STEMI-2017/C2/STEMI-App-and-its-mandatory-fields/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:28, 16 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
NARRATION
00:01 नमस्कार. STEMI ऍप and its mandatory fields वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत - टॅब्लेटवर STEMI ऍप उघडणे.
00:15 STEMI होमपेज समजून घेणे.
00:17 STEMI ऍपवरील अनिवार्य फिल्डसमधे माहिती भरणे.
00:23 या पाठाच्या सरावासाठी आपल्याकडे - STEMI ऍप इन्स्टॉल केलेली अँड्रॉईड टॅब्लेट आणि चालू स्थितीतील इंटरनेट जोडणी असावी.
00:36 STEMI ऍप हे STEMI चा लोगो असलेल्या लाल आयताप्रमाणे दिसते.
00:42 STEMI ऍप सिलेक्ट करण्यापूर्वी टॅब्लेट इंटरनेटशी जोडले असल्याची खात्री करा.
00:50 तसे नसल्यास तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासण्यासंदर्भातील पॉप-अप दाखवला जाईल.
00:56 डिव्हाईस इंटरनेटला जोडल्यावर STEMI ऍप सिलेक्ट करा.
01:01 STEMI होमपेज उघडेल.
01:04 लक्षात घ्या stemiAuser असे दाखवत आहे. याचे कारण A हॉस्पिटल युजर आहे.
01:12 जर तुम्ही इतर हॉस्पिटलचे युजर असाल उदाहरणार्थ: B हॉस्पिटल, तर हे stemiBuser असे दाखवेल.
01:22 त्याचप्रमाणे C हॉस्पिटल आणि D हॉस्पिटलसाठी अनुक्रमे stemiCuser किंवा stemiDuser असे दाखवले जाईल.
01:33 STEMI ऍप हे EMRI अँब्युलन्समधून ऍक्सेस करत असल्यास stemiEuser असे दाखवले जाईल.
01:42 सर्व केसेसमधे आपण STEMI होमपेजमधे असतो. आता आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत.
01:49 STEMI होमपेजच्या मध्यभागात 3 टॅब्ज आहेत.
01:54 न्यू पेशंट टॅब, पेशंटची संपूर्ण हिस्ट्री भरण्यासाठी आहे.
01:59 सर्च टॅब, आधी सेव्ह केलेली पेशंटची माहिती शोधून ती सिलेक्ट करण्यासाठी मदत करते.
02:05 ECG टॅब कमीतकमी माहिती भरून त्वरित ECG घेण्यासाठी मदत करते.
02:12 तसेच पेजच्या डाव्या बाजूला वर मेनू टॅबदेखील आहे. ते कसे वापरायचे याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
02:21 आता अनिवार्य फिल्डस म्हणजे काय हे समजून घेऊ.
02:26 जी फिल्डस छोट्या लाल ऍस्टेरिस्क या चिन्हाने दाखवली आहेत त्यांना मँडेटरी म्हणजेच अनिवार्य फिल्डस म्हणतात.
02:34 या फिल्डसमधे डेटा भरणे पर्यायी नसून अनिवार्य आहे.
02:38 सदर पेज सेव्ह करून पुढील पेज वर जाण्यासाठी हा डेटा भरलेला असणे आवश्यक आहे.
02:45 प्रात्यक्षिक करण्यासाठी मी मुख्य ECG टॅब सिलेक्ट करून तो उघडत आहे.
02:51 मुख्य ECG टॅबखालील

पेशंट नेम, एज, जेंडर आणि ऍडमिशन ही चारही फिल्डस अनिवार्य आहेत.

03:01 ही लाल ऍस्टेरिस्कच्या चिन्हाने दाखवली आहेत.
03:05 एक पेशंट गृहीत धरून खालील माहिती भरू.

पेशंट नेम: रमेश

एज: 53

जेंडर: पुरुष

03:15 परंतु एक फिल्ड वगळू. जसे की…ऍडमिशन.
03:19 पेज सेव्ह करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण सिलेक्ट करा.
03:26 सिलेक्ट द ऍडमिशन टाईप असा पॉप-अप मेसेज लगेच आलेला दिसेल.
03:32 तुम्ही बघू शकता की चारपैकी एकजरी फिल्ड आपण रिकामे ठेवले तरी पेज सेव्ह होणार नाही.
03:39 आता ऍडमिशन या रिकाम्या फिल्डमधे डायरेक्ट अशी माहिती भरू.
03:45 पेज सेव्ह करण्यासाठी पेजच्या खालच्या भागात असलेले Take ECG बटण सिलेक्ट करा.
03:51 लगेचच “Saved Successfully” असा मेसेज पेजच्या खालच्या भागात आलेला दिसेल.
03:57 अशाप्रकारे आपल्याला जेव्हा लाल ऍस्टेरिस्कचे चिन्ह असलेले फिल्ड दिसेल त्यात माहिती भरणे अनिवार्य आहे.
04:05 थोडक्यात,
04:08 आपण या पाठात शिकलो-

टॅब्लेटवर STEMI ऍप उघडणे, STEMI होमपेज समजून घेणे, STEMI ऍपवरील अनिवार्य फिल्डमधे माहिती भरणे.


04:20 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
04:34 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
04:47 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya