FrontAccounting-2.4.7/C2/Setup-for-Sales-in-FrontAccounting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Setup for Sales in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत :
Sales Types |
00:12 | Sales Persons |
00:14 | Sales Areas |
00:16 | Add and Manage Customers आणि Customer Branches यांचा सेटअप करणे. |
00:22 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:30 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:35 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे. |
00:45 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:52 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:58 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
01:04 | Sales ही विक्रीशी संबंधित एक क्रिया आहे. |
01:08 | दिलेल्या कालावधीत विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवा यांची ही राशी आहे. |
01:14 | आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू. |
01:19 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:27 | login पेज उघडेल. |
01:30 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
Login बटणावर क्लिक करा. |
01:38 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
Sales टॅबवर क्लिक करा. |
01:44 | Sales आणि Customer ची माहिती सेटअप करण्यासाठी Maintenance पॅनेल वापरतात. |
01:50 | आता Sales मधील सेटअपच्या पायऱ्या बघू. |
01:56 | स्टेप 1 - Setup Sales |
01:59 | स्टेप 2 - Setup Customers |
02:03 | Sales च्या सेटअपमधे खालील पर्याय सेट करणे गरजेचे आहे.
|
02:08 | Sales Types |
02:10 | Sales Persons आणि Sales Areas
आता हे कसे करायचे ते जाणून घेऊ. |
02:18 | FrontAccounting इंटरफेसवर परत जा. |
02:22 | Maintenance पॅनेलमधील Sales Types लिंकवर क्लिक करा.
|
02:27 | ह्यात आपल्याला विशिष्ट ग्राहकांसाठी किंमतीची पातळी निश्चित करता येते. |
02:33 | आपण Retail आणि Wholesale हे Sales Types बघू शकतो. |
02:39 | उदाहरणार्थ असे समजूया की आपला बहुतांश व्यवसाय हा Retail आहे. |
02:45 | त्यामुळे आपण रिटेल किंमत ही Base मूल्य सूची म्हणून निश्चित करू. |
02:51 | डिफॉल्ट रूपात, Tax included हे फिल्ड Yes वर सेट केले आहे. |
02:56 | याचा अर्थ sales मधे नेहमी tax समाविष्ट केलेला असेल. |
03:01 | Wholesale शोधून त्याच्या Edit आयकॉनवर क्लिक करा. |
03:06 | Calculation Factor फिल्डवर जा. |
03:09 | तुम्हाला बेस किंमत समायोजित करायची असल्यास Calculation factor टाईप करा. |
03:15 | आपण हे तसेच ठेवणार आहोत. |
03:18 | पुढे Tax included हे फिल्ड आहे. |
03:22 | हिशेब करताना taxes हा घटक असल्यास हा बॉक्स चेक करा. |
03:28 | मी Tax included हा चेकबॉक्स चेक करत आहे. |
03:32 | विंडोच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा. |
03:37 | आपण भरलेली माहिती अपडेट झाल्याचे सूचित करणारा मेसेज दिसेल. |
03:43 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंक क्लिक करा. |
03:48 | आता नवा Sales Person कसा समाविष्ट करायचा ते बघू. |
03:53 | Maintenance पॅनेलमधील Sales Persons लिंकवर क्लिक करा. |
03:58 | येथे Sales Person शी संबंधित आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे. |
04:05 | येथे दाखवल्याप्रमाणे माहिती भरा. |
04:09 | Provision फिल्ड हे Sales Person द्वारे वापरले जाते. |
04:13 | तो जे विकतो त्यावर त्याला commission किंवा provision मिळते. |
04:18 | म्हणून मी Provision फिल्डमधे commission म्हणून 5% टाईप करत आहे. |
04:25 | पुढे Turnover Break Point Level फिल्ड आहे. |
04:29 | हे Sales Person साठी वापरले जाते. |
04:32 | रक्कम break point पेक्षा जास्त असेल तरच त्याला provision मिळेल. |
04:37 | Break point फिल्डमधे एक लाख टाईप करू. |
04:42 | Sales Person ने break point च्या वर विक्री केल्यास त्याला 5% commission मिळेल. |
04:50 | येथे हे एक लाख रूपये आहे. |
04:54 | Sales Person ने break point च्या खाली विक्री केल्यास Provision 2 हे फिल्ड वापरले जाईल. |
05:01 | मी येथे 3 टाईप करत आहे.
म्हणजेच Sales Person ने एक लाखाहून कमी विक्री केल्यास, त्याला 3% commission मिळेल. |
05:12 | विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा. |
05:17 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा. |
05:23 |
आता नवा Sales Area कसा बनवायचा ते पाहू. |
05:28 | Maintenance पॅनेलमधील Sales Areas लिंकवर क्लिक करा. |
05:33 | Sales Area वर आधारित sales orders बनवून आपण dispatches करू शकतो. |
05:40 | तयार करायचे नवीन Area Name टाईप करा.
मी South Mumbai टाईप करत आहे. |
05:47 | केलेले बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा. |
05:53 | अपडेटेड एंट्रीसहित टेबल आपल्याला दिसेल. |
05:58 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा. |
06:03 | Sales Order देण्यापूर्वी आपल्याला, |
06:08 | Add and Manage Customers आणि Customer Branches सेट करावे लागतील.
|
06:14 | Customer ही एक स्वतंत्र व्यक्ती किंवा व्यवसाय आहे जो वस्तू किंवा सेवा खरेदी करतो. |
06:21 | उत्पादने विकण्यासाठी आपल्याला customers समाविष्ट करावे लागतील. |
06:25 | FrontAccounting इंटरफेसवर परत जा. |
06:29 | Maintenance पॅनेलच्या खाली डावीकडे Add and Manage Customers वर क्लिक करा. |
06:36 | येथे दाखविल्याप्रमाणे Customer ची सर्व आवश्यक माहिती भरा. |
06:42 | Customer’s Currency च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Indian Rupees निवडा. |
06:47 | Sales Type or Price List च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Retail पर्याय निवडा. |
06:53 | येथे दाखवल्याप्रमाणे customer च्या संपर्काची माहिती भरा. |
06:58 | मी Sales Person म्हणून Rahul हे नाव निवडत आहे जो मी आधीच तयार केलेला आहे. |
07:05 | आपल्याला उजवीकडे Sales कॉलम दिसेल. |
07:09 | या customer ला लागू असलेले Discount, Credit आणि इतर कंडिशन्स येथे भरा. |
07:16 | मी ही डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवत आहे. |
07:20 | खाली स्क्रॉल करा.
विंडोच्या खालील भागातील Add New Customer बटण क्लिक करा. |
07:28 | The default branch is added असा मेसेज दिसेल. |
07:33 | sales किंवा delivery orders देण्यासाठी प्रत्येक customer ला एक customer branch असली पाहिजे. |
07:40 | प्रथम नव्या Sales Entry साठी हे बदल लागू करणे गरजेचे आहे. खाली स्क्रॉल करा.
|
07:49 | विंडोच्या खालील भागातील Update Customer वर क्लिक करा. |
07:54 | हा मेसेज customer ची माहिती यशस्वीरित्या अपडेट केल्याचे दाखवतो. |
08:00 | FrontAccounting इंटरफेसवर परत जाण्यासाठी Back लिंकवर क्लिक करा. |
08:05 | आता डिफॉल्ट branch समाविष्ट केली का ते पाहू. |
08:11 | Maintenance पॅनेलमधील Customer Branches लिंकवर क्लिक करा. |
08:16 | customer साठी Global ही डिफॉल्ट ब्रँच समाविष्ट झाल्याचे दिसेल. |
08:22 | या एंट्रीमधे बदल करण्यासाठी उजवीकडील Edit आयकॉनवर क्लिक करा. |
08:28 | Sales पॅनेलमधे Sales Area च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून South Mumbai पर्याय निवडा. |
08:36 | इतर फिल्डसमधील माहिती आहे तीच राहू द्या. |
08:40 | Mailing address आणि Billing address मधील customer चा पत्ता सारखाच असेल. |
08:46 | पत्ते वेगळे असल्यास, तुम्ही ते येथे बदलू शकता. |
08:50 | हे बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Update बटण क्लिक करा. |
08:56 | branch यशस्वीरित्या अपडेट झाल्याचा मेसेज वरील भागात आलेला दिसेल. |
09:01 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
09:07 | या पाठात आपण:
Sales Types |
09:13 | Sales Persons |
09:15 | Sales Areas |
09:17 | Add and manage Customers आणि Customer Branches यांचा सेटअप करायला शिकलो.
|
09:23 | असाईनमेंट म्हणून आणखी एक customer समाविष्ट करा. |
09:28 | नव्या customer च्या तपशीलासाठी या पाठाची Assignment लिंक बघा. |
09:34 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
09:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
09:52 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
09:56 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:02 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |