Health-and-Nutrition/C2/Vegetarian-recipes-for-7-month-old-babies/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:55, 9 July 2020 by Sakinashaikh (Talk | contribs)
|
|
00:00 | 7 महिन्यांच्या मुलांसाठी शाकाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जाणून घेणार आहोत - 7 महिन्यांच्या बाळांना पूरक आहार देण्याचे महत्त्व आणि |
00:16 | शाकाहारी पाककृती कशा तयार कराव्यात जशी – फणसाच्या बियांची लापशी |
00:23 | कुळीथ व राजगिऱ्याच्या पानांची लापशी |
00:26 | राजगिरा आणि चवळीची लापशी |
00:28 | मेथी पाने व वेलीच्या शेंगांची लापशी आणि कोद्रा व हरभऱ्याची लापशी |
00:35 | सुरवात करू, 1 वर्षाच्या दरम्यान, जेव्हा बाळ रांगण्यास आणि हालचाल करण्यास सुरवात करते, तेव्हा त्याची वाढ वेगाने होत असते. |
00:43 | बाळाला उर्जेची आवश्यकतादेखील वाढते. |
00:48 | 6-8 महिन्यांच्या बाळांना पूरक आहारामधून 200 कॅलरीज आवश्यक असतात. |
00:55 | देण्यात आलेल्या अन्नाचे प्रमाण हळूहळू वाढवायला हवे. |
00:59 | हेदेखील लक्षात ठेवा - पुरेशा पूरक आहारासोबत अंगावरील दूध पाजणेदेखील अतिशय महत्वाचे आहे. |
01:07 | म्हणूनच, जेव्हा बाळाला सात महिने पूर्ण होतात, तेव्हा दिवसातून तीन वेळा अर्धा कप पूरक अन्न देणे सुरू करा. |
01:16 | अर्धा कप सुमारे 125 मिलीलीटर किंवा 8 मोठ्ठे चमचे अन्न इतके आहे. |
01:22 | आतापर्यंत बाळ वेगवेगळे आहार व्यवस्थितपणे घेत आहे. |
01:28 | जेव्हा ती 6 महिन्यांची झाली तेव्हा तिला पूरक अन्न सुरू केले. |
01:33 | आता बाळाला वेगवेगळे पदार्थ एकत्र करून देण्यास सुरवात करा. |
01:38 | लक्षात घ्या- फक्त कुस्करलेले आणि शुद्ध स्वरूपातील खाद्यपदार्थ द्यावे. |
01:44 | हे सुनिश्चित करा की - बाळाचे अन्न हे, पुरेसे घट्टसर असून पाण्यासारखे पातळ नाही. |
01:52 | बाळाचे जेवण तयार करताना - नेहमीच स्थानिक आणि हंगामी साहित्यांचा वापर करावा. |
01:59 | तसेच विविध पौष्टिक पूड घालणे लक्षात ठेवा- काजू आणि दाण्यांची पूड, मोड आलेल्या बियांची पूड |
02:08 | कढीपत्त्याच्या पानांची पूड, शेवग्याच्या पानांची पूड |
02:11 | हे त्याच मालिकेच्या दुसर्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केले आहे. |
02:17 | बाळ एक वर्षाचा होईपर्यंत बाळाच्या अन्नात मीठ घालू नका. |
02:21 | बाळ दोन वर्षाचा होईपर्यंत बाळाच्या अन्नात साखर, गूळ घालू नका. |
02:27 | आता आपण पाहणार आहोत - काही शाकाहारी पाककृती जे बाळासाठी पूरक अन्न म्हणून वापरले जाऊ शकतात. |
02:35 | आपली पहिली पाककृती आहे - फणसाच्या बियांची लापशी. |
02:39 | आवश्यक साहित्य आहेत - 15-20 फणसाच्या बिया, एक लहान किंवा ½ केळे |
02:48 | नारळाचे दूध किंवा आईचे दूध |
02:50 | एक चमचा दाणे आणि बियांची पूड |
02:53 | फणसाच्या बियांची लापशी तयार करण्यासाठी – फणसाच्या बिया चांगल्या धुवा. |
02:59 | ह्या बिया स्टीलच्या भांड्यात घ्या. बिया बुडतील इतके पाणी घाला. |
03:06 | 5-6 शिट्या होईपर्यंत शिजवा. |
03:09 | ह्या बिया ताटात काढा आणि त्या थोडा वेळ थंड होऊ द्या. |
03:16 | नंतर त्यावरील साली काढून घ्या. |
03:20 | पुढे, मिक्सर किंवा दगडी ग्राईंडरमध्ये घट्ट रस्सा बनवा. |
03:25 | ह्यासोबत, एक पिकेलेले केळे सोलून चमच्याने ते कुस्करा. |
03:32 | आता कुस्करलेले केळे आणि फणसाच्या बिया एकत्र मिसळा. |
03:37 | त्यात 2 चमचे नारळाचे दूध किंवा आईचे दूध घाला. |
03:42 | त्यात दाणे आणि बियांची पूड घाला. |
03:45 | चांगले मिसळा. |
03:47 | हे मिश्रण मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजू द्यावे. |
03:52 | फणसाच्या बियांची लापशी तयार आहे. |
03:56 | ही फणसाच्या बियांची लापशी - प्रथिने |
03:59 | ओमेगा 3 फॅटी एसिडस् |
04:02 | पोटॅशियम आणि फॉस्फरस ह्यांनी समृद्ध आहे. |
04:06 | दुसरी पाककृती आहे - कुळीथ व राजगिऱ्याच्या पानांची लापशी |
04:11 | हे तयार करण्यासाठी आपल्याला हवे आहे - 2 चमचे कुळीथ, 2 कप धुतलेली राजगिऱ्याची पाने |
04:19 | ¼ चमचा कढीपत्त्याच्या पानांची पूड, ½ चमचा तूप |
04:24 | कृती - प्रथम, कुळीथ पाण्यात 7 ते 8 तास भिजवा. |
04:31 | यानंतर हे गाळणीत काढून पाण्याने व्यवस्थित धुवा. |
04:37 | सर्व पाणी काढून टाकावे. आता स्वच्छ सुती कपड्यात बांधा आणि मोड येईपर्यंत बाजूला ठेवा. |
04:47 | हे मोड आलेले कुळीथ उन्हात एक किंवा दोन दिवस वाळवा. |
04:52 | मंद आचेवर 8-10 मिनिटे भाजून घ्या. थंड होऊ द्या. |
04:58 | नंतर ते बारीक करून त्याची पूड बनवा. ही संपूर्ण प्रक्रियेला माल्टिंग म्हटले जाते. |
05:05 | त्यावेळी कढईत तूप गरम करा. |
05:10 | त्यात धुतलेली राजगिऱ्याची पाने घाला. |
05:13 | 4-5 मिनिटे परता आणि थंड होऊ द्या. |
05:17 | आणि मिक्सर किंवा दगडी ग्राईंडरने त्याची त्याचा घट्ट रस्सा बनवा. |
05:23 | पुढे, कुळीथाच्या पूडमध्ये 2 चमचे पाणी घाला. |
05:28 | हे चांगले मिसळा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. |
05:32 | हे पातळ मिश्रण 6-7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. |
05:37 | आता या कुळीथाच्या मिश्रणात राजगिऱ्याच्या पानांचा घट्ट रस्सा घाला. |
05:43 | पुढील 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. |
05:48 | त्यात कढीपत्त्याची पूड घाला आणि पुन्हा मिसळा. |
05:52 | आचेवरून उतरवा आणि आपली कुळीथ आणि राजगिऱ्याच्या पानांची लापशी तयार आहे. |
05:59 | ही लापशी – प्रथिने, ओमेगा 3 फॅटी एसिडस्, कॅल्शियम |
06:06 | फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. |
06:10 | कृपया लक्षात घ्या की अशा प्रकारची लापशी तयार करण्यासाठी कोणत्याही स्थानिक उपलब्ध असलेल्या बिया आणि पालेभाज्या वापरू शकता. |
06:20 | बियांसोबत नेहमीच वेगवेगळी बाजरी आणि धान्ये घ्यावे जसे - ज्वारी, नाचणी, कोद्रा इत्यादी. |
06:31 | हे संयोजन बाळाला संपूर्ण प्रथिने प्रदान करते. |
06:35 | आपण एकतर बाळाच्या अन्नात ह्या धान्य आणि बाजरीचे माल्टेड पूड घालू शकता किंवा |
06:42 | आपण अशा लापशींमध्ये मोड आलेली बाजरी शिजवून कुस्करून टाकू शकता. |
06:48 | तिसरी पाककृती म्हणजे राजगिरा आणि चवळीची लापशी. |
06:53 | आवश्यक साहित्य आहेत - 2 चमचे माल्ट केलेले राजगिऱ्याच्या पानांची पूड |
06:59 | 2 चमचे मोड आलेले चवळीचा घट्ट रस्सा आणि ¼ चमचा शेवग्याच्या पानांची पूड |
07:06 | कृती - माल्टेड राजगिऱ्याच्या पानांची पूड बनवण्यासाठी- त्याच ट्युटोरिअलच्या आधीच्या पाककृतीमध्ये स्पष्ट केलेल्या सूचनेप्रमाणे करा. |
07:17 | नंतर, मोड आलेली चवळी स्टीलच्या भांड्यात घ्या आणि 4 ते 5 शिट्या काढून शिजवा. |
07:26 | आता या शिजवलेल्या चवळीचा घट्ट रस्सा बनवा. |
07:30 | नंतर एका वाडग्यात दोन चमचे माल्टेड राजगिऱ्याच्या पानांची पूड घ्या.
त्यात पुरेसे पाणी घाला. |
07:38 | गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे चांगले मिसळा. |
07:42 | राजगिऱ्याच्या पानांच्या पुडाचे हे पातळ घोळ 2-3 मिनिटे शिजू द्या. त्यात चवळीचा घट्ट रस्सा घाला. |
07:52 | ते चांगले मिसळा आणि 4-5 मिनिटे शिजवा. आचेवरून उतरवा. |
07:58 | ह्या शिजलेल्या लापशीत शेवटी ¼ चमचे शेवग्याच्या पानांची पूड घाला. आणि राजगिरा आणि चवळीची लापशी तयार आहे. |
08:09 | ही राजगिरा आणि चवळीची लापशी ही प्रथिने, ओमेगा -3 फॅटी एसिडस् |
08:17 | फॉस्फरस, मॅग्नेशियम |
08:20 | लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियमने समृद्ध आहे. |
08:24 | अशी लापशी तयार करण्यासाठी पुढील मोड आलेल्या घटकांचे मिश्रणदेखील वापरू शकतो- जसे रागी, ज्वारी |
08:32 | मटकी, चणे इत्यादी. |
08:37 | चौथी पाककृती आहे - मेथीची पाने आणि वेलीच्या शेंगांची लापशी. |
08:41 | आवश्यक असलेले घटक आहेत - 2 वाटी धुऊन कापलेली मेथीची पाने, 1 चमचा तूप |
08:49 | 2 चमचे ताज्या नारळाचे वाटण |
08:52 | 2 चमचे मोड आलेल्या वेलीच्या शेंगांची पूड |
08:56 | वेलीच्या शेंगांची पूड बनवण्यासाठी - त्याच मालिकेच्या दुसर्या ट्युटोरिअलमध्ये दिलेल्या सूचना पाहा. |
09:04 | कृती - कढईत 1 चमचा तूप गरम करा. |
09:09 | मेथीची पाने घाला व 2-3 मिनिटे परता. |
09:13 | ते एका स्वच्छ ताटात काढून घ्या आणि काही वेळ थंड होऊ द्या. |
09:18 | नंतर, ग्राईंडर किंवा मिक्सरने त्याचा घट्ट रस्सा बनवा. |
09:23 | घट्ट रस्सा एक मिनिट मंद आचेवर शिजू द्या. त्यात 2 चमचे वेलीच्या शेंगांची पूड घाला. |
09:31 | गुठळ्या होऊ नये म्हणून हे चांगले मिसळा. |
09:35 | आवश्यक असल्यास त्यात उकळून थंड केलेले पाणी घाला. |
09:40 | आता त्यात 2 चमचे नारळाचे वाटण घाला. |
09:44 | नारळाचे वाटण बनवण्यासाठी - ताजे खोवलेले खोबरे घ्या आणि बारीक वाटा. |
09:51 | नंतर हे मिश्रण पुढच्या 7-8 मिनिटांसाठी सतत ढवळत मंद आचेवर शिजू द्यावे. |
09:58 | आणि मेथीची पाने व वेलीच्या शेंगांची लापशी तयार आहे. |
10:03 | ही मेथीची पाने व वेलीच्या शेंगांची लापशी प्रथिने, ओमेगा -3 फॅटी एसिड |
10:10 | फोलेट, लोह |
10:12 | कॅल्शियम, फॉस्फरस |
10:14 | झिंक आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. |
10:16 | ही पाककृती तयार करताना, आधी सांगितल्याप्रमाणे धान्य किंवा विविध धान्य आणि बाजरी एकत्र करण्यास विसरू नका. |
10:27 | पाचवी पाककृती आहे – कोद्रा आणि चण्याचा घट्ट रस्सा. |
10:32 | साहित्य - 2 चमचे कोद्रा |
10:35 | 2 चमचे मोड आलेले हरभरे |
10:38 | 3 चमचे नारळाचे दूध, 1 चमचा तूप |
10:43 | कृती - स्टीलच्या भांड्यात 2 चमचे कोद्रा घ्या. |
10:48 | ते व्यवस्थित धुवा. नंतर त्यात 3-4 चमचे पाणी घाला. |
10:55 | ते 3-4 शिटी काढून शिजवा. |
10:58 | दरम्यान, 4-5 शिटीपर्यंत हरभरे शिजवा. |
11:04 | मग त्याचा घट्ट रस्सा बनवा. |
11:07 | स्टीलच्या भांड्यात 1 चमचा तूप गरम करा. |
11:11 | त्यात शिजवलेले कोद्रा, हरभऱ्याचा घट्ट रस्सा आणि नारळाचे दूध घाला. चांगले मिसळा. |
11:18 | पुढील 4-5 मिनिटे शिजवा आणि थंड होऊ द्या आता कोद्रा, हरभऱ्याचा घट्ट रस्सा तयार आहे. |
11:27 | हा घट्ट रस्सा - प्रथिने, लोह |
11:30 | फॉस्फरस, मॅग्नेशियम |
11:33 | कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. |
11:36 | ह्यासह आपण 7 महिन्यांच्या मुलांसाठी शाकाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. |