FrontAccounting-2.4.7/C2/Installation-of-FrontAccounting-on-Windows-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:05, 29 May 2020 by Manali (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 FrontAccounting installation on Windows OS वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आपण शिकणार आहोत XAMPP इन्स्टॉल करणे
00:12 FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे
00:15 Windows OS मधे डेटाबेस सेटअप करणे आणि
FrontAccounting  इन्स्टॉल करणे. 
00:21 या पाठासाठी मी वापरणार आहे-

Windows OS वर्जन 10

00:26 XAMPP 5.5.19 द्वारे मिळवलेले Apache, MySQL आणि PHP
00:32 FrontAccounting वर्जन 2.4.7
00:36 फायरफॉक्स वेब ब्राऊजर आणि चालू इंटरनेट कनेक्शन.
00:41 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजरही वापरू शकता.
00:44 FrontAccounting ही server वर आधारित Accounting System असल्याने,

आपण web server चा सेटअप करण्यासाठी XAMPP वापरणार आहोत.

00:52 वेब ब्राऊजर उघडा.

ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करून Enter दाबा.

00:59 हे आपल्याला XAMPP च्या डाऊनलोड पेजवर नेईल.
01:03 येथे सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी XAMPP डाऊनलोड उपलब्ध आहेत.
01:08 हिरवे बटण क्लिक करून XAMPP चे नवीनतम वर्जन डाऊनलोड करता येते.
01:13 परंतु सॉफ्टवेअरच्या आवश्यकतेनुसार XAMPP ची वेगवेगळी वर्जन लागू शकतात.
01:19 येथे मला XAMPP वर्जन 5.5.19 हवे आहे.
01:24 XAMPP Windows या लिंकवर क्लिक करा.
01:28 हे आजपर्यंतच्या XAMPP च्या सर्व वर्जन्सची सूची असलेल्या पेजवर नेईल.
01:32 येथे इन्स्टॉल करण्यासाठी मी XAMPP वर्जन 5.5.19 निवडत आहे.
01:39 डाऊनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
01:43 आता Save file वर क्लिक करा.

आपल्या मशीनवर exe फाईल डाऊनलोड होईल.

01:51 ही फाईल ज्या फोल्डरमधे डाऊनलोड झाली आहे तो उघडा.
01:55 इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी फाईलवर डबल क्लिक करा.
01:59 User Account Control हा डायलॉग बॉक्स उघडेल.

Yes बटणावर क्लिक करा.

02:06 तुमच्या मशीनवर antivirus सॉफ्टवेअर असल्यास कदाचित एक पॉप अप विंडो उघडेल.

Yes बटणावर क्लिक करा.


02:15 पुढील विंडोमधील वॉर्निंग मेसेज बंद करण्यासाठी OK वर क्लिक करा.
02:21 आता Setup wizard चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:25 विचारणा झाल्यावर Next वर क्लिक करा. येथे दाखवल्याप्रमाणे इन्स्टॉलेशनच्या सर्व स्टेप्सचे पालन करा.
02:31 Learn more about Bitnami for XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करून पुढे जाण्यासाठी

Next बटणावर क्लिक करा.

02:40 इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर Do you want to start the Control Panel now? हा चेकबॉक्स अनचेक करा.
02:47 शेवटी Finish बटणावर क्लिक करा.
02:51 आता मशीनवर XAMPP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले का हे तपासू.
02:56 स्क्रीनच्या डाव्या बाजूला खाली Windows search bar वर क्लिक करून त्यात xampp टाईप करा.
03:02 सूचीमधे आपल्याला XAMPP Control Panel दिसेल.
03:06 XAMPP Control Panel वर राईट क्लिक करून Run as administrator पर्याय निवडा.
03:12 XAMPP Control Panel मधे Apache आणि MySQL सर्व्हिसेस कार्यान्वित असल्याची खात्री करा.
03:18 नसल्यास संबंधित सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी START बटणावर क्लिक करून services सुरू करा.
03:24 तुम्हाला कदाचित यापैकी काही एरर मेसेजेस मिळू शकतात:

Apache shutdown unexpectedly

03:30 Port 80 in use for Apache Server'
03:34 Unable to connect to any of the specified MySQL hosts for MySQL database.”
03:41 याचे कारण Apache आणि MySQL साठी देण्यात आलेले डिफॉल्ट पोर्ट दुसऱ्या सॉफ्टवेअरने वापरलेले आहे.
03:47 Apache चा डिफॉल्ट पोर्ट नंबर 80 आणि MySQL चा 3306 आहे.
03:55 ही पोर्टस बदलण्यासाठी या पाठातील Additional Reading Material चा संदर्भ घ्या.
04:00 आणि पुढे जाण्यापूर्वी योग्य पोर्ट नंबर द्या.

उदाहरणार्थ: 8080

04:07 आता फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा.
04:11 ऍड्रेसबारमधे localhost टाईप करून एंटर दाबा.

आपल्याला XAMPP चा स्क्रीन दिसला पाहिजे.

04:19 भाषा निवडण्यासाठी पर्याय दाखवले तर English पर्याय निवडा.

आपण XAMPP homepage वर आहोत.

04:27 आता FrontAccounting डाऊनलोड करू.
04:30 वेब ब्राऊजरमधे आणखी एक टॅब उघडा आणि या URL वर जा.
04:37 frontaccounting-2.4.7.zip वर क्लिक करा.
04:42 लगेच डाऊनलोड होणे सुरू होईल.

Save File वर क्लिक करून OK वर क्लिक करा.

04:49 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, फाईल डाऊनलोड झालेला फोल्डर उघडा.
04:54 ही फाईल मी डाऊनलोड केली आहे.
04:57 फाईलवर राईट क्लिक करून Extract Here पर्याय निवडा.
05:01 एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यावर मी FrontAccounting फोल्डरचे नाव बदलून account असे करत आहे.
05:07 फोल्डरचे नाव बदलणे ऐच्छिक आहे.

परंतु हे एकाच मशीनवर असलेल्या FrontAccounting च्या अनेक फोल्डर्सपैकी आपला फोल्डर निवडण्यास मदत करते.

05:17 आता आपण account फोल्डर वेब सर्व्हरच्या root directory मधे हलवू.
05:22 c:\xampp\htdocs” हा root directory चा पाथ आहे.
05:29 account फोल्डरवर राईट क्लिक करून Copy पर्यायावर क्लिक करा.
05:33 डावीकडील भागात “This PC” वर क्लिक करा ज्याला “My Computer” असेही म्हणतात.
05:39 नंतर “Local Disk (C:)” म्हणजेच C drive वर डबल क्लिक करा.

xampp फोल्डरमधील htdocs फोल्डरमधे जा.

05:47 htdocs मधे रिकाम्या जागेत राईट क्लिक करून Paste पर्याय निवडा.
05:53 XAMPP server यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे.
05:57 FrontAccounting installer वेब सर्व्हरच्या root डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा.
06:02 पुढे जाण्यापूर्वीFrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे.
06:07 हे phpmyadmin मधे करू जो MySQL साठीचा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे.

हे XAMPP इन्स्टॉल करताना त्याबरोबरच आले आहे.

06:17 वेब ब्राऊजरमधील XAMPP पेजवर परत जाऊ.
06:21 XAMPP पेजवर डावीकडील मेनूमधे phpMyadmin वर क्लिक करा.
06:27 वरील भागात असलेल्या मेनूमधील Users वर क्लिक करून मग Add User क्लिक करा.
06:33 उघडलेल्या नव्या विंडोमधे तुमच्या पसंतीचे User name टाका.

मी माझे User name म्हणून frontacc टाईप करत आहे.

06:42 Host च्या ड्रॉपडाऊन सूचीतून Local हा पर्याय निवडा.
06:46 password च्या टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा.
06:50 मी पासवर्ड म्हणून admin123 टाईप करणार आहे.
06:54 Re-type च्या टेक्स्ट बॉक्समधे तोच पासवर्ड टाईप करा.
06:58 सध्या Generate Password prompt वर क्लिक करू नका.
07:02 Database for user account खाली -

Create database with the same name and grant all privileges हा पर्याय दिसेल.

07:10 तो पर्याय निवडून खाली स्क्रॉल करा.
07:14 पेजच्या खालील भागात उजवीकडील Go बटणावर क्लिक करा.
07:18 You have added a new user” हा मेसेज दिसेल.
07:22 म्हणजेच frontacc नावाचा नवा डेटाबेस frontacc या युजरसहित तयार झाला आहे.
07:29 हे युजरनेम आणि पासवर्ड केवळ डेटाबेसमधे लॉगिन करण्यासाठी आहे.
07:34 युजरनेम, पासवर्ड आणि डेटाबेस यांच्या नावांची नोंद ठेवा.
07:38 नंतर FrontAccounting चे इन्स्टॉलेशन करताना त्यांची गरज लागेल.
07:43 Database चे नाव आणि username सारखे नसले तरी चालेल.

वेगळी नावे हवी असल्यास प्रथम डेटाबेस तयार करा. नंतर त्यासाठी युजर तयार करा.

07:53 नावांच्या प्रथेप्रमाणे username मधे स्पेस असता कामा नये.
07:59 XAMPP कार्यान्वित झाले असून डेटाबेस तयार आहे.
08:02 आपण Front Accounting इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहोत.
08:07 वेबब्राऊजरमधे नवीन टॅब उघडा.

ऍड्रेसबारमधे localhost/account टाईप करून Enter दाबा.

08:17 आपल्याला FrontAccounting च्या वेबपेजवर

Step 1: System Diagnostics असे दिसत आहे.

08:22 Select install wizard language साठी English हा पर्याय निवडल्याची खात्री करा.
08:26 पेजवर खाली स्क्रॉल करा. तेथील Continue बटणावर क्लिक करा.
08:31 Step 2: Database Server Settings हे पुढील वेबपेजचे शीर्षक आहे.
08:37 येथे मी Server Host म्हणून localhost ठेवत आहे.

Server Port चा बॉक्स रिकामा ठेवत आहे.

08:44 तुम्ही MySQL चा 3306 हा डिफॉल्ट port number बदलला असल्यास तो येथे टाईप करा.
08:52 आपण आधी तयार केलेला पुढील तपशील भरू-

database Name मधे frontacc

09:00 database user मधे frontacc
09:03 आणि database password मधे admin123
09:07 उर्वरित पर्याय भरू नका. खालील Continue बटणावर क्लिक करा.
09:12 पुढे तुम्ही तुमच्या company चा तपशील भरणार आहात.

कसे ते मी दाखवणार आहे.

09:19 Company Name मधे ST Company Pvt Ltd टाईप करा.
09:24 मी Admin Login म्हणून admin आणि

Admin Password म्हणून spoken टाईप करत आहे.

09:31 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही पासवर्ड द्या.
09:34 तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करा.

हा login password लक्षात ठेवा.

09:40 पुढे Charts of Accounts साठी दोन पर्याय दिसतील.
09:44 Standard new company American COA हा पर्याय निवडू.
09:49 Default Language साठी English हा पर्याय निवडा.
09:52 Install बटणावर क्लिक करा.
09:55 स्क्रीनवर शेवटी, FrontAccounting ERP has been installed successfully हा मेसेज दिसेल जो आपले इन्स्टॉलेशन यशस्वी झाल्याचे सांगतो.


10:06 FrontAccounting च्या इंटरफेसवर लॉगिन करण्यासाठी Click here to start ही लिंक क्लिक करा.
10:12 लॉग-इन स्क्रीनमधे पुढील तपशील भरा:

User name म्हणून admin

Password म्हणून spoken

10:22 Company साठी ST Company Pvt. Ltd हा पर्याय निवडून

Login वर क्लिक करा.

10:28 हे आपल्याला Front Accounting Administration पेजवर नेईल.
10:32 या पेजवर आपल्याला विविध टॅब्ज दिसतील.

ते कसे वापरायचे हे आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत.

10:39 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

10:44 या पाठात आपण शिकलो,

XAMPP डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे

10:50 FrontAccounting डाऊनलोड आणि इन्स्टॉल करणे
10:53 विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर डेटाबेस सेटअप करणे.
10:57 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


11:05 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


11:13 तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

11:18 ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.

प्रश्न थोडक्यात विचारा . आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल.

11:27 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
11:32 कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.

त्यामुळे गोंधळ कमी होईल.

11:39 यामुळे सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.
11:44 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


11:49 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali