STEMI-2017/C2/Search,-select-and-edit-a-patient-file/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:38, 16 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search


Time
NARRATION
00:00 नमस्कार. How to search, select and edit a patient file वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात शिकणार आहोत - डिव्हाईसवर आधीपासून उपलब्ध असलेल्या रुग्णाची फाईल शोधणे व निवडणे.
00:17 तसेच रुग्णाच्या आधीपासून उपलब्ध असलेल्या माहितीमधे बदल करणे.
00:22 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे -STEMI App इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट,
00:30 आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी.
00:34 आता आपण STEMI च्या होमपेजवर आहोत.
00:38 कृपया लक्षात घ्या येथे हे D हॉस्पिटल युजर असे दाखवत आहे.
00:43 तुम्ही कुठल्या ह़स्पिटलमधे आहात त्यानुसार तुमचा लॉगिन युजर ID वेगळा असू शकतो.
00:50 सर्च पेजवर जाण्यासाठी सर्च टॅब सिलेक्ट करा.
00:54 सर्च पेजवर डाव्या बाजूला वर मेनू टॅब आहे.
01:00 येथे सर्च करण्यासाठी पेशंट ID, पेशंट नेम, ऍडमिशन फ्रॉम टू एंड डेट, STEMI स्टेटस, टाईप ऑफ हॉस्पिटल, हॉस्पिटल क्लस्टर असे सहा निकष आहेत.
01:17 हे सर्व आपल्याला पेजवर वरच्या भागात दिसेल.
01:22 येथे खालच्या भागात अलीकडेच केलेल्या 14 नोंदी दाखवल्या जात आहेत.
01:27 याचे कारण माझ्या STEMI डिव्हाईसवर 14 पेक्षा अधिक नोंदी आधीच केलेल्या आहेत.
01:33 तुमच्या STEMI डिव्हाईसवर 14 पेक्षा कमी नोंदी असल्यास तुम्हाला छोटी सूची दिसेल.
01:41 परंतु 14 पेक्षा अधिक नोंदी असल्यास सर्वात अलीकडील 14 नोंदी दाखवल्या जातील.
01:49 पेजच्या खालच्या भागात उजवीकडे सर्च बटण आहे.
01:54 आधीच सेव्ह केलेली पेशंटची फाईल शोधण्यासाठी आपल्याला प्राधान्यकृत सर्च निकष देणे गरजेचे आहे.
02:03 नंतर पेजच्या खालच्या भागातील सर्च बटण सिलेक्ट करा.
02:08 आपण एकाच वेळी सर्च करण्याचे अनेक निकष देऊन पेशंटची फाईल शोधू शकतो. यामुळे आपला शोध संक्षिप्त होईल.
02:19 लक्षात घ्या, आपण सर्च टॅबखाली केवळ पूर्वी सेव्ह करून ठेवलेल्या फाईल्सच शोधू शकतो.
02:26 म्हणजेच पेशंटची माहिती भरून झाल्यावर Save and Continue बटण दाबले नाही तर पेज सेव्ह होणार नाही आणि आपण ते नंतर बघू शकणार नाही.
02:40 आता काही निकष गृहीत धरून सेव्ह केलेल्या काही फाईल्स सर्च करू.
02:46 प्रथम पेशंटची फाईल विशिष्ट पेशंट ID देऊन सर्च करू.
02:51 दाखवलेल्या सूचीतून कुठलीही पेशंट फाईल निवडा.
02:56 आता आपल्या डिव्हाईसवर फाईल उघडली आहे.
02:59 पेजच्या वरच्या भागात दाखवलेल्या पेशंट Id ची नोंद करून घ्या.
03:05 माझ्या डिव्हाईसमधे मी निवडलेल्या पेशंटसाठी हा नंबर दिसत आहे.
03:12 तुमच्या डिव्हाईसवर तुम्ही निवडलेल्या पेशंटसाठी वेगळा नंबर दिसू शकतो.
03:17 या नंबरची नोंद करून ठेवा. आपण तो नंतर वापरणार आहोत.
03:22 आपल्याला पेशंटचा ID त्याच्याकडील फाईल कव्हर वरही मिळू शकतो.
03:28 हा नंबर, माहिती भरताना STEMI डिव्हाईसद्वारे ऑटोजनरेट केला गेला आहे.
03:35 आता पेजच्या डाव्या कोप-यात वरती असलेला मेनू टॅब सिलेक्ट करा.
03:42 नंतर होम टॅब सिलेक्ट करा.
03:44 आता पुन्हा होमपेजमधील सर्च टॅब सिलेक्ट करा.
03:49 आता आपण सर्च पेजवर परत आलो आहोत.
03:52 येथे पेशंट Id सर्च क्रायटेरियामधे पेशंट Id टाकणे गरजेचे आहे.
03:59 मी हा नंबर पेशंट Id सर्च क्रायटेरियामधे टाकणार आहे. हा मी आधीच नोंद करून घेतलेल्या फाईलचा नंबर आहे.
04:09 तुमच्या डिव्हाईसवरून नोंद करून घेतलेल्या फाईलचा नंबर तुम्ही टाईप करणे गरजेचे आहे.
04:14 आता पेजच्या खालच्या भागात उजवीकडे असलेले सर्च बटण सिलेक्ट करा.
04:19 टाईप केलेल्या पेशंट Id साठी ही पेशंटची फाईल स्क्रीनवर दाखवली जाईल.
04:26 त्यातील घटक बघण्यासाठी फाईल सिलेक्ट करा.
04:30 पुढे रमेश असे पेशंट नेम टाकून पेशंटची फाईल सिलेक्ट करू.
04:35 रमेश हे पेशंटचे नाव असलेली पेशंटची फाईल पेजवर दाखवली जाईल.
04:40 फाईलचे घटक उघडून ते बघण्यासाठी आता फाईल सिलेक्ट करा.
04:45 या पेजच्या उजव्या बाजूला वर असलेल्या EDIT आयकॉन बघा.
04:50 रुग्णाच्या माहितीमधे बदल करण्यासाठी हा आयकॉन सिलेक्ट करा.
04:55 केलेले सर्व बदल सेव्ह करण्याचे लक्षात ठेवा.
04:59 आता आपण विशिष्ट तारखांच्या दरम्यान सेव्ह केलेल्या पेशंटच्या सर्व फाईल्स शोधणार आहोत.
05:05 मी From Date मधे 1 जानेवारी 2016 आणि End Date मधे 9 फेब्रुवारी 2016 निवडत आहे.
05:14 तुमच्या डिव्हाईसवर ज्या तारखांना माहिती भरली आहे त्यानुसार या तारखांची रेंज निवडा.
05:22 नंतर पेजच्या खालच्या भागात उजवीकडे असलेले सर्च बटण सिलेक्ट करा.
05:27 1 जानेवारी 2016 ते 9 फेब्रुवारी 2016 दरम्यान सेव्ह केलेल्या पेशंटसच्या सर्व फाईल्स माझ्या पेपरवर दाखवत आहे.
05:38 तुमच्या डिव्हाईसवर ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या दरम्यान सेव्ह केलेल्या पेशंटसच्या फाईल्स दिसतील.
05:44 आता फाईल उघडण्यासाठी आणि त्यातील घटक बघण्यासाठी तुमच्या पसंतीची कोणतीही फाईल उघडा.
05:50 पुढे आपण STEMI स्टेटस कन्फर्म्ड असलेल्या फाईल्स सर्च करणार आहोत.
05:55 STEMI स्टेटस सर्च क्रायटेरिया खाली आपल्याकडे पुढील पर्याय आहेत -

ऑल STEMI कन्फर्म्ड STEMI इनकन्क्ल्युझिव्ह STEMI नॉट कन्फर्म्ड नॉन STEMI


06:11 मी STEMI कन्फर्म्ड पर्याय निवडत आहे. पेजच्या खालच्या भागात उजवीकडे असलेले सर्च बटण दाबा.
06:18 सेव्ह केलेल्या फाईल्सपैकी STEMI कन्फर्म्ड असलेल्या फाइल्स पेजवर दाखवल्या जातील.
06:24 माझ्या STEMI डिव्हाईसवर, आपण 14 रुग्ण पाहू शकतो.
06:28 ही सूची तुमच्या STEMI डिव्हाईसवर लहान किंवा मोठी असू शकते.
06:33 प्रत्यक्षात STEMI स्टेटस कन्फर्म्ड असलेले किती रुग्ण निवडले गेले यावर हे अवलंबून आहे.
06:42 त्याचप्रमाणे हॉस्पिटल टाईप सर्च क्रायटेरियासाठी आपल्याकडे हे पर्याय आहेत-

ऑल EMRI A हॉस्पिटल C हॉस्पिटल D हॉस्पिटल


06:55 हा सर्च पेशंटची फाईल या device मध्ये प्रथम कुठे तयार झाली यावर अवलंबून असेल.
07:02 D हॉस्पिटल पर्याय निवडून सर्च बटणावर क्लिक करा.
07:07 तुम्ही शोधत असलेल्या पेशंट फाईलनुसार तुम्हाला हॉस्पिटल टाईप सिलेक्ट करणे गरजेचे आहे.
07:14 माझे डिव्हाईस, या पेजवर D हॉस्पिटल मधील सर्व पेशंटच्या फाईल्स दाखवत आहे.
07:21 हा सर्च करण्याचा निकष तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमधून स्थलांतरित झालेल्या पेशंटच्या फाईल्स बघण्यासाठी देखील वापरू शकता.
07:29 तुमच्या बाबतीत हे तुमच्या डिव्हाईसवरील युजर id नुसार असेल.
07:34 त्याचप्रमाणे टाईप ऑफ हॉस्पिटल क्लस्टरखाली, आपल्या पसंतीचे क्लस्टर निवडू शकतो.
07:41 मी Kovai Medical Centre and Hospital निवडत आहे.
07:45 तुमच्या आवडीचे क्लस्टर तुम्ही निवडू शकता
07:49 क्लस्टरचे नाव त्याच्या Hub Hospital वरून (उदाहरणार्थ A B Hospital) ठेवले जाते.
07:58 नंतर पेजच्या खालच्या भागात उजवीकडे असलेले सर्च बटण सिलेक्ट करा.
08:02 आता विशिष्ट क्लस्टर खाली सेव्ह केलेल्या फाईल्स आपण पाहू शकतो.
08:08 थोडक्यात, आपण शिकलो- विविध प्रकारे सर्च करण्याच्या निकषांच्या सहाय्याने रुग्णाची फाईल शोधून ती सिलेक्ट करणे.
08:17 तसेच आधीपासून सेव्ह केलेल्या रुग्णाच्या माहितीमधे बदल करणे.
08:21 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
08:34 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

08:48 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya