LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Creating-a-presentation-in-Impress/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 22:16, 18 July 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Creating a presentation वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण Impress विंडोमधील काही महत्त्वाचे फीचर्स बघणार आहोत:
00:13 तसेच शिकणार आहोतः
00:16 नवीन slides समाविष्ट करणे
00:19 अस्तित्वात असलेल्या slides कॉपी करणे
00:22 Impress मधे विविध fonts वापरणे


00:26 fonts फॉरमॅट करणे आणि

slides डिलीट करणे


00:32 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:46 आपण आधी बनवलेल्या presentation, “Sample-Impress.odp” ची फाईल उघडू.
00:55 ही फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे.


01:02 ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.


01:05 या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:10 Impress विंडो बारकाईने पाहू.
01:14 मध्यभागी जी Workspace दिसते तेथे आपले कार्यक्षेत्र आहे.
01:20 Workspace चा व्ह्यू आपण आवडीनुसार कस्टमाईज करून घेऊ शकतो.
01:26 त्यासाठी menu bar मधील View menu वर क्लिक करा.
01:31 आता View Tab Bar पर्याय निवडा.
01:36 Workspace ला वरती असलेले 4 टॅब्ज म्हणजे ‘View buttons’ होत.
01:42 डिफॉल्ट रूपात Normal tab निवडलेले आहे.
01:46 एकेक slides तयार करण्यासाठी हा मुख्य व्ह्यू आहे.
01:51 Outline tab आऊटलाईन फॉरमॅटमधील प्रत्येक स्लाईडसाठी topic titles, bulleted, आणि numbered lists दाखवेल.
02:00 Notes tab प्रत्येक स्लाईडमधे नोटस समाविष्ट करू देते.
02:05 presentation दर्शविले जाते असताना या नोट्स दिसत नाहीत.
02:10 Slide Sorter tab स्लाईडसचे thumbnails दाखवते.
02:15 Normal tab वर पुन्हा क्लिक करू.
02:18 हे ऍक्सेस करण्याची आणखी एक पध्दत म्हणजे Standard toolbar मधे Display Views वर क्लिक करणे.


02:26 Workspace चे वेगवेगळे व्ह्यू दाखवणारे विविध आयकॉन्स आपल्याला येथे दिसतील.
02:33 स्क्रीनच्या डाव्या बाजूला Slides Pane आहे.
02:38 येथे presentation मधील slides चे thumbnails आहेत.
02:43 उजवीकडील बाजूस Sidebar आहे,

त्याचे 7 विभाग आहेत.

02:50 Sidebar मधे ‘Properties’ ह्या पहिल्या विभागावर क्लिक करा.
02:56 साईड बारमधे “Layouts” नावाची प्रॉपर्टी आहे.
03:00 यात विविध बिल्ट-इन layouts दिलेले आहेत.
03:04 आपण गरजेनुसार हे layouts प्रत्यक्ष वापरु शकतो किंवा त्यात सुधारणा करू शकतो.
03:11 मालिकेत पुढे आपण यापैकी प्रत्येक विभाग सविस्तरपणे पाहू.
03:18 Properties विभाग बंद करा.
03:21 बंद करण्यासाठी Properties विभागाच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील ‘x’ वर क्लिक करा.
03:28 दुसऱ्या रिकाम्या slide मधे काही कंटेंट समाविष्ट करू.
03:33 Slides Pane मधील दुसऱ्या slide वर क्लिक करा.
03:37 Click to add Title’ लिहिलेल्या textbox वर क्लिक करा आणि त्यामधे “Overview” टाईप करा.
03:46 नंतर ‘Click to add Text’ लिहिलेल्या textbox वर क्लिक करा.

आणि पुढील टेक्स्ट टाईप कराः

03:55 Summarize the main plans

Explain the long term course to follow.

04:02 Body textbox च्या कंटेंटमधे bullet points समाविष्ट करू.
04:07 Ctrl + A कीज दाबून प्रथम सर्व वाक्ये सिलेक्ट करा.
04:14 नंतर Properties विभागावर क्लिक करा.
04:18 Lists प्रॉपर्टीवर जा आणि “Toggle Bulleted List” आयकॉनवर क्लिक करा.
04:26 Properties विभाग बंद करू.
04:29 टेक्टमधील झालेले बदल लक्षात घ्या.
04:33 presentation मधे नवीन slide कशी समाविष्ट करायची ते आता पाहू.
04:39 slide समाविष्ट करण्याच्या दोन पध्दती आहेत.
04:43 पहिली पध्दत पाहू.
04:46 Slides Pane मधे slide 2 वर क्लिक करून सिलेक्ट करा.
04:51 LibreOffice विंडोचा आकार बदला असल्यास, काही आयकॉन्स कदाचित दिसणार नाहीत.
04:58 अशावेळी लपलेले आयकॉन पाहण्यासाठी toolbars च्या शेवटी double arrow वर क्लिक करा.
05:06 Standard Toolbar मधील New Slide आयकॉनवर क्लिक करा.
05:11 slide 2 नंतर नवीन कोरी slide समाविष्ट होईल.
05:17 आता नवीन slide समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू.
05:22 menu bar मधील Slide menu वर आणि

नंतर New Slide पर्यायावर क्लिक करा.


05:29 नवी कोरी slide समाविष्ट झाल्याचे पुन्हा एकदा दिसेल.
05:35 या कोऱ्या slides मधे काही कंटेंट समाविष्ट करू.
05:40 Slides Pane मधे slide 3 सिलेक्ट करा.


05:44 Click to add title’ या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा आणि त्यात “Short Term Strategy” टाईप करा.
05:52 तसेच “Long Term Goal” म्हणून चौथ्या slide साठी title सेट करा.
05:59 आता slide कॉपी कशी करायची ते शिकू.
06:03 slide कॉपी करण्याच्या दोन पध्दती आहेत.
06:08 चला, पहिली पध्दत पाहू.
06:11 Slides Pane मधे slide 3 वर क्लिक करून सिलेक्ट करा.
06:16 Standard Toolbar मधील Duplicate Slide आयकॉनवर क्लिक करा.
06:21 slide 3 नंतर नवीन डुप्लिकेट केलेली slide समाविष्ट होईल.
06:26 दुसऱ्या पध्दतीत menu bar मधील Slide menu वर आणि

नंतर Duplicate Slide पर्यायावर क्लिक करा.

06:35 पुन्हा एकदा आपल्याला नवीन डुप्लिकेट slide समाविष्ट झाल्याचे दिसेल.
06:41 आता fonts बद्दल आणि fonts फॉरमॅट करण्याविषयी जाणून घेऊ.
06:46 Slides Pane मधील ‘Overview’ ह्या स्लाईड टायटलवर क्लिक करा.
06:52 Body textbox वर क्लिक करा आणि टेक्स्टची दुसरी ओळ सिलेक्ट करा.
06:58 Sidebar वर जा आणि Properties आयकॉनवर क्लिक करा.
07:03 Character’ property मधे Font name बदलून “Carlito” करा.
07:09 नंतरFont size बदलून “26” चा “32” करा.


07:15 आपण केलेल्या निवडीप्रमाणे font बदलल्याचे लक्षात घ्या.
07:20 आता font चा रंग बदलू.
07:24 Body textbox वर क्लिक करा आणि Ctrl+A कीज दाबून सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा.
07:32 Character प्रॉपर्टीमधे जाऊन Font Color आयकॉनवर जा.
07:37 त्याच्या जवळील ड्रॉप डाऊन बाणावर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा रंग निवडा.
07:44 Teal हा रंग निवडू.
07:48 टेक्स्टचा बदललेला रंग लक्षात घ्या.
07:52 आता Title textbox वर क्लिक करा आणि संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा.
07:58 Character प्रॉपर्टीवर परत जा.

टेक्स्ट आधीच बोल्ड आहे.

08:04 आता Italics आणि Underline साठीचे आयकॉनही क्लिक करा.
08:11 टेक्स्टमधे झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
08:15 शेवटी presentation मधून slide कशी डिलीट करायची ते पाहू.

हे करण्याच्या दोन पध्दती आहेत.

08:23 पहिल्या पध्दतीत Slide Pane मधील एक slide जसे की, slide 5 निवडू.
08:30 नंतर Standard toolbar मधील Delete Slide आयकॉन क्लिक करू.
08:35 दुसरी पध्दत म्हणजे Slide Pane मधील एक slide जसे की, slide 4 निवडू.
08:42 ही slide काढून टाकण्यासाठी कीबोर्डवरील Delete कीचा वापर करा.
08:48 Save आयकॉन वर क्लिक करून आपल्या presentation मध्ये केलेले सर्व बदल सेव्ह करा.

नंतर फाईल बंद करा.

08:58 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:05 या पाठात आपण Impress विंडोचे काही महत्त्वाचे फीचर्स पाहिले.
09:12 तसेच आपण शिकलोः
09:15 नवीन slides समाविष्ट करणे


09:17 अस्तित्वात असलेल्या slides कॉपी करणे,

विविध fonts वापरणे,

09:22 fonts फॉरमॅट करणे आणि

slides डिलीट करणे.


09:27 असाईनमेंट म्हणून:

Practice-Impress.odp” फाईल उघडा.

09:34 दुसऱ्या slide नंतर नवीन slide समाविष्ट करा.
09:38 तिसऱ्या slide च्या Body textbox मधे काही टेक्स्ट टाईप करा.
09:43 टेक्स्टचा font size बदलून 36 करा.
09:47 टेक्स्ट Bold, Italic, Underlined करा आणि निळा रंग द्या.
09:53 तिसऱ्या slide ची कॉपी तयार करा.
09:57 presentation सेव्ह करून बंद करा.
10:01 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:09 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


10:15 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


10:19 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:23 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:30 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali