LibreOffice-Suite-Writer/C2/Typing-text-and-basic-formatting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Typing text and Basic Formatting
Author: Manali Ranade
Keywords: Writer
|
|
---|---|
0:01 | लिबर ऑफिस रायटरच्या टेक्स्ट टायपिंग आणि बेसिक फॉरमॅटिंग वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
0:10 | रायटर मध्ये टेक्स्ट अलाईन करणे. |
0:12 | Bullets आणि Numbering |
0:14 | रायटर मधील Cut, Copy आणि Paste हे पर्याय. |
0:18 | 'Bold', 'Italic', आणि 'Underline' हे पर्याय. |
0:21 | रायटर मधील Font Name, Font Size आणि Font color. |
0:26 | प्लेन टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये या विविध पर्यायांचा वापर करून आपले डॉक्युमेंट आकर्षक आणि वाचण्यासाठी अधिक सुटसुटीत बनवता येते. |
0:36 | आपण उबंटु लिनक्स व्हर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत. |
0:47 | आपण प्रथम रायटरमध्ये Aligning Text बद्दल जाणून घेणार आहोत. |
0:50 | आपल्या इच्छेनुसार रायटरमध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडून त्यामध्ये हे विविध पर्याय लागू करू या. |
0:57 | आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेली resume.odt ही फाईल उघडू या. |
1:08 | त्या फाईलध्ये आपण 'RESUME' हा शब्द टाईप करून त्याला पानाच्या मध्यभागी आणले होते. |
1:14 | आता शब्द सिलेक्ट करून 'Align Left' वर क्लिक करा. तुम्हाला 'RESUME' हा शब्द लेफ्ट अलाईन्ड म्हणजेच पानाच्या डाव्या बाजूला सरकलेला दिसेल. |
1:25 | जर आपण 'Align Right' वर क्लिक केले तर आपल्याला 'RESUME' हा शब्द पानाच्या उजव्या बाजूला सरकलेला दिसेल. |
1:32 | जर आपण 'Justify' वर क्लिक केले तर आपल्याला 'RESUME' ह्या शब्दातील अक्षरे पानाच्या उजव्या आणि डाव्या मार्जिनच्या मध्ये एकसमान अंतरावर लिहिलेली दिसतील. |
1:44 | जेव्हा आपल्याकडे टेक्टची एक पूर्ण ओळ किंवा परिच्छेद असेल त्यावेळी हे विविध पर्याय अधिक स्पष्ट होतील. |
1:51 | हे Undo करू या. |
1:54 | Bullets आणि Numbering चा उपयोग मुद्दे स्वतंत्रपणे लिहिण्यासाठी होतो. |
1:58 | प्रत्येक मुद्दा हा Bullet वा Number यांनी सुरू होतो. |
2:02 | या प्रकारे वेगवेगळ्या मुद्यांची डॉक्युमेंटमध्ये आपण स्वतंत्रपणे नोंद करू शकतो. |
2:07 | यासाठी मेनूबारवरील Format या ऑप्शनवर प्रथम क्लिक करा. आणि नंतर 'Bullets and Numbering' वर क्लिक करा. |
2:15 | 'Bullets and Numbering' वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल जो तुम्हाला वेगवेगळ्या टॅबमध्ये उपलब्ध स्टाईल्स दर्शवेल. |
2:26 | Numbering पर्यायामध्ये सुध्दा याचप्रमाणे क्रिया करता येते. आणि प्रत्येक ओळ एका नवीन क्रमांकाने सुरू होते. |
2:34 | आता 'Numbering Type' या स्टाईलखालील दुस-या स्टाईलवर क्लिक करू या. |
2:40 | नंतर 'OK' या बटणावर क्लिक करा. |
2:42 | आता आपण आपले पहिले वाक्य टाईप करण्यास तयार आहोत. |
2:46 | टाईप करा "NAME Colon RAMESH”. |
2:50 | वाक्य टाईप करून झाल्यावर एंटर हे बटण दाबा. तुम्हाला नवीन Bullets Point किंवा नवीन अनुक्रमांक तयार झालेला दिसेल. |
3:05 | गरजेनुसार व निवडलेल्या पर्यायांनुसार Bullets मध्ये Bullets किंवा अनुक्रमांकांमध्ये अनुक्रमांक आपण लिहू शकतो. |
3:13 | आता आपण resume मध्ये दुसरे वाक्य टाईप करू या. FATHER'S NAME colon MAHESH. |
3:20 | पुन्हा Enter बटण दाबा. आणि टाईप करा MOTHER'S NAME colon SHWETA. |
3:27 | त्याचप्रमाणे 'FATHER'S OCCUPATION colon GOVERNMENT SERVENT' आणि 'MOTHER'S OCCUPATION colon HOUSEWIFE' असे टाईप करू या. |
3:39 | तुम्ही बुलेटचे Indent वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी अनुक्रमे Tab आणि Shift Tab चा उपयोग करू शकता. |
3:47 | Bullets and Numbering हा ऑप्शन बंद करण्यासाठी प्रथम HOUSEWIFE या शब्दाच्या पुढे कर्सर नेऊन ठेवा. प्रथम एंटर या बटणावर क्लिक करून मग 'Bullets and Numbering' च्या डायलॉग बॉक्समधील 'Numbering Off' या ऑप्शनवर क्लिक करा. |
4:03 | आपल्याला दिसेल की आता आपण जे नवीन टेक्स्ट टाईप कराल त्यासाठी बुलेट स्टाईल उपलब्ध नाही. |
4:10 | लक्षात घ्या आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये 'NAME' हा शब्द दोन वेळा टाईप केलेला आहे. |
4:14 | समान टेक्स्ट सगळीकडे वारंवार टाईप करण्याऐवजी आपण रायटर मधील "Copy”, “Paste” या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. |
4:21 | ते कसे करायचे ते आपण पाहू. |
4:24 | आता आपण "MOTHER'S NAME” या टेक्स्ट मधील " NAME” हा शब्द डिलिट करू आणि कॉपी-पेस्ट या ऑप्शनच्या मदतीने "NAME” हा शब्द पुन्हा लिहू. |
4:33 | प्रथम 'FATHER'S NAME' या टेक्स्ट मधील 'NAME' या शब्दावर कर्सर ड्रॅग करून सिलेक्ट करा. |
4:40 | आता माऊसचे उजवे बटण क्लिक करून Copy या ऑप्शनवर क्लिक करा. |
4:45 | कर्सर “ "MOTHER'S" या शब्दापुढे नेऊन ठेवा. |
4:48 | पुन्हा माऊसचे उजवे बटण दाबून नंतर 'Paste' या ऑप्शनवर क्लिक करा. |
4:54 | आपल्याला 'NAME' हा शब्द आपोआप पेस्ट झालेला दिसेल. |
4:57 | येथे या पर्यांयासाठी शॉर्टकट कीज सुध्दा आहेत जसे कॉपी साठी CTRL+ C आणि पेस्ट साठी CTRL+V |
5:08 | जेव्हा डॉक्युमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात समान टेक्स्ट लिहायचे असते तेव्हा या पध्दतीचा खूप उपयोग होतो. अशा वेळी आपल्याला समान टेक्स्ट वारंवार लिहिण्याची गरज पडत नाही. |
5:19 | डॉक्युमेंटमध्ये तुम्ही टेक्स्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी Cut आणि Paste या पध्दतीचा उपयोग करू शकता. |
5:26 | आता हे कसे करायचे ते पाहू. |
5:29 | आता प्रथम MOTHER'S या शब्दापुढील 'NAME' हा शब्द डिलिट करा |
5:34 | हा शब्द कट आणि पेस्ट करण्यासाठी प्रथम FATHER'S NAME या वाक्यातील 'NAME' हा शब्द सिलेक्ट करा. |
5:40 | माऊसचे उजवे बटण क्लिक करून मग 'Cut' या ऑप्शनवर क्लिक करा. लक्षात घ्या की FATHER'S या शब्दापुढील 'NAME' हा शब्द आता तेथे उपस्थित नाही. याचाच अर्थ तो कट किंवा डिलिट झाला आहे. |
5:54 | आता कर्सर MOTHER'S या शब्दापुढे नेऊन ठेवा. आणि माऊसचे उजवे बटण क्लिक करा. |
5:59 | 'Paste' या ऑप्शनवर क्लिक करा. |
6:02 | तुम्हाला तो शब्द MOTHER'S या शब्दापुढे पेस्ट झालेला दिसेल. |
6:07 | CTRL+X ही 'Cut' साठी वापरली जाणारी शॉर्टकट की आहे. |
6:11 | टेक्स्ट कॉपी आणि कट करण्याच्या क्रियांमध्ये एकच फरक असतो. तो म्हणजे कॉपी करताना शब्द मूळ जागेवर तसाच राहतो तर कट करताना शब्द मूळ जागेवरून पूर्णपणे काढून टाकला जातो. |
6:27 | FATHER'S शब्दापुढे देखील 'NAME' हा शब्द पेस्ट करा. |
6:31 | 'EDUCATIONAL DETAILS' हे नवे हेडिंग टाईप करा. |
6:35 | रायटरमध्ये "Bullets and Numbering” बद्दल जाणून घेतल्यानंतर आपण कुठल्याही टेक्स्टचे 'Font Name' आणि 'Font Size' कसा बदलायचा किंवा लागू करायचा हे शिकणार आहोत. |
6:45 | आता वरील Format Toolbar मध्ये आपल्याकडे 'Font Name' नामक फिल्ड आहे. |
6:52 | साधारणपणे डीफॉल्ट रूपात 'Liberation Serif ' हे फाँट नेम असते. |
6:57 | Font Name चा उपयोग आपल्या इच्छेनुसार टेक्स्टचा फाँट निवडण्यासाठी आणि बदलण्यासाठी केला जातो. |
7:04 | उदाहरणार्थ "Educational Details” या हेडिंगला वेगळी फाँट स्टाईल आणि फाँट साईज देऊ या. |
7:11 | प्रथम "Educational Details” हे टेक्स्ट सिलेक्ट करून मग 'Font Name' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. |
7:19 | ड्रॉप डाऊन मेनूमध्ये तुम्हाला फाँट नेमचे अनेक पर्याय दिसतील. |
7:25 | यामध्ये 'Liberation San' शोधून त्यावर फक्त क्लिक करा. |
7:29 | तुम्हाला दिसेल की सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फाँट बदलला आहे. |
7:34 | 'Font Name' फिल्डच्या शेजारी आपल्याकडे 'Font Size' नामक फिल्ड आहे. |
7:38 | नावाप्रमाणेच फाँट साईजचा उपयोग, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा आकार कमी जास्त करण्यासाठी किंवा आपल्याला नवीन मजकूर टाईप करताना त्याचा फाँट साईज ठरवण्यासाठी केला जातो. |
7:52 | आता प्रथम "EDUCATIONAL DETAILS” हे टेक्स्ट सिलेक्ट करा. |
7:55 | सध्या त्याचा फाँट साईज 12 दिसत आहे. |
7:58 | आता फाँट साईज या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करून मग 11 वर क्लिक करा. |
8:05 | तुम्हाला टेक्स्टचा फाँट साईज कमी झालेला दिसेल. |
8:09 | अशाच पध्दतीने फाँट साईज वाढवता येतो. |
8:13 | फाँट साईज बद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण रायटरमध्ये फाँटचा रंग कसा बदलायचा हे बघणार आहोत. |
8:21 | 'Font Color' चा वापर आपल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट किंवा टाईप केलेल्या काही ओळींचा रंग निवडण्यासाठी केला जातो. |
8:27 | उदाहरणार्थ "EDUCATIONAL DETAILS” ह्या हेडिंगला रंग देऊ या. |
8:32 | आता पुन्हा "EDUCATIONAL DETAILS” हे टेक्स्ट सिलेक्ट करा. |
8:36 | आता टूलबारवरील 'Font Color' या ऑप्शनमधील डाऊन ऍरोवर क्लिक करा आणि नंतर टेक्स्टला 'Light Green' हा रंग देण्यासाठी फिकट हिरवा रंग असलेल्या चौकटीवर क्लिक करा. |
8:48 | आता तुम्हाला हेडिंगचा रंग फिकट हिरवा झालेला दिसेल. |
8:52 | फाँट साईज या ऑप्शननंतर तुम्हाला 'Bold', 'Italic', आणि 'Underline' नामक तीन पर्याय दिसतील. |
9:00 | नावाप्रमाणेच हे पर्याय आपला मजकूर अनुक्रमे ठळक किंवा आयटॅलिक म्हणजेच तिरपे किंवा अधोरेखित करतात. |
9:07 | त्यासाठी प्रथम "EDUCATIONAL DETAILS” हे हेडिंग सिलेक्ट करा. |
9:11 | आता टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी "Bold” या आयकॉनवर क्लिक करा. |
9:15 | तुम्हाला सिलेक्ट केलेले टेक्स्ट ठळक झालेले दिसेल. |
9:19 | त्याचप्रमाणे तुम्ही "Italic” या आयकॉनवर क्लिक केल्यास टेक्स्ट आयटॅलिक मध्ये बदलेल. |
9:25 | “Underline वर क्लिक करा. |
9:26 | अंडरलाईनवर क्लिक केल्यावर तुमचे टेक्स्ट अधोरेखित होईल. |
9:31 | आता तुम्हाला सिलेक्ट केलेले टेक्स्ट अधोरेखित झालेले दिसेल. |
9:35 | हेडिंगला 'Bold' आणि 'Underline' ठेवण्यासाठी Italic या ऑप्शनवर पुन्हा क्लिक करून ते डिसिलेक्ट करा आणि इतर दोन्ही ऑप्शन सिलेक्ट केलेलेच राहू द्या. |
9:45 | त्यामुळे आता हेडिंग बोल्ड आणि अधोरेखित झालेले आहे. |
9:50 | आपण लिबर ऑफिस Writer वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
9:55 | आपण काय शिकलो ते थोडक्यात : |
9:57 | रायटर मध्ये टेक्स्ट अलाईन करणे. |
10:00 | Bullets आणि Numbering |
10:02 | रायटर मधील Cut, Copy आणि Paste हे ऑप्शन्स. |
10:05 | 'Bold', 'Italic', आणि 'Underline' हे ऑप्शन्स. |
10:09 | रायटर मधील Font Name, Font Size आणि Font color |
10:13 | COMPREHENSIVE ASSIGNMENT: |
10:16 | Bullets आणि Numbering ऍक्टिव्हेट करा |
10:18 | स्टाईल निवडा आणि काही मुद्दे लिहा. |
10:22 | काही टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचे फाँट नेम बदलून ते "Free Sans” करा आणि त्याचा फाँट साईज 16 करा. |
10:29 | टेक्स्ट आयटॅलिक करा. |
10:32 | फाँटचा रंग बदलून तो लाल करा. |
10:35 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
10:38 | *ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:41 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण तो download करूनही पाहू शकता. |
10:46 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:52 | *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:55 | *कृपया अधिक माहितीसाठी आमच्याशी contact@spoken-tutorial.org वर संपर्क करा, |
11:02 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
11:06 | *यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
11:14 | *यासंबंधी माहिती |
11:18 | *spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
11:25 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज ............ नी दिलेला आहे. |
11:30 | *ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |