COVID19/C2/Making-a-protective-face-cover-at-home/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:34, 14 May 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 संरक्षक मुखावरण घरी बनवण्याच्या, स्पोकन ट्युटोरियलच्या या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोतः
00:10 संरक्षक मुखावरण घालण्याची आवश्यकता.
00:14 आरोग्य कर्मचारी आणि कोविड – 19 च्या रुग्णांसाठी महत्वपूर्ण सूचना.
00:20 संरक्षक मुखावरणाशी संबंधित सुरक्षिततेची खबरदारी.
00:25 शिवणयंत्राचा वापर करून आणि न करता मुखावरण तयार करणे.
00:32 संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी आणि ते काढताना घ्यायची काळजी.
00:38 संरक्षक मुखावरण निर्जंतुक करण्याची आणि नीट ठेवण्याची योग्य पध्दत.
00:44 आपण संरक्षक मुखावरण घालण्याची गरज प्रथम समजून घेणे आवश्यक आहे.
00:50 करोना विषाणुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुखावरण घालणे महत्वाचे आहे.
00:56 भारतातील लोकवस्ती दाट असल्याने मुखावरण घालण्याची विशेष शिफारस केली जाते.
01:03 करोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारची मुखावरणे वापरली जात आहेत.
01:10 त्यापैकी घरगुती संरक्षक मुखावरण बनवणे सोपे असून ते पुन्हा वापरता येऊ शकते.
01:18 पुढे जाण्यापूर्वी कृपया महत्वाच्या सूचना लक्षात घेऊ.
01:23 घरगुती मुखावरण हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नाही.
01:28 तसेच ते कोविड – 19 च्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी नाही.
01:37 कोविड – 19 च्या रुग्णांनी घरगुती मुखावरण वापरू नये.
01:42 या सर्व लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेली विशिष्ट संरक्षक सामग्री वापरावी.
01:48 सुरक्षेची काळजी घेण्यासाठी इतर काही गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत.
01:53 घरगुती मुखावरणे संपूर्ण संरक्षण देत नाहीत.
01:58 ते केवळ संसर्गित व्यक्तीच्या शिंक किंवा खोकल्यातून, हवेत पसरलेले थेंब आपल्या नाका-तोंडात जाण्याची शक्यता कमी करतात.
02:06 मुखावरण न धुता कधीही वापरू नये.
02:10 अनेक लोकांत एक मुखावरण वापरू नये.
02:14 दोन व्यक्तींमधे नेहमीच कमीत कमी 2 मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे.
02:21 साबणाने वारंवार 40 सेकंद तुमचे हात धुवा.
02:26 आता पुर्नवापर करण्यायोग्य मुखावरण तयार करण्याची सोपी पध्दत बघणार आहोत.
02:33 हे घरात सहज उपलब्ध असलेल्या सुती कापडाच्या सहाय्याने बनवता येते.
02:38 हे तयार करताना त्याने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल याची खात्री करा.
02:44 आपल्याला ते चेहऱ्यावर सहजपणे बांधता आले पाहिजे.
02:49 घरगुती मुखावरण, शिवणयंत्र वापरून किंवा न वापरता सहजपणे बनवता येते.
02:55 प्रथम आपण शिवणयंत्र वापरून संरक्षक मुखावरण कसे तयार करायचे ते पाहू.
03:02 आपण 100% सुती कापड वापरणार आहोत.
03:06 कापडाचा रंग कुठलाही असला तरी चालेल.
03:10 मुखावरण तयार करण्यापूर्वी कापड स्वच्छ धुऊन घ्या.
03:13 आणि ते पाच मिनिटे मिठाच्या पाण्यात उकळवून घ्या.
03:17 कापड चांगले वाळवून घ्या आणि मग वापरा.
03:21 इतर आवश्यक साहित्यः
03:23 कापडाच्या चार पट्ट्या
03:26 कात्री

आणि शिवणयंत्र.

03:29 आता मी संरक्षक मुखावरण बनविण्याची पध्दत समजावून सांगणार आहे.
03:34 प्रथम मुखावरणासाठीचे कापड कापून घेऊ.
03:39 प्रौढांसाठी ते 9 इंच x 7 इंच असावे.
03:44 लहान मुलांसाठी ते 7 इंच x 5 इंच असावे.
03:50 आता पट्ट्या कापून घेऊ.
03:53 प्रौढांसाठी, मुखावरण बांधण्यासाठी आणि पायपीनसाठी चार पट्ट्या कापा.
03:59 1.5 इंच x 5 इंच आकाराचे प्रत्येकी दोन तुकडे.
04:05 तसेच 1.5 इंच x 40 इंच आकाराचे प्रत्येकी दोन तुकडे.
04:11 पायपीन म्हणून वापरण्याकरता कापडाच्या एका बाजूला 1.5 इंच x 5 इंचाची पट्टी जोडा.
04:19 कापडाच्या खालच्या बाजूला तोंड केलेल्या प्रत्येकी 1.5 इंचाच्या तीन घड्या घाला.
04:28 घड्या घातलेले कापड फिरवून घेऊन दुसऱ्या बाजूसही त्याचप्रकारे घड्या घाला.
04:34 आता त्या कापडाची उंची 9 इंचावरून 5 इंच होईल.
04:42 दोन्ही बाजूंनी पायपीन लावून घड्या नीट बसवून घ्या.
04:46 सर्व घड्या खालच्या दिशेने तोंड केलेल्या स्थितीत असल्याची खात्री करा.
04:51 पुढे मुखावरणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला 40 इंचाची पट्टी जोडा.
04:59 पुन्हा एकदा या दोन्ही पट्ट्या तीन वेळा दुमडून त्या शिवून टाका.
05:05 तुमचे मुखावरण आता वापरण्यासाठी तयार आहे.
05:09 ते घालताना मुखावरण आणि आपला चेहरा यामधे अजिबात अंतर नसावे.
05:15 चेहऱ्याच्या बाजूच्या मुखावरणाच्या घड्या खालच्या दिशेने असाव्यात.
05:21 मुखावरण पुन्हा उलट करून कधीही वापरू नका.
05:24 आणि प्रत्येक वापरानंतर ते स्वच्छ धुवा.
05:28 आपल्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका.
05:31 घरी गेल्यावर लगेच हात स्वच्छ धुवा.
05:35 आता आपण शिवणयंत्राचा वापर न करता मुखावरण कसे बनवायचे ते पाहू.
05:41 त्यासाठी आपल्याला आवश्यक आहेः

100% सुती कापड किंवा पुरूषांचा मोठा रूमाल


05:47 आणि दोन रबरबँड.
05:50 आता मी संरक्षक मुखावरण बनवण्याची पध्दत समजावून सांगणार आहे.
05:55 हातरूमालाची एक कड त्याच्या मध्यभागाच्या थोडी पुढे जाईल अशा तऱ्हेने घडी घाला.
06:01 आता दुसरी कड पहिल्या कडेवर येईल अशी घडी घाला.
06:07 आता पुन्हा याची मध्यभागी घडी घाला.
06:11 एक रबरबँड घेऊन ते रूमालाच्या डाव्या बाजूला बांधा.
06:15 आता दुसऱ्या बाजूला दुसरे रबरबँड बांधा.
06:20 दोन रबरबँडमधील जागा पुरेशी मोठी असल्याची खात्री करा.
06:25 ज्यामुळे आपले तोंड व नाक पूर्णपणे झाकले जाईल.
06:30 रूमालाच्या एका रबरबँडकडील बाजूची रबरबँडवर घडी घाला.
06:36 असे दोन्ही बाजूंसाठी करून घ्या.
06:38 आता एका बाजूची घडी दुसऱ्या बाजूच्या घडीच्या आत घाला.
06:43 आता आपले मुखावरण वापरण्यासाठी तयार आहे.
06:47 मुखावरण घालण्यासाठी रबरबँड कानामागे अडकवा.
06:53 आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नाका-तोंडाभोवती मुखावरण घट्ट बसेल याची खात्री करा.
07:00 त्या दोहोंमधे कोणतेही अंतर असू नये.
07:04 घरगुती संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करा.
07:10 मुखावरण घालण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुवा.
07:14 मुखावरण ओले किंवा दमट झाले तर लगेच दुसरे मुखावरण घाला.
07:21 मुखावरणाचा एकदा वापर झाल्यावर ते पुढच्या वेळी वापरण्यासाठी धुऊन घ्या.
07:27 कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे मुखावरण असणे आवश्यक आहे.
07:32 मुखावरण काढताना, त्याच्या पुढच्या किंवा कोणत्याही इतर पृष्ठभागाला हात लावू नका.
07:38 फक्त मागील दोऱ्या किंवा रबरबँड यांनी ते काढा.
07:43 दोरी असलेल्या मुखावरणाची खालची दोरी आधी सोडा आणि नंतर वरची सोडा.
07:51 मुखावरण काढल्याबरोबर लगेचच हात साबण व पाण्याने 40 सेकंद धुवा.
07:58 यासाठी 65% अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर देखील वापरू शकता.
08:04 आता मुखावरण योग्य प्रकारे कसे निर्जंतुक करायचे हे पाहू.
08:09 कृपया याचे पालन सक्तीने करा.
08:12 साबण आणि गरम पाण्याने मुखावरण स्वच्छ धुवा.
08:17 उन्हामधे कमीतकमी पाच तास वाळवा.
08:21 किंवा निर्जंतुक करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करू शकता.
08:25 प्रेशर कुकरमधे पाणी घालून त्यात मुखावरण टाका.
08:29 त्यात मीठ घालून ते कमीत कमी 10 मिनिटे उकळवा.
08:33 मग ते बाहेर काढून स्वच्छ ठिकाणी कोरडे करा.
08:38 अन्यथा मुखावरण 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात उकळून घेऊ शकता.
08:44 आपल्याकडे प्रेशर कुकर किंवा उकळते पाणी नसल्यास साबणाचा वापर करा.
08:51 साबणाने धुवा आणि स्वच्छ करा.
08:54 आणि 5 मिनिटे मुखावरण गरम करा.
08:59 तुम्ही ते गरम करण्यासाठी इस्त्रीचा वापर देखील करू शकता.
09:04 अशी शिफारस आहे की, आपण कमीत कमी दोन मुखावरणे तयार करावीत.
09:09 एक वापरात असताना दुसरे धुऊन वाळवता येईल.
09:13 स्वच्छ मुखावरणे कशी ठेवावीत हे आता जाणून घेऊ.
09:18 कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी घेऊन ती साबण व पाण्याने धुऊन स्वच्छ करा.
09:23 दोन्ही बाजूंनी ती व्यवस्थित कोरडी होऊ द्या.
09:27 या स्वच्छ पिशवीत अतिरिक्त मुखावरण ठेवून ते नीट बंद करून ठेवा.
09:32 आता हे मुखावरण दररोज एकेक करून वापरू शकता.
09:38 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:41 थोडक्यात, या पाठात आपण जाणून घेतले,
09:45 करोना विषाणुमुळे आपल्याला संरक्षक मुखावरण घालण्याची आवश्यकता आहे.
09:51 तसेच आपण महत्वाच्या सूचनांबद्दलही जाणून घेतले.
09:54 आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरगुती मुखावरण वापरू नये.
09:59 कोविड-19 च्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांनी देखील ते वापरू नये.
10:05 कोविड-19 च्या रुग्णांनी देखील हे मुखावरण वापरू नये.
10:10 त्या सर्वांनी विशिष्ट पध्दतीने तयार केलेली संरक्षक सामग्री वापरणे अनिवार्य आहे.
10:15 तसेच आपण सुरक्षिततेच्या खबरदारीबद्दलदेखील जाणून घेतले.
10:19 घरगुती मुखावरण संपूर्ण संरक्षण देत नाहीत.
10:23 मुखावरण धुतल्याशिवाय वापरू नये. तसेच एकच मुखावरण अनेकांनी वापरू नये.
10:29 दोन व्यक्तींमधे कमीत कमी 2 मीटरचे अंतर अनिवार्य आहे.
10:34 साबणाने वारंवार 40 सेकंद हात धुवा.
10:39 आपण शिवणयंत्र वापरून किंवा न वापरता मुखावरण तयार करण्याची पध्दत जाणून घेतली.
10:45 संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी आणि ते काढताना घ्यायची खबरदारी,
10:51 आणि मुखावरणे निर्जंतुक करून योग्य रीतीने ठेवण्याची पध्दत पाहिली.

Contributors and Content Editors

Manali