LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Printing-a-presentation-in-Impress/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:14, 21 July 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Printing a Presentation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण Printing चे विविध पर्याय जाणून घेऊ.
00:12 Slides, Handouts, Notes आणि Outline
00:20 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:34 Printing पर्यायाचा उपयोग:

presentation च्या हार्ड कॉपीज प्रिंट करण्यासाठी आणि

00:42 presentation च्या प्रती पुढील संदर्भासाठी प्रेक्षकांना देण्यासाठी होतो.
00:50 आपण सेव्ह केलेल्या presentation ची Sample-Impress.odp फाईल उघडू.
00:59 ही फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे.

ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.

01:10 या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:15 आता आपल्या slides चे विविध फॉरमॅटमधे प्रिंटआऊट कसे घ्यायचे हे जाणून घेऊ.
01:22 Standard toolbar मधे Print आयकॉन आहे.
01:26 slides प्रिंट करण्यासाठी आयकॉनवरील टूलटीप ‘Control plus P’ ही शॉर्टकट की दाखवते.

Print आयकॉनवर क्लिक करा.

01:38 Print चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:42 आता Print चा डायलॉग बॉक्स बंद करा.
01:46 Print डायलॉग बॉक्स उघडण्याची आणखी एक पध्दत बघू.
01:52 menu bar मधील File menu वर क्लिक करून नंतर Print पर्यायावर क्लिक करा.
01:59 Print डायलॉग बॉक्समधे, General आणि LibreOffice Impress हे दोन टॅब्ज दिसतील.
02:08 प्रथम LibreOffice Impress या टॅब खालील पर्याय पाहू.
02:14 Document या भागापासून सुरूवात करू.
02:18 डिफॉल्ट रूपात Type फिल्डच्या ड्रॉपडाऊनमधे Slides हा पर्याय निवडलेला आहे.
02:25 इतर पर्याय बघण्यासाठी Type फिल्डच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
02:31 Type फिल्डमधील पर्याय फक्त Impress साठीच लागू आहेत.
02:36 या पर्यायांच्या सहाय्याने slides च्या इतर फॉरमॅटमधे प्रिंटस घेऊ शकतो. जसे की,
02:43 Handouts, Notes आणि Outline
02:51 डावीकडे तुम्हाला slides चा Print preview दिसेल.
02:57 येथे previous आणि next page चे आयकॉन्स आहेत.
03:02 Print preview विंडोमधे स्क्रॉल करून सर्व slides कशा प्रिंट होतील ते पहा.
03:11 Contents या भागात खाली डिफॉल्ट रूपात Hidden pages हा चेकबॉक्स निवडलेला आहे.
03:18 Slide name आणि Date and time हे चेकबॉक्स देखील सिलेक्ट करा.
03:24 हे तारीख आणि वेळेसहित slide चे नाव प्रिंट करेल. तसेच काही hidden pages असल्यास तीही प्रिंट करेल.
03:32 Color या भागात खाली Grayscale या रेडिओ बटणावर क्लिक करून ते निवडा.
03:39 Size या भागात खाली ‘Fit to printable page’ हे रेडिओ बटण निवडा.
03:46 LibreOffice Impress टॅब खालील color आणि size चे इतर पर्याय तुम्ही नंतर वापरून बघा.
03:54 आता General टॅबखालील पर्याय पाहू.
03:59 प्रिंटर भागात खाली आपल्या कॉन्फिगर केलेल्या प्रिंटरचे नाव निवडा.
04:04 Page Layout या भागात जा.
04:07 Page Layout भागात विविध पर्याय उपलब्ध आहेत.
04:12 Orientation फिल्डमधे Landscape पर्याय निवडणार आहोत.
04:18 Pages per sheet फिल्डमधे डिफॉल्ट रूपात 1 आकडा निवडलेला आहे.

म्हणजेच एका पानावर एक slide प्रिंट होईल.

04:29 Order field च्या उजव्या बाजूला 1 आकडा दाखविणारा rectangle box देखील दिसेल.
04:37 Pages per sheet फिल्डमधील दिलेल्या पर्यायानुसार preview मधे स्लाईड दिसतील.
04:44 समजा printout च्या एका पानावर आपल्याला एका पेक्षा अधिक slide हव्या आहेत.
04:51 त्यावेळी Pages per sheet फिल्डमधे एका पानावर प्रिंट करण्याच्या slides ची संख्या निवडू शकतो.
05:00 या फिल्डमधे ‘2’ हा पर्याय निवडू.
05:04 आता आयताकृती बॉक्समधे slide क्रमांक ‘1’ आणि ‘2’ यांचा preview बघू शकतो.
05:12 आपल्याला डावीकडे Print preview मधे देखील एका पानावर दोन slides चा preview दिसेल.
05:20 आता Pages per sheet फिल्डमधे ‘4’ हा पर्याय निवडून काय होते ते बघू.
05:28 लगेच ‘1’ ते ‘ 4’ क्रमांकाच्या slide चा preview आयताकृती बॉक्समधे दिसेल.
05:36 तसेच डावीकडेही Print preview मधे एका पानावर चार slides चा preview दिसेल.
05:44 आता ‘Draw a border around each page’ च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:50 हे प्रिंटींगच्या वेळी प्रत्येक slide भोवती black border काढेल.

यामुळे हे पान अधिक आकर्षक दिसते.

05:59 शेवटी slides प्रिंट करण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील खालील OK बटणावर क्लिक करा.
06:06 तुमचा printer योग्य प्रकारे कॉन्फिगर केलेला असल्यास presentation चे printing सुरू झाले पाहिजे.
06:12 आता slides ची प्रिंट Handouts फॉरमॅटमधे कशी घ्यायची हे जाणून घेऊ.
06:18 Standard Toolbar मधील Print आयकॉनवर क्लिक करा.
06:23 Print च्या डायलॉग बॉक्समधे LibreOffice Impress टॅबवर क्लिक करा.
06:28 Type फिल्डच्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून Handouts पर्याय निवडा.
06:34 Slides per page फिल्डमधे According to Layout हा पर्याय डिफॉल्ट रूपात निवडलेला आहे.
06:41 हा डावीकडे Print preview मधे पाच slides दाखवेल.
06:47 Handouts म्हणून प्रिंट करायची slides ची हवी ती संख्या Slides per page मधून निवडू शकतो.

आपण ती बदलून 3 करू.

06:58 या presentation साठी इतर पर्यायांत बदल न करता तसेच ठेवा.
07:03 शेवटी slides प्रिंट करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा.
07:10 printer योग्य प्रकारे कॉन्फिगर असल्यास presentation चे printing आता सुरू होईल.
07:16 आता पहिल्या slide वर जा आणि Notes टॅबवर क्लिक करा.
07:22 Click to add Notes वर क्लिक करून “This is a sample note” असे टाईप करा.
07:28 नंतर टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा.
07:32 आपल्या slides साठी टाईप केलेल्या नोटसची प्रिंट घेऊ.
07:37 पूर्वीप्रमाणेच Standard Toolbar मधील Print आयकॉनवर क्लिक करा.
07:43 Print डायलॉग बॉक्समधील LibreOffice Impress टॅब थेट उघडल्याचे लक्षात येईल.
07:50 Type फिल्डच्या ड्रॉप डाऊनमधून, Notes हा पर्याय निवडा.
07:55 डाव्या बाजूला slide चा Print preview बघा.
08:00 Print preview च्या खालील भागात आपण आधी टाईप केलेली नोट दिसत आहे.
08:06 Print preview विंडोमधे स्क्रॉल करून सर्व slides च्या आपण टाईप केलेल्या इतर नोटस् पहा.
08:14 उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा.
08:18 printer योग्य प्रकारे कॉन्फिगर असल्यास printer आता printing सुरू करेल.
08:24 शेवटी presentation दरम्यान जलद संदर्भासाठी लागणाऱ्या slides च्या Outline प्रिंट करू.
08:31 पुन्हा एकदा Standard Toolbar मधील Print आयकॉनवर क्लिक करा.
08:36 Type फिल्डच्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Outline हा पर्याय निवडा.
08:41 आता डावीकडे स्लाईडचा Print preview बघा.
08:46 यात तुम्हाला outline किंवा slide headings आणि उपमुद्द्यांसह slides चा क्रम दिसेल.
08:54 उजव्या कोपऱ्यात खाली OK बटणावर क्लिक करा.
08:58 printer योग्य प्रकारे कॉन्फिगर असल्यास printer आता printing सुरू करेल.
09:04 Save आयकॉनवर क्लिक करून आपण प्रेझेंटेशनमधे केलेले सर्व बदल सेव्ह करा

आणि नंतर फाईल बंद करा.

09:14 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:21 या पाठात:

Slides, Handouts, Notes आणि Outline हे Printing चे विविध पर्याय जाणून घेतले.

09:32 असाईनमेंट म्हणून,

“Practice-Impress.odp” ही फाईल उघडा.

09:38 प्रत्येक पानावर दोन स्लाईडस Print करा.
09:41 सर्व स्लाईडस त्यावरील date and time सहित black and white मधे प्रिंट करा.
09:47 फक्त पहिल्या चार स्लाईडस Handouts म्हणून Print करा.
09:52 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:00 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

10:10 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:14 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:21 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali