FrontAccounting-2.4.7/C2/Banking-and-General-Ledger-in-FrontAccounting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Banking and General Ledger in Front Accounting वरील पाठात आपले स्वागत. |
0:07 | या पाठात तयार करायला शिकणार आहोतः
General Ledger Classes |
00:13 | General Ledger Groups आणि
General Ledger Accounts |
00:18 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:26 | FrontAccounting वर्जन 2.4.7. |
00:30 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे |
00:40 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:46 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:52 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
00:58 | आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू. |
01:01 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:09 | login पेज उघडेल. |
01:12 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
Login बटणावर क्लिक करा. |
01:20 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल. |
01:23 | Banking and General Ledger टॅब क्लिक करा. |
01:27 | Maintenance पॅनेलमधे हे पर्याय दिसतील:
GL Accounts |
01:33 | GL Account Groups आणि
GL Account Classes. |
01:38 | कोणतेही transaction सुरू करण्यापूर्वी Charts of Accounts सेट करणे गरजेचे आहे. |
01:43 | FrontAccounting मधील Charts of Accounts हे Type, Class, Group आणि Account यांनी पारिभाषित होतात. |
01:50 | सर्व transactions ही Account, Group आणि Classes यांना चार्ज केली जातात. |
01:56 | यांचा उपयोग करून reporting purposes साठी transactions चे गट बनवले जातात. |
02:00 | FrontAccounting मधे Account हे एखाद्या Group मधे आणि Group हे एखाद्या Class मधे असतात. |
02:06 | याचे प्रतिबिंब Balance Sheet आणि Profit and Loss account statements मधे Account Group प्रमाणे दिसते. |
02:13 | FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाऊ. |
02:17 | General Ledger Account Classes सेट करणे ही पहिली पायरी आहे. |
02:22 | Maintenance पॅनेलमधील GL Account Classes लिंक क्लिक करा. |
02:27 | येथे डिफॉल्ट रूपात Class Name आणि Class Type हे अशाप्रकारे निश्चित केले आहेत:
Assets , Liabilities , Income आणि Expense |
02:38 | तसेच प्रत्येक Class Type साठी एक Class ID सेट केलेला आपल्याला दिसेल. |
02:44 | Account Group चे सेटिंग करण्यापूर्वी class सेट करणे गरजेचे आहे. |
02:49 | आता नवा class कसा समाविष्ट करायचा ते बघू. |
02:53 | Class ID फिल्डमधे 5 टाईप करा. Class ID ची व्हॅल्यू युनिक असली पाहिजे. |
03:00 | Class Name फिल्डमधे Equity टाईप करा. |
03:04 | Class Type च्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.
आपण Assets , Liabilities, Equity, Income, Cost of Goods Sold आणि Expense ही डिफॉल्ट सूची बघू शकतो. |
03:21 | हे Class Type FrontAccounting च्या Balance Sheet मधे दाखवले जातात. |
03:26 | Class Type साठी Equity पर्याय निवडा. |
03:29 | विंडोच्या खालील भागात असलेले Add new बटण क्लिक करा. |
03:33 | 'New account class has been added' असा मेसेज दिसेल. |
03:38 | येथे तिसऱ्या ओळीत “Equity” हा नवा class समाविष्ट झालेला दिसेल. |
03:44 | कारण डिफॉल्ट रूपात Equity हा Class Type तिसऱ्या श्रेणीबध्द स्तरावर आहे. |
03:50 | एखादा नवा Class समाविष्ट झाल्यास तो त्या Class Type ची डिफॉल्ट जागा घेईल. |
03:56 | आता GL Groups कसे समाविष्ट करायचे ते पाहू. |
04:00 | Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा. |
04:03 | Maintenance पॅनेलमधील GL Account Groups लिंक क्लिक करा. |
04:08 | आपल्याला दिसेल की, Class च्या खाली डिफॉल्ट Group Name आहेत, जे GL Account Groups दाखवतात. |
04:15 | Class प्रमाणे Group ID सेट केल्याचे बघू शकतो. |
04:20 | ID फिल्डमधे, 12 हा नवा Group ID टाईप करा. |
04:24 | Name फिल्डमधे Group Name म्हणून Fixed Assets टाईप करा. |
04:29 | आधी असलेल्या कोणत्याही subgroupशी “Fixed Assets” हे Group Name संबंधित नाही. |
04:35 | म्हणून Subgroup फिल्डमधे None हाच पर्याय ठेवा. |
04:40 | आता Class च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. |
04:44 | Charts of Accounts नुसार Fixed Assets हे Assets या class खाली येते.
म्हणून Class साठी Assets पर्याय निवडा. |
04:53 | हे बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा. |
04:59 | आपल्याला "This account Group ID is already in use" हा एरर मेसेज दिसेल. |
05:06 | त्यामुळे प्रत्येक Group Name साठी युनिक Class ID देणे गरजेचे आहे. |
05:11 | Group ID बदलून तो 13 करू. |
05:15 | विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा. |
05:19 | यावेळी "New account type has been added" हा मेसेज दिसेल. |
05:25 | class “Assets” मधे नवीन Group Name यादृच्छिकपणे (रँडमली) समाविष्ट होईल. |
05:30 | असे आपण स्वतःचे Group Name समाविष्ट करू शकतो. |
05:34 | आता GL Accounts कसे समाविष्ट करायचे ते पाहू. |
05:38 | Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा. |
05:42 | नंतर Maintenance पॅनेलमधील GL Accounts लिंक क्लिक करा. |
05:47 | येथे युनिक कोड टाईप करणे गरजेचे आहे. हे फिल्ड अनिवार्य आहे. |
05:53 | Account Code फिल्डमधे मी 1100 हा कोड टाईप करत आहे. |
06:00 | तुमच्या पसंतीचा कोड देखील देऊ शकता. |
06:04 | Account Name फिल्डवर क्लिक करा.
"Land and Building" हे Account Name टाईप करा. |
06:11 | तुम्ही तुमच्या पसंतीचे नाव द्या. |
06:14 | Account Group च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Fixed Assets हा Account Group निवडा. |
06:20 | Charts of Accounts नुसार Land and Building हे Account Name Fixed Assets या Group खाली असले पाहिजे. |
06:28 | पुढे Account status या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.
Active हे status निवडा. |
06:35 | विंडोच्या खालील भागातील Add Account बटण क्लिक करा. |
06:40 | "New account has been added" हा मेसेज दिसेल. |
06:45 | आता वरच्या भागातील New account या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
येथे नवीन समाविष्ट झालेला Account दिसेल. |
06:54 | येथे दाखवल्याप्रमाणे प्रत्येक संस्थेचा स्वतःचा account codes चा सेट असेल. |
07:00 | तसेच वरील स्टेप्सचे अनुसरण करून आपले स्वतःचे GL Accounts तयार करू शकतो. |
07:06 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
07:12 | या पाठात आपण,
General Ledger Classes , General Ledger Groups and General Ledger Accounts तयार करायला शिकलो. |
07:22 | असाईनमेंट-
खालील तपशील वापरून - Cash आणि Capital ही नवी GL Accounts बनवा. हे बदल सेव्ह करा. |
07:31 | आता आपल्या कंपनीसाठी नवीन GL Accounts असलेले Charts of Accounts सेट केलेले आहेत. |
07:38 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:46 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
07:55 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
07:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:05 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |