STEMI-2017/C2/Essential-data-to-be-filled-before-an-ECG/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:32, 16 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | NARRATION |
00:00 | नमस्कार, ECG काढण्यापूर्वी आवश्यक डेटा भरण्यावरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात शिकणार आहोत-
ECG पूर्वी STEMI App मधे आवश्यक डेटा भरणे. |
00:15 | या पाठासाठी आपल्याकडे -
STEMI App इन्स्टॉल केलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी. |
00:25 | पाठांच्या या मालिकेत आपण मागे शिकलो आहोत-
STEMI App वर लॉगिन आणि लॉगआऊट करणे. STEMI App मधील आवश्यक फिल्डसमधे डेटा भरणे. |
00:37 | पुढे जाण्यापूर्वी ECG चे यंत्र
रुग्णाला आणि STEMI यंत्राला जोडले असल्याची खात्री करा. |
00:46 | आता आपण STEMI च्या होमपेजवर आहोत. |
00:50 | तातडीची वैद्यकीय गरज असताना कमीतकमी माहिती भरून त्वरित ECG घेण्यासाठी ECG टॅब निवडा. |
00:59 | एक रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
01:03 | रुग्णाचे नाव: रमेश
वय: 53 लिंग: पुरूष प्रवेश: थेट |
01:12 | हॉस्पिटल लॉगिनचा प्रकार कुठलाही असला तरी ही चार फिल्डस सर्व वापरकर्त्यांसाठी समान असतात. |
01:19 | येथे दाखवल्याप्रमाणे केवळ चार फिल्डसमधे माहिती भरावी लागेल हा याचा फायदा. |
01:25 | पानाच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण दाबून ECG घेण्यासाठी त्वरित पुढे जाऊ शकतो. |
01:34 | Take ECG बटण दाबल्यावर आपण भरलेली रुग्णाची वैयक्तिक माहिती सेव्ह होईल. |
01:42 | पानाच्या खालच्या भागात लगेच “Saved Successfully” असा मेसेज आलेला दिसेल. |
01:49 | हे यंत्र आपल्याला ECG live stream या पानावर नेईल. आता आपण ECG घेण्यासाठी सज्ज आहोत. |
01:57 | माहिती भरण्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला त्वरित ECG घेता येतो. |
02:02 | Homepage मधील New Patient टॅब खाली पानाच्या उजवीकडे वरच्या भागात असलेल्या ECG बटणावर क्लिक करा. |
02:10 | ECG बटणावर क्लिक केल्यावर, आपल्याला थेट ECG live stream पेजवर जाता येईल. |
02:17 | थोडक्यात, |
02:19 | आपण या पाठात जाणून घेतले-
STEMI App ECG पूर्वी STEMI App मधे आवश्यक माहिती भरणे. |
02:27 | STEMI INDIA
संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे |
02:41 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
02:48 | अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
02:54 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |