounting डाऊनलोड आणि इन्स्टॉल करणे |
10:53 | विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर डेटाबेस सेटअप करणे. |
10:57 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
|
11:05 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
|
11:13 | तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
11:18 | ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
प्रश्न थोडक्यात विचारा. आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
11:27 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
11:32 | कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
त्यामुळे गोंधळ कमी होईल. |
11:39 | सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
11:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
11:49 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |