COVID19/C2/Making-a-protective-face-cover-at-home/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
| ||
00:00 | संरक्षक मुखावरण घरी बनवण्याच्या, स्पोकन ट्युटोरियलच्या या पाठात आपले स्वागत.
- |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोतः |
00:10 | संरक्षक मुखावरण घालण्याची आवश्यकता. | ||
00:14 | आरोग्य कर्मचारी आणि कोविड – 19 च्या रुग्णांसाठी महत्वपूर्ण सूचना. | ||
00:20 | संरक्षक मुखावरणाशी संबंधित सुरक्षिततेची खबरदारी. | ||
00:25 | शिवणयंत्राचा वापर करून आणि न करता मुखावरण तयार करणे. | ||
00:32 | संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी आणि ते काढताना घ्यायची काळजी. | ||
00:38 | संरक्षक मुखावरण निर्जंतुक करण्याची आणि नीट ठेवण्याची योग्य पध्दत. | ||
00:44 | आपण संरक्षक मुखावरण घालण्याची गरज प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. | ||
00:50 | करोना विषाणुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुखावरण घालणे महत्वाचे आहे. | ||
00:56 | भारतातील लोकवस्ती दाट असल्याने मुखावरण घालण्याची विशेष शिफारस केली जाते. | ||
01:03 | करोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रकारची मुखावरणे वापरली जात आहेत. | ||
01:10 | त्यापैकी घरगुती संरक्षक मुखावरण बनवणे सोपे असून ते पुन्हा वापरता येऊ शकते. | ||
01:18 | पुढे जाण्यापूर्वी कृपया महत्वाच्या सूचना लक्षात घेऊ. | ||
01:23 | घरगुती मुखावरण हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नाही. | ||
01:28 | तसेच ते कोविड – 19 च्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी नाही. | ||
01:37 | कोविड – 19 च्या रुग्णांनी घरगुती मुखावरण वापरू नये. | ||
01:42 | या सर्व लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेली विशिष्ट संरक्षक सामग्री वापरावी. | ||
01:48 | सुरक्षेची काळजी घेण्यासाठी इतर काही गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत. | ||
01:53 | घरगुती मुखावरणे संपूर्ण संरक्षण देत नाहीत. | ||
01:58 | ते केवळ संसर्गित व्यक्तीच्या शिंक किंवा खोकल्यातून, हवेत पसरलेले थेंब आपल्या नाका-तोंडात जाण्याची शक्यता कमी करतात. | ||
02:06 | मुखावरण न धुता कधीही वापरू नये. | ||
02:10 | अनेक लोकांत एक मुखावरण वापरू नये. | ||
02:14 | दोन व्यक्तींमधे नेहमीच कमीत कमी 2 मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. | ||
02:21 | साबणाने वारंवार 40 सेकंद तुमचे हात धुवा. | ||
02:26 | आता पुर्नवापर करण्यायोग्य मुखावरण तयार करण्याची सोपी पध्दत बघणार आहोत. | ||
02:33 | हे घरात सहज उपलब्ध असलेल्या सुती कापडाच्या सहाय्याने बनवता येते. | ||
02:38 | हे तयार करताना त्याने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल याची खात्री करा. | ||
02:44 | आपल्याला ते चेहऱ्यावर सहजपणे बांधता आले पाहिजे. | ||
02:49 | घरगुती मुखावरण, शिवणयंत्र वापरून किंवा न वापरता सहजपणे बनवता येते. | ||
02:55 | प्रथम आपण शिवणयंत्र वापरून संरक्षक मुखावरण कसे तयार करायचे ते पाहू. | ||
03:02 | आपण 100% सुती कापड वापरणार आहोत. | ||
03:06 | कापडाचा रंग कुठलाही असला तरी चालेल. | ||
03:10 | मुखावरण तयार करण्यापूर्वी कापड स्वच्छ धुऊन घ्या. | ||
03:13 | आणि ते पाच मिनिटे मिठाच्या पाण्यात उकळवून घ्या. | ||
03:17 | कापड चांगले वाळवून घ्या आणि मग वापरा. | ||
03:21 | इतर आवश्यक साहित्यः | ||
03:23 | कापडाच्या चार पट्ट्या | ||
03:26 | कात्री
आणि शिवणयंत्र. | ||
03:29 | आता मी संरक्षक मुखावरण बनविण्याची पध्दत समजावून सांगणार आहे. | ||
03:34 | प्रथम मुखावरणासाठीचे कापड कापून घेऊ. | ||
03:39 | प्रौढांसाठी ते 9 इंच x 7 इंच असावे. | ||
03:44 | लहान मुलांसाठी ते 7 इंच x 5 इंच असावे. | ||
03:50 | आता पट्ट्या कापून घेऊ. | ||
03:53 | प्रौढांसाठी, मुखावरण बांधण्यासाठी आणि पायपीनसाठी चार पट्ट्या कापा. | ||
03:59 | 1.5 इंच x 5 इंच आकाराचे प्रत्येकी दोन तुकडे. | ||
04:05 | तसेच 1.5 इंच x 40 इंच आकाराचे प्रत्येकी दोन तुकडे. | ||
04:11 | पायपीन म्हणून वापरण्याकरता कापडाच्या एका बाजूला 1.5 इंच x 5 इंचाची पट्टी जोडा. | ||
04:19 | कापडाच्या खालच्या बाजूला तोंड केलेल्या प्रत्येकी 1.5 इंचाच्या तीन घड्या घाला. | ||
04:28 | घड्या घातलेले कापड फिरवून घेऊन दुसऱ्या बाजूसही त्याचप्रकारे घड्या घाला. | ||
04:34 | आता त्या कापडाची उंची 9 इंचावरून 5 इंच होईल. | ||
04:42 | दोन्ही बाजूंनी पायपीन लावून घड्या नीट बसवून घ्या. | ||
04:46 | सर्व घड्या खालच्या दिशेने तोंड केलेल्या स्थितीत असल्याची खात्री करा. | ||
04:51 | पुढे मुखावरणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला 40 इंचाची पट्टी जोडा. | ||
04:59 | पुन्हा एकदा या दोन्ही पट्ट्या तीन वेळा दुमडून त्या शिवून टाका. | ||
05:05 | तुमचे मुखावरण आता वापरण्यासाठी तयार आहे. | ||
05:09 | ते घालताना मुखावरण आणि आपला चेहरा यामधे अजिबात अंतर नसावे. | ||
05:15 | चेहऱ्याच्या बाजूच्या मुखावरणाच्या घड्या खालच्या दिशेने असाव्यात. | ||
05:21 | मुखावरण पुन्हा उलट करून कधीही वापरू नका. | ||
05:24 | आणि प्रत्येक वापरानंतर ते स्वच्छ धुवा. | ||
05:28 | आपल्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका. | ||
05:31 | घरी गेल्यावर लगेच हात स्वच्छ धुवा. | ||
05:35 | आता आपण शिवणयंत्राचा वापर न करता मुखावरण कसे बनवायचे ते पाहू. | ||
05:41 | त्यासाठी आपल्याला आवश्यक आहेः
100% सुती कापड किंवा पुरूषांचा मोठा रूमाल
| ||
05:47 | आणि दोन रबरबँड. | ||
05:50 | आता मी संरक्षक मुखावरण बनवण्याची पध्दत समजावून सांगणार आहे. | ||
05:55 | हातरूमालाची एक कड त्याच्या मध्यभागाच्या थोडी पुढे जाईल अशा तऱ्हेने घडी घाला. | ||
06:01 | आता दुसरी कड पहिल्या कडेवर येईल अशी घडी घाला. | ||
06:07 | आता पुन्हा याची मध्यभागी घडी घाला. | ||
06:11 | एक रबरबँड घेऊन ते रूमालाच्या डाव्या बाजूला बांधा. | ||
06:15 | आता दुसऱ्या बाजूला दुसरे रबरबँड बांधा. | ||
06:20 | दोन रबरबँडमधील जागा पुरेशी मोठी असल्याची खात्री करा. | ||
06:25 | ज्यामुळे आपले तोंड व नाक पूर्णपणे झाकले जाईल. | ||
06:30 | रूमालाच्या एका रबरबँडकडील बाजूची रबरबँडवर घडी घाला. | ||
06:36 | असे दोन्ही बाजूंसाठी करून घ्या. | ||
06:38 | आता एका बाजूची घडी दुसऱ्या बाजूच्या घडीच्या आत घाला. | ||
06:43 | आता आपले मुखावरण वापरण्यासाठी तयार आहे. | ||
06:47 | मुखावरण घालण्यासाठी रबरबँड कानामागे अडकवा. | ||
06:53 | आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नाका-तोंडाभोवती मुखावरण घट्ट बसेल याची खात्री करा. | ||
07:00 | त्या दोहोंमधे कोणतेही अंतर असू नये. | ||
07:04 | घरगुती संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करा. | ||
07:10 | मुखावरण घालण्यापूर्वी आपले हात व्यवस्थित धुवा. | ||
07:14 | मुखावरण ओले किंवा दमट झाले तर लगेच दुसरे मुखावरण घाला. | ||
07:21 | मुखावरणाचा एकदा वापर झाल्यावर ते पुढच्या वेळी वापरण्यासाठी धुऊन घ्या. | ||
07:27 | कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे मुखावरण असणे आवश्यक आहे. | ||
07:32 | मुखावरण काढताना, त्याच्या पुढच्या किंवा कोणत्याही इतर पृष्ठभागाला हात लावू नका. | ||
07:38 | फक्त मागील दोऱ्या किंवा रबरबँड यांनी ते काढा. | ||
07:43 | दोरी असलेल्या मुखावरणाची खालची दोरी आधी सोडा आणि नंतर वरची सोडा. | ||
07:51 | मुखावरण काढल्याबरोबर लगेचच हात साबण व पाण्याने 40 सेकंद धुवा. | ||
07:58 | यासाठी 65% अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर देखील वापरू शकता. | ||
08:04 | आता मुखावरण योग्य प्रकारे कसे निर्जंतुक करायचे हे पाहू. | ||
08:09 | कृपया याचे पालन सक्तीने करा. | ||
08:12 | साबण आणि गरम पाण्याने मुखावरण स्वच्छ धुवा. | ||
08:17 | उन्हामधे कमीतकमी पाच तास वाळवा. | ||
08:21 | किंवा निर्जंतुक करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करू शकता. | ||
08:25 | प्रेशर कुकरमधे पाणी घालून त्यात मुखावरण टाका. | ||
08:29 | त्यात मीठ घालून ते कमीत कमी 10 मिनिटे उकळवा. | ||
08:33 | मग ते बाहेर काढून स्वच्छ ठिकाणी कोरडे करा. | ||
08:38 | अन्यथा मुखावरण 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात उकळून घेऊ शकता. | ||
08:44 | आपल्याकडे प्रेशर कुकर किंवा उकळते पाणी नसल्यास साबणाचा वापर करा. | ||
08:51 | साबणाने धुवा आणि स्वच्छ करा. | ||
08:54 | आणि 5 मिनिटे मुखावरण गरम करा. | ||
08:59 | तुम्ही ते गरम करण्यासाठी इस्त्रीचा वापर देखील करू शकता. | ||
09:04 | अशी शिफारस आहे की, आपण कमीत कमी दोन मुखावरणे तयार करावीत. | ||
09:09 | एक वापरात असताना दुसरे धुऊन वाळवता येईल. | ||
09:13 | स्वच्छ मुखावरणे कशी ठेवावीत हे आता जाणून घेऊ. | ||
09:18 | कुठलीही प्लॅस्टिकची पिशवी घेऊन ती साबण व पाण्याने धुऊन स्वच्छ करा. | ||
09:23 | दोन्ही बाजूंनी ती व्यवस्थित कोरडी होऊ द्या. | ||
09:27 | या स्वच्छ पिशवीत अतिरिक्त मुखावरण ठेवून ते नीट बंद करून ठेवा. | ||
09:32 | आता हे मुखावरण दररोज एकेक करून वापरू शकता. | ||
09:38 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
09:41 | थोडक्यात, या पाठात आपण जाणून घेतले, | ||
09:45 | करोना विषाणुमुळे आपल्याला संरक्षक मुखावरण घालण्याची आवश्यकता आहे. | ||
09:51 | तसेच आपण महत्वाच्या सूचनांबद्दलही जाणून घेतले. | ||
09:54 | आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरगुती मुखावरण वापरू नये. | ||
09:59 | कोविड-19 च्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांनी देखील ते वापरू नये. | ||
10:05 | कोविड-19 च्या रुग्णांनी देखील हे मुखावरण वापरू नये. | ||
10:10 | त्या सर्वांनी विशिष्ट पध्दतीने तयार केलेली संरक्षक सामग्री वापरणे अनिवार्य आहे. | ||
10:15 | तसेच आपण सुरक्षिततेच्या खबरदारीबद्दलदेखील जाणून घेतले. | ||
10:19 | घरगुती मुखावरण संपूर्ण संरक्षण देत नाहीत. | ||
10:23 | मुखावरण धुतल्याशिवाय वापरू नये. तसेच एकच मुखावरण अनेकांनी वापरू नये. | ||
10:29 | दोन व्यक्तींमधे कमीत कमी 2 मीटरचे अंतर अनिवार्य आहे. | ||
10:34 | साबणाने वारंवार 40 सेकंद हात धुवा. | ||
10:39 | आपण शिवणयंत्र वापरून किंवा न वापरता मुखावरण तयार करण्याची पध्दत जाणून घेतली. | ||
10:45 | संरक्षक मुखावरण घालण्यापूर्वी आणि ते काढताना घ्यायची खबरदारी, | ||
10:51 | आणि मुखावरणे निर्जंतुक करून योग्य रीतीने ठेवण्याची पध्दत पाहिली. |