FrontAccounting-2.4.7/C2/Journal-Entry-and-Balance-Sheet-in-FrontAccounting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Journal Entry and Balance sheet in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोतः
Journal Entry पास करणे |
00:12 | Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि transaction Void करणे. |
00:18 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:26 | FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:30 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग |
00:37 | तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे |
00:40 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:46 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:52 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
00:58 | आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू. |
01:02 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:10 | login पेज उघडेल. |
01:12 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
Login बटणावर क्लिक करा. |
01:20 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल. |
01:23 | व्यवसायात capital कसे भरायचे ते पाहू. |
01:27 | 5,00,000 रूपयांच्या भांडवलासह व्यवसाय सुरू झाला ही Journal एंट्री आहे. |
01:32 | ही Entry असेल Cash account debit 5,00,000 व To Capital Account 5,00,000
( Being capital introduced in the business) |
01:41 | यासाठी Journal एंट्री पास करा. |
01:45 | Banking and General Ledger टॅबवर क्लिक करून Journal Entry ची लिंक क्लिक करा. |
01:52 | Journal date फिल्डमधे डिफॉल्ट डेट म्हणून आजची डेट दिसेल. |
01:57 | transaction साठी reference number देखील आलेला दिसेल.
हा auto-generated आहे. |
02:05 | Account Description च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Cash हा पर्याय निवडा. |
02:11 | Debit च्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून पाच लाख रक्कम लिहा. |
02:17 | Debit एंट्री सेव्ह करण्यासाठी त्या ओळीतील Add Item वर क्लिक करा. |
02:23 | पुन्हा Account Description च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून Capital पर्याय निवडा. |
02:30 | नंतर Credit च्या टेक्स्टबॉक्सवर क्लिक करून पाच लाख रक्कम लिहा. |
02:38 | ही Credit एंट्री सेव्ह करण्यासाठी त्या ओळीतील Add item वर क्लिक करा. |
02:44 | आता Memo फिल्डवर या Journal Entry चा तपशील देण्यासाठी क्लिक करा. |
02:49 | येथे Being capital introduced in the business हे टेक्स्ट लिहा. |
02:54 | ही एंट्री सेव्ह करण्यासाठी विंडोतील खालच्या Process Journal Entry बटणावर क्लिक करा. |
03:01 | वरील भागात,
“Journal entry has been entered” मेसेज दिसेल. |
03:07 | आपल्याला पुढील पर्याय दिसतील: View this Journal Entry , Enter New Journal Entry |
03:12 | Add an Attachment आणि Back |
03:17 | एकेक करून त्याबद्दल जाणून घेऊ. |
03:20 | View this Journal Entry या लिंकवर क्लिक करा. |
03:24 | नवी पॉपअप विंडो उघडेल. |
03:27 | आपण जी एंट्री आत्ताच केली होती त्याचे General Ledger Transaction Details दाखवेल. |
03:33 | पुढे लागणाऱ्या संदर्भासाठी या transaction चा Print लिंकद्वारे प्रिंटआऊट घेता येतो. |
03:39 | Close लिंकवर क्लिक करून ही विंडो बंद करा. |
03:43 | आता Enter New Journal Entry पर्यायावर क्लिक करा. |
03:48 | पुढील नव्या Journal Entry साठी नवे पेज उघडेल. |
03:52 | पाठ थांबवा आणि पुढील असाइनमेंट करा. |
03:56 | 50,000 रूपयांत खरेदी केलेल्या वस्तूंसाठी Journal एंट्री पास करा. |
04:01 | ही Entry आहे: Office furniture and Equipments Account debit
To cash Account for Rs 50,000 |
04:09 | Memo मधे Purchased Office furniture and Equipments for Rs 50,000 टाईप करा. |
04:15 | Process the journal entry वर क्लिक करा. |
04:19 | आता Add an Attachment लिंकवर क्लिक करा. |
04:23 | आपल्याला ही फिल्डस दिसतील:
Transaction |
04:27 | Description आणि Attached file |
04:31 | Attached file चा वापर पास केलेल्या Journal entry शी संबंधित दस्तऐवज जोडण्यासाठी होतो. |
04:38 | मी आधीच तयार करून संगणकावर सेव्ह केलेले sample voucher आता जोडूया. |
04:44 | Browse बटणावर क्लिक करून ती फाईल सेव्ह केलेला फोल्डर शोधा. |
04:51 | मी Desktop फोल्डरमधून Sample-Voucher.pdf फाईल निवडत आहे. |
04:57 | आता जोडलेली फाईल येथे दिसत आहे. |
05:01 | या पाठाच्या Code files लिंकमधे हे voucher दिलेले आहे. |
05:06 | ते डाऊनलोड करून सराव करताना त्या फाईलचा उपयोग करा. |
05:11 | नंतर Add new बटणावर क्लिक करा. |
05:14 | Attachment has been inserted हा मेसेज दिसेल. |
05:19 | तसेच अपलोड केलेली फाईल टेबलमधे समाविष्ट झालेली दिसेल. |
05:25 | परत मागे जाण्यासाठी Back पर्यायावर क्लिक करा. |
05:28 | Balance Sheet मधे ही Journal एंट्री प्रतिबिंबित झालेली पाहू. |
05:34 | हे करण्यासाठी Banking and General Ledger च्या टॅबवर क्लिक करा. |
05:39 | Balance Sheet Drilldown लिंकवर क्लिक करा. |
05:43 | येथे हे transaction प्रतिबिंबित झालेले बघू शकतो. |
05:47 | भविष्यात आपल्याकडे अनेक journal एंट्रीज असतील तेव्हा ही सूची खूपच मोठी असेल. |
05:54 | आता transaction कसे void म्हणजेच रद्द करायचे ते पाहू. |
05:58 | Setup टॅबवर क्लिक करा.
Maintenance पॅनेलमधील Void a transaction लिंकवर क्लिक करा. |
06:06 | हा पर्याय एंट्री डिलीट करण्यासाठी/काढून टाकण्यासाठी वापरला जातो. |
06:11 | येथे आपल्या एंट्रीज दाखवणारा रेफरन्स नंबर बघू शकतो. |
06:15 | void transaction करण्यासाठी 002/2019 हा रेफरन्स निवडू. |
06:23 | एंट्री डिलिट करण्यापूर्वी तिचा तपशील पडताळून बघण्यासाठी GL कॉलममधील आयकॉनवर क्लिक करा. |
06:30 | Office furniture and Equipments साठी 50,000 रूपयांत खरेदी केलेल्या सामानाची ही एंट्री दिसेल. |
06:38 | विंडोच्या खालील भागातील Close लिंक क्लिक करा. |
06:42 | आता Select कॉलममधील आयकॉनवर क्लिक करा. |
06:46 | आयकॉन सिलेक्ट केल्यावर transaction नंबर आणि voiding तारीख दिसेल. |
06:52 | Void Transaction बटणावर क्लिक करा. |
06:55 | हे Are you sure you want to void this transaction? This action cannot be undone हा मेसेज दाखवेल. |
07:03 | मी Proceed बटणावर क्लिक करते. |
07:07 | लगेच
Selected transaction has been voided असा मेसेज दिसेल. |
07:14 | गरजेनुसार transaction अशाप्रकारे void करू शकतो. |
07:19 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
07:25 | या पाठात आपण शिकलो,
Journal Entry पास करणे. |
07:30 | Balance Sheet मधे त्याचे प्रतिबिंब बघणे आणि
transaction Void करणे. |
07:35 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
07:43 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
07:51 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
07:55 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:00 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद.
|